स्व रचित आरती:- श्री दताची आरती

श्री गुरु दत्ता जय गुरु दत्ता सद्गुरु हे आई
हे निजसुंदर आरती गुरुवर बाळ तुझे गाई !!ध्रु !!
ब्रम्हा विष्णु महा -ईश तु
अनसुयेचा होई सुत तु
घास भरविते तुम्हा प्रीतीचे
गाते अंगाई !! १ !!
आरती बाळ तुझे गाई

अवतरसी तु या भुमीवर
श्रीपाद वल्लभ रुप दिगंबर
समर्थ स्वामी गणी गजानन
क्रूपासिंधू साई !! २ !!
आरती बाळ तुझे गाई

चार श्वान अन धेनु वत्सला
दुर करी मद मोह मत्सरा
दत्त मनी मी म्हणता येतो
धावूनी लवलाही !! ३ !!
आरती बाळ तुझे गाई

पुर्ण क्रुपाळू तु भक्तांवर
सदा लीन जो तुज चरणांवर
दत्त दत्त मी गाईन जोवर
प्राण असे देही !! ४ !!
आरती बाळ तुझे गाई
आरती बाळ तुझे गाई