बंटीबाबा – ऑस्कर नॉमिनी

ताई, आता चेंज कर भांडायचा मूड.
नाय्तर सग्ळे म्हण्तिल, "ही जोडी नाई गुड"

ताई ग ताई, मोठ्ठी तू, चिड्णं नाई बरं
धाक्ट्या भावाला म्हणावं, ”तुझं म्हण्णं खरं”

म्हणशील तसं तर मीही भांडाय्चा नाई
फक्त म्हणेन, ”थँक्यू, आय टोल्ड यू सो ताई”

आई बाजू तुझी घेते; बाबा माझी घेतात.
आबा नेहमी मध्यस्ती कराय्ला पुढे येतात.

माझ्या चुग्ल्या तू कर्तेस नि तुझ्या कर्तो मी;
पण, अग, खरं ठर्तं माझंच नेहमी.

म्हट्लं तर नेहमीच अस्तो माझा कांगावा.
खरं ठर्वून घ्याय्ला अ‍ॅक्टर तयारीचाच हवा.

मग सांग, तुझा पाड कस्सा गं लाग्णार?
ऑस्करसाठी यावर्षी, बघ, माझंच नाव जाणार.

Submit to kanokani.com

भन्नाट बंटीबाबा.

हाहा बंटीबाबा इरसाल आहेत अगदी

बंटीबाबा, फक्त नॉमिनेशन कशाला ह्यावर्षीचं ऑस्करच तुम्हाला स्मित

कांगावखोराची कबुली मस्त.

बंटीबाबाची पुन्हा एकदा धम्माल स्मित

फक्त नॉमिनेशन कशाला ह्यावर्षीचं ऑस्करच तुम्हाला >>>>अगदी अगदी स्मित

बंटीबाबा ग्रेट आहेत.....
मंदारशी सहमत

फक्त नॉमिनेशन कशाला ह्यावर्षीचं ऑस्करच तुम्हाला<<<<<<+१

हे ही अगदे तंतोतंत! मस्तच! बंटीबाबा रॉक्स!

बंटीबाबा मस्तच !!!!!!! स्मित

नेहेमीप्रमाणे मस्तच..

लै खास बंटीबाबा !

तुफ्फान!

माझ्या घरी हेच चाललंय सध्या. असं वाटलं ते दोघंच समोर आहेत स्मित
कर्णिक सर... तुम्ही मस्त निरागस विश्व निवडलंय कवितांसाठी. धन्यवाद या कवितेसाठी.

चला, यंदा रेड कार्पेटवर बंटीबाबा दिसणार तर डोळा मारा
ही पण मस्तच झालीये स्मित

कविता छानच आहे ! पण टाईपींग (जोडाक्षरं) आणि काही ठिकाणी आलेले चौकोन डोळ्यांना आणि पर्यायाने वाचायच्या एकसंधपणाला त्रास देतात. (हे तुमच्या सर्वच कवितांबाबत होतंय म्हणून आज ईथे सांगीतलं.) स्मित
बंटीबाबा रॉक्स!

मस्त !

सर्वांचे खूप खूप आभार, अगदी मनापासून.
शेरलॉक याना येत असलेला प्रॉब्लेम तुमच्यापैकी आणखी कुणाला येतोय का? असल्यास काय उपाय करायला पाहिजे ते सुचवल्यास मला मोलाची मदत होईल.

मस्तच!

अर्र्र्र्र्र्र्र्रे!!!! कसली भारीये ही कविता स्मित चॅप्टर आहेत हो बंटीबाबा अगदी हाहा

अँड द ऑस्कर गोज टू.......बंटीबाबा!

बनुताईशी मवाळपणे बोलताना लब्बाड बंटीबाबा डोळ्यासमोर दिसतोय. बनुताईंनी मात्र गाल फुगवलेले दिसतायत.

बंटी एकदम फोरवर्ड आहे

वा रे लब्बाड बंटीबाबा. स्मित खूप मस्त,, ऑस्कर तुम्हालाच स्मित

टाईप करताना बॅकस्पेस अन स्पेस की(key) वापरलीत तर प्रॉब्लेम नाही येणार. चौकोन ४-५ च आहेत ते काढून अन जोडाक्षरांच्या जागी स्पेस दिलाय. स्मित तुम्हाला योग्य वाटल्यास कॉपी पेस्ट करा. स्मित

ताई, आता चेंज कर भांडायचा मूड.
नायतर सगळे म्हणतील, "ही जोडी नाई गुड"

ताई ग ताई, मोठ्ठी तू, चिडण नाई बरं
धाकट्या भावाला म्हणावं, तुझं म्हणण खरं

म्हणशील तसं तर मीही भांडायचा नाई
फक्त म्हणेन, थँक्यू, आय टोल्ड यू सो ताई

आई बाजू तुझी घेते; बाबा माझी घेतात.
आबा नेहमी मध्यस्ती करायला पुढे येतात.

माझ्या चुगल्या तू करतेस नि तुझ्या करतो मी;
पण, अग, खरं ठरतं माझंच नेहमी.

म्हट्लं तर नेहमीच असतो माझा कांगावा.
खरं ठरवून घ्यायला अ‍ॅक्टर तयारीचाच हवा.

मग सांग, तुझा पाड कस्सा गं लाग्णार?
ऑस्करसाठी यावर्षी, बघ, माझंच नाव जाणार.

व्व्वाव रे व्वाव बंटीबाबा स्मित

स्मित

हाहा मस्त हां.
लबाड आहे बंटीबाबा!