माझे आवडते शिक्षक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 9 January, 2012 - 00:25

घर ते सोसायटीचं मैदान अशा दोन टोकांत सगळं जग वसलेलं आहे, अशी भावना मूळ धरत असतानाच शाळेच्या रुपाने नियतीमॅडम कहानी में ट्विस्ट घालून देतात. नवा गणवेश, नवं दप्तर असा सगळा जामानिमा करुन जेव्हा शाळेत प्रवेश होतो, तेव्हा मात्र पुढं आईला जाताना पाहून दमसासाची आवर्तनं घातली जातात. पण पहिल्यांदा आयुष्यात बाईंचं बोट धरुन नव्या नवलाईच्या जगाला सामोरं जायला आपण तयारही होतो.

त्यानंतर अनेक शिक्षक येतात, काहींबरोबर सूर जुळतात, काहींना खास टोपणनावं ठेवली जातात. कधी काही खास आकर्षणांमुळेही आठवणी रुजलेल्या असतात. अगदी चितळे मास्तरांच्या नियमाप्रमाणे ओळीत आठच शब्द किंवा प्रत्येक उत्तराला चौकट, फक्त निळंच पेन वापरायचं असल्या सवयी कधी आपल्या अंगवळणी पडतात ते कळतही नाही. त्यांचंच 'सगळं बरोब्बर' ते 'त्याला कुठं काय येतं.. उग्गाच माज!' अशा सगळ्या वळणावळणांनी हा प्रवास सुरु राहतो.

या सगळ्या प्रवासात तुम्हांला आवडलेले शिक्षक कोणते, तुमच्या आयुष्यात त्यांचं असलेलं खास स्थान, यांबद्दल आम्हांला जाणून घ्यायला आवडेल. कदाचित कृतज्ञता म्हणून किंवा आठवणींना केलेला सलाम म्हणून त्यांच्याबद्दल लिहाल का?

janimage.JPG
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच खुप मस्त लिहिलय सगळ्यांनी .... आवडल.
पाटिल बाई .. पाचवीत आम्हाला शिकवायला होत्या.खर म्हणजे सर्वच विषय शिकवायच्या.त्यांच्या गालावर मस्त खळी पडायची.त्यांचा आवाजसुद्धा गोड होता.कधी-कधी आभ्यासाचा कंटाळा आला तर आम्ही बाईंना गाणी म्हणायला लावायचो. "ए मालिक तेरे बंदे हम ..." या गाण्याचे बोल अजुनसुद्धा कानात रुंजी घालतात.तर कधी छान-छान गोष्टी सांगायच्या.बाकीचे विषय शिकवतानासुद्धा एखादी गोष्टच सांगतायत असे वाटायचे.आमच्या वर्गातील मुलांच्या आग्रहास्तव परत सातवीला आम्हाला शिकवायला आल्या.कारण आम्ही ज्या शाळेत शिकत होतो तेथे सातवीपर्यंतच वर्ग होते.पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या शाळेत जावे लागायचे.ते वर्ष खुप धमाल गेल.परत जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा गुरुपोर्णिमेला त्यांना भेटायला गेलो होतो.
कामाच्या रहाटगाड्यात त्यांना परत भेटता आल नाही पण या धाग्यामुळे सगळ्या आठवणी मनात जाग्या झाल्या.परत एकदा शाळेतल्या बेंचवर बसलोय अन बाईंच गोड आवाजात गाणे ऐकतोय असे वाटतय...

छडी लागे छम छम ... विद्या येई घम घम ..
छम छम छम ... Happy

छानच लिहिताहेत सगळे.
नादखुळा, लिहिलंय छान पण <कानात दरवर्षी आख्ख्या सुपार्‍या फोडणारा> हे बराच वेळ कळलंच नाही Wink Lol

कानात दरवर्षी आख्ख्या सुपार्‍या फोडणारा << पारंपारीक कुस्ती मधे हे सगळे प्रकार असतात. कुस्तीच्या तालमीत वगेरे हे चालतं. एखाद्या मल्लाच्या कानात सुपारी फोडतात. का ते माहित नाही? विचारून सांगतो.

Proud

Pages