अमराठी डॉक्टरांशी संवाद कसा साधावा?

Submitted by dhaaraa on 16 February, 2012 - 23:16

तसा हा प्रश्न आमच्यासाठी बराच जुना आहे. (एरवी 'मराठी लोकांचं हिंदी'सारखा टीपी करण्याचा विषय, पण यावेळी गंभीरपणे विचारतेय.)

अमेरिकेत तर फारच मज्जा मज्जा यायची, कारण तिथल्या डॉ.ला मळमळणे(nausea) सांगता यायचे, पण पोटात पाकपुक होतंय/डुचमळतंय, पोट ढवळून निघालंय, असल्या गोष्टी नाहीच सांगता यायच्या. मी एकदा तर गुडूमगुडूम होतंय असं सांगायचं होतं, म्हणून 'बबललाइक साउंड कम्स फ्रॉम स्टमक' असंच सांगितलं होतं. तरी मी आधीच अशी शब्दांची तयारी करून जायचे, पण आमचं मेडिकल टर्म्सचं ज्ञान अगाध आहे, तेव्हा ऐन वेळी काही तरी असं आठवायचं की त्याला समान इंग्रजी शब्द दूरदूरपर्यंत माहित नसायचे. घरी आल्यावर गूगलदेवाला शरण गेल्यावर मग 'स्कोप आहे का मला हा शब्द माहित असायचा?' असलं काही-बाही कळायचं. Happy

तर सध्या आम्ही आसाममध्ये राहतो. भारतातच असल्याने हिंदी बर्‍याचदा चालून जाते. पण तिथेही मराठीचं भाषांतर महाग पडतंच. मागे एकदा डॉ.ला 'पोट साफ होत नाही' याचं मी 'पेट साफ नहीं होता' असं बिनदिक्कत सांगितलेलं. डॉक्टरचा प्रतिप्रश्नः"मतलब क्या होता है?" त्यावेळी मी प्रेग्नंट होते, त्यामुळे तिने 'क्या कुछ करना है?' असं चिडूनच विचारलं. मग आम्ही इंग्रजीचा सहारा घेतला. Happy

परवा नवर्‍याला 'डोळ्याच्या वरच्या पापणीच्या आत पुटकुळी आली होती. आता गेलीये, पण त्याचा काही साइडइफेक्ट नाही ना?' असं विचारायचं होतं. काहीच सुधरेना, तेव्हा त्याने कशीबशी दुसर्‍या ठिकाणी आलेली छोटीशी पुटकुळी दाखवून निभावून नेलं. मागे एकदा इथेच 'दात खाणे'ला 'teeth grinding' म्हणतात, असे कळले होते म्हणून ही पोस्ट टाकत आहे.

तेव्हा आतापुरता 'डोळ्याच्या वरच्या पापणीच्या आत पुटकुळी आली होती' याचं भाषांतर सांगा.
किंवा अशा वेळी तुम्ही काय करता, तेही सांगा.
नेहेमीच कामास पडतील असे शब्द माहिती असतील, तर ते शेअर केले तरी उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेहेहे! धारा यातुन गेलेय्/जातेय! गुगलदेव जिंदाबाद! मी आधीच जे काय होतय त्याबद्दलची माहिती गुगलुन घेते. त्यात बरेच शब्द सापडतात! ते teeth grinding शोधताना मी चक्क 'teeth eating in sleep' अशी सर्च दिली होती Biggrin पण हवी ती माहिती मिळाली. मध्यंतरी मला घसा खाकरुन थुंकलं की रक्त दिसायचं. त्यासाठी पण गुगल केल आणि त्याला 'bloody sputum' असं म्हणतात समजलं! पहिल्या प्रेग्नंसीमध्ये बरेच नवीन शब्द समजले!

'डोळ्याच्या वरच्या पापणीच्या आत पुटकुळी आली होती' >> Please google search for blepharatis.
this is an eye infection like sty/ where eyelids get infected. It is sometimes connected with dandruff and head lice. it is a very common condition. Please use hot compresses on the eye and the doc will also prescribe medicine plus eye drops. He must be feeling as if something heavy is in the eyes. you can also grate a potato and put over his closed eyes for 10 minutes that brings great relief. avoid too much tv/ computer and bright light for some time.

Happy इथे बंगलूर मध्येही परवा अनुभव आला...
नवर्‍याला बरं वाटत नव्ह्तं तेव्हा.. शहारे येण्याला गूज पिंपल्स म्हणतात हे समजलं Happy
गूज बम्प्स माहित होते.

डोळे येणेला Conjunctivitis असा शब्द आहे ना? आय फ्ल्यु पहिल्यांदा ऐकला, हाही वापरतात का?

हिंदीत आय फ्लु, इंग्रजीमध्ये आणी डॉक्टरी भाषेत Conjunctivitis च म्हणतात. कामवालीने आय फ्लु झाला असा निरोप पाठवल्यावर हा शब्द कळाला.

वरदा, अमा, धन्यवाद.
अमा, हेच तर होतं... तुम्ही सांगितलेला शब्द मेडिकली एकदमच बरोबर आहे, पण बोलीभाषेत प्रचलीत नसतो. आणि महत्वाचे म्हणजे ऐन वेळी आठवल्याने त्याचा गृहपाठही केलेला नसतो, त्यामुळेच तर गडबड होते.

बाकी सगळ्यांचेही आभार... असेच ओळखीतले शब्द सांगत राहा, ही विनंती.

धारा मस्त धागा.
मी बहुभाषिक बॉर्डरच्या भागात राहात असल्याने येणार्‍या पेशंटशी कसा संवाद साधावा हे मला पण कधीकधी कळत नाही.

मस्त यावरून एक गम्मत आठवली, मी इंटर्नशिप करत असताना ग्रामीण भागात ३ महीने होते, तिथे नेहमीची गर्भार बायकांची तपासणी होत असे. एकदा मी एकीला विचारलं की बच्चा घुमता हे क्या?(मला विचारायच होत, तुला फिटल मुव्हमेंट्स नीट जाणवतात का?) त्यावर तिनं उत्तर दिलं हां हां घुमता है ,वो देखो जा रहा है..तिने तिच्या २ वर्षाच्या मुला कडे बोट दाखवलं...

महेश सोअर आईज म्हणजे फक्त डोळे दुखणे किंवा थकणे अश्या अर्थी बरोबर वाटतय. बहुदा डोळे येण्याला नसावा हा शब्द. कन्जक्टीव्हायटीस आणि पिंक आय हे दोन्ही शब्द ऐकलेत मी सुधा.

आपलं डोक्टरांना कळणं आवश्यक आहे पण त्यांचंही आपल्याला कळणं...

माझ्याच एका इमर्जेन्सि ऑपरेशनसाठी हॉस्पिटलात दाखल झाले होते. पोटात हू म्हणून दुखत होतं आणि डोक्टर्स विचारतायत... हॅव यू ओपन युवर बोऊल्स टूडे? (नंबर २ आज झालय का?)
आईशप्पथ... आमच्या तर्खडकरी इंग्रजीत हे नव्हतं हो...

आता हो म्हणू की नाही? शेवटी प्रश्नं नाही कळला असंच सांगितलं. त्यांना वाटलं की मला अ‍ॅक्सेंट कळत नाहीये... शेवटी मी व्हिच बॉउल्स... व्हॉट बॉउल्स अस्लं काहीतरी विचारल्यावर कळ्ळं की या यडचापच्या बेसिकमेच गडबड है...
असो... बर्‍याच जणांना हे वाचून... श्शी काय हे... वाटेल. वाटू दे. पण कुणाला ह्या माहितीचा उपयोग झाला तर बरच आहे. माझ्यासारखं ह्या तुच्छं प्रश्नाच्या उत्तरासाठी पंधरा मिनिटं दुख दुख दुख करीत बसावं लागणार नाही.

दाद +१.
मी बरेचदा गुगल-भाषांतर घेउन जातो आणि मोबाईलमध्ये डिक्शनरीपण ठेवली (होती).

ही गोष्ट १९९२ सालची हो... गुगल जन्मलं असेल... पण इतकं "मोठं" नव्हतं झालं ना... आणि इमर्जन्सी ऑपरेशन... काय बरोबर होतं अन काय नाही... काय नव्हेच ते

दाद Lol

मी पुर्वी नोएडात होतो (तेव्हा गुगल नव्हते), एकदा पोटात दुखत होते म्हणुन ओवा घ्यायचा होता.
एका किराणाच्या दुकानात जाऊन पुणेरी हिंदित खुप सांगायचा प्रयत्न केला,
छोटा छोटा तिल जैसा होता है, तिखा होता है, पोट दुखनेपर उपयोगी होता हैं, इ.
आधी काळे तिळ, मग अजुन एक दोन अगम्य गोष्टी आणून झाल्या,
नंतर एक दोन वेळा तिखा होता हैं असे ठासुन सांगितल्यावर ओवा आणला,
मग हसत हसत सांगितले की इसे हिंदीमे अजवाईन कहते हैं. Happy

गेल्यावर्षी नवऱ्याला cyst झाले होते छातीवर. त्यानेच दुर्लक्ष केले म्हणून त्यात पस होवून चांगलेच ठणकत होते २ दिवस.

इथे लंडन GP ची appointment मिळणे म्हणजे २-३ आठवडे वाट पहावी लागते. खूपच दुखत होते मग सकाळी ८ वाजता फोन केला आणि ९ वाजताची भेट ठरली. नवऱ्याला T-shirt घालताना पण त्रास होत होता अगदी छातीवर फोड.

फोड ला इंग्लिश मध्ये BOIL म्हणतात असा सरळ समानार्धी शब्द शोधून फोनवर मीच सांगितले heartboil किंवा chestboil किवा Heatboil

गेलो सकाळ ९ वाजता डॉक्टर केबिन मध्ये, डॉक्टर ने मग सगळी माहिती विचारली वय काय ?? केव्हा पासून दुखत आहे ?? छातीमध्ये काही दुखल्यासारखे वाटत आहे का ?? सगळे चोख उत्तरे. मग डॉक्टर ने prescription पण कॉम्पुटर वर type केले. मी आणि नवरा shock कि इतके मोठी गाठ /फोड आणि डॉक्टर ने एकदा पण पहिले नाही आणि त्यात ते फुटले पण होते.

मग डॉक्टरला T-shirt वर करून जे होते ते दाखवले तेव्हा त्याच्या लक्षात आले पण डॉक्टर पण इतके शोक्क के इतका वेळे यांना कसे कळले नाही आणि आम्ही आमच्या इंग्लिश वर लाजिरवाणे झाले होतो.

फोने वरच्या receptionist ने heartboil किंवा chestboil किवा Heatboil चे सरळ सरळ heartburn असे टाकले होते त्यामुळे डॉक्टर त्या बद्दल विचारात होते.

गुलमोहोर तुम्ही बरोबरच सांगितलेत की. त्या बाईने गडबड केली ना?

मी चक्क, i don't understand what you just said अथवा i dont know what you mean. असे सांगते... तरीही नाही समजले तर, 'so sorry, still i dont understand'. असे झाले की ते वेगळ्या शब्दात सांगतात. हे इथल्या लोकांकडुनच शिकले आहे कारण त्यांना पण भारतीयांचे इंग्लिश जेव्हा समजत नाही तेव्हा समजेपर्यंत ते विचारतात.

डॉ. बाबतीत तर भयंकर काळजी घेतो. डॉ.ना फोनवरुन किंवा समोरपण काय झाले आहे हे सांगताना कधीही मेडिकल टर्म मधे सांगत नाही. उगाच भलतच निघालं तर काय घ्या. केवळ शब्दश: वर्णन करुन लक्षणे सांगतो. डोळा आला तर डोळा लाल झालाय, पाणी येतय, खाजय, दुखतय असे सर्व. त्यावरुन तिला समजते. शेवटी असेपण विचारतो की, आमचा काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला नक्की बरोबर समजलय ना? उगाच टेशन नाही भलतेच औषध लिहुन घेण्याचे. Happy

बच्चा घुमना एकदम विनोदी. Happy