भेट

नमस्कार...हा माझा पण पहिला प्रयत्न.....

ओढाळ स्पर्शात सारे श्वास गंधीत होती
ओठात ओठ विरघळत मौनात गीत गाती

हात हाती येता वचने सारी सुखावली
ही तुझी हार पण त्यांची जीत होती

अंतरे दुराव्यातली मिठीत हरवुन गेली
मनी चांदण्याची लाघवी प्रीत होती

हळुवार मान तुझी खांद्यावरी विसावली
उरी लांटांची भरती उसळीत आली

न मी माझा राहिलो न तुझी तु राहिली
मनी मोरांची रास थिरकत गेली

सुखावर तरंगत रात सारी झिंगली
डोळ्याच्या पापणीची ही काय रित होती?

आर्तता काळजातली अशी वाढत गेली
स्पर्शाने तिचिया कळ कापित गेली

कळाची आवर्तने स्तब्ध कोठुनी झाली
घटिका ती विरहातली काय आक्रित होती?


बासुरी,
कवितेचा प्रयत्न छान आहे... गझलेच्या कार्यशाळेला जरूर भेट द्या...



अरे बासुरी.. तु पण आमच्या सारखीच अवेळी नकॉ तिथेच वाजलीस.... कविता छान आहे...



बासुरी कविता छान आहे. कल्पना तर सुंदर आहेतच पण छंदबद्ध लिहिण्याचीही आवड दिसतेय. गझल कार्यशाळेला जरूर भेट द्या. थोडक्या वेळातच इअतकी सुरेख गजला लिहू लागाल! माझ्या शुभेच्छा!
तुमच्या माहितीसाठी-
इथे मायबोलीवर एक गजल कार्यशाळा झाली होती. त्याची ही लिन्क (स्लार्टींनी दिलेल्या एका अभिप्रायातून)-
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/123104.html

तसच लघु-गुरू विषयी इतरत्र झालेली ही चर्चा (नचिकेत ने दिलेल्या एका अभिप्रायातून)-
http://www.marathigazal.com/node/542