हा असा येईन मी, वेळीअवेळी!

Submitted by सतीश देवपूरकर on 6 September, 2012 - 09:36

गझल
हा असा येईन मी, वेळीअवेळी!
वेळही पाळीन मी, वेळीअवेळी!!

साद केव्हाही चकोरासारखी दे...
चांदणे होईन मी, वेळीअवेळी!

तू जिवाचे कान केलेले दिसू दे;
पैंजणे बांधीन मी, वेळीअवेळी!

स्पंदने हृदयातली जागी असू दे!
दार ठोठावीन मी, वेळीअवेळी!!

प्रश्न माझे नीट वारंवार वाचा!
उत्तरे देईन मी, वेळीअवेळी!!

तू नको समजूस एकाकी स्वत:ला;
आत बघ...प्रकटीन मी, वेळीअवेळी!

लेखणी तैनात राहू दे हमेशा;
शायरी सुचवीन मी, वेळीअवेळी!

धून गझलेची तुझ्या आहे नव्या मी!
अंतरी उसळीन मी, वेळीअवेळी!!

माणसांच्या लोचनांची शीक भाषा....
लोचनी तरळीन मी, वेळीअवेळी!

ठेव आटोक्यात तू मैफील आता!
भैरवी गाईन मी, वेळीअवेळी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

चकोर चकोर. आलाच पक्षी एकदाचा शेवटी. काय हो सतीश देवपूरकर? तुमचे प्रश्न लोकांनी नीट वारंवार वाचायचे आणि तुम्ही मात्र उत्तरे वेळीअवेळी देणार हा कुठला न्याय? या कवितेचा अर्थ काय ते सांगता का? काही कळलेच नाही मला तरी. सुधाकर मात्र आपला भक्तीभावाने प्रतिसाद देतो तुम्हाला. हृदयातली स्पंदने जागी असूदेत म्हणताय, ती झोपली तर माणूस उठेल ना आयुष्यातून? कैच्याकै तर्कविसंगत खरडता का? लिटल जिमी संतप्त झाला आहे ही कविता वाचून, थैमान घालत आहे तो घरात. लिटल जिमी, पुन्हा नाही हं देवमामा असे लिहिणार! उगी उगी.

शेर गझल समजत नाही कारण या क्षेत्रातली नाही, तरीही शेवटची भैरवीची ओळ खूप आवडली. तसा मैफीलीचा समारोप करण्यासाठीच भैरवी गातात, तरी आवडली गझल.