जुलै २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके

Submitted by admin on 13 August, 2012 - 11:22

जुलै २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके

dreamruner_OscarCover.jpg ड्रीमरनर - ऒस्कर पिस्टोरिअस, सहलेखक - गियन्नी मेरलो, अनुवाद - सोनाली नवांगुळ ऑस्कर पिस्टोरिअस, ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कृत्रिम पायांनिशी धावणारा पहिला स्पर्धक. 'ड्रीमरनर' या ऑस्कर पिस्टोरिअसच्या आत्मकथनाचा मराठीत अनुवाद करणार्‍या सोनाली नवांगुळ यांचं या पुस्तकाविषयीचं मनोगत, आणि मनोविकास प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणाची काही पानं मायबोली अक्षरवार्तेत वाचू शकता.

p-18069.jpg सुलभ महाभारत - राजा मंगळवेढेकर चित्रकार: गोपाळ नांदुरकर.
महाभारत हे भारतीय संस्कृतीतले महाकाव्य असून तो भारताचा ठेवा आहे. राजे आणि राज्य नष्ट होतात, निर्माण होतात. वेगवेगळ्या सत्तांचा उदय होता, अस्त होतो. मानवी स्वभाव आणि वर्तणूक यांचे वर्णन असणारं हे महाकाव्य वेगवेगळ्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे काव्य म्हणझे गोष्टीरूप खजिना आहे. मंगळवेढेकरांनी या गोष्टी सहजसोप्या भाषेत सांगितल्या आहेत. तर गोपाळ नांदुकरांच्या पूरक चित्रांनी पुस्तक अधिक चांगलं झालं आहे.

p-18071.jpg हिताच्या गोष्टी प्र.ग.सहस्रबुद्धे चित्रकार: पुण्डलीक वझे हितोपदेशातील लहान मुलांना आवडतील अशा गोष्टींच्या या संग्रहात प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे यांनी सुंदर चित्रे काढली आहेत.

p-18073.jpg पेन्सिल टेक्निक्स - ग्राफाइट राहुल देशपांडे गोपाळ नांदुरकर ग्राफाइट प्रकारातल्या हार्ड ग्रेडपासून सॉफ्ट ग्रेडपर्यंतच्या पेन्सिली चित्रनिर्मितीसाठी विविध पद्धतीने कशा वापरता येतात याची माहिती अनेक तंत्रांसह या पुस्तकात दिली आहे. सोबत मेकॅनिकल, वुडलेस ग्राफाइट व वॉटरसोल्युबल असे पेन्सिलचे आधुनिक प्रकार कसे हाताळावेत याचेही मार्गदर्शन केले आहे. गॅलरीमध्ये पेन्सिलच्या अनेक तंत्रांचा वापर करून साकारलेली विविध विषयांवरील चित्रे पेन्सिल माध्यमाच्या अमर्याद शक्यता दर्शवतात.

रंगलेपन तंत्र व मंत्र पुण्डलीक वझे
सध्या अनेकांकडे क्रेयॉन, पेस्टल, कलर पेन्सिल, वॉटर कलर, पोस्टर कलर असे विविध प्रकारचे रंग असतात. या प्रत्येक रंगाचे काही गुणदोष व स्वतःची अशी वैशिष्ट्ये असतात. या पुस्तकात वझे यांनी या प्रत्येक माध्यमाची वैशिष्ट्ये, हाताळण्याची पद्धत, दोन माध्यमांतला फरक, वेळप्रसंगी ती एकत्रितरीत्या कशी वापरायची अशी सारी माहिती अनेक उदाहरणांच्या साहाय्याने दिली आहे. वझे यांनी ही माहिती सांगताना वेळोवेळी केलेल्या सूचना, चित्रासोबत येणारे त्यांचे मनोगत यामुळे कलात्मक जाणीव विकसित व्हायलाही मदत होईल.

स्केचिंग अॅन्ड ड्रॉइंग - माझा दृष्टिकोन शिवाजी तुपे संपादन: राहुल देशपांडे. चित्रकार शिवाजी तुपे गेली पन्नासहून अधिक वर्षे निसर्गचित्रणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी निसर्गचित्रणाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी भ्रमंती केली आहे. विविध रंगमाध्यमांप्रमाणेच त्यांनी पेन अॅन्ड इंक या माध्यमात वैशिष्ट्यपूर्ण काम केले आहे. या पुस्तकात आउटडोअर स्केचिंगबद्दलचे त्यांचे विचार, काम करण्याच्या विविध पद्धती व माध्यमाची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली आहेत. यातली त्यांची चित्रे पाहताना या माध्यमातल्या चित्रनिर्मितीच्या शक्यता लक्षात येतात.

p-18081.jpg अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तीकर - मिलिंद संगोराम
स्वत:कडे पैसे असताना घर घ्यायचे असेल तर, `ओन फंड्स' वापरायचे की `लोन फड्स'? ...या आणि अशा अनेक प्रश्नांवर, भरपूर उदाहरणांसह सोप्या भाषेत लिहिलेले आणि तुम्हांला श्रीमंत करणारे पुस्तक.

p-18082.jpg कृपाबाई सत्यनादन अनुवाद: रोहिणी तुकदेव एकोणिसाव्या शतकात कृपाबाई सत्यनादन यांनी इंग्रजी कादंबरी लिहिली, ही घटनाच महत्वपूर्ण. मुंबई इलाख्यातील धर्मांतरित जोडपे हरीपंत आणि राधाबाई. त्यांची कन्या कृपाबाई. विवाहानंतर कृपाबाई मद्रास प्रांतात राहिल्या. बुद्धीचे वरदान लाभलेल्या कृपाबाईंनी प्रकृती अस्वास्थ्याला तोंड देत लेखन केले. मुस्लिम शाळाही काढली. 'कमला' या त्यांच्या पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या पहिल्या कादंबरीचा हा अनुवाद. या कादंबरीत एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील कौटुंबिक - सामाजिक वातावरणाचे दर्शन घडते. पारंपारिक चौकटीतून बाहेर पडून नवे भान स्वीकारणारी ही नायिका ! रोहिणी तुकदेव यांच्या रसाळ शैलीमुळे सहज सुंदर झालेला हा भावानुवाद ....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'मुस्लिम मनाचा शोध' हे शेषराव मोरे यांचे आता वाचनात असलेले व्यासंगपूर्ण पुस्तक.मर्यादित प्रतींची स्वप्रकाशित आवृत्ती लेखकाने मित्रमंडळींकडून अर्थसहाय्य घेऊन काढलेली वाचनात आली. आपण दखल घ्यावी असे वाटले..

डॉ. सुप्रिया संत यांचं 'अमलताश' आणि प्रकाश नारायण संत यांचं 'चांदण्यांचा रस्ता' ही दोन्ही पुस्तकं मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहेत.

http://kharedi.maayboli.com/shop/Amaltash.html

http://kharedi.maayboli.com/shop/ndanyacha-Rasta.html

डॉ. गिरीश कर्नाड यांचं आत्मचरित्र आता मराठीत आलं आहे. उमा कुलकर्णी यांनी 'खेळता खेळता आयुष्य' या नावानी हा अनुवाद केला आहे. हे आत्मचरित्रही मायबोलीवर उपलब्ध आहे.

http://kharedi.maayboli.com/shop/Khelata-khelata-Aayushya.html

डॉ. नरेंद्र दाभोळकरांची काही पुस्तकं -

१. भ्रम आणि निरास - http://kharedi.maayboli.com/shop/Bhram-Aani-Niras.html
२. विचार तर कराल? - http://kharedi.maayboli.com/shop/Vichar-Tar-Karal.html
३. अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - http://kharedi.maayboli.com/shop/Andhashradhda-Prashnachinha-Aani-Purnav...
४. अंधश्रद्धा विनाशाय - http://kharedi.maayboli.com/shop/Andhashradhda-Vinashay.html
५. मती -भानामती - http://kharedi.maayboli.com/shop/Mati-Bhanamati.html
६. प्रश्न मनाचे - http://kharedi.maayboli.com/shop/Prashna-Manache.html
७. श्रद्धा- अंधश्रद्धा - http://kharedi.maayboli.com/shop/Shradha-Ani-Andhashrada.html
८. तिमिरातुनी तेजाकडे - http://kharedi.maayboli.com/shop/Timiratuna-Tejakade.html