पांडुरंग पांडुरंग

Submitted by वैवकु on 21 March, 2012 - 04:16

पांडुरंग पांडुरंग...............

सोडुनि असंग-संग जाहलो तुझा मलंग
लावतोय आतम्यास आज रे तुझाच रंग

येवुनी भरून टाक काळजातला तुरुंग
पारधीsय मी तुझाच होच आज तू कुरंग

वाजती कशास टाळ वाजतोय का मृदुंग
आज गज्जलेत एक भेटला मला अभंग

फक्त एक शब्द त्यात पांडुरंग- पांडुरंग !!
पांडुरंग -पांडुरंग- पांडुरंग- पांडुरंग!!

गुलमोहर: 

आपल्या कवितेतील नेहमीची नाजुकता ह्ररवलेली वाटली. कदाचित मला 'मलंग, तुरुंग, पारधी, कुरंग' हे शब्द या कवितेत थोडे ' harsh ' वाटले असावेत.
एरवी रचना म्हणून सुरेखच.

प्रद्युम्नजी : धन्यवाद
आपले प्रतिसाद आजकाल नेमके आणि अभ्यास्पूर्ण येत आहेत ........मी त्याच्याशी सहमत आहे !!

अवल धन्स..................
धन्यवाद उल्हासकाका.............
"आज गज्जलेत एक भेटला मला अभंग " >>>> ही ओळ पाया आहे या रचनेचा !!
आणि पांडुरंग वीट झालाय जणू.............. कसा सगळयात खालीए बघा अग्दी तळाशी....!!!!