अध्यात्म

Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 9 September, 2012 - 10:11

अध्यात्म
म्हणतात सगळे
अध्यात्मिक असावे
म्हणतात सगळे कि धार्मिक असावे
कोणाला कळलंय कि अध्यात्म काय असते ?
कोणाला कळलंय कि धर्म काय असतो ?
सकाळी दररोज पूजा करतो मी देवाची !
उपवास करतो मी सोमवारचा न चुकता ~!
मी डोक्यावर शेंडीपण ठेवली आहे !
कपाळावर माझ्या मोठा टीका असतो लाल लाल !
कृपा आहे माझ्या गुरूंची माझ्यावर !
पण संकट आली कि त्याचं धावा करतो !
एकशे आठ मण्यांच्या मालेने जप कतो मी दररोज !
घरी माझ्या गीता आहे
घरी माझ्या भागवत आहे !
मी वाचतो दररोज गीता !
मी आरत्या म्हणतो दररोज सकाळी !
आता गणपती येणार आहे माझ्या घरी !
तुम्ही काही म्हणा मला
पण मी अध्यात्मिक आहे
पण मी धार्मिक आहे !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users