पुण्यातील विश्वासार्ह भविष्यवेत्ता

Submitted by प्रार्थना on 13 July, 2012 - 02:21

नमस्कार.
पुण्यात विश्वासार्ह भविष्यवेत्ता कोणास माहिती आहे का? तसे बरेच जण आहेत, अगदी गल्लोगल्ली आढळतील. परंतु तुम्ही स्वतः अनुभव घेतलेले कोणी आहे का ? कौटुंबिक, व्यावसायिक व इतर बाबत योग्य सल्ला देणारे कोणी आहे का ?
कृपया अतिशय निकडिने विचारत आहे. तरी भविष्य बघणे योग्य का अयोग्य, त्यात किती तथ्य यावर चर्चा, वाद न करता योग्य तो सल्ला द्यावा ही कळकळीची विनंती.
धन्यवाद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण पुण्यात शनिवारवाड्याच्या बाजुने चालत गेलात तर बरेच ज्योतिषी बसलेले दिसतात त्यांच्यासमोर माणसेही बसलेली असतात. पहिल्यांदा मला हसु यायचे की या माणसाना हे कळत नाही का की आपल्याला भविष्यात काय घडणार आहे हे सांगु शकणारे ज्योतिषी रस्त्यावर बसुन १० रु. का मागत आहेत? पण नंतर विचार केल्यावर कळले की ही माणसे उत्तरे शोधतात, आशा शोधतात. कुणाला नोकरी नसते, कुणाची तब्येत बरोबर नसते, कोणाच्या मुलीचे लग्न जमत नाही, झालेले असेल तर काही प्रॉब्लेम्स असतात त्याना उत्तर हवे असते , आशा हवी असते ती त्याना इथुन मिळते. आणि आशा अशिक्षित माणसानाच का? उच्चशिक्षित माणसाला सुद्धा हवी असतेच की. या आशेला (ती चुकीची का बरोबर हा एका न संपणार्‍या वादाचा मुद्दा आहे) आचरट म्हणणे हे नक्कीच सुशिक्षितपणाचे लक्षण नाही असु शकत.

माझा स्वत:चा "एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे" यावर विश्वास आहे. पत्रिका , भविष्य बघणे इ. बाजुला मी जात नाही पण इतर कोणी जात असेल तर त्या बाफवर जाउन त्याना आचरट/अंधश्रद्ध म्हणणे हे मला अजिबात बरोबर वाटत नाही. To each their own..

आपण पुण्यात शनिवारवाड्याच्या बाजुने चालत गेलात तर बरेच ज्योतिषी बसलेले दिसतात
<<
मनपा समोरच्या (बस स्टॉपकडील) पादचारी पुलावर तसेच खाली फूटपाथवरदेखिल काही ज्योतिषी असतात, असे आठवते. त्यांत काही पत्रिका पाहणारे व पोपटवाले देखिल आहेत. बराच चॉईस कमी बजेटात उपलब्ध होईल.

***

दर रविवारी पेप्रात येणारे राशीभविष्य मीदेखिल आवडिने वाचतो. प्रत्येक पेपरात वेगळे असते. त्यातील सगळ्यात छान वाटेल ते माझे असे ठरवून घेतो Wink

मनस्मी साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ज्यांना जायचे त्यांनी जावे हे बरोबर आहे. हे एका प्रकारे कमकुवत मनाला मानसिक आधार देणारे असू शकते. पण याप्रकारचे इलाज शोधणार्‍या माणसाचे मन कमकुवत आहे हे या सर्व तथाकथित भविष्यवेत्त्यांना चांगलेच ठाऊक असते.

यातूनच अनेकदा/बहुतेकदा या मार्ग शोधण्यापायी अमुक शांती, तमुक ग्रहखडा, ढमूक यंत्र इ. पाठी पैसे खर्चून, किंवा गुप्तधन / करणी इ. चे आमिष वा भिती दाखवून लोकांना इतरही मार्गांनी नाडले जाते, बुडती नाव खोलातच जाते. अशी अनेक उदाहरणे पाहून ठाऊक आहेत. एकदा भजनी लागले की सारासार विचार गंगेत बुडवला जातो हे नक्कीच. याच कारणासाठी या प्रकारचा इलाज शक्य तितक्या ठिकाणी, शक्य तितक्या प्रकारे डिसकरेज करणे असा प्रयत्न आम्ही 'बुप्रावादी' लोक करीत असतो.

याच कारणासाठी, कमी शब्दांत, अशा बाफवर जाऊन त्याला 'आचरट/अंधश्रद्धा' इ. म्हटले जाते.

पानशेतचा पूर आला तेव्हा पुण्यातले बरेच जोतिषीपण वाहून गेले होते म्हणे.
माझ्यापुरते, जोतिष्य "ते" चांगले जे गर्तेतल्या व हरलेल्या माणसाला खोटी का होईना आशा दाखवून जगण्याचे उभारी देईल ते. जोतिष्य "ते" वाईट, जे सुखातल्या माणसाला उगीच अज्ञाताची भिती दाखवेल ते.

@ मनस्मी १८ तसं असेल तर कोणी स्वत:च कितीही नुकसान करत असेल तर त्यालाही सपोर्ट केलाच पैजे नै का!!
ज्योतिषाकडे जाउन उत्तरं शोधण्यापेक्षा सेल्फ हेल्प पुस्तकं वाचा, जरा डोकं शांत ठेउन विचार करा की आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला काय प्रयत्न केले पाहीजेत? जर शिकुन इतकं कळत नसेल अन ज्योतिषाच्या मागे लागत असाल तर शिक्षणाचा खरंचंच काहीच संबंध नाही.

अन बाकी व्यवसायांचं म्हणाल तर दुधवाला, पेपरवाला, बिल्डर इ. ज्यांच्या स्वत:च्या हातात स्वत:ची विश्वार्हता टीकवणं असतं ते नक्कीच बरं. गरज असल्यास तसे धागे काढा.

एक थ्री इन वन ज्योतिषाबद्दल ऐकले काल. होमिपदी + पत्रिका + मानसोपचार.
सुसाईडल केसेस हॅन्डल करण्याचा पूर्वानुभव. हे राम !

एकूण काय कुणी ज्योतिषाची मदत घेत तर कुणी सेल्फ हेल्प पुस्तके, मानसोपचार, कौन्सिलर यांची मदत घेतो.आपली ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा. आयुष्यभर सदैव तुमचे मन खंबीरच राहील याची खात्री देणारे महाभाग पण असतात आयुष्याच्या उत्तरार्धात यांची मते काय असतात हे जाणून घेणे रोचक ठरेल.

शिल्पा तुमच्या मतापेक्षा मला तुमच्या भाषा शैलीचे ( लिखाण) आश्चर्य वाटले. तुम्हाला ही जर अंधश्रद्धा वाटते तर वाटु द्या ना. जर तुम्हाला तुमच्या मताचा येथे आदर व्हावा असे वाटतेय, तर आधी दुसर्‍याच्या मतांचा आदर करायला शिका की.

आचरटपणा काय आहे त्यात? वर मनस्मिंची भाषा बघा आणी तुमची बघा. तुम्हाला नाही पसंत तर नका येऊ या बाफावर, पण निदान आपण तेवढे शहाणे आणी बाकी अनाडी हा दृष्टीकोन सोडा.

पुण्यातले साळवी=लूट...
आधी अभिषेक्,पूजा,........असे बरेच काही करायला सांगतात आणि काही उपयोग नाही झाला कि मग उपास,.. करायला सांगतात + नशिबात असेल तर नक्की होइल तुमचे काम असे ऐकवले जाते.... नाडी भविष्याच्या नादी लागू नका कारण तिथेही तेच.....

>>>. अहो लिंबुजी तुम्ही पण पत्रिका वगैरे बघता का? <<<
टुनटुन, हो. मात्र वेळ मिळाला अन मुड असला तरच.

<<<<<शिल्पा तुमच्या मतापेक्षा मला तुमच्या भाषा शैलीचे ( लिखाण) आश्चर्य वाटले. तुम्हाला ही जर अंधश्रद्धा वाटते तर वाटु द्या ना. जर तुम्हाला तुमच्या मताचा येथे आदर व्हावा असे वाटतेय, तर आधी दुसर्‍याच्या मतांचा आदर करायला शिका की.

आचरटपणा काय आहे त्यात? वर मनस्मिंची भाषा बघा आणी तुमची बघा. तुम्हाला नाही पसंत तर नका येऊ या बाफावर, पण निदान आपण तेवढे शहाणे आणी बाकी अनाडी हा दृष्टीकोन सोडा.>>>>>>>>>>>>+११११११

@ टुनटुन
दुसर्‍यांना शिकवताना तेच शिक्षण वापरत चला.

बाकी तुम्ही दारु नाही पित तर दुसर्‍यांना पीउ द्या, तुम्ही ड्रग्ज नाही घेत तर दुसर्‍यांना कशाला थांबवता ? तुम्ही आहात ना शिक्षित मग दुसर्‍यांना नसेल शिकायचं तर कशाला त्यांच्या नादी लागता? ...अशाच मनोवृत्तीचं कौतुक वाटतं.

आणि मताचा आदर वगैरे सारख्या दिखाव्याच्या गोष्टींचा मला सोस नाही.

@ शिल्पाताई सुरुवात तुम्हीच केली होतीत. आचरटपणा वगैरे भाषा तुमचीच होती, विसरला का? समाजसेवेची एवढीच हौस आहे तर तुमच्या जवळपासचे जे लोक जे दारु पितात ( सोशल पार्ट्या आणी सोशल ड्रिंक्सच्या नावाखाली ) आणी ड्रग्ज घेतात त्यांचे प्रबोधन करा आणी मग दुसर्‍याला बोला.

दुसर्‍याला आचरट वगैरे म्हणताना स्वतः खालच्या पातळीवर जाऊन बोलायचे आणी चूक दाखवली की मग तांडव करायचे, बाकी आता अजून काय शिमगा करायचा तो करा. गुडबाय्,बाय बाय.

टुनटुन यांनी ही नावे सुचवली होतीच. त्यात फोन नं. ची भर घालत आहे.
पंडित विजय श्री. जकातदार, पुणे येथे - फोनः ०२० २४४५५८२६
डॉ. उदयराज साने, पुणे येथे - १३६२ सदाशिव पेठ, औदुंबर अपार्टमेंट, वना विष्णु चौक, बाजीराव रस्ता, पुणे
श्रीराम सबनीस - पुणे येथे फोन २४४७३१०९
सिद्धेश्वर मारटकर यांचेही नाव आलेच आहे.
तसेच ग्रहांकित मासिकाचे चंद्रकांत शेवाळे हे ही मार्गदर्शन करू शकतील असे वाटते फोन. ०२० २४४५५८३८

पैकी कुणाचाही अनुभव मला नाही. आपापल्या जबाबदारीवर जाणे.
परंतु ही मंडळी संस्थेवर असल्याने तसेच अतिशय अनुभवी असल्याने येथे चांगली माहिती मिळेल अशी आशा आहे.

संदिप एस - सप्रेम नमस्कार,

गणेश ऊत्स्वाच्या हर्दिक शुभेचा
पंताशी बोलताना आपले स॑पुण् नाव रेफरन्स म्हणून हवे आहे
पुन्हा एकदा धन्यवाद.

आपला कृपाभिलाषी.
ईमेल - dipaknw@yahoo.co.in

आसाराम बापुजी सुद्धा चांगले भविष्य सांगतात असे त्यांचा एक भक्त सांगत होता. सध्या मुक्काम तुरुंगात आहे पण जर कदाचित सुटले नि पुण्यात आले तर सुवर्णसंधी सोडू नका
.फक्त भविष्यच नाही तर त्या पुढे जावून पुढच्या जन्मात तुम्ही काय बनणार हे हि तुम्हाला कळू शकते .अशी बर्याच जणांची श्रद्धा आहे.

पुण्यातल्या श्री. विजय केळकरांचा अनुभव खूप छगला आहे. त्यांनी माझ्या आणि बहिणीच्या लग्न बद्दल चे भाकीत तंतोतंत खरे ठरले. इथे दिल्लीला माझ्या एका मैत्रिणीला मी त्यांचा रेफ्रेन्स दिला होता. त्यांनी फोनवर मार्गदर्शन केलं . तिचा पण अनुभव चांगला आहे..

एक शंका - भविष्य सांगणारे फक्त भविष्य सांगतात की भविष्यात जे अनिष्ठ घडणार आहे ते बदलूही शकतात. बेसिकली भविष्य बदलता येते का ?

आता चौकशी - भविष्य खोटे ठरले तर पैसे परत देणारा मुंबईतील एखादा ज्योतिषी कोणाच्या ओळखीचा आहे का ?

विजय केळकर यांनी माझ्या नातेवाईकाकडुन एका प्रश्नाचे ३०० रुपये घेतले त्यासाठी फक्त २/३मिनीटे पत्रीका बघितल्यासारखे केले व मुल होईल का ह्या प्रश्नाला अॅडोप्श्नला जा सांगितले व त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांना मुल झाले ़:)

श्रीराम भटांचे भविष्य एकदम खोटे असते . ह्याबाबत सकाळ ला मी इमेल केलं होतं. त्यांचा reply आला होता योग्य ती action घेतली जाईल म्हणून . पण अजूनही ह्या भटांच भविष्य सकाळ मध्ये येतंच आहे .
आदिनाथ साल्वीकडे जायचं असेल तर खिशात किमान १०००० रु असायला हवेत नाहीतर तो आत घेतच नाही . १ नंबर चा frod आहे .

नाडी भविष्याबद्दल डोळे उघडणारी काही माहिती असेल तर हवी आहे. http://www.youtube.com/watch?v=-mrup498kbQ ही एक लिंक मिळाली पण भाषेच्या अडचणीमुळे फार काही कळत नाहीये.

चीनचा प्रवासी हुएन सुंग तेराशे वर्षाँपूर्वी भारतात येऊन गेला आणि त्याने इथल्या ठिकाणांचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्याला लहानपणी एका चीनी ज्योतिषाने सांगितले होते की तो गाढवावरून दक्षिणेकडे खूप दूरचा प्रवास करेल. आताचे अंशात्मक केपी इत्यादी पध्दतीने ज्योतिष सांगणारे अधिक अचूक निर्णय देतील याची अपेक्षा आहे.

रावी, नाडी ज्योतिषाबद्दल चिकित्सा हवी असल्यास
http://mr.upakram.org/node/955 इथे मिळेल
प्रत्यक्ष नाडीभविष्यावर असलेल्या अनुभावर आधारित पुस्तकातील लेख वाचा
फसवे नाडी ज्योतिष
http://www.scribd.com/doc/29357377/Fasve-Nadi-Jyotisha

मला आजवरच्या आयुष्यात भेटलेले सर्वात प्रभावशालि व्यक्तित्व....
भुतकाळ तर अचुक, पत्रिकेवरुन मनुष्याचे वर्णन. अगदी अचुक.
श्री. खोले, सिंहगड रोड, संतोष हॉल समोरच्या गल्लित.
मोबा. नं.- ९८५०२८३८५४

Pages