- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
पुणे : शाळा-महाविद्यालय
सदस्य प्रवेश |
नू. म. वि. मुलांची प्रशाला व महाविद्यालयनू. म. वि., नू. म. वि., नू. म. विद्यालय... |
|
नू. म. वि. चे माजी मुख्याध्यापक चं. ज. कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
सतीश, चं.ज्.कु. किती साली मु. होते हे कळेल का?
नक्की कल्पना नाही. मी १९७३ साली ४थी पास झालो. ते त्यानंतर म्हणजे १९७९-८० च्या आसपास मुख्याध्यापक झाल्याचे ऐकले होते.
८२ मध्ये आम्हांला चं ज मु होते
चं. ज. कुलकर्णी सर छोट्या शाळेचे मुख्याध्यापक होते माझ्या माहितीनुसार.. आणि ते ८८- ८९ पर्यंत शाळेत येत होते पण तेव्हा मुख्याध्यापक नव्हते..
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
हो, ते छोट्या शाळेतच होते... ८५ मधला माझा एक त्यांच्याकडून बक्षिस घेतानाचा फोटो आहे म्हणजे तेव्हा तरी ते मुख्याधापक होते.
हो, मलाही मुख्याध्यापक चंज आठवतायत. केसकर बाई एके दिवशी रजेवर असताना त्यांनी आमचा ४थी स्कॉलरशीपचा तास घेतला होता (तो शाळा सुरू व्हायच्या आधी असायचा).
***
If dreams are like movies, then memories are films about ghosts...
चं. ज. मला ४थी ला वर्गशिक्षक होते. ते अतिशय कडक होते, पण खूप चांगले शिकवायचे. रागावले की ते बेदम मारायचे. ते जोशी-दामले कार्यालयाजवळ एका मोठ्या चाळीत रहात होते. मी व माझ्या वर्गातील काही विद्यार्थी रोज सकाळी त्यांच्या घरी ४थी च्या शिष्यवृत्तीच्या शिकवणीला जात होतो.
एका अतिशय चांगल्या व तळमळीने शिकविणार्या या माझ्या शिक्षकांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली ! असे मनापासून शिकविणारे शिक्षक आता दुर्मिळ झाले आहेत.
नमस्कार मंडळी.
दिवाळीची चाहूल कशी अगदी आसमंतात भरून राहिली आहे नाही?
वर्षातल्या सर्वात मोठ्या या उत्सवात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. घरातली अडगळ काढून साफसफाई करायची आहे. घर रंगवायचे आहे. नवीन खरेदी करायला दोन-तीन दिवस तरी पाहिजेत. प्रियजनांच्या गाठी आणि त्यांच्यासाठी भेटी घ्यायच्या आहेत. नोकरी-धंद्यातल्या संबंधांना यानिमित्ताने उजाळा द्यायचा आहे. बर्याच नातेवाई़कांकडे जायचे नियोजन करायचे आहे.. हे ना ते. अनंत विषय मनात असतील, अन् कमी वेळेत कसे कसे होईल हा प्रश्नही!
या गडबडीत आपल्या दिवाळी अंकाला मात्र विसरू नका, म्हणजे झाले.
दिवाळी अंकाची घोषणा होऊनच आता आठवडा उलटून गेला आहे. दिवाळी अंकातला आपला सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने हीच वेळ आहे घाई करण्याची.
आपल्या लाडक्या मायबोलीचा हा नववा 'हितगुज दिवाळी अंक', "मायबोली-मायमराठी- गेले तप आणि येणारे तप" असा विषय घेऊन महाजालावर आपणा सर्वांसमोर येतो आहे, हे दिवाळी अंक घोषणेत सांगून झालेच आहे. या वर्षी आपला दिवाळी अंक मूर्त रूप घेणार आहे तो फक्त शब्दरूपाने नव्हे, तर दृक्-श्राव्य रूपाने सुध्दा. यामध्ये कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, रसग्रहण यांबरोबरच बाल साहित्य व आपल्या गुणप्रदर्शनांचे स्वागत आहे..
आपण अजूनही विचार करत असाल, विषय ठरले झाले नसतील तर आपण घाई करायला हवी. ऐनवेळी तुमची धांदल नको, म्हणून ही आगाऊ सूचना!
तेव्हा, लागा बघू तयारीला..!!
आपले साहित्य तयार असेल तर दिवाळी अंकाची घोषणा व त्यातील सूचना पुन्हा एकदा वाचून, कृपया आपले साहित्य दिवाळी अंक लेखनाच्या खालील दुव्यावर पाठवावे.
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1
काही शंका असल्यास, आपल्या प्रश्नांचे स्वागत आहे..
--
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २००८