सोप्पा केक

Submitted by के अंजली on 9 July, 2012 - 04:27
soppa cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय Happy

हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!

साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा,आठ चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(४ रु.) चा सॅशे.

क्रमवार पाककृती: 

कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो. Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आजच हा केक करुन पाहिला..मस्त स्पोन्जि झाला होता. खुप खुप सोपाय !अगदी माझ्या बाबांना (जे बेकरी फुड चे कट्टर विरोधी आहेत ) त्यांना ही आवडला. Happy आणि मला जास्त आवड्ला करण माझी हाइड न सीक ची बिस्किटे पण संपली जी कोणिच खात नव्हते . अजुन खुपदा करण्यात येइल..कारण हाइड न सीक (सेलिब्रशन ) ची अख्खी बरणी शिल्लक आहे... Wink
धन्यवाद केअंजली Happy

जयदीप...
हाईड अँड सिकचा १ पुडा, पारले जी बिस्किटांचे दोन पुडे असे नाही का चालनार चॉकलेट कमी हवे म्हणुन विचारतो>> तसाही केक छान होईल माझ्या मते. करुन तर पहा..

रिया....केलास का आज केक..नाही ना फोडतेस खापर माथ्यावर..? Happy

शुभांगी छान दिसतोय तुझा केक... Happy

हेमाली आणिधनश्री नक्की करुन पहा..खूप सोप्पा आहे करायला.

धन्यवाद पिंकस्वान. Happy

काल लाईट पाणी नसल्याने केला नाही
आज करणारेय
आईला सांगितलं इनो आण फ्लेवरलेस तर तिने हिरव्या पाकिटातला इनो आणलाय ज्यावर लेमन फ्लेवर लिहिलय?
हा नकोय ना आपल्याला?
दुकानदार म्हणे हाच असतो Sad
हा नक्की नकोय ना?
(लवकर उत्तर द्या)

रिये, काल समस केला होता मी तुला Angry कर की आता लवकर केक, अंत पाहु नकोस त्या केकचा Proud गार दुध चालेल, कोमटही चालेल अगदी गरम दुध नको Wink

तर, केक चवीला मस्त झालेला.... "दिदी असाच केक माझ्या बड्डेला पण नीट आकारात बनव" असं बहिणाबाईंनी सांगितलय...तर, मला आता सांगा माकाचु...
वर लिहिलेया प्रमाणात मी सगळ्या वस्तू घेतल्या...दुध अगदीच गरमा गरम घेतलं कारण आदितीने बराच लेट रिप्लाय दिला... तोवर दुध ओतून झालेलं केकात...
बाकीची कृती नीट फॉलो केली.....भाकरी करायचा तवा आणि अ‍ॅल्युमिनिअमचं पातळ बुडाचं भांड घेतलं ( ठोक्याचं, जाड बुडाचं, स्टीलचं पातेलं घेणार होते पण त्यात मॅगी होती आणि ते भांडं घासून घ्यायचा कंटाळा आलेला)
आणि... केक भांड्याला चिकटून बसला.... निघताना तुकडे तुक्डे हो गया था वो Sad कशाने?
केक गोलबिल तर नव्हताच पण इतके तुकडे झाले की काही आकार पण देता येईना...
सांगा आता माझं काय चुकलं?
मी स्वयंपाक घरात शिरले हेच चुकलं हे सोडून दुसरं उत्तर द्या.....
त्यानंतर मी त्याचं जे काही केलं त्याचा फोटो मला अपलोड करता येत नाहीये Sad
होsssss तुटा तुटा केक परिंदा ऐसा तुटा
के फिर जुडना पाया
लुटा लुटा सबने मजाक ऐसे लुटा
की फिर कट ना पाया
तुटता हुवा वो पातेलेसे आकर गिरा प्लेटपर.....
असो! Sad

कृतीतली शेवटून दुसरी ओळ पहा. <केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे>

भांड्याला तूप लावलं होतं का?

mayekar +1

bhande ghasun ghyayacha aalas nadala. jaad budache bhande ghyayala have hote.

रिया...तुझ्या रिप्लायमधल्या टिकलीसारखी ही बघ निळी टिकली Sad

तू नीट वाचली नाहियेस का कृती....???

कित्ती सोप्प्प्पी रेसीपी आहे गं..

बिस्किटांचा चुरा करायचाय..त्यावर प्रमाणात इनो टाकायचयं...वरुन प्रमाणात दूध घालून तूप लावलेल्या भांड्यात बेक करायचाय...किंवा गॅसवर ठेवायचाय..

तू त्यात गरम दूध घातल्याने इनो नीट फुलून आलं नसेल कदाचित....

परत कर आता आणि लवकर फोटो टाक...आणि सॅड गाणी गाऊ नकोस... Proud

तुप लावलेलं की... सगळं वर लिहिलेल्या प्रमानात टाकलं होतं...... केक तुटला कशाने हा प्रश्न आहे
स्पाँजीही झालेला केक..... भांड्याला चिकटून का बसला असावा?
जाड बुडाचं ठोक्याच पातेलं चालतं का?

आज पुन्हा करून पहाणार आहे
आता गार दुध घालते..... त्याआधी इतर काय चुकलय ते सांगा

केक तुटला कशाने हा प्रश्न आहे
>>> गरम दुधामुळे इनो प्रमाणाबाहेर अ‍ॅक्टीवेट होऊन केक अति भुसभुशीत झाला आणि तुकडे पडले.

तुझी चूक नाही? मग दूध गरम होऊन काय आपोआप केकमध्ये जाऊन पडलं का? Lol

आता उलट म्हणजे ठार गार दूध नको घालूस फ्रीजमधलं. रूम टेम्परेचरचं असूदे!

अग तोच तो जुना केक आहे.... ज्याचे तुकडे तुकडे झालेले Proud
मग मी आईसिंगचा लेप देऊन त्याला एकदाचा काही तरी (डॉलासारखा वाटावा असा) आकार दिला Proud

शुभातै धन्स गं Happy

पूनम, दुध गरम घालायचं नाही हे अंजलीने सांगितलं नाही की नाही?
मग तिचीच चुक Proud
आज केला नाही कारण दुसरी अनेक कामं होती त्यामुळे आता १५ ऑगस्टला करणार Happy

पूनम, अति गार टाकायचं नाहीये हे सांगितलस ते बर झालं... मी आज केला असता तर फ्रिजमधून दुध काढुन तसच टाकलं असतं हे नक्की Proud

काल अतिगार दुध टाकुन केला केक (अतिघाई).. शिवाय इनो उशिरा आला, तोवर धीर नव्हता म्हणुन आईच्या अंदाजाने (आ अं ने) सोडा टाकला. घरात होती म्हणुन आ अं ने बेकिंग पावडर पण टाकली.. दुध पण आ अं ने टाकलं, कारण कपाचा आकार खुपच लहान होता, त्यामुळे त्या दीड कप दुधाने आईच्या मते योग्य ती कन्सिस्टंसी आली नव्हती. साखर थोडी कमी पडली असावी, कारण पिठी साखर वापरलेली. हाईड अ‍ॅन्ड सीकचा छोटा पॅक मिळाला नाही. सो २५ वाला एक पुडा वापरला (काल चिंचवड मधे जेव्हड्या दुकानात हाईड अ‍ॅन्ड सीक चा पुडा मागितला तितक्या सगळीकडे फक्त २५वाला एकच उपलब्ध होता, अन प्लेन इनो कुठेच नव्हता).. मिश्रणाच्या मानाने भांडं खुप मोठं वापरल्याने केक मोठ्या इडलीच्या आकाराचा झालेला, अन फक्त १०च मिनीटात झाला. चोको पावडर टाकली तर केक बेस्ट होईल..

असो.. काहीका असेना आ अं मुळे तरी माझा सोप्पा पाकृ करायचा प्रयत्न यशस्वी झाला Happy

अंजली धन्स Happy आज किंवा उद्या पुन्हा एकदा प्रयत्न करेन कदाचीत Happy

फोटोची साइज केकपेक्षा मोठी असल्याने फोटो अपलोड होत नाहिये Sad

साहित्यांची एकत्र किँमत आणि केकचे वजन यांच्या दृष्टिकोनातून ही पाककृती दुकानात मिळणार्या केकपेक्षा स्वस्त आहे का?

साहित्यांची एकत्र किँमत आणि केकचे वजन यांच्या दृष्टिकोनातून ही पाककृती दुकानात मिळणार्या केकपेक्षा स्वस्त आहे का?>>>>>> माहित नाही.. पण स्वतः बनवलाय याचं समाधान असतं.. अन फ्रेशनेस, क्वालिटी इ. बाबतीत नक्कीच सरस असावा, भले मग चवीत थोडंफार कॉम्प्रमाइज करावं लागलं तरी चालेल.. माझ्याबाबतीत म्हणायचं तर आय एन्जॉइड प्रोसेस ऑफ मेकिंग Happy

येस्स्स चिमुरे! Happy

अस्मिता...एकतर मला केssक करता आला याचं समाधान..
तो ताजा आणि गरमागरम खाण्याचं समाधान..
घरातली मंडळी आनंदाने Happy खातायेत याचं समाधान..

या सगळ्या आनंदापुढे तो दुकानापेक्षा स्वस्त आहे का .. त्याची किंमत काय नी वजन काय....हे मुद्दे फार लांब रहातात.. हे या पाकृवर सगळ्या सख्यांनी ज्या उत्साहाने आपापल्या केकसकट प्रतिक्रिया दिल्यात..असं नाही का वाटतं??

पुन्हा एकदा सगळ्या सख्यांचे मनःपूर्वक आभार Happy

आणि चिमुरे बेकिंग पावडर नको घालू पुढच्या वेळेस केकमध्ये. इनो किंवा खायचा सोडा यांपैकी एकच टाक.
बेकिंग पावडर अगोदरच असते बिस्किटांमधे गो बाय... Happy

Pages