सोप्पा केक

Submitted by के अंजली on 9 July, 2012 - 04:27
soppa cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय Happy

हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!

साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा,आठ चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(४ रु.) चा सॅशे.

क्रमवार पाककृती: 

कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो. Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केक करताना दूध जरा जास्त पडलं असावं, पण केक थंड झाल्यावर मस्त झाला. संपला पण लगेच Happy
आता पुढच्यावेळी ड्रायफ्रूट्स घालून करतो + मावे पण आलाय म्हणजे झटपट केक होईल Happy

आज केला. मावेमधे केला. मस्त. मउ, स्पाँजी झाला होता. मी Digestives and hide&seek वापरली.
साखर अजुन चालली असती असे वाटले. पण छानच झाला होता.

धन्यवाद मस्तानी! आठवणीने इथे लिहिलंस ते Happy

साखरेचे प्रमाण वाढवायला हरकत नाही..चारचमचे या प्रमाणात थोडासा अगोड होतो पण चहाबरोबर खाताना प्रमाण ठीक वाटते. सहा सात चमचे साखर घातली तर प्रमाणात होईल.

केकचे भाण्डे नसल्यास कुकर मधे पन छान होतो हा केक. कुकर च्या आत जालि ठेवुन त्यावर भान्डे ठेवावे. त्या भान्ड्याला आतुन तुपाचा थर लावावा आनि त्यात हे मिश्रण ओतावे. पन कूकर चि शिट्टि काढुन टाकाविअनि ४५ मि. मन्द गैस चालु ठेवावा.

साखरेचे प्रमाण वाढवायला हरकत नाही..चारचमचे या प्रमाणात थोडासा अगोड होतो पण चहाबरोबर खाताना प्रमाण ठीक वाटते. सहा सात चमचे साखर घातली तर प्रमाणात होईल.
>>
अंजली, हे वर हेडरमध्ये प्लिज अपडेट करणार का? मी प्रतिसाद आधी वाचले नव्ह्ते. काल कॄती वाचून केला आणि अजिबातच पुरेसा गोड नाही वाटला Sad

आधी तीन वेळा केक फसल्याने मी हा धागा उघडुन पाहिलाच नव्हता कारण माहीत होते उघडला तर केक करण्याची इच्छा होणार. आज पाहीला कारण आज लग्नाचा वाढदिवस आहे तर हा सोप्प्प्पा केक करुन पाहावा अशी खुप इच्छा होतेय.
घरात एक २० रु. वाला चॉकलेट चिप्सवाला बिस्किटचा पुडा आहे तसेच पारले जी पण आहेत आता फक्त इनो घेऊन जावे लागेल. फक्त मला सांगा इनोचे ६ रु. वाले संपुर्ण पाकीट घालु का त्यात?

घरात एक २० रु. वाला चॉकलेट चिप्सवाला बिस्किटचा पुडा आहे तसेच पारले जी पण आहेत आता फक्त इनो घेऊन जावे लागेल. फक्त मला सांगा इनोचे ६ रु. वाले संपुर्ण पाकीट घालु का त्यात?

>
yes but it must be blue wala packet... without flavor

केला एकदाच काल केक आणि चक्क तो मस्त झाला अशी लेकीकडुन पावती पण मिळाली. धन्यवाद के अंजली.

गरम असतानाच तिला घाबरत घाबरत थोडा भरवला कारण तिला जर आवडले नाही तर ती सरळ थुंकून टाकते पण तिने लगेच वाव मम्मा किती मस्त झालाय ग केक असे म्हणत अजुन दे करत होती. तसेच दादाला, आजीआजोबांना पण दे ना छान छान केक म्हणुन सांगत होती. किती आनंद झाला म्हणुन सांगु.

गरम केक छान लागत होता पण मी नंतर त्यावर मेल्टेड चॉकलेट + मिल्कमेड घालुन वर जेम्सच्या गोळ्यांची सजावट करुन फ्रिजमध्ये ठेवला. थंड करुन खाताना केक दातांना थोडा चिकटत होता पण चवीमुळे सगळ्यांना आवडला

मी पण केला हा सोप्पा केक..
मस्त स्पोन्जी झाला..
ऑफिस मधल्या मैत्रीणींमधे भाव पण खाउन घेतला,....:)

केक च्या सोप्प्या पाकृ साठी के अंजली ना खुप खुप धन्यवाद....

yeeehh...thanks anjali tai... kal me pahilyanda cake kela, ani to khup chan zala... saglyana khup avadala....ardha khaun zalya nantar athvan ali teva photo kadla......

अंजली आज संध्याकाळीच केला केक. खुपच मस्त झाला. बिल्दिंग मध्ल्या मैत्रीणींनाही खुप आवडला. बिस्कीटांचा आहे यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. मनापासुन धन्यवाद

जो एस ..झकास दिसतोय केक!

अन्विता कणकेच्या केकची रेसिपी वेगळी आहे. ह्यात बिस्किटेच घालावीत Happy

धन्यवाद SakshiM . मी आधी सुद्दा दोन वेळा करुन खाल्ला. यावेळे फोटो काढला होता.
Thanks to K Anjali.

.

Pages