वर्षाविहार २०१२ - स्वयंसेवक नोंदणी

Submitted by admin on 29 May, 2012 - 02:48

गेली बरीच वर्षे सातत्याने आणि वाढत्या प्रतिसादाने चालणारा मायबोलीचा एक उपक्रम म्हणजे वर्षाविहार. पावसाळा जवळ येत चालला आहे आणि बहुतेक मायबोलीकरांना वर्षाविहाराची प्रकर्षाने आठवण येत असेल.

मुंबई पुण्यामधल्या ज्या मायबोलीकरांना यंदा वर्षाविहार संयोजन समितीत काम करायला आवडेल त्यांनी आपली नावे इथे कळवा म्हणजे त्यातून ववी संयोजक मंडळ स्थापन करता येईल. या मंडळात आधी काम केलेले काही अनुभवी संयोजक असतीलच. तेव्हा तुमचा विभाग आणि कुठले काम करायला उत्सुक आहात ते इथे कळवा.

गेली ५/६ वर्षे सातत्याने आपण ववीबरोबरच टीशर्टही तयार करत होतो. यंदा या उपक्रमाला विश्रांती देण्याचे ठरवले आहे. पुढल्या वर्षीपासून हा उपक्रम जरा वेगळ्या ढंगात पुन्हा सुरू करू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा वर खेचण्यापुरती स्वयंसेवागिरी केली आहे! Happy
बाकी मला कुठल्याही गोष्टीशेवटी "सन्घ" हा शब्द असल्याशिवाय स्वयंसेवकगिरी करताच येत नाही बर्का! Proud

गेली ५/६ वर्षे सातत्याने आपण ववीबरोबरच टीशर्टही तयार करत होतो. यंदा या उपक्रमाला विश्रांती देण्याचे ठरवले आहे.>>>> का? Sad

अरे वा. कालच मॉन्सून भारताच्या सरहद्दीत आला म्हणे. इथे लगेच वविचे वारे वाहू लागले.

मज्जा करा.

अरे वा! स्वयंसेवकांची नावनोंदणी सुरू झाली का... छानच.... पावसाच्या कल्पनेनेही आत्ता गारेगार वाटतंय.... Happy

गेली ५/६ वर्षे सातत्याने आपण ववीबरोबरच टीशर्टही तयार करत होतो. यंदा या उपक्रमाला विश्रांती देण्याचे ठरवले आहे. निषेध Sad
या वर्षी नक्की नोंदणी करायचं ठरवलेलं... आणि.............!!!

कोणीच इछुक दिसत नाहीय या वर्षी...? Proud
फक्त पाण्याबाहेर बसुन मजा घेणार्यांचीच संख्या जास्त आहे तर. शब्दांचे बुडबुडे.

ए गप्पे मल्ली! मी आहे. जर वविच्या सुयोग्य तारखानुसार मला येता येणार असेल, तर मी नक्कीच (नेहेमीप्रमाणेच) ऐनवेळची पडतील ती कामे करायला उपलब्ध आहेच Happy फक्त त्यास "स्वयंसेवक" असे नक्कीच म्हणता येणार नाही कारण जवळपास प्रत्येक उपस्थित मायबोलीकर गरज पडली तर ऐनवेळच्या कामास उपलब्ध होतोच! Happy
असो.
बाकीच्या पाण्याबाहेरच्यान्चे जाउदे, तुझे काय? तू पडणारेस की नै पाण्यात? अरे हेच वय तुझ, पाण्यात पडण्याच Wink Proud

चला तर सुरुवात झाली....

प्रिती आपला सहभाग कौतुकास्पद आहे.

मला या वर्षी संयोजन करायला आवडेल.

नवीन लोकांनी समितीत येण जास्त आवश्यक आहे.
Happy

विन्या, पॉकेटलाईन नक्की घेऊन जाऊया. माझ्याकडे १ आहे, अजून २-३ जणांनी आणा... गेल्या वर्षीच्या अनुभवावरुन म्हणतेय Happy ट्रेकर्सनी हूक्स वगैरेही जवळ ठेवा.

संयोजनात येणे जमणार नाहिये. वविला यायचा नक्कीचनेहमीप्रमाणेच उत्साह असल्याने यायचा प्रयत्न असेलच..

स्वरुप , तुम्ही सहभाग घेणार असाल तर बाकी चिंता नसावी , पुर्वानुभव असलेले तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.

अरे घारु मला काय सांगतोस ?

तु सगळ्यात जुना जाणता संयोजक .. तु आम्हा सगळ्यांना मार्गदर्शनाच काम केल पाहिजेस.

ए मुलांनो, यंदा टी-शर्ट का नाहीत वगैरे विचारत बसू नका. वर अ‍ॅडमिननी लिहिलंय ना पुढच्या वर्षी निराळ्या ढंगात हा उपक्रम चालू होईल म्हणून... मग? निराळा ढंग म्हणजे कुठला असेल यावर विचार करा की जरा. Proud
(त्याचा बाफ निघाला आणि माबोकरांकडून आयडिया मागवल्या गेल्या, तर उपयोग नाही का होणार त्याचा? Wink )

Pages