खर्‍या चलनी नोटाची ओळख..!!

Submitted by उदयन. on 6 July, 2012 - 03:07

नाशिक मधे काम करताना खोट्या नोटांचा फार त्रास होत आहे... १००० आणि ५०० च्या नोटामधे फारच खोट्या नोटा दिसुन येतात... बँकेत पैसे भरताना चा त्रास वेगळाच ... १ लाख भरताना ५ नोटा १००० च्या खोट्या निघाल्या..म्हणजे ५००० चा फटका..:( बँक डायरेक्ट फाडुनच टाकते...वर आपल्या नावाची कंप्लेंट सुध्दा..पोलिसांना चा त्रास सुध्दा..काही माहीती होती खोट्या नोटा कश्या ओळखायच्या तरी सुध्दा येतच होत्या..वर बँक वाले पण निट सांगत नाहीत... भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक मधे काम करणारे लोक ग्राहकांवर उपकारच करतात काम करुन ......अश्या थाटातच वावरत असतात.. उडवाउडवीची उत्तरे मिळतात..
नंतर देना बँक मधल्या एका कॅशिअर ने निट समजावुन सांगितले काही गोष्टी .........जी नेट वर सुध्दा उपलब्ध नाहीत.. Happy तेव्हा पासुन नोट कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला......
...
http://www.paisaboltahai.rbi.org.in/1000.htm
या रिजर्व बँकेच्या साईट वर गेल्यावर आपल्याला नोटांची माहीती मिळते.. जे आकडे (१,२ असे) आहेत त्यावर क्लिक केल्यास ते कसे वापरावे हे ही कळते.

काही माहीती खालील प्रमाणे:-
महाराष्ट्र टाईम्स मधुन सभार.:-
१. नोटेच्या डाव्या बाजूला ५०० किंवा १००० अंकाच्या सरळ खाली एक डिझाइन आहे. हे डिझाइनची प्रिंटिंग बनावट नोटांमध्ये थोडीशी हललेली दिसते. म्हणजेच त्यातील फरक लक्षात येऊ शकतो.

२. नोटेच्या डाव्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत गांधीजींचे चित्र दिसते. बनावट नोटेत ते नसते.

३. नोटेच्या मध्यभागी असलेला ५०० किंवा १००० या आकड्याचा रंग हिरवा असतो. बनावट नोटांमध्ये तो निळा दिसून येतो. तसेच, या आकड्याचा आकारही कमी-अधिक असतो.

४. गांधींच्या चित्राच्या पाठीमागील बाजूस RBI आणि ५०० किंवा १००० असे लिहिलेले असते. बनावट नोटेत ते नसते.

५. नोटेच्या उजव्या बाजूला चमकणारी पिवळ्या रंगाची एक तुटक पट्टी असते. त्यावर भारत, ५०० किंवा १००० आणि RBI असे नाव लिहिलेले असते. निळ्या आणि हिरव्या रंगात ही पट्टी असते. (याच पट्टीला तार असेही म्हटले जाते.)

६. नोटेच्या मधोमध लिहिलेले पाच सौ रुपये हे नाव हललेले असते. या शब्दांच्या रंगांवरूनही ती नोट बनावट असल्याचे स्पष्ट होते.

७. डाव्या बाजूला असलेल्या अशोक स्तंभाच्यावर एक लाल ठिपका असतो. अंध व्यक्तींना या ठिपक्यामुळे नोट खरी की खोटी ते कळते.

८. नोटेच्या मागील बाजूस मध्यभागी वर्ष लिहिलेले असते. बनावट नोटेत ते असतेच असे नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
सामान्य लोकांना न दिलेली माहीती........
आणि बँकेच्या कॅशिअर ने दिलेली माहीती :-
१) १०००रु, ५००रु, च्या नोट मधे महात्मा गांधींचा फोटो खाली (चित्रच्या हनुवटी खाली) १०००,५०० चे आकडे छापलेले असतात. जे नजरेला दिसत नाही..परंतु जर आपण नोट कागदावर धरली आणि पेंन्सिल फिरवली तर ते आकडे उठुन येतात.
प्रचि. १

प्रचि २

प्रचि. ३

.
असे ५०० चा आकडा उठुन दिसेल.. खोट्या नोटांमधे असे नसते......:)
बोट त्यावरुन फिरवली तरी बोटांना उठाव लगेच कळुन येतो.......म्हणुन बँकेचे कॅशिअर उलटी नोट धरुन मोजत नाही .....सरळ धरुन मोजतात
.
२) महात्मा गांधी:- साधारण समज असा आहे की वॉटरमार्क मधे गांधींची प्रतिमा दिसली की ती खरी नोट..पण खरी गोष्ट अशी आहे..की खोट्या नोटांमधे सुध्दा गांधी वॉटरमार्क मधे आहेत..;) मग खरी कशी ओळखायची??? .........नोट जर प्रकाशात धरुन पाहिली तर ... खर्‍या नोटांमधले वॉटरमार्कवाले गांधी छापलेल्या गांधींकडे पाहत असतात..आणि छापील गांधींची नजर खाली असते.. Wink
खोट्या नोटा बनवणारे छापिल गांधींचाच फोटो वापरुन उलटी प्रतिमा तयार करतात आणि त्याचा वॉटरमार्क बनवतात...याचा परिणाम असा होतो की खोट्या नोटांवरचे वॉटरमार्क वाले गांधी सुध्दा खालीच बघतात.. Lol
त्यामुळे बनावट नोट लगेच कळुन येते.............

.
.
अजुन काही माहीती असल्यास नक्की सांगा इथे...........जेणे करुन बनावट नोट ओळखायला मदत मिळेल....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेन्सील ची ग म्मत वाटली पण ज्या प्रचंड वेगाने नोटा आपल्याकडे येतात त्या प्रत्येक चेक करणे शक्य होत नाही. Sad

पेन्सील ची ग म्मत वाटली पण ज्या प्रचंड वेगाने नोटा आपल्याकडे येतात त्या प्रत्येक चेक करणे शक्य होत नाही. Sad

एक वेगळा उपाय म्हणजे आपल्याकडे डेबिट/क्रेडिट कार्ड असतं. ज्या दुकानात आणि हॉटेलात कार्ड द्वारे वस्तूंची किंमत चुकती करण्याची सोय आहे तिथे तिथे कार्ड वापरण्याला प्राधान्य द्यायचं. आणि दुकानदार कार्ड स्वाईप करत असताना आपण तिथे हजर राहणे महत्वाचे.

२-३ % चार्जेस आहेत................मंदार....... जर प्लॅस्टिक मनी ला प्राधान्य द्यायचे असल्यास ...... हे सर्व चार्जेस काढले पाहिजे...मगच लोक त्याचा वापर करतील

उदयन चांगली माहिती सांगितलीस .. नीट लक्षात ठेवली पाहिजे आता नेक्स्ट टायमाला.. भारतात २०,१० च्या नोटा नकली नसतात ना??

उदय, सगळीकडे नाही आहेत ते चार्जेस. पेट्रोल, दागिने, आणि विद्युत उपकरणे (इलेक्ट्रॉनिक्स) च्या दुकानात हे चार्जेस आहेत.

आपण कपडे, खेळणी, औषधे वगैरे असंख्य गोष्टी खरेदी करतो. या सगळ्या गोष्टी कार्ड द्वारे खरेदी करण्यावर चार्जेस नाहीत.

वर्षू, असं काही नाही. असू शकतात. पण खोट्या नोटा पसरवणारे मोठ्या रकमेच्या नोटांना प्राधान्य देतात कारण एकदम मोठी (खोटी) रक्कम अर्थव्यवस्थेत घुसवता येते.

बँकेतून आदल्या दिवशी काढलेले नोटांचे बंडल पुन्हा दुसर्‍या दिवशी बँकेत तेच पैसे भरताना त्यात ३ बनावट नोटा आढळल्या. हे बँकवाले देताना नोटा तपासून देत नाहीत घेताना मात्र तपासतात.. फुकट दिड हजाराचा भुर्दंड बसला.

काही दुकानात कार्ड द्वारे खरेदी साठी रकमेची मर्यादा असते. उदाहरणतः १५० रुपयांवरच्या खरेदीसाठी कार्ड वापरता येईल. अशा प्रत्येक ठिकाणी कार्ड द्वारेच पैसे द्यावे.

अ‍ॅक्सिस बँकेचे डेबिट कार्ड वापरले असता पेट्रोलसाठीही चार्जेस लागत नाहीत. बँकेत चौकशी करुन त्याचा फायदा घ्या.

उदय, चांगली माहिती दिलीस.
माबोकरांना नक्कीच उपयोग होईल या माहितीचा Happy

उदय, सामान्य माणसाला प्रत्येक नोट अशी तपासणे अवघड जाते. बॅकेतले कॅशियर्स तर स्पर्शाने पण ओळखू शकतात. जगभर यू एस डॉलर्स साठी वापरात असलेले, स्कॅनर्स आपल्याकडे आले पाहिजेत. त्यात नोट खरी असेल तर पुढे जाते, खोटी असेल तर मागे पडते !

बॅकेतले कॅशियर्स तर स्पर्शाने पण ओळखू शकतात. >>> +१
माझ्या आईने रीझर्व्ह बँक मधे एकदा पाहिले होते. नोटा मोजता मोजता नुसत्या स्पर्शाने खोटी म्हणून नोट ओळखून बाजुला टाकतात.

बाकी माहिती माहीत होती. पण ते पेन्सिलचे नव्याने कळले.

माझ्याकडच्या ५०० च्या नोटेत पाहते आहे तर छापील गांधी खाली वै. काही बघत नाहीयेत! आय मीन मान खाली झुकलेली आहे वरच्या चित्रात दाखवली आहे तशी पण बुब्बुळे खाली पाहताहेत असे वातट नाही. आणि वॉटरमार्क वाले गांधी पुसट झालेत. बुब्बुळे कुठे बघताहेत कळत नाहीये! Lol

छान आणि उपयोगी माहिती आहे.
मुद्दा क्र. ३ -
"३. नोटेच्या मध्यभागी असलेला ५०० किंवा १००० या आकड्याचा रंग हिरवा असतो. बनावट नोटांमध्ये तो निळा दिसून येतो. तसेच, या आकड्याचा आकारही कमी-अधिक असतो." >>
वर दिलेल्या इमेज मधे इंग्रजीमधे वाचल्यास अर्थ वेगळा आहे आहे
"Optically Variable Ink"
The color of the numeral thousand appears green when banknote is held flat.
But would change to blue when banknote is held at an angle. The font size is reduced.

आत्ता घरात १०००ची नोट बघायला नाहीये. कुणीतरी बघुन कन्फर्म करा.