पुण्यातील पाककलेचे वर्ग

Submitted by हर्ट on 10 July, 2012 - 00:22

पुण्यात खास करुन कोथरुड भागात भारतीय पारंपरिक आणि फास्ट-फुड पाककृतीचे वर्ग कुठे असल्यास त्या वर्गांबद्दलची इथे माहिती लिहा. माहितीमधे संपर्क क्रमांक वा पत्ता नमूद करा. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, थँक्स ! मलाही ही माहिती हवीच होती. सगळंच कुकिंग शिकायचं आहे, पण Expecially मावे पाककृती शिकण्याची जास्त इच्छा आहे.

बी,

हे पहा. इथे बहुतांशी गुजराती, मारवाडी प्रकारचा स्वयंपाक शिकवला जातो.
बर्‍याच वर्षांपासून त्यांचे क्लासेस चालु आहेत.
http://shobhaindani.in/

मावेकरता सुधा कुलकर्णीचा क्लास छान आहे. नेहमी सकाळला जाहिरात येते,शुभदा जोशीचा क्लासही छान आहे.केक्सकरता टिल्लूबाई बेस्ट!!!!

बी वरती शुभा इंदांनींची वेब आहे ना, ती बघ. नाहीतर गुगलुन बघ. किंवा पुण्यातील कोथरुड भागातील माबोकरांची मदत घे, हाकानाका.

मावे म्हणजे मायक्रोव्हेव ओव्हन.

सॉरी वर सुचरीताने दिलेय तसे सकाळ ( नेटवरचा नाही. ) पेपर घे, त्यात या जाहीराती असतात. नाहीतर पुण्यातील एखाद्या मित्राला गाठुन ( मेलवर ) त्याच्याकडुन हे सकाळमधले पत्ते घे.

हा घ्या सुधा कुलकर्णींचा पत्ता
एच २०३, वृंदावन हाईटस, कोथरुड
०२०-२५२८०६९१
sudha.kul@gmail.com
शिकवणं माहित नाही. पण त्यांची मावेतल्या पदार्थांची पुस्तकं मस्त आहेत. पदार्थ सहसा बिघडत नाहीत.

बरं झाल हा धागा सुरु केला...मला पण ही माहीती हवी होती..
कॅम्प भागामधले किंवा जवळपास माहीत आहे का कोणाला ???? विशेषत: केक साठी

कॅम्प भागामधले किंवा जवळपास माहीत आहे का कोणाला ???? विशेषत: केक साठी>> शहा म्हणून एक वल्ड फेमस आहेत कँप मध्ये शिवाजी मार्केट जवळ. शिवाजी मार्केट जवळ गेलात तर शक्यतो केक वाले शहा माहिती असतात बर्याच जणांना.

पी. पी. शहा
http://www.indiamart.com/pp-shah-sons/food-flavours-and-concentrates.html

त्यांच्याकडे फक्त शाकाहारी बेकिंग प्रोडक्ट्स शिकवतात.

फार महाग क्लासेस आहेत सगळे. ५०० च्या आसपास... कुणितरी एक माबोकरीणीने जाउन शिकून मग इथे रेसिप्या टाका..:)

धन्यवाद! खूपच छान माहिती पुरवत अहात तुम्ही सगळे जण. आता एकेका ठिकाणी संपर्क करुन बघतो. इंदानीजचे वर्ग वर्षातून फक्त दोनदा असताता. त्यांचा सिलॅबस फार मोठा वाटतो आहे. वेबसाईटवर संपर्क क्रमांक दिलेला नाही.

खरे तर फक्त सात्विक महाराष्ट्रीयन पद्धतीचा स्वयंपाक त्यात आजकालच्या पदार्थाची थोडीशी भर. इतकेच पुतणीला शिकवायचे आहे.

खरे तर फक्त सात्विक महाराष्ट्रीयन पद्धतीचा स्वयंपाक त्यात आजकालच्या पदार्थाची थोडीशी भर. इतकेच पुतणीला शिकवायचे आहे. >> मग शुभदा जोशींचा क्लास बेस्ट आहे.
याखेरीज यूट्यूबवर देखील वेगवेगळ्या पाककृतींचे स्टेपवाईज व्हिडियोज आहेत. कुकरी शोज (जसे खाना खजाना इ.) चे एपिसोड्स आहेत. ते पाहूनही अनेक पदार्थ करता / शिकता येतील.
यूट्यूबवर 'आम्ही सारे खवय्ये', झी टीव्ही कुकरी शो, ई टीव्ही कुकरी शो असे टाईप करून शोधल्यास अनेक व्हिडियोज सापडतील.

अरुंधती, मान्य आहे पाहून पाहून शिकता येत. पण माझ्यामते तिला असा आखून दिलेला आणि शिस्तीतला वर्ग जास्त सोपा पडेल.

पाक क्रुती प्रमाणे कला कुसर मध्‍ये क्रुपया कुणी तरी
लोकरी च्‍या सोप्‍या विणी , क्रोशाच्‍या विणी , वेगवेगळे टाके डिझाइन्‍स इ चा नवीन धागा टाकून माहिती दयावी

फार महाग क्लासेस आहेत सगळे. ५०० च्या आसपास>> ५०० च्या आसपास महाग ? अहो साधा केक येत नाही ५०० मधे आजकाल. Happy
माझी पत्नी घ्यायची ब्रेड आणि मावेचे हौसी क्लासेस. खुप मेहनत असते आणि सहित्याचा खर्च पण असतो.

बनवलेले पदार्थपण शिकणार्‍याना खायला मिळतात की. Happy

५०० चा वर्ग शक्यच नाही. नक्कीच काहीतरी टायपो झाला असेल. ५०० च्या पुढे एक किंवा दोन शून्य असतील Happy तीन नको!!!

माझ्या पुतणीला इथे सिंगापुरात कुकीज केक वगैरे शिकायचे होते. चौकशी केल्यावर माहिती पडले इथली फी एक लाख वीस हजार आणि फक्त आठ दिवस वर्ग! रोज दोन तास! तिला म्हंटले आयुष्यभर तू एक लाखात कितीतरी कुकीज नि केक खाऊ शकशील.

साध्या स्वयंपाकासाठी कोणीतरी बिल्डिंग मधलया काकू मावशींना हाताशी घेऊन शिकता येइल. बदल्यात काहीतरी करून त्यांनाच देता येइल किंवा ताजी भाजी फळे वगैरे देता येइल आणून.

Pages