पद्मभूषण प्राण सिकंद यांचा आज 92वा वाढदिवस... ...

मित्र हो
हिन्दी सिनेजगतातील खलनायक पद्मभूषण प्राण सिकंद यांचा आज 92वा वाढदिवस...
...
 खलनायक.jpg
...त्यांच्या आयुर-आरोग्याचे शुभ चिंतन!...


Submit to kanokani.com

शत आयुष्य लाभो....

आमच्याही शुभेच्छा!

'प्राण सिकंद' हे नाव आहे हे माहीत नव्हते.

माझं एक अत्यंत आवडता नात.. स्मित जिओ हजारो साल... स्मित

शुभेच्छा.... हिंदी षिणेमाचं एक वैशिष्ट्य आहे.. खलनायकी भूमिका करणारे लोकच प्रत्य्क्ष आयुष्यात जास्त प्रेमळ असतात... ( आणि नायक सगळे टवाळ असतात.)

उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा! एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता. खलनायकी विविध लकबी पुन्हा पुन्हा पहाण्यासारख्या.. अगदी आजच्या आक्रस्ताळी तथाकथित खलनायकांच्या थोतरीत बसेल अशा लकबी. मी लहानपणापासून फिदा आहे. प्राण...नुसता नजरेचा खेळ.!

शुभेच्छा!

शुभेच्छा.

प्राण...नुसता नजरेचा खेळ.!
अगदी अगदी ... मी प्राणचा एवढा फॅन होतो/आहे की दोन मिनिटे प्राणचे काम असले तरी आणि कितीही टुकार पिकचर असला तरी मी तो पहात असे....

सध्याचे प्राणसाहेबांचे दर्शन....
http://www.youtube.com/watch?v=lTOc_RYvFwE

दिलीप, देव, राज या समकालीन तीन अभिनेत्यांपेक्षाही वयाने चारपाच वर्षे सीनिअर असूनही नेहमी आपली तब्येत सांभाळूनच या चित्रपटसृष्टीत राहिल्याने प्राण फक्त मेकअप केल्यानंतरच 'म्हातारे' वाटत राहिले. आघाडीची त्रयी मागे पडली तरी पुढील पिढीतील धर्मेन्द्र, जितेन्द्र, राजेन्द्रकुमार, जॉय मुखर्जी, विश्वजीत, मनोजकुमार आदी त्या त्या काळातील प्रत्येक नायकांसोबत त्यानी जशाचतसे काम केले आणि आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला.

एक काळ असा होता की, चित्रपटसृष्टीत राजेश खन्ना पाठोपाठ सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार म्हणजे 'प्राण'होते.

पडद्यावर जरी ते खलनायक म्हणून वावरले असले तरी खाजगी जीवनात त्यानी कधीही आपल्या स्टारपदाचा मुकूट मिरविला नाही असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात ते सत्यच असणार.

त्यांच्याविषयीच्या आदरात भर पडली त्यावेळी ज्यावेळी त्यानी "आंसू बन गये फूल" साठी त्याना मिळालेला 'फिल्मफेअर' पुरस्कार नाकारला. त्याला कारण म्हणजे त्यावर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार गुलाम महमद याना "पाकिझा" साठी मिळायला हवा असे जवळपास सार्‍यांचे म्हणणे असताना तो पुरस्कार दिला गेला टुकार अशा "बेईमान" साठी शंकर जयकिशन याना. प्राण यानी एकप्रकारे गुलाम महमद याना त्यांच्या कलेबद्दल मुजराच केला होता असे म्हटले पाहिजे.

प्राण १०० गाठतील यात संदेह नाही.

Veteran-actor-Pran-on-his-90th-birthday-Party-1.jpg

हेही बघा.....

http://www.pransikand.com/family.html

फोटो पाहून 'चाहत्यांजवळ कलाकारांच्या वार्धक्याची खुण राहायला नको' म्हणून स्वाक्षरी नाकारणारे 'हसवा हसवी' नाटकामधले 'कृष्णराव हेरंबकर' हे पत्र आठवले.
खरच त्यांना असे पाहून थोडे उदास वाटले. अर्थात वयोमानानुसार हे होणारच हे माहीत असूनही..

बाळू... उत्तम लिंक. खूप धन्यवाद.. स्मित

प्राण माझाही आवडता कलाकार. स्मित
लहानपणी त्यांची भुमिका असलेले सिनेमे पाहताना प्रचंड राग यायचा...
मोठं झाल्यावर कळलं, तोच खरा अभिनय. स्मित

प्राण १०० गाठतील यात संदेह नाही.>>>> तुमच्या तोंडात साखर पडो. १००००००००० मोदक स्मित
प्राणसाहेबांना आमच्याही शुभेच्छा स्मित

zanjeer pran.jpg

प्राण...नुसता नजरेचा खेळ.!>>>>

अगदी...अगदी..!
त्यामुळेच जंजीर बघताना खास मझा आला होता. दोघेही नजरेच्या खेळातली, डोळ्याचा हुकमी वापर करणारी अफ़लातुन माणसं स्मित

प्राणने रंगवलेले खलनायक इतके प्रभावी असत, कि ते म्हणाले होते त्यांच्या काळातल्या पिढीत कुणीही आपल्या मुलांचे नाव, प्राण ठेवत नसत.

जून्या अदालत मधली, (नर्गिसच्या) त्यांची भुमिका माझ्या आवडीची.

त्यांना हार्दिक शुभेच्छा.

+ सहमत दिनेश यांच्या "अदालत" मताशी. कोठीवर वावरण्याची त्यांची सवय इतकी बेमालूम वठली होती की कुणाला तरी वाटावे की त्यांची ती जन्मजातच सवय आहे.

अशीच एक भूमिका म्हणजे 'मधुमती' मधील 'उग्रनारायण' या इनामदाराची. सुरुवातीला आनंदशी ओळख झाल्यावर अगदी सहजपणे त्याला सांगतो, "बरं झाले तुझ्यासारखी शहरातील एखादी व्यक्ती इथे कामासाठी आली आहे. संध्याकाळी जरूर ते वाड्यावर गप्पा मारण्यासाठी." अशी भावना उग्रनारायण व्यक्त करतो. शहरातून इस्टेटीच्या कामासाठी नाईलाजास्तव आलेला इनामदार असतो त्याला खेड्यात एक रात्रही काढणे मुश्किल वाटणे साहजिकच आणि तसाच संवाद प्राण त्या भूमिकेतून व्यक्त करतात ते पाहून मुळात उग्रनारायण 'खलपुरुष' नाही हे पटते, पण आनंदच्या उत्तरामुळे तो चिडतो असे त्यानी दाखविले.

९३व्या वाढदिवसानिमित्त पद्मभूषण प्राण सिकंद यांना अनेक शुभेच्छा.

pran.jpg

प्राण सिकंद यांना अनेक शुभेच्छा...माझ्या बाबांचा आवडता खलनायक... 'प्राण' वर ते भरभरून बोलतात. त्यांच्या मते प्राण ला फाळके पुरस्कार मिळाला पाहिजे.

प्राण यांना अनेक शुभेच्छा.

प्राण यांची मला सर्वात जास्त आवडलेली भूमिका, उपकारमधली आणि दुसरी "हम बोलेगा तो..." स्मित

look at him, he was/is so handsome

pran.jpg

हा अभिनेता हजारो वर्ष जगो.

मी, प्राण, लिंकन, डार्विन ----- १२ फेब चे हिरे

प्राण यांना फाळके पुरस्कार मिळाला पाहिजे. +१००

प्राण यांना अनेक शुभेच्छा.

प्राण यांचा प्रत्येक भुमिकेत वेगवेगळा गेटअप असतो .

प्राण हे खरोखर एके काळी हिंदी चित्रपटसृष्टीचे प्राण होते.
चित्रपट कितीही टुकार असला तरी जीव ओतुन अभिनय केल्यामुळे प्राण यांची भुमिका म्हणजे बावनकशी सोने असायचे.
मला तरी असे वाटते की सद्ध्या समग्र हिंदी चित्रपटसृष्टीमधे वयाने आणि अनुभवाने सर्वात ज्येष्ठ प्राण साहेबच आहेत.

प्राण यांना फाळके पुरस्कार उशीराने का होईना मिळाला. प्राणसाहेबांचे अभिनंदन!