फरारी

Submitted by तुटता तारा on 3 August, 2012 - 16:45

नमस्कार, ही माझी पहिलीच गझल(?) आहे. मी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तो सफल झाला आहे की नाही ठाऊक नाही. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती. टीकेचे स्वागत आहे.(अर्थात त्या योग्य रचना असल्यास.)

देव तारी कोण मारी
देव मारी कोण तारी ?

काय सांगू काय बोलू
माणसे माझीच सारी

व्याज उपकारी असे हे
परवडत नाही उधारी

नीट द्या फेकू नका हो
बोलला साधा भिकारी

घ्यायची आहे भरारी
मी कसा होऊ फरारी ?

-तुटता तारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा वा

पर्फेक्ट वाटली मलातरी
अर्थात तज्ञ येवून सान्गतीलच जर काही त्रुटी असतील तर ....चुका नक्कीच नाहीयत माझ्यामते

सहजसुन्दर शैली आवडली .
खयाल भारीच आहेत .
पहिल्याच प्रयत्नात छोटा बहर हे कै खायचं काम नैयय . ( म्हणूनच... 'पहिलाच प्रयत्न' (???)...शन्का उपस्थित करायला प्रचण्ड वाव आहे !!)

असो
गझलेच्या या दरबारात हार्दिक स्वागत
लाख लाख शुभेच्छा

आपला
-वैवकु

खूप धन्यवाद ऑर्फिअस...
बेफिकीर जी...तुमची वाहवा मिळाली...धन्य झालो...मी तुमच्या गझलांचा मोठा चाहता आहे...