सोप्पा केक

Submitted by के अंजली on 9 July, 2012 - 04:27
soppa cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय Happy

हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!

साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा,आठ चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(४ रु.) चा सॅशे.

क्रमवार पाककृती: 

कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो. Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, मी नाही मी नाही.
मागच्या पानांवर श्रद्धादिनेशनी '५ मि. मावे' लिहिलंय. Happy

अंजली, मी पण केला हा केक. खुप छान झाला. माझ्या आर्याला चॉकलेटी (रंग आणि चव दोन्ही) केक खुप आवडला. तिला जनरली चॉकलेटशिवाय इतर केक विशेष आवडत नाहीत. त्यामुळे आईने चॉकलेटचा केक केला म्हणुन मॅडम एकदम खुष झाल्या.

मी कधीच घरी केक करण्याच्या भानगडीत पडले नव्हते. आपल्याला हे जमणार नाही अशी माझी ठाम समजूत होती. पण या खरोखरीच सोप्प्या पध्दतीमुळे मी केक करुन पाहिला आणि छानचं जमला Happy

अशी सोप्पी रेसेपी शेअर केल्याबद्द्ल खुप खुप धन्यवाद Happy

रेसिपी बघुन आणी प्रतिसाद वाचुन करायचा मोह आवरत नाहीये.. पण मावे नाहीये आणी केकचं खाली रेती पसरुन ठेवायचे भांडे पण नाहीये .. कसा करता येईल हा केक?? जरा डिटेलवार सांगा प्लीज ह्या आधी केलेला नाहीये कुकर किंवा ईतर काही वापरुन .. Sad

ह्म्म... ही चुर्‍याची आयडीया पण भारीच नंदिनी.. पण सोडा घातला नव्हता तर किती फुलला? ते सांगाल का?.. म्ह्णजे सोडा ना घालताही फटाफट करता येईल..
स्निग्धा.. Happy ,
दिपाली उत्तर मंजूडीने दिलच आहे.. केक खरच करायला सोप्प्पा आहे, पटकन होतो म्हणून मोह न आवरता करा बिंधास्त! Happy
साधना.. तुम्ही दिलेली लिंक मी थोपूवर लॉगिन करुन सुद्धा ओपन होत नाहीये. काय आहे ते?

मला चॉकलेट केक आवडत नाही ..चॉकलेट शिवाय पार्ले आणि मारी बिस्किट्स वापरून कोणी केक केला आहे का? असल्यास प्लीज प्रमाण द्या नं

सोप्पा केक खरच सोप्पा आहे...

घरी असलेले बॉन्बॉन ( १०० गॅ) + पारले जी (५६.४ गॅ)+ १ टीस्पू इनो मिक्सी मध्ये फिरवलं..
त्यात मिश्रण (ईडली एतपत ) पातळ होईल एव्हढं दूध घातलं..( सगळ्यानी चहाचा कप लिहला य...माझ्या घरचा चाहाचा कप भरून दूध घातलं असतं तर फारच पातळ झालं असतं) ...

५ मि मायक्र्प्वेव्ह..झटपट केक तयार..

अल्पना म्हणतेय तसं बिस्किटाची चव लागत होती..मुलाना वरून चॉकलेट सिरप घालून दिला. ..

नंदिनी म्हनतेय तसं बिस्किटांचा चुरा करून ठेवून पाहिजे त्वेहा ५ मि मधे केक करून खायला बरय..

मारी ब्स्किट वापरून जरा तिखट मसाला टाकून स्पायसी केक करून बघाय्ला पाहिजे.

गुड डे-चॉकोलेट चा एक पुडा व पार्ले जी अर्धा वापरुन [इनो एक पाऊच व ४ चमचे साखर,१ चहाचा कप भर दुध]काल केक केला..खूपच मस्त फुलला..मावे त फुल पॉवर वर ५ मिनिटे बेक केला-.....मावे लाप्री-हीट केला नाही..

स्वाती, इनो वापरला होता, त्यामुळे स्पाँजी झाला.

अवनी, ओव्हनमधे केला नाही. मायक्रोवेव्हमधे केला. त्याला प्रीहीटींगची गरज नसते.

अरे केक सेटिंग ला माझा मावे आपोआप प्रीहीट होतो.. >> बहुदा केक सेटींग म्हणजे कन्वेक्षन मोडवर होत असेल. मावे मोडवर ५ मिनीट मॅक्स पॉवर ( ९०० आहे माझ्याकडे ) आणी ५ मिनीट स्टॅडींग टाएम.. मस्त होतो हा केक.. मी २ पुडे ( २० rs ) हाईड अ‍ॅन्ड सीक आणि १५ पारलेची १५ बिस्कीटे , १ ईनॉ सॅशे ने केला १५ व्या मिनीटात केक खाण्यासाठी तयार Happy [ मी त्यात चॉकलेट चिप्स पण घातले होते ]

फक्त पारले वापरुन कोको पावडर टाकली तर होइल का? नेहमी करण्यासाठी हाईड-सीकची बिस्कीटे मोडायला नको वाटते.

अरे केक सेटिंग ला माझा मावे आपोआप प्रीहीट होतो..>>मग ते कन्व्हेक्शन मोड असेल.

हा मी केलेल्या केकचा फोटो.

काल केक करुन पाहिला... मावे मधून काढला तेव्हा मस्त फुलला आणि स्पॉन्जी झालेला. थोड्या वेळाने मात्र कडक झाला.. Sad मावे ५ मिनिटा वर ठेवलेला. बाकी प्रमाण आहे तेच वापरलेले. कशामुळे झाले असेल असे? जास्त वेळ बेक झाला म्हणून का? मावे मध्ये प्रत्येक पदार्थासाठी सेंटिंग्ज आहे त्यामुळे मावेची फुल्ल पॉवर किती आहे कळत नाही. बहुधा ९०० च असावी.

बरं अजून एक सांगाल का कोणी... केक करायचं अ‍ॅल्युमिनियमचे भांडे मावे मोड मध्ये वापरता येते का? आतापर्यंत कन्वेक्शन मोड मध्येच वापरलय.

केक करायचं अ‍ॅल्युमिनियमचे भांडे मावे मोड मध्ये वापरता येते का? << नाही. वापरलंस तर ठिणग्या पडू शकतात.

नीलू, इनो अथवा सोडा जास्त झाला की केक तसा कडक होतो, असा माझा अंदाज.

नीलु,माझ्या मते दूध कमी घेतले असावे..ओलावा कमी असेल तर केक कडक होईल असा अंदाज्..केक मिश्रण ---ओतण्याची दाटसर कन्सिस्टंसी असावी.घट्टसर नको..पळीवाढ असावे.

झाला झाला मस्त केक झाला.
धन्यवाद सुलेखा.. दूधच कमी झालेले. त्याचे प्रमाण वाढवले. मस्त स्पॉन्जी झाला !! Happy
फोटोच काढायचा राहून गेला. आता ३१ ला पुन्हा करणार आहे. तेव्हा फोटो टाकते. Happy

Pages