डाग

Submitted by pradip rane on 7 September, 2008 - 10:50

मनं जुळली नसली तरी
हातात हात आहे,
सत्तेसाठी युती करताना
विरोधकांवर मात आहे.

खुर्चीच्या हव्यासापोटी
स्वाभिमान लाचार आहे,
श्रद्धांजलीच्या भाषणातही
पक्षाचा प्रचार आहे.

सभ्यतेच्या बुरख्याआड
सारे काही माफ आहे,
नवीन घोटाळे करण्यात
प्रत्येकजण बाप आहे.

जनताजनार्दनाचा मात्र
सर्वांवरच राग आहे,
कोणीही निष्कलंक नाही येथे
चंद्रालाही डाग आहे.

प्रदीप राणे.