माहिती हवी आहे : सण, धार्मिक ग्रंथ, तीर्थक्षेत्र, प्रार्थनास्थळाचे नाव

Submitted by गजानन on 3 October, 2011 - 11:01

नमस्कार,

मला खालील खालील धर्मांची [सण, धार्मिक ग्रंथ, तीर्थक्षेत्र , प्रार्थनास्थळाचे नाव] ही माहिती हवी आहे. कृपया माहीत असल्यास लिहा / चुकीचे असल्यास दुरुस्त करा. धन्यवाद.

जैन :
सण : पर्युषण
धार्मिक ग्रंथ : आगम
तीर्थक्षेत्र : श्रवणबेळगोळ, मांगी-तुंगी, गिरनार, शत्रूंजय (?), पालिताना (?)
प्रार्थनास्थळाचे नाव : मंदिर / बस्ती / देरासर

पारशी :
सण : जमशेद नवरोझ ( न्यू इयर)
धार्मिक ग्रंथ : झेंद अवेस्ता
तीर्थक्षेत्र : ??
प्रार्थनास्थळाचे नाव : अग्यारी

ख्रिश्चन :
सण : नाताळ
धार्मिक ग्रंथ : बायबल
तीर्थक्षेत्र : जेरुसलेम
प्रार्थनास्थळाचे नाव : चर्च

ज्यू :
सण : रोश हाशान्ना (नवीन वर्ष), योम किप्पूर
धार्मिक ग्रंथ : ??
तीर्थक्षेत्र : जेरुसलेम
प्रार्थनास्थळाचे नाव : सिनगॉग

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पारशी
प्रार्थनास्थळाचे नाव - अग्यारी.
धर्मग्रंथ - झेंद अवेस्ता

ज्यू
सण - रोश हाशान्ना (नवीन वर्ष), योम किप्पूर
प्रार्थनास्थळ : सिनगॉग
तीर्थक्षेत्र - जेरुसलेम (ख्रिश्चनांचेही तेच.)

जैन :
सण : पज्युशन (ते पर्युषण असे हवे.... पज्युशन असेही म्हणतात बहुतेक. पण माझ्या माहितीत पर्युषण पर्व असे आहे)

जैन प्रार्थनास्थळः देरासर
तीर्थस्थळे: हिन्दूप्रमाणे अनेक. श्रवणबेळगोळ, मांगी-तुंगी, गिरनार ई.

जैब.. पर्युषण

तीर्थक्षेत्रे अनेक.. महाराष्ट्रात बाहुबली आहे
उत्तर भारतात सम्मेद शिखरजी आहे.

जैनाच्या देवळाला जैन मंदिर, बस्ती असे म्हणतात.

गजानन, विकीवर जैन धर्माच्या प्रमुख सणांमध्ये खालील सणांचा उल्लेख आहे :

पंचकल्याणक
महावीर जयंती
ओली
पज्जुशण
पर्जुषण
ऋषिपंचमी
दीवाली, जैन धर्म
ज्ञान पंचमी
देव दिवाली

माउंट अबू वर जैन मंदिर आहे.. दिलवाडा जैन मंदिर.

गिरनार हे जैन, बौद्ध, हिंदु, मुस्लेम सगळ्यांचे कॉमन तीर्थस्थळ आहे.

सायो, बरोबर, पण ते ज्याला टेम्पल म्हणतात, ते कल्चरल सेन्टरसारखं असतं. त्यातलं जे प्रार्थनास्थळ, त्याला टेक्निकली सिनगॉगच म्हणतात माझ्या (ऐकीव) माहितीनुसार.

श्रवण बेळगोळ्याला बाहुबलीची मूर्ती आहे.

महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात बाहुबली या नावाचे गाव आहे.

>>महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात बाहुबली या नावाचे गाव आहे.
ओह ओके, हे माहित नव्हते, काय आहे त्या गावी ? जैन मंदिर आहे का ?

जैन सण - संवत्सरी

पारसी तिर्थक्षेत्र - याझ्द

ख्रिश्चनांचे तिर्थक्षेत्र रोम नाही होणार का?

महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात बाहुबली या नावाचे गाव आहे >> गावाचे नाव कुंभोज आहे. जयसिंगपूर -कोल्हापूर रस्त्यावर.
जैन धर्माचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र - झारखंडमधले (आधिच्या बिहार) सम्मेद शिखरजी. इथूनच २४ पैकी २० तीर्थंकर मोक्षाला गेले.
बाकी देवस्थाने भरपूर आणि भारतभर पसरलेली आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची चंपापूर, पावापूर आणि गिरनार.