अंड्याचा नविन प्रकार...........

Submitted by उदयन. on 11 August, 2011 - 04:46

अंड्याचे नविन प्रकार

साहित्य : ६ अंडी, २ टॉमॅटो, २ कांदे, गरम मसाला पावडर, हळद, लाल मसाला, ( आल-लसुन-खोबरे-कोथिंबीर वाटुन घेणे)

कृती : ६ अंडी एका कुकर च्या भांड्यात चांगली फेटावी त्यात गरम मसाला, मीठ घालावा ( भांड्याला आधी थोडे तेल लावावे म्हणजे अंडी चिटकत नाही) १/२ अर्धीच शिट्टी मारावी..

फोडणी: अंडे शिजुन त्याचे केक सारखे होइल. त्याचे १ इंचाचे पनिर च्या आकाराचे तुकडे करुन फोडणी करण्याच्या अगोदर तळुन घ्यावे..ते पनिर सारखे होतात..जास्त तळु नये नाही तर ते चिवट होतात..
tukade.JPG

त्याच तेलात जरा अजुन तेल टाकुन तापवुन त्यात कढीपत्ता, जिरे तडतडले की त्यात कांदा बारीक चिरुन घालावा..गुलाबी होत आल्यावर हळद, मीठ, लाल मसाला घालावा..थोड्यावेळाने टॉमॅटो कापुन घालावा..मग वाटलेला आल- लसुन-खोबरे इत्यादी..घालावे..चांगले मिक्स झाल्यावर त्यात अंड्याचे तुकडे टाकुन थोडे पाणी टाकावे.. ग्रेवी थोडी हवी असल्यास कपभर पाणी टाकावे...
झाकण लावुन ५- १० मिनीटे ठेवावीत.......नंतर कोथिंबीर चिरुन घालावी.......आणी गरम गरम वाढावे..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१/२ अर्धीच शिट्टी मारावी.. >> म्हणजे शिट्टी व्हायला लागली की शिट्टीवर थाप मारुन बंद करायची Uhoh
प्रकार निश्चितच वेगळा आहे. खायचा कशाबरोबर? म्हणजे पोळी-ब्रेड की नुसताच ?

१/२ अर्धीच शिट्टी मारावी.. >> म्हणजे शिट्टी व्हायला लागली की शिट्टीवर थाप मारुन बंद करायची .... Lol
कुकर ऐवजी श्रीखंडाच्या प्लास्टीकच्या डब्यात फेटलेली अंडी घालून मग झाकण लावून, तो डबा गरम पाण्यात उखळायचा.

बा.द.वे `स्टिंग रे ` माशाच कालवण बनवायची रेसीपी माहीत आहे का कूणाला?

कुकर ऐवजी श्रीखंडाच्या प्लास्टीकच्या डब्यात फेटलेली अंडी घालून मग झाकण लावून, तो डबा गरम पाण्यात उखळायचा. >> प्लॅस्टीक वितळत नाही का? आणि जरी पुर्ण नाही वितळले तरी मला वाटते आरोग्याच्या दृष्टीने अपायकारकच.

@ वर्षा_म

प्लॅस्टीक वितळत नाही का? <<<
नाही कारण तो डबा संपुर्ण पाण्यात बुडेल इतक पाणी ठेवावे.
हरियाणात असताना तिथल्या मेस मद्ये हा प्रकार करायचे आणि तिथे तर प्लॅस्टिकची पिशवी वापरत.

आरोग्याच्या दृष्टीने अपायकारकच.<<
माहीत नाही पण श्रीखंडाचा डबा नसावा. हा आपला अंदाज... Happy

प्लास्टिकचे डबे, बाटल्या कधीही गरम करू नयेत. आरोग्याच्या दृष्टीनं ते अपायकारक असतं. उष्णतेमुळे प्लास्टिकमधलं Biosphenol A हे कंपाउंड खूप अधिक प्रमाणात पाण्यात मिसळतं. हे रसायन आरोग्यासाठी अतिशय घातक असतं. सर्वच प्रकारच्या प्लास्टिकमध्ये हे रसायन नसेलही, पण खात्री नसल्यानं शक्यतो प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये गरम पाणी घालू नये.