झटपट मँगो केक

Submitted by नानबा on 5 September, 2012 - 21:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अंडं, मँगो पल्प, बेकिंग पावडर, वेलची पूड (असल्यास), गव्हाचं पीठ, तूप, साखर आणि मायक्रोवेव्ह

क्रमवार पाककृती: 

१ अंड फोडून काचेच्या भांड्यात फेटून घ्या
त्यात १ अंड्या एवढाचं मँगो पल्प घाला
त्यात २ ते ३ चिमूट बेकिंग पावडर घालून हे मिश्रण चांगलं घोटून घ्या.
त्यात २ चमचे गव्हाचं पीठ घालून पुन्हा घोटून घ्या. (हातावर काढायच्या मेंदीच्या कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार होईल. इतपत गव्हाचं पीठ)
मिश्रणाची चव बघून हवी असल्यास साखर घाला, वेलची पावडर घाला, एक ते दीड चमचा तूप घाला.
मिश्रण चांगलं घोटून ते काचेचं भांडं मायक्रोवेव्ह मधे ठेवा. २.५ मिनिट्स हाय वरती आच द्या
ह्या सगळ्या प्रकारात अंदाजे पाच मिनिट्स निघून जातील
आता ३-४ मिनिटस नुसतीच वाट बघा.. किंवा आणखीन थोडा पल्प वापरून आयसिंग तयार करा Wink

टॅडा.... मँगो केक तयार!

वाढणी/प्रमाण: 
२ गोड अती न खाणारी माणसं
अधिक टिपा: 

- माझा मायक्रोवेव्ह बर्‍यापैकी पॉवरफुल आहे.. तुमच्या मायक्रोवेव्हच्या ताकदीवर वेळ जरासा अ‍ॅड्जस्ट करा
- मी थोडेसे बदामाचे काप घातलेले, भारी लागले..
- आता ह्यात वेगवेगळी फळं घालून प्रयोग करण्यात येतील..
- टूटी फ्रुटी घालावी का?
- गव्हाचं पीठ - मैदा नाही म्हणजे (त्यातल्या त्यात) हेल्दी.
- अगदीच झटपट झाला.. मूड आल्यापासून दहा मिनिटात केक तयार...
- तुम्ही तयारीचे असाल तर मूड आल्यापासून दहा मिनिटात केक फस्तही करु शकता!
- केक चांगला स्पॉजी झालेला.. गरम भारी लागला.. गारही भारीच लागला!

माहितीचा स्रोत: 
साक्षीच्या रेसिपीवरून मायक्रोवेव्ह मधे केक होतं कळलं, त्यावरून प्रयोग.. http://www.maayboli.com/node/36508
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॅडा.... मँगो केक तयार! >>> असा आवाज येतो का केक तयार होताना Lol
सॉरी हं मला केक पेक्षा त्यातले विनोद जास्त आवडले Proud

असू शकेल प्रसिक.. पण नंतर घातली बेपा तर मिक्स होईल का नीट?
बेंकिंग एक्स्पर्ट लाजो सांगू शकेल..
( हा केक मस्त स्पाँजी झालेला पण)

अनु, बिन अंड्याच्या रेसिपीसाठी साक्षीची रेसिपी आहे ना

दिनेशदा.. मी मायक्रोवेव्ह वापरलेला(ओवन नाही) - त्यामुळे सेंटिंग काहीच नाही केलं.. हाय आणि २- २.५ मिनिट्स, बस!