भेट

नमस्कार...हा माझा पण पहिला प्रयत्न.....

ओढाळ स्पर्शात सारे श्वास गंधीत होती
ओठात ओठ विरघळत मौनात गीत गाती

हात हाती येता वचने सारी सुखावली
ही तुझी हार पण त्यांची जीत होती

अंतरे दुराव्यातली मिठीत हरवुन गेली
मनी चांदण्याची लाघवी प्रीत होती

हळुवार मान तुझी खांद्यावरी विसावली
उरी लांटांची भरती उसळीत आली

न मी माझा राहिलो न तुझी तु राहिली
मनी मोरांची रास थिरकत गेली

सुखावर तरंगत रात सारी झिंगली
डोळ्याच्या पापणीची ही काय रित होती?

आर्तता काळजातली अशी वाढत गेली
स्पर्शाने तिचिया कळ कापित गेली

कळाची आवर्तने स्तब्ध कोठुनी झाली
घटिका ती विरहातली काय आक्रित होती?


न मी माझा राहिलो न तुझी तु राहिली
मनी मोरांची रास थिरकत गेली

एकदम मस्त लिहीलय. पहीला प्रयत्न बिलकूल वाटत नाही. पूढील कवीतान्चि वाट पाहतोय. स्मित