यापुढे

Submitted by pulasti on 29 August, 2008 - 22:11

मी सांगणे दिले; सोडून यापुढे
तुमचे तुम्हीच घ्या; पाहून यापुढे

हे अर्थ-लेख, हे...चवदार आकडे!
ताटात हेच घ्या; वाढून यापुढे

"कंटाळतोस तू; अन्नास त्याच त्या..."
मी लाजवूच का... बोलून यापुढे?

मी दचकलो असा, हे कोण बोलले?
"ठेवू नका मला कोंडून यापुढे"

बेभान शब्द हे; मी आवरू कसे?
खुंटेल बोलणे, बोलून यापुढे...

गुण माणसा तुझे; आले हवेतही
तू श्वास श्वास घे; गाळून यापुढे

सूर्यासवे नव्या; येती जुनेच ते -
टळतात प्रश्न का; जागून यापुढे...

मी काय शोधतो; ते आठवेचना!
शोधायचे कसे; शोधून यापुढे...

गुलमोहर: 

गुण माणसा तुझे; आले हवेतही
तू श्वास श्वास घे; गाळून यापुढे

सूर्यासवे नव्या; येती जुनेच ते -
टळतात प्रश्न का; जागून यापुढे...

विशेष भावले. इतरही सुरेखच.

>>गुण माणसा तुझे; आले हवेतही
तू श्वास श्वास घे; गाळून यापुढे

खल्लास!
वाचायला नको याहून यापुढे! Wink

खूप छान..

पुलस्ती : मस्त जमलीय गझल...

मी दचकलो असा, हे कोण बोलले?
"ठेवू नका मला कोंडून यापुढे"

बेभान शब्द हे; मी आवरू कसे?
खुंटेल बोलणे, बोलून यापुढे...

गुण माणसा तुझे; आले हवेतही
तू श्वास श्वास घे; गाळून यापुढे

मी काय शोधतो; ते आठवेचना!
शोधायचे कसे; शोधून यापुढे...

हे खूप आवडले...

टळतात प्रश्न का च्या ऐवजी टळतील प्रश्न का जास्त योग्य वाटतेय..

    ================
    हीच शोकांतिका तुझी माझी
    काच शाबूत पण चरे होते

      -वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
      प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
      एस. एम. जोशी हॉल, पुणे

      पुलस्ती, सुरेख गजल, आवडली.
      गुण माणसा तुझे; आले हवेतही
      तू श्वास श्वास घे; गाळून यापुढे
      बहोत खूब!

      अगदी सहज आहेत काही काही शेर. 'टळतील' साठी मिल्याशी सहमत.

      जमलेली गझल! आवडली!

      मी दचकलो असा, हे कोण बोलले?
      "ठेवू नका मला कोंडून यापुढे"
      - मस्त!

      -----------------------------------------------
      शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
      Happy

      मिल्या, शलाका - "टळतील" च योग्य वाटतंय. धन्यवाद!

      प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.