चारोळी स्पर्धा...मसाला मार के...(३)

Submitted by माध्यम_प्रायोजक on 11 April, 2012 - 02:19

पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!

'मसाला' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या चारोळ्यांच्या स्पर्धेतलं हे तिसरं छायाचित्र...

चला तर मग... अन्नदाता आणि चारोळीकर्ता सुखी भव !!

7spices.jpg

स्पर्धेचं स्वरूप आणि नियम http://www.maayboli.com/node/33622 इथे दिले आहेत.

या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला' चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..

***

वरील छायाचित्र प्रताधिकारमुक्त.

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!! तिसरं चित्र आलं एकदचं!!

तुझ्या वाटीत काळं मिरं दिसतय गं
माझ्या वाटीतलं लवंग कसं हसतय गं...
थोडं हळदी मधुन, थोडं जिर्‍यामधुन
मिरची, मस्साल्यातुन बेलिफ कसं डुलतय गं......... Lol

चाल??? ओळखा बरं Happy

हळद, मिरची, जिरं, नि लवंग- मिरे
वाटीभर लाल तिखट आणि तेजपत्ता
कांडा, कुटा, नैतर मिक्सरमधे वाटा
स्वादिष्ट होई चिकन हंडी वा करी कोफ्ता

हळद ,तिखट जोडीला शाही जिरे
मिरी, लवंगा आणि फोडणीला तमाल पत्र बरे
मसाल्याचा स्वाद सोबत स्वयंपाकाचे तंत्र
खमंग जेवणासाठी हाच खरा मंत्र

हळद आणि लवंग जंतुनाशक खरी
स्वयंपाकाला आणी वेगळीच खुमारी
मिरची- मिरे तिखट पण पाचक तरी
मसाले आपले गुणी, जेवण खमंग करी

हळद तिखटाच्या रंगाने खुलविले रुपडे
खमंग चवीसाठी जिरे, लवंग आणि मिरी ....
तमाल पत्राचा सुगंध दरवळे चोहीकडे
मसालेदार जेवण तृप्त करी...

नका नका हो असं सांडू घळाळा
डोळ्यातून तुमच्या आधीच पाणी
खड्या मसाल्याशी त्या मिलनाला
नटलीय बघा ना, आतुर लाल राणी

तेज तर्रार मिरची संगे झणझणते ही काळी मिरी
तिखट, हळद, जिर्‍यांना बिलगुनी लगटून बसली शेजारी
सुरस लवंगी नखरा, तोरा काय वर्णू मी कसा अहा!
तमालपत्रासवे नांदते जिव्हेवरी चटकेल पहा!

बोटभर मिरची सोबत फोडणीला जिरे
चिमुटभर हळद तर सुगंधाला तेजपान
दोन तीन लवंगा आणि चवीला मिरे
लज्जतदार जेवणाचा तुमचाच पहिला मान

लवंग आनी मिरीसंगट बसलं शहाजिरंssssss
तमालपत्रामागून आली मिरची झनझनीत की रंsssssss
काय वर्नू चव ह्यांची??
हळदी-तिखटाचं रूप लई न्ह्यारं ssssssss

हे जी जी रं जी जी रं जी जी! Proud

सप्त-सुरांच्या मीलनातुनी उमले सुमधूर गाणे
सप्त-मसाले मेळ घालूनी खुलविती आपुले खाणे
रोजचीच ती भाजी-आमटी, रोजचाच तो रस्सा
चिमटीभरूनी मसाल्यामुळे खाणे होई गाणे

हळद, मिरी,लवंगा
मिरची,तिखट,जीरे,
तमालपत्रे घातली फोडणीत
मोहरी राहिली ना रे? Happy

चाल??? ओळखा बरं
>>>>

लाजो...... Rofl तू महान आहेस.

तुझ्या हातात सिनेमाचं तिकिट दिसते......य
तुझ्या बाजुला कोण बरं येऊन बसत...य Rofl हीच ती तुझी चाल Wink

आता म्हण बघू Proud

टेबलावर वाट्या ठेवल्या सात
तिखट, हळद, शाही जिरे बसले आत
लवंग-मिरी अन तमालपत्र वाढवी स्वाद
खमंग जेवणाला सर्वांचीच दाद

-------------------------------------

तापले तेल... चर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्र फोडणी
फोडणी ला मिरी, लवंग आणि जिरे.....
चीमूट भर हळद अन स्वादासाठी तिखट
तमाल पत्राचा सुगंध घरभर फिरे .....