'लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री' चर्चा

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2012 - 14:00

महिला दिन २०१२ च्या निमित्ताने घडवलेला निरभ्र : लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री परिसंवाद विशेषांक तुम्ही वाचला असेल किंवा वाचत असालच.

अंकामधे जाहिर केल्याप्रमाणे या विषयाच्या सर्व पैलूंवर सर्व बाजूने चर्चा होणे अतिशय गरजेचे आहे. त्याशिवाय विशेषांक पूर्ण होणार नाही.

या धाग्यावर लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख (आयडेन्टिटी) या विषयाची चर्चा करूया. चर्चा करताना काही थोडीशी पथ्ये पाळूया.
१. विशेषांकातल्या लेखांतले, लेखांबाहेरचे सर्वच मुद्दे घेऊन अवश्य चर्चा करू. विशेषांकामधे काय बरोबर नाही, संपादक मंडळाचे कुठे चुकते आहे याचा उहापोह इथे नको. तो त्या त्या लेखाच्या धाग्यावर करू.

२. आपली भाषा, आपण वापरत असलेली उदाहरणे या सगळ्यांचा सभ्यतेच्या संदर्भातून विचार करणे अतिशय गरजेचे. धागा मॉडरेटेड असणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.

- संपादक मंडळ

विषय: 

मृदुला | 16 March, 2012 - 21:55

>> किती मैत्रिणींची वाट पाहिली
असं का होतं याचा तुम्हीच विचार करा म्हणजे झालं
<><><><><><><><><><><><><><><><><><><><>

कदाचित मला नीधप यांच्या सारख्याच (उगीचंच) खडूसपणे वागणार्‍या मुली भेटल्या असाव्यात Happy

मृदुलाजी, नाही हो, हे (अर्थातच) मी स्वाती२ यांना अशासाठी लिहिलं की, त्यांनी जे म्हटले आहे, की "स्त्रियांनी प्रपोज करायला काय हरकत आहे"? त्यावर माझा अनुभव सांगितला एवढेच.

नीधप यांनी स्वाती२ यांना त्यावेळेला हे का नाही सांगितलं, की "असे मुद्दे इथे नकोत" म्हणून?

नीधपः
एक रिमाईंडरः

अंकामधे जाहिर केल्याप्रमाणे या विषयाच्या सर्व पैलूंवर सर्व बाजूने चर्चा होणे अतिशय गरजेचे आहे. त्याशिवाय विशेषांक पूर्ण होणार नाही.

बेफिकीर,

>> मी भ्रमात काहीतरी भयंकरच विचार करत होतो.

निरपेक्ष म्हणजे अपेक्षाविहीन की अतीत या अर्थबाहुल्यामुळे आपला गोंधळ उडाला असावा. याचं निराकरण करायचं झालं तर सापेक्ष या शब्दाची फोड (संधिविग्रह) कसा होतो हे पाहिलं पाहिजे.

तर,

सापेक्ष = स + अपेक्ष की स + आपेक्ष ?

स + आपेक्ष धरल्यास त्याचा विरुद्धार्थ निर् + आपेक्ष = निरापेक्ष असा व्हायला हवा. मग लिंगनिरपेक्ष चुकीचा शब्द ठरून लिंगनिरापेक्ष हा योग्य शब्द ठरतो.

मात्र स + अपेक्ष धरल्यास गोंधळ उडणार!

कोणी 'सापेक्ष' चा संधिविग्रह स्पष्ट करून सांगेल का ते पाहायला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

दिपक भिडे,

बहुधा मी वाक्य अब्रोबर लिहिले नाही माझ्या वरच्या पोस्ट मध्ये. ते मी सुधारले.
दुसरे असे की, मला आता कोणाचे लेख वाचले ह्याची यादी टाकावी लागेल व पुन्हा ते लेख दुव्यावर जावून पहावे लागेल. मग नीट सांगते व लिहिते परत.

तोवर गैरसमज नको(कोणांचे).

मी इथे 'निरपेक्ष' शब्दावर झालेली चर्चा आत्ताच वाचली.
एकेकाळी 'धर्मनिरपेक्षता' या विषयाशी संबंधीत विषय जेव्हा वाद्विवाद स्पर्धेला असत तेव्हा 'धर्मनिरपेक्ष' असणे याच्या विरुद्ध बाजूने मुद्दे मांडताना 'धर्माधिष्ठीत' असणे (धर्मावर आधारित या अर्थाने) असा अर्थ घेऊन वाद-विवाद होत असे.
'लिंगनिरपेक्ष' शब्द वाचल्यापासून मला परत परत ह्या 'निरपेक्ष' आणि 'अधिष्ठीत' या दोन शब्दांवर विचार करावा असं वाटत आहे.

'लिंगनिरपेक्ष' शब्द वाचल्यापासून मला परत परत ह्या 'निरपेक्ष' आणि 'अधिष्ठीत' या दोन शब्दांची आठवण होत आहे.>>>>>>

अभिनंदन

मला हा वादच समजलेला नाही

म्हणजे लिंगनिरपेक्ष मैत्री / ओळख , हे नाकारले कोणी?

लिंगनिरपेक्षतेचा अर्थ स्वाती आंबोळेंनी समजावून सांगितल्यावर माझा हा प्रश्न आहे

-'बेफिकीर'!

ह्या विषयाचा आवाका आधी संयोजकाना तरी नीट कळला का हा मोठा प्रश्ण आहे. >>> झंपी, तुम्ही संपादकीय वाचलं का ? ते वाचलं असतं तर हे वाक्य ( कदाचित ) आलं नसतं.

सगळे लेख वाचल्यावर तेच ते मुद्दे व "एकंदरीत" गोंधळेपणाच जाणवला.. 'स्वप्नातील लिंगनिरपेक्षता उतरू नका हो केव्हा'... असे. >>>> ह्या मताशी असहमत. माझ्या लेखात कुठलाही गोंधळ नाही पण तुम्ही तो लेख वाचण्याचे कष्ट घेतल्याचे दिसत नाही.

'लिंगनिरपेक्ष' ही संज्ञा subjective ( based on opinions,judgements,assumptions etc. ) आहे objective ( factual, able to be seen,touched,heard,tasted or smelled ) नव्हे. त्यामुळे ह्या विषयाबद्दल मतमतांतरे असणे साहजिक आहे. त्याचे दोषारोप संयोजक मंडळावर करण्याचे प्रयोजन अनाकलनीय आहे.

>>लिंगनिरपेक्ष' ही संज्ञा subjective ( based on opinions,judgements,assumptions etc. ) आहे objective ( factual, able to be seen,touched,heard,tasted or smelled ) नव्हे. त्यामुळे ह्या विषयाबद्दल मतमतांतरे असणे साहजिक आहे. त्याचे दोषारोप संयोजक मंडळावर करण्याचे प्रयोजन अनाकलनीय आहे.<<

तुमच्या वरील मुद्द्यात तुमचे उत्तर आहे. संयोजक पण माणसेच होती ना.. मग सबजेक्टीवच असणार ना.. व्यक्तीसापेक्ष आहे. मी आधी पण मुद्दा स्पष्ट केला आहे की वरच्याच पोस्ट मध्ये(जाहीराती, घोषणा वगैरे वगैरे).

रहाता रहाता, तुम्ही हे कसे म्हणता की मी तुमचा लेख वाचायचे कष्ट घेतले नाहीत? कशावरून?
एका बाजूला मतांतरे असणार म्हणता, सबजेक्टीव असणार म्हणता, मग दुसर्‍या बाजूला तुमचा लेख असा नव्हताच मुळी , त्यामुळे दुसर्‍याचे मत असे कसे शक्य आहे हा प्रश्ण कसा पडतो तुम्हाला?

तुमच्या लेखाबद्दल तुमची मतं होती, मला तो लेख वाचून जे वाटले ते मत मी "माझे" दिले... (तरी बरं, मी फक्त तुमच्या'च' लेखावर असे वाटले लिहिले नाही, मी एवरेज मत मांडले).. त्यावर लगेच इतके कावून... मी तो लेख वाचायचे कष्टच घेतले नाहीत हे आरोप कशाला?

व तसेच मी वरती लिहिले आहे ते तुम्ही मात्र "वाचायचे कष्ट घेतले नाहीत हे स्पष्ट आहे". मी "एकदंरीत" सगळे लेख गोंधळेपणाच दर्शवतात असे लिहिले आहे. आता ह्याचा अर्थ "तुमचा" लेख दर्शवतो असा तुम्ही काढलात का?

मी हे ही नमूद केले की, आता परत प्रत्यक्ष लेखावर जावून सांगते की नक्की काय गोंधळेपणा वाटत्तो(असे मी दिपक भिडे ह्यांना दिलेलेया प्रतिसादात लिहिले आहे) पण मग इतकी घाई कशाला स्वता:च्या लेखाबद्दल डिफेंड करायची?
वाचकाला जे वाटले ते नम्रपणे मत मांडले की लेखक इतका धावून का बाजू मांडायला लागतो? धीर धरा. लिहिते जर तुम्ही डिफेंसिव मोडमधून बाहेर आलात तर. व जाणून घ्यायची 'खरोखर' इच्छा असेल तर. Happy

आता परत प्रत्यक्ष लेखावर जावून सांगते की नक्की काय गोंधळेपणा वाटत्तो>> झंपी कृ. इथेही लिहा म्हणजे एकाच ठिकाणि वाचता येइल ... अता ज्यांचा गोंधळ होता त्यांनी त्यांच्य मकदुराप्रमाणे लिहिले तुमच्यासारखे ज्यांचा नव्हता त्यांनी का लिहिले नाही ? म्हणजे कसे इतके गुर्हाळ लागले नसते ना! सगळॅ स्पष्ट न गोंधळात टाकणारे रोखठोक वाचता आले असते नाही का? झंपी वाक्यं प्रमाणम असे काहीसे Proud

>>झंपी वाक्यं प्रमाणम असे काहीस>><<
बsss रं, मग? Proud

बाकी, तुम्ही तुम्हाला चालत्या ट्रेन मध्ये घुसायला आवडते का? Wink

>>बsss रं, मग? >><<
अहो मग ते प्रमाणम इथे लिहा ईतकीच विनंती नम्र वै म्हणतात तशी अगदी... Proud

तुम्ही ह्या फलकावर स्टेशन्मास्तर स्टेशन्मास्तर खेळायला लागल्यावर आम्ही पण आलो खेळायला! Proud

म्हणजे लिंगनिरपेक्ष मैत्री / ओळख , हे नाकारले कोणी? <<
मला प्रश्नाचा अर्थ नाही कळला. एक्स्प्लेन कराल का?
म्हणजे नाकारणे या संदर्भात नक्की काय म्हणायचेय ते कळले नाही.

झंपी, तुमची बुद्धीमत्ता इथल्या कोणाहीपेक्षा अत्त्युच्च दर्जाची आहे हे तुम्ही सांगताय सतत पण ती दाखवा म्हणलं की आम्हालाच नावे ठेवताय. लेख द्या म्हणलं तर लाथाळी, लेख वाचल्यावरही लाथाळी. अहो लाथाळी म्हणजे बुद्धीमत्ता नव्हे. आम्ही काय असू ते असू. तुम्ही तुमचे पांडीत्य आम्हाला नावे ठेवण्यापेक्षा खरंच काहीतरी उजेड पाडण्यात वापरा ना.

म्हणजे लिंगनिरपेक्ष मैत्री / ओळख , हे नाकारले कोणी? <<
मला प्रश्नाचा अर्थ नाही कळला. एक्स्प्लेन कराल का?
म्हणजे नाकारणे या संदर्भात नक्की काय म्हणायचेय ते कळले नाही.>>

म्हणजे मला असे म्हणायचे होते की जे (स्वाती आंबोळेंनी सांगितल्यानुसार मंडळाला) अभिप्रेत आहे ते लक्षात घेतले तर लिंगनिरपेक्ष मैत्री, ओळख असावी हे कुठे नाकारले जात आहे? लिंगाधिष्ठितच वर्तन असावे असा मुद्दा नसून लिंगनिरपेक्षही वर्तन असू शकते याची शक्यता नाकारली जात नाही आहे असे म्हणायचे आहे.

आपल्याला जर माझ्या 'मला हा वादच समजलेला नाही' या विधानाबाबत विचारायचे असल्यास माझा मुद्दा असा आहे की जो अर्थ मला नंतर समजला (जो योग्य असणार) त्या अर्थाने लिंगनिरपेक्ष ओळख, मैत्री ही असू शकते का हा जो विचार / विषय मांडला गेलेला होता तो मुळातच सर्वांना मान्य असणार हे गृहीत धरलेले असणार ना!

म्हणजे समानता (इक्वॉलिटी) नसावी असे कोणी म्हणणारच नाही असे मला म्हणायचे आहे.

या परिसंवादात चर्चा अ‍ॅडिक्वेट मुद्यांवर होत नाही आहे असे मला वाटत आहे.

हा परिसंवाद असल्यामुळे यात लेखांमध्ये आलेले व न आलेले असे सर्वच मुद्दे अपेक्षित असू शकतात असे वाटते.

१. लिंगनिरपेक्षता ही एखाद्या संस्कृतीशी, एखाद्या भौगोलिक प्रदेशाशी (थोडक्यात ) मातीशी निगडीत (त्यावर विसंबून) असावी का? (म्हणजे ते आंघो़ळीचे वगैरे उदाहरण)

२. लिंगनिरपेक्षता असायला हवी हे स्त्रियांना केवळ समानतेच्या (इक्वॉलिटीच्या) इच्छेमुळे वाटते का?

३. लिंगनिरपेक्षता पुरेशी निर्माण झाल्यास स्त्री आपले स्त्रीपण (मुद्दाम 'स्त्रीत्व' म्हणत नाही आहे) काही प्रमाणात हरवून बसण्याची शक्यता आहे का? (स्त्रीपणात कौटुंबिक वातावरण चांगले ठेवण्याची नैसर्गीक इच्छा व त्यानुसार केलेल्या कृती, लग्नसंस्थेवर विसंबून राहण्याची प्रवृत्ती, कौटुंबिक आधाराची गरज या गोष्टी अपेक्षित असून त्या केवळ नैसर्गीक व प्रादेशिक आहेत असे मत)

इत्यादी

लिंगनिरपेक्षता:

१. शहर व खेड्यांमध्ये फरक काय, कसा, कितपत व कशामुळे

२. भारत व इतर देशांमध्ये काय फरक

३. लिंगनिरपेक्षतेचे काही कॉम्पोनन्ट्स स्त्रियांना मान्य होतील का? जसे आरक्षण नसणे वगैरे

४. लिंगनिरपेक्ष मैत्री ही केवळ एक काव्यमय कल्पना आहे का? की प्रत्यक्षात तसे उदाहरण प्रत्येकाच्या जीवनात एक तरी आहे?

५. वैवाहिक आयुष्याची अनेक वर्षे गेल्यानंतर पती व पत्नी जवळपास एकमेकांचे मित्रच होतात व अशा नात्यात अशा कालावधीनंतर लिंगनिरपेक्ष मैत्री निर्माण होते का

वगैरे

< याची शक्यता नाकारली जात नाही आहे असे म्हणायचे आहे> : किती फिरवून फिरवून लिहाल?
लिंगनिरपेक्ष वर्तन सर्वसामान्यतः स्वीकारले जाते असे तरी कुठे आहे?

<स्त्रीपणात कौटुंबिक वातावरण चांगले ठेवण्याची नैसर्गीक इच्छा व त्यानुसार केलेल्या कृती, लग्नसंस्थेवर विसंबून राहण्याची प्रवृत्ती, कौटुंबिक आधाराची गरज या गोष्टी अपेक्षित असून त्या केवळ नैसर्गीक व प्रादेशिक आहेत असे मत आहे>

स्त्रीला या गोष्टींची गरज असते आणि ते नैसर्गिक आहे असे म्हणायचेय का? म्हणजे पुरुषाला या गोष्टीची गरज निसर्गतः नसते? यातले नैसर्गिक किती आणि संस्कारजन्य किती? स्त्रीने पुरुषावर अवलंबून/त्याच्या आश्रयानेच रहावे अशी परिस्थिती /शिकवण असणे ही गोष्ट नैसर्गिक की सामाजिक/सांस्कृतिक?

लग्नसंस्थेवर अवलंबून रहायची गरज स्त्रीला जास्त असेल तर जोडीदाराच्या मृत्यूनंतर पुरुषाने दुसरा विवाह करणे सर्वसंमत, तर स्त्रीने विवाहाशिवाय आपल्या अन्य नातेवाइकांच्या आश्रयाने जीवन कंठावे असे का बरे?

एक मिनिट एक मिनिट...
लिंगनिरपेक्षता आणि स्त्री-पुरूष समानता या दोन्ही एकमेकांशी निगडीत संकल्पना आहेत असं जरी असलं तरी लिंगनिरपेक्षता = स्त्री-पुरूष समानता एवढेच नव्हे.

चर्चा लिंगनिरपेक्षतेवर व्हावी. समानतेच्या ज्या मुद्द्यांना धरून आधीही भरपूर वाद होऊन गेलेत इथे तेच सगळे वाद आणि मुद्दे जरा टाळूया का प्लीज?

लिंगनिरपेक्ष वर्तनही असू शकते हे नाकारले जात नाही आहे.

कौटुंबिक आधार, लग्नसंस्थेवर अवलंबून असणेबाबतचा आपला प्रतिसादः

पुरुषाला गरज नसते का असा प्रश्न विचारलात.

प्रथम हे मान्य आहे का की 'लिंगनिरपेक्षता' या शब्दाचा अर्थ जर 'स्त्री पुरुष समानतेशी' निगडीत असला तर 'स्त्री पुरुष समानता' या संज्ञेचा युगानुयुगे अपेक्षित अर्थ असा आहे की स्त्रीला तिचे हक्क पुरुषाइतकेच मिळावेत. यात (सहसा) असे अपेक्षित नसते की पुरुषाला स्त्रीचे अथवा समान हक्क मिळावेत. याचे कारण (बर्‍याचश्या) संस्कृती पुरुषप्रधान आहेतच. असे असल्यावर या परिसंवादात 'स्त्रीला असलेल्या कौटुंबिक पार्श्वभूमी'वरच चर्चा होणार ना? पुरुषाला गरज असते की नसते हा मुद्दा येणार नाही.

होय, 'संस्कृतीप्रदेशसापेक्ष' ते नैसर्गीक आहे. भारतीय संस्कृतीत एकट्या स्त्रीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाणे हे अनेक शतके होत आहे. अनेक वर्षांच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या थरांमुळे आपल्याकडील स्त्री मूलभूतरीत्याच कौटुंबिक पार्श्वभूमी असावी या विचाराची होते.

याचे कारण (बर्‍याचश्या) संस्कृती पुरुषप्रधान आहेतच. असे असल्यावर या परिसंवादात 'स्त्रीला असलेल्या कौटुंबिक पार्श्वभूमी'वरच चर्चा होणार ना? पुरुषाला गरज असते की नसते हा मुद्दा येणार नाही.<<<

तुम्ही विनाकारण खूप गृहिते धरता आहात.
पुरूषाला भावनाविवश होण्याची मुभा नाही लिंगाधारीत स्टिरिओटाइप्स (मराठी शब्द?) मधे हे जेव्हा म्हणले जातेय तेव्हा एक माणूस म्हणून ती मुभा असायला हवी लिंगनिरपेक्षपणे हे आलंच ना ओघाने. हे एक उदाहरण झालं.

१. लिंगनिरपेक्षता ही एखाद्या संस्कृतीशी, एखाद्या भौगोलिक प्रदेशाशी (थोडक्यात ) मातीशी निगडीत (त्यावर विसंबून) असावी का? (म्हणजे ते आंघो़ळीचे वगैरे उदाहरण)
>> अगोदर लिहिलंय, पुन्हा लिहिते : लिंगनिरपेक्षता ही वेळोवेळी देश, काल, स्थल, समाज यांनुसार बदलत जाते. (जरा वाचाहो अगोदर लिहिलेलं प्लीज! :))

२. लिंगनिरपेक्षता असायला हवी हे स्त्रियांना केवळ समानतेच्या (इक्वॉलिटीच्या) इच्छेमुळे वाटते का?
>> माणूस म्हणून स्त्री व पुरुष दोघांनाही वागवले जावे व माणूसपणाच्या दृष्टीने परस्पर वागणूक असावी ही इच्छा.

३. लिंगनिरपेक्षता पुरेशी निर्माण झाल्यास स्त्री आपले स्त्रीपण (मुद्दाम 'स्त्रीत्व' म्हणत नाही आहे) काही प्रमाणात हरवून बसण्याची शक्यता आहे का? (स्त्रीपणात कौटुंबिक वातावरण चांगले ठेवण्याची नैसर्गीक इच्छा व त्यानुसार केलेल्या कृती, लग्नसंस्थेवर विसंबून राहण्याची प्रवृत्ती, कौटुंबिक आधाराची गरज या गोष्टी अपेक्षित असून त्या केवळ नैसर्गीक व प्रादेशिक आहेत असे मत)
>> इथे ''स्त्रीपणा''त तुम्ही ज्या गोष्टी गृहित धरताय त्या बर्‍याचशा सोशल कंडिशनिंग मधून आलेल्या आहेत. जर स्त्रिया किंवा पुरुषांना वेगळ्या पद्धतीने वाढवले गेले (त्याच त्या सोशल कंडिशनिंगचा आधार न घेता) तर नक्कीच त्यांची विचारांची पद्धत, गरजा, प्रवृत्ती या भिन्न असतील. उदा : स्वीत्झर्लंड, फिनलंड इ. काही देशांत डेटिंग इ. मध्ये स्त्रिया जास्त आग्रही / अग्रेसर दिसून येतात - त्या तुलनेत तेथील पुरुष निवांत - laid back असतात, स्त्री-पुरुष दोघेही मिळून घर चालवितात - अर्थार्जन करतात, स्त्रीला जशी ''कुटुंबा''ची गरज भासू शकते तशीच तिथे ती 'पुरुषा'लाही भासू शकते, स्त्रीला जशी ६ महिने बाळंतपणाची रजा असते तशीच ६ महिने पुरुषांनाही रजा मिळते - तेव्हा ते आलटून पालटून रजा घेतात व रजेच्या काळात पूर्णवेळ बाळाचे संगोपन करतात - घर सांभाळतात. तेव्हा ''मातृत्व''कारक सर्व गुण हे फक्त स्त्रीपुरते मर्यादित नसून गरज व इच्छा असल्यास पुरुषालाही ''अंगिकारता'' येतात. माता झाली म्हणजे तिला आपोआप सर्व काही मातृत्वसंबंधी ज्ञान होते असे अजिबात नाही. गरज, सराव व निरीक्षण यांतूनच अनेक माता शिकतात.

माणूस म्हणून स्त्री व पुरुष दोघांनाही वागवले जावे व माणूसपणाच्या दृष्टीने परस्पर वागणूक असावी ही इच्छा.>>

हे विधान (माझ्यामते) अपुरे आहे.

समजा ऑफीसमधून घरी आलेला नवरा बायकोला प्रेमाने वागवत आहे व माणूस म्हणूनही वागवत आहे पण तिला आल्या आल्या चहा करायला सांगत आहे. (येथे उदाहरणापुरते हे गृहीत धरले की...) त्या पत्नीला चहा नवर्‍याने स्वतःचा स्वतः करून प्यावा असे वाटत आहे, तर ते माणूसपणे न वागवले जाण्याचे निदर्शक ठरेल का? माणूस म्हणून वागवल्यानंतरही जे अनेक शतकांपासून निर्माण झालेले समज (चुकीचे अथवा काही वेळा काही ठिकाणी योग्य) हे जातील असे कुठे?

एक मिनिट एक मिनिट...
लिंगनिरपेक्षता आणि स्त्री-पुरूष समानता या दोन्ही एकमेकांशी निगडीत संकल्पना आहेत असं जरी असलं तरी लिंगनिरपेक्षता = स्त्री-पुरूष समानता एवढेच नव्हे.>>>>

तुम्ही विनाकारण खूप गृहिते धरता आहात.>>>>

मला वाटते एका प्रतिसादात तुम्ही 'लिंगनिरपेक्षता म्हणजे नेमके काय' हे कृपया लिहाच आता. याची गरज आहे व हे माझे विधान उपरोधिक नव्हे याची खात्री बाळगा.

पण इतकी चर्चा झाल्यानंतरही लिंगनिरपेक्षता म्हणजे काय हे सर्वांनाच म्हणावेसे वाटत आहे (आधी मूळ संकल्पनेवर अनेक जण तसे म्हणाले, परिसंवादात मला वाटलेला अर्थ घेतल्यामुळे मी म्हणालो आणि आता आपण लिंगनिरपेक्षता म्हणजे एवढेच नव्हे असे म्हणत आहात) तर एकदा पुन्हा नोंदवावेत की लिंगनिरपेक्षता म्हणजे नेमके काय!

धन्यवाद!

(अवांतर - हा प्रतिसाद वादोत्पादक नव्हे. लिंगनिरपेक्षता म्हणजे केवळ दुसर्‍याला माणूस म्हणून वागवणे असे नक्कीच नसणार. ती माणूसकी झाली. लिंगनिरपेक्षता म्हणजे लिंगाधिष्ठित वर्तन, विचार नसणे असेही नसणार. याचे कारण तसे झाल्यास ती फक्त स्त्री पुरुष समानता होईल. मग लिंगनिरपेक्षता ही स्त्री पुरुष समानतेपेक्षा वेगळी म्हणजे नेमके काय?)

>>>झंपी, तुमची बुद्धीमत्ता इथल्या कोणाहीपेक्षा अत्त्युच्च दर्जाची आहे हे तुम्ही सांगताय सतत पण ती दाखवा म्हणलं की आम्हालाच नावे ठेवताय. लेख द्या म्हणलं तर लाथाळी, लेख वाचल्यावरही लाथाळी. अहो लाथाळी म्हणजे बुद्धीमत्ता नव्हे. आम्ही काय असू ते असू. तुम्ही तुमचे पांडीत्य आम्हाला नावे ठेवण्यापेक्षा खरंच काहीतरी उजेड पाडण्यात वापरा न>>><<

अरेरे किती ती आदळाआपट व शब्दांचा भडीमार.. तो ही स्वतःच अर्थ पाहिजे तो काढून.

अत्यच दर्जा वगैरे... ती तुम्ही दाखवा हो. तो तुमचा अधिकार आहे.
उगाच लाथाळी वगैरे शब्द वापरायचे कारण नाही. इतक्या हिन पातळीवर बोलणे तुम्हालाच जमते. समजले ना.

विषयावर मी माझे मत मांडले व मला जे काही पटले नाही ते म्हटलेय, चुका काय वाटल्या ते सांगितले आयोजनातील आणी जर तुम्हाला आवडले नाही तर अशी आदळाअपट का? तेव्हा उगाच कांगावा करु नका.

तुमच्या भाषेत , प्रतिसाद आम्हाला वाटेल तसा देवू ह्याच्या नावाखाली शिव्या नाही घातल्यात कोणाला का अजुन कोणाची अक्कल नाही काढलीय?(एका लेखिकेच्या साध्या शब्दाच्या उच्चारावरचा तुमचा गोंधळ विसरलात का तुम्ही?)

तसा गोंधळ घालून मलाच खूप कळतय असा काही दावाही केलेला नाही तेव्हा उगाच 'ह' झाल्यासारखे बोलु नका.

Pages