घरगुती गॅस सिलेँडर आणि डीझेलची दरवाढ......पर्यायी इंधन आणि इंधन बचतीचे सोपे मार्ग...

Submitted by ग्रेटथिंकर v 1.... on 13 September, 2012 - 11:48

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात आता फक्त सहा सिलेंडरवर सबसिडी मिळेल ,सातवा सिलेंडर बाजारभावाने रु ७२० ते रु ७८० च्या दरम्यान मिळणार .याचे मध्यमवर्गीयांवर काय परिणाम होतील?
LPG_gas_cylinder-450x350.jpg

डीझेलची दरवाढही पाच रुपये प्रतिलिटर झाली आहे. इंधन दरवाढ गेले काही सततचीच बाब झाली आहे. वीजेच्या वापरावरही भरमसाट खर्च मध्यमवर्गीयांना करावा लागत आहे .
अशा परिस्थीतीत पर्यायी इंधनाचा वापर आणि इंधन बचत अटळ आहे.पर्यायी इंधनाचा ,इंधनाच्या सुयोग्य वापराचे, इंधन बचतीचे मार्ग कोणकोणते आहेत.ज्यांना असे अभिनव उपाय ठाऊक आहेत त्यांनी जरुर मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्चा कसली करायची, एकएक राजकारण्याला गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. सरकार कोळसा खाण घोटाळ्यात आस्तित्वात नसलेल्या कंपन्यांना कंत्राटं देऊ शकतात. सर्व सामान्यांना आवश्यक असलेल्या गॅसवर मात्र सबसिडी देऊ शकत नाही. Angry

ह्याचा अर्थ सरकारचा एकत्र कुटुंबाला विरोध आहे! तसेच कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने सरकारने उचललेले पाऊल! ह्यातून सरकारचा दूर दृष्टीकोन दिसून येतो! वर्षाला ६ नळकांडी पुरवायचे म्हणजे कुटुंब लहान सुख महान! तसेच घरी स्वयंपाक करून खाल्याने होणारा सरकारचा सर्विस टॅक्स मधील तोटा लोक हॉटेलात जावून जेवल्याने दूर होईल. सहा नळकांड्यात जेवण बनविणे पाणी तापविणे आदी गोष्टी तसेच आता आतिथी देवोभव म्हणजे अंगावर काटा!! कारण गॅस चा खप वाढणार.... म्हणजे आपोआप लोकांचे एकमेकांकडे जाणे कमी होवून पर्यायाने पेट्रोल आनि डिझेलची बचत... म्हणजेच आमच्या द्रष्ट्या सरकारची अजून एक दूर दृष्टी!!

शाबास पेट्रोलियम मंत्री!! शाबास सरकार!!!

निव्वळ घरगुती गॅसमध्येच नव्हे तर डिझेलच्या दरातही ५ ते ७ रुपयापर्यंत वाढ झाली असून ती आज मध्यरात्रीपासून अंमलात येईल.

बेस्ट, पीएमटी...केएमटी...एस.टी....आरामगाड्या...निमआराम...यांच्या प्रवास दरात होऊ घातलेल्या दरवाढीने प्रवाशी नावाच्या इसमाला चक्कर येणार हे नक्की.

ट्रक्स मालवाहतूक दरही अर्थातच वाढणार, त्याचा परिणाम भाजीपाला दरावर होईल हे तर आता केजीतील पोरही सांगू शकेल.

भोगत राहाणे....दुसरे काय.

एकेका घरातवेगवेगळ्या नावावर घेतलेली वेगवेगळ्या कम्पन्यांची किती कनेक्शन्स आहेत? त्यातली बाथरूममध्ये पाणी तापवण्यासाठी किती वापरली जातात? आणि चार चाकी गाड्यांना फिट करून किती वापरली जातात? वेटरांच्या नावावर कनेक्श्न्स घेऊन हॉटेलमध्ये कोण वापरते? तो कूकिंग गॅस आहे. आंघोळीसाठी आणि गाड्या चालवण्यासाठी नव्हे....

बाळू जोशींना प्लसवन.

सहा सिलेंडर्सचा निर्णय योग्यच आहे. कधीच घ्यायला हवा होता. सबसिडाईज्ड दरात फक्त पिवळे कार्डधारकांना सिलेंडर्स दिले पाहिजेत. मध्यमवर्गीयांना याची काहीही गरज नाही.

आहे. एका वर्षात आता फक्त सहा सिलेंडरवर सबसिडी मिळेल ,सातवा सिलेंडर बाजारभावाने रु ७५० च्या आसपास मिळणार >> सबसिदाईझ्ड सिलेंडरची किम्मत काय आहे?

सहा सिलेंडर्सचा निर्णय योग्यच आहे. << सहा सिलेंडर ही छुपी दरवाढ आहे
साधारण पणे ५ लोकांच्या कुटुंबाला १.५ महिने एक सिलेंडर पुरतो त्यामुळॅ वर्षाला त्याला ९ सिलेंडर घ्यावेच लागतील यादराने सरासरी १००-१२० रु दरवाढ केलीये सरकारने

पिवळे कार्ड धारक???

हे एक मिथ आहे. बक्कळ पैसा कमावणारे दुकानदार पिवळे कार्ड धारक असलेले पाहिले आहेत.

रेशन कार्ड इश्यू करण्याची प्रक्रिया पारदर्शक आहे का?

४ माणसांच्या कुटूंबाला १-१.५ महिनाच सिलिंडर पुरत असावा. त्यामुळे निदान सिलिंडरची संख्या तरी वाढवावी.

दुसरी गोष्ट म्हणजे करदात्यांचा पैसा हे लोग अब्जावधींचे घोटाळे करून लाटणार आणि खजिना रिकामा झाला की मग त्याच करदात्यांच्या सबसिड्या बंद करणार. संतापजनक आहे हे सगळे

बी, सबसिडी असलेला सिलेंडर ४१० रुपये किमतीला मिळतो ,त्यात राज्य सरकारची ड्युटीधरुन महाराष्ट्रात ४३० ते ४५० ला मिळतो.

स्_सा +१०००००

लॉजीकली जरा विचार करा. माझ्या घरात आम्ही तिघेच आहोत. तरी ही १.५ महीना एक सिलेंडर पुरतो Sad
म्हणजे वर्षाला ९ सिलेंडर लागणारच,

आणि मी ना तो कारसाठी वापरत ना हॉटेलसाठी!!!!!
मला वाट्ते, चुलीच पेट्वाव्यात आता Happy

पिवळे कार्ड धारक???>>>>

अहो महिना लाखो कमावणारे पिवळे कार्ड धारक आहेत येथे! ही गळचीपी केवळ प्रामाणिकपणे कर भरणार्‍यांची आहे! चौकोनी कुटुंबाला पण ६ सिलेंडर पुरणार नाहीत वर्षाला... ज्यांचे एकत्र कुटुंब आहे त्यांचे काय? आणि ज्यांच्यापाशी २ कंपन्यांचे कनेक्शन आहे त्यंचा शोध घेणार होते त्याचे काय झाले? घ्या ना तो शोध कारण ह्या चोरांचेच पित्ते सापडतील त्यात!
हॉटेल वाल्यांना घरगुती सिलेंडर पुरविणारे काय सामन्य लोकं आहेत? हेच मंडळी ह्यांना ठाऊक असते सगळे! सगळी लबाडी बाहेर काढली तर ह्यांचेच पितळ उघडे पडेल...सामान्यांनी तोंड दाबून ह्या बुक्क्यांचा मार सोसायचा बाकी काही नाही!

तो कूकिंग गॅस आहे. आंघोळीसाठी आणि गाड्या चालवण्यासाठी नव्हे....>>>>> ज्यांना दिड महिण्यापेक्षा जास्त दिवस जेवण बनविण्यासाठी पुरत असेल त्यांच्या कडे एक महिना जेवायला राहुन पहायला हवे! आमच्या घरात आई वडील आनि आही चौघे अश्या सहा जणांना सव्वा महिना जास्ती जास्त पुरतो...

गॅस बचतीचे मार्ग दाखविल्यास अश्या किमान दोन सव्वा दोन महिने सिलेण्डर वापरणार्‍यांचा सत्कार ठेऊया (अर्थात त्यांच्या घरात किमान ६ जण आणि रोज दोन वेळचा स्वयंपाक व न्याहारी चहा वैगेरे घरी बनविणारे असावे ही किमान अपेक्षा ता. क. आलेल्या पाहुण्याना किमान चहा देणारे असावेत Proud ) !

अर्थात माझा विरोध भाव वाढीला मुळीच नाही ती करण्यासाठी जे गणित वापरलय ते चुकेचे!
किंबहुना सरसकट २५-३० रुपये वाढविले तर तुट बरीच कमी होईल... दुसरे म्हणजे सिलेण्डर देण्यात होणारा भ्रष्टाचार कामी व्हायला हवा... हॉटेल मध्ये घरगुती सिलेण्डर वापरतात हे सार्‍यांना माहिती आहे... पण कारवाई शुन्य... एकाच घरात दोन एजन्सीचे कनेक्शन कारवाई शुन्य... गाड्यांना सिलेण्डर कारवाई शुन्य... ही चोरी पकडा... आणि जादा पैसे घेऊन नंबर आधी देणारे मधले... ते शोधा.. खुप फायदा होईल...

एकेका घरातवेगवेगळ्या नावावर घेतलेली वेगवेगळ्या कम्पन्यांची किती कनेक्शन्स आहेत? त्यातली बाथरूममध्ये पाणी तापवण्यासाठी किती वापरली जातात? आणि चार चाकी गाड्यांना फिट करून किती वापरली जातात?
------ बाजो भारतात सर्वांकडे चार चाकी नाही आहे.

४ लोकांच्या कुटुंबात दोन महिने सिलेंडर पुरत नाही यास अनुमोदन, आमच्या कडे ५ आठवडे सिलेंडर जायचे (६ आठवडे म्हणजे डोक्यावरुन पाणि). आता आठवड्याला ३ वेळा बाहेर जेवणार्‍यांना फरक पडणार नाही :स्मित:.

जो ११० रु कीलोचे चिकन / मटण खावू श़कतो त्याने बोंब मारु नये..>>>>>>> एकदा मटणाचे भाव चेक करणार का???? Happy

(अर्थात त्यांच्या घरात किमान ६ जण आणि रोज दोन वेळचा स्वयंपाक व न्याहारी चहा वैगेरे घरी बनविणारे असावे ही किमान अपेक्षा ता. क. आलेल्या पाहुण्याना किमान चहा देणारे असावेत>>>>> याकरता एक सिलेंडर जस्तीत जास्त एक महिना पुरतो...

>>करदात्यांचा पैसा हे लोग अब्जावधींचे घोटाळे करून लाटणार आणि खजिना रिकामा झाला की मग त्याच करदात्यांच्या सबसिड्या बंद करणार. संतापजनक आहे हे सगळे>> +१०००००

>>एकेका घरातवेगवेगळ्या नावावर घेतलेली वेगवेगळ्या कम्पन्यांची किती कनेक्शन्स आहेत? त्यातली बाथरूममध्ये पाणी तापवण्यासाठी किती वापरली जातात? आणि चार चाकी गाड्यांना फिट करून किती वापरली जातात? वेटरांच्या नावावर कनेक्श्न्स घेऊन हॉटेलमध्ये कोण वापरते?>> ह्यात पाणी तापवण्याचा संदर्भ सोडला तर बा़की उद्योग मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या घरात नक्कीच होत नसतील. कूकिंग गॅसवर आंघोळीचे पाणी तापवू नये हे विधान मुळात बिनबुडाचे आहे. एकीकडे वीजेच्या बिलात भरमसाठ बाढ दुसरीकडे हे असं. खरच आता सरकारने प्रत्येक घरागणिक चुली बंधनकारक कराव्यात.

<< दुसरे म्हणजे सिलेण्डर देण्यात होणारा भ्रष्टाचार कामी व्हायला हवा... हॉटेल मध्ये घरगुती सिलेण्डर वापरतात हे सार्‍यांना माहिती आहे... पण कारवाई शुन्य... एकाच घरात दोन एजन्सीचे कनेक्शन कारवाई शुन्य... गाड्यांना सिलेण्डर कारवाई शुन्य... ही चोरी पकडा... आणि जादा पैसे घेऊन नंबर आधी देणारे मधले... ते शोधा.. खुप फायदा होईल...>> ह्याला अनुमोदन आहेच!

आमच्या घरातील उदाहरण-

घरातील माणसे- ६ ( २ लहान + ४ मोठी) - २ महिने एक सिलेंडर पुरतो!

  1. आंघोळीसाठीचे पाणी सूर्य ऊर्जेवर तापवतो.
  2. चहा एकदाच करतो- परत परत गरम करावयाचा असल्यास मायक्रोवेव्ह वापरतो.
  3. मोठा, छोटा कुकर नियमित वापरतो. बर्‍याच लोकाना कुकरमधील भाजीची चव आवडत नाही (आम्हाला ती अडचण नाही).
  4. ४. कढईतील भाज्या झाकण ठेवून शिजवणे, गरजेपुरतेच पाणी घालणे, कडधान्य आधी भिजवून ठेवणे ह्या गोष्टी पाळतो.

स्वयंपाक सर्वसामान्य घरात असतो तोच असतो, अर्थात फार तरतर्‍हा नसतात( मला आवड नाहिए :-)) हॉटेलिंग वगैरे फार नाही ( २ आठवड्यातून एकदा वगैरे)

स्वयंपाकाचा गॅस फक्त स्वयंपाकासाठी वापरला तर बरोब्बर २ महिने पुरतो. त्यावर आंघोळीचे पाणी गरम केले की पुरत नाही. बाजो +१

ज्यांना सबसिडी द्यायची गरज आहे त्यांच्या बँक खात्यावर सरळ कॅश सबसिडी जमा करून सरसकट सर्वच सिलंडर्स(च नव्हे तर तमाम सबसिडाईज्ड वस्तू) कमर्शिअल रेटने पुरवावेत असे माझे मत आहे. म्हणजे ९०% ग्यासवर धावणार्‍या गाड्या, हॉटेलवाले, लग्न-समारंभवाले इ.इ. जो भरमसाठ सबसिडाईज्ड एल.पी.जी. वापरतात तो वापर उरायला लागेल. मागणी कमी अन पुरवठा जास्त असे चित्र तयार होईल अन गॅसची किम्मत उतरेल! नाही उतरली, तरी कमीतकमी बिना त्रासाने मागितल्याबरोबर घरपोच गॅस येईल.

किंमत फुगण्यामागे टॅक्सेशन हे दुसरे कारण आहे. वाट्टेल तसे टॅक्स, अगदी सेंट्रल एक्साईजपासून लोकल जकातीपर्यंत लावून किम्मत वाढलेली दिसते. हे सगळ्याच राज्यांत आहे. अमक्या पार्टीचे सरकार आले की टॅक्स गायब होईल असे होणार नाही, असे वाटते.

>> उदयजी, अहो, सर्वांकडे गॅसच्या चारचाकी नसल्या तरी हे विजेसारखे आहे. वीजचोरी करणार्‍यांची बिले 'वीजगळती' झाली असे सांगून कंपनी तुमच्या माझ्या खिशातून वसूल करीत असते. (वरून त्यांची मोनोपली असल्याने बोम्बही मारता येत नाही..) त्याचप्रमाणे सबसिडीचा एक सिलिंडर चोरबाजारात गेला कि ते एक्स्ट्रा ३०० रुप्ये तुमच्या माझ्याच खिशातून निघतात. १०० कोटीच्या देशात ५० लाख चोरीचा ग्यास वापरणार्‍या गाड्या असल्या तरी महिना किती रुपयाचा भुर्दंड बसतो ते बघा विचार करून Sad

<त्यातली बाथरूममध्ये पाणी तापवण्यासाठी किती वापरली जातात? आणि चार चाकी गाड्यांना फिट करून किती वापरली जातात? वेटरांच्या नावावर कनेक्श्न्स घेऊन हॉटेलमध्ये कोण वापरते?>> ह्यात पाणी तापवण्याचा संदर्भ सोडला तर बा़की उद्योग मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या घरात नक्कीच होत नसतील

एका निमसरकारी संस्थेत शिपाई (peon) म्हणून सेवारत असलेल्याने गॅसवर चालणारी सेकंडहँड चारचाकी घेतली होती. विकणाराही मध्यमवर्गीयच होता. दोघेही स्वयंपाकाचा गॅस वापरूनच गाडी चालवायचे.

पाइप गॅस मिळालेल्या लोकांनी सरेंडर न केलेल्या सिलिंडर्सची संख्या लाखात आहे.

अनन्या_न
>> कूकिंग गॅसवर आंघोळीचे पाणी तापवू नये हे विधान मुळात बिनबुडाचे आहे. एकीकडे वीजेच्या बिलात भरमसाठ बाढ दुसरीकडे हे असं. खरच आता सरकार्ने प्रत्येक घरागणिक चुली बंधनकारक कराव्यात.<<
प्रत्येक घरागणिक सौरचुली बंधनकारक कराव्यात का? खरेच उत्तम होईल..

प्रत्येक घरागणिक सौरचुली बंधनकारक कराव्यात का? खरेच उत्तम होईल..>>>>>> हे शक्य होणार नाही.. किमान फ्लॅट मधे राहणार्‍यांना तरी..

<हे शक्य होणार नाही.. किमान फ्लॅट मधे राहणार्‍यांना तरी..> हाउसिंग सोसायटीला सोलर वॉटर हिटर लावणे शक्य आहे. नव्या इमारतींना रेन वॉटर हार्व्हेस्टिंगप्रमाणे हेही अनिवार्य करायला हवे.

हाउसिंग सोसायटीला सोलर वॉटर हिटर लावणे शक्य आहे.>>>>>>> हे शक्य आहे, खर्चिक असलं तरिही शक्य होण्याजोगं आहे.. मी सौरचुली शक्य नाही असं म्हणत होते..

भरत मयेकरजी तुम्ही सांगितलेले उदाहरण असतील हे मान्य पण मोजकीच ना. पण ओल्याबरोबर सुकेही जळते ना Sad आमच्याकडे पाच जणांचे कुटुंब आहे. सकाळी ऑफिस शाळा मध्ये जाण्याच्या, घाईगडबडीत बर्‍याच वेळेला गॅसवर पाणी तापवणे आवश्यक होते.
>>प्रत्येक घरागणिक सौरचुली बंधनकारक कराव्यात का? खरेच उत्तम होईल..>> ही कल्पना चांगलीच आहे. पण चिमुरीने म्हटल्याप्रमाणे हे सरसकट शक्य नाही. आमच्याच घरात सकाळचे मोजून एक ते दीड तास उन येत. तेही कडक नाहीच. आणि आता समोर नवीन बिल्डिंग होत असल्यामुळे तेही कमी होणार आहे. म्हण्जे मग आता स्वयंपाकासाठी गच्चीतच ठाण मांडावे तर.

माझे आई वडील दोघेच रहातात. जेवायला वगैरे येणारे पाहुणे फारच कमी. घरात इलेक्ट्रीक गिझर आहे. पण त्यांचा वॉटर प्युरीफायरवर विश्वास नसल्याने ते प्यायचे पाणी उकळून पितात. त्यांना २ महिने एक सिलिंडर पुरते. माझ्या मते हा मिनिमम वापर आहे. सरकारने कोणत्या निकषावर ६ सिलिंडरची मर्यादा ठरवली आहे?

अनन्याजी,
मी तुमच्या 'चुली बंधनकारक' वर 'सौरचुली' असं म्हटलो होतो. मला सौरउर्जा वापरच अभिप्रेत होता. सोलर वॉटर हिटर्सवर प्रचण्ड सबसिडी आपल्याला मिळू शकते. कमीतकमी गरम पाण्याचा प्रश्न सुटतो.

सोलर वॉटर हिटर्सवर प्रचण्ड सबसिडी आपल्याला मिळू शकते>>
लवकरात लवकर ही सबसिडी वापरली पाहिजे, नायतर ही देखील बंद होइल. Wink

आमची कामवाली म्हणालि, 'अरेरे मॅडम तुमचे तर हाल होणार'
मी म्हटलं बाई तुम्ही काय करणार तर म्हणाली 'अभयारण्यातून आणलेल्या लाकडांवर पाणी तापवणे आणि भाकर्या करतो आम्ही आणि बाकीचा स्वयंपाक कॉईलवर.' मी म्हटलं 'मग आपल्याकडे पण हॉटप्लेटवर स्वयंपाक करत जा '
तर म्हणाली 'तुम्हाला काय परवडतय मॅडम ,आमच्याकडे भाग्यज्योती योजनेची वीज आहे. ' Happy
ही अगदी आज सकाळी घडलेली खरीखुरी घटना आहे.

सोलर वॉटर हिटर्सवर प्रचण्ड सबसिडी आपल्याला मिळू शकते.<<<<
इब्लीस - जरा खुलासेवार डिटेल्ड लिहिणार का तुमच्या वाक्यातील प्रचण्ड सबसिडी हा शब्द फार आवडला. मला सोलर चुल आणि हिटर दोन्ही बसवायचे आहेतच ........................

Pages