महाराष्ट्र मंडळ लॉस एंजल्स - गणेशोत्सव २००७

P1010476.JPG

दरवर्षी प्रमाणे यंदाही लॉस एंजल्स महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव शनिवार दि. २२ सप्टेंबरला दणक्यात पार पडला. कधी नव्हे ते इथे शुक्रवार रात्रीपासुन जोरदार पाउस पडत होता. तरीही ५५० भाविकानी उत्सवाला हजेरी लावली होती.

सकाळी पूजा, लहान मुलांच्या स्पर्धा, आरती, महाप्रसाद झाल्यावर दुपारी "तात्याची वाणी आणि मराठी गाणी" हा कार्यक्रम झाला. नंतर उत्तर पूज आणि आरती झाल्यावर सर्व जण मॅनहॅटन बिचवर गणेश मुर्तीचे विसर्जन करायला गेले. वरील छायाचित्र तेव्हाच्या मिरवणुकीचे आहे.


सही !
एकदम भारतातली मिरवणूक वाटतेयः)
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !



अगदी अगदी!... स्मित



काल शिकागोत पण मंडळाचा गणपती कार्यक्रम होता. २५०+ लोक आले होते पण अशी मिरवनुक न्हवती. पुढच्या वेळी काढता येइल का ते पाहावे लागेल.