निळाई

Submitted by गणेश भुते on 4 September, 2008 - 10:50

हिरव्या हिरव्या मळ्याकिनारी
माती काळीभोर
मातीमधुनी भक्ष्य शोधती
निळे विलोभी मोर

निळ्या गळ्याच्या निळाईत त्या
मन अडकले माझे
सोनेरी पक्षास लाजर्‍या
निळा पिसारा साजे

--गणेश भुते (२००५)

गुलमोहर: 

मातीमधुनी (भक्ष) ऍवजी मोती शोधती असे वापरल्यास सौंदर्य अधिकच वाढेल

गोदेय

निळाई आवडली ... मोर कधीही विलोभनीयच !
गोदेयची सूचनाही योग्य वाटतेय पण 'भक्ष' हाच शब्द ठेवायचा असेल तर खरा शब्द 'भक्ष्य' असा आहे Happy

गोदेय आणि संदिप ,अभिप्रायाबद्दल आणि सुचनांबद्दल तुमचे मनापासुन आभार...