तोल किरणांचा ढळाया लागला

तोल किरणांचा ढळाया लागला
साज संध्येचा चढाया लागला

लाल झाली पश्चिमा ती लाजली
पाहण्या जोतो जमाया लागला

विहग सारे श्रांत, परतू लागले
वृक्षही तो सळसळाया लागला

लांबल्या त्या सावल्या कंटाळुनी
गाव सारा आळसाया लागला

सावल्या पूर्वेस वळल्या वाकल्या
त्या उगवत्याला नमाया लागल्या

सुधीर