कैरी चे सार

Submitted by अबोल on 1 July, 2011 - 07:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मध्यम आकारची कैरी
एक वाटी किसलेले खोबरे
चार मिरच्या, थोडस आल, लसुन
जिरे हिंग कडीपतत्ता

क्रमवार पाककृती: 

एक मध्यम आकारची कैरी एक वाटी किसलेले खोबरे चार मिरच्या, थोडस आल, मिस्कर मध्ये एकत्र वाटाव
हे वाटण थोडे पातळ करावे जितके पातळ हवे तेवढे पणी टाकावे

नंतर फोडनी साठी एका पातेल्यात तेल घेवुन जिरे हिंग कडीपत्याची फोडनि द्यावी. नंतर वरील वाटण गस मंद करुन त्यात टाकावे. व मीठ चवी नुसार टाकावे आनि हळु हळु हलवावे. ते फुटु देत कामा नये किंवा उकळि येता कामा नये

नंतर वरती कोथीबिर टाकुन गरम गरम वाढावी. ह्या बरोबर एकाधी तिखट भाजी असेल तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल

वाढणी/प्रमाण: 
२ जण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधी, छान रेसिपी.
हिंग, मोहरी व मेथीच्या दाण्यांची फोडणी आणि वरच्याच वाटणात मिरच्यांऐवजी हळद ,तिखट व किंचित गूळ टाकूनही छान होतं कैरीचं सार.

आज माझा पहिला च दीवस आहे मायबोली वर ... सभासद म्हणुन .. पण मी वाचक पहिल्या पासुन आहे .. पण वेग-वेगल्या डिशेश बनवणे माझा छद आहे