क्रोशाचे रुमाल

Submitted by अनया on 26 September, 2011 - 05:45

मला पहिल्यापासून विणकाम, भरतकाम करायला खूप आवडत. लहान असताना मण्याची तोरणे नाहीतर लहान लहान भरतकाम करत राहायचे. आता काम आणि संसार सांभाळताना वेळ कमी मिळतो. पण ‘आवड असली की सवड मिळते’ म्हणतात, तशी सवड काढून काहीतरी उद्योग चालू ठेवते. लेकाचा अभ्यास घेताना नाहीतर टी.व्ही. बघताना हात चालू असतो. नवऱ्यानेही आता निषेध नोंदवणे सोडून दिलय!!

तर, माझी ही आवड माहिती झाल्यामुळे, ज्यांचा विणायचा उत्साह बाजारातून लोकर आणेपर्यंतच टिकतो अश्या मैतीणी, नातेवाईक, शेजारी-पाजारी ह्यांची मोठी सोय झाली आहे. उरलेली लोकर संपवण्याची उत्तम कल्पना म्हणजे ती मला देउन टाकायची!! काही वेळा ती लोकर बाळाचा स्वेटर होईल, इतकीही नसते. मग मी त्या सगळ्याचे छोटे-मोठे रुमाल क्रोशाच्या सुईने विणले. ते देवाला आसन म्हणून, टेबलवर असे कुठेही वापरता येतात, त्यामुळे कोणाला भेट द्यालाही उत्तम!!

DSC01950.JPGDSC01953.JPGDSC01954.JPGDSC01955.JPGDSC01956.JPGDSC01957.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ते पुस्तक अनुभवी आणि नवीन शिकणारे सर्वांनाच उपयोगी आहे. मी ते पुस्तक वापरण्याआधी मलाही फार काही येत नवते. फक्त बेसिक खांब-साखळ्या वगैरे येत होत. मी पुस्तकात वाचूनच शिकले. प्रत्येक वीण करून बघितली. मग आपोआप आकृती पाहूनही येत.

अनया खुपच सुंदर तुझा हात खुपच चांगला बसलाय ह्याच्यावर. मी पण आधी केले आहेत लोकरीचे रुमाल. माझी आई क्रोशाचे आधी छान करायची तोरणे, रुमाल. आता बरेच वर्ष तिनेही नाही केल आणी मी पण नाही केल.

Pages