मुळा आणि गाजरे

Submitted by sneha1 on 17 July, 2008 - 15:42

दिनेशदा,तुम्ही मिनरल वोटर च्या बाटलीत मुळा कसे लावायचे?आणि तशी गाजरे पण येतात का?अशी कमी जागेत अजुन कोणती भाजी लावता येइल?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्कि कुठे पोस्टाव ते कळत नाहिय.
आमच्या जास्वंदला बारीक पांढरी कीड लागलीय. अगदि छोटि आणि अंडाक्रुती कीड आहे. जवळच्या दुकानातुन एक कीटक नाशक आणुन वापरल पण काहिच ऊपयोग होत नाहिय. हे दुकान बागकामाच साहित्याच आहे.
प्लिज काहितरि ऊपाय सान्गा.

मिनरल वॉटरच्या बाटलीत, हंगामी अशी कुठलीही भाजी लावता येते. पालेभाज्या सुद्धा लावया येतात. आणलेली पालेभाजी तजी असेल तर तिथे मूळासकट देठ खोचले तरी त्याचा पाने फुटतात.
या बाटला वरुन कापायच्या, खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी, काहि छिद्रे करायची. तळात नारळाच्या शेंड्या, मग भाजीपाल्याचा टाकाऊ भाग आणि वर माती टाकायची चार पाच दिवसानी बिया पेरायच्या.
मूळा किंवा गाजर यांची वरची चकती कापुन खोचली तर त्याला फूले येतात व बिया मिळतात. शलगम बीट वगैरे भाज्या पण अश्या पेरता येतात.

क्षितिज,
जास्वंदीच्या झाडावर बहुदा पांढरे ढेकूण झालेत. त्यासाठी पुर्ण छाटणी करुन नवीन फूट येऊ द्यावी. कुठलाही तीव्र साबण, पाण्यात विरघळवून, ते पाणी ब्रशने ढेकणावर लावल्यास ते मरतात. हा प्रकार चिकाटीने करावा लागतो.
कदाचित हे पटणार नाही पण रोज अश्या झाडांची संवाद साधून, हात फिरवून विनंति केल्यास झाड नक्कीच प्रतिसाद देते.

मिनरल वॉटरच्या बाटलीत, हंगामी अशी कुठलीही भाजी लावता येते. पालेभाज्या सुद्धा लावया येतात. आणलेली पालेभाजी तजी असेल तर तिथे मूळासकट देठ खोचले तरी त्याचा पाने फुटतात.
या बाटला वरुन कापायच्या, खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी, काहि छिद्रे करायची. तळात नारळाच्या शेंड्या, मग भाजीपाल्याचा टाकाऊ भाग आणि वर माती टाकायची चार पाच दिवसानी बिया पेरायच्या.
मूळा किंवा गाजर यांची वरची चकती कापुन खोचली तर त्याला फूले येतात व बिया मिळतात. शलगम बीट वगैरे भाज्या पण अश्या पेरता येतात.

क्षितिज,
जास्वंदीच्या झाडावर बहुदा पांढरे ढेकूण झालेत. त्यासाठी पुर्ण छाटणी करुन नवीन फूट येऊ द्यावी. कुठलाही तीव्र साबण, पाण्यात विरघळवून, ते पाणी ब्रशने ढेकणावर लावल्यास ते मरतात. हा प्रकार चिकाटीने करावा लागतो.
कदाचित हे पटणार नाही पण रोज अश्या झाडांची संवाद साधून, हात फिरवून विनंति केल्यास झाड नक्कीच प्रतिसाद देते.

आमच्या घरात जिथे झाडे लावता येतील त्या जागी ऊन खुपच कमी येते किंवा नसतेच तर तिथे कोणती झाडे लावता येतील?
शक्यतो किचन गार्डन करायचा विचार आहे. कारण ऊन जास्त नसले तरी उजेड भरपूर आहे.

दिनेशदा मदत हवीय. टोम्याटोला ३ फुल आली आहेत. पण पान थोडी काळी होत आहेत काय करु? माझी समुद्र मेथी खुप छान आली आहे. त्या साट्।इ तुमचे खुप आभार.

methi3ej.jpg

मला ही जाडी मेथी इथे US ला घरी कशी वाढवायची सांगेल का? इथे त्या पटेल कडे जवळ जवळ मेलेली मेथी विकायला ठेवतो.
आणि कडू तर अजीबात नसते. मला तो कडवटपणा खूप आवडतो त्या भाजीचा.
मला pls सांगा कोणी इथे ही grow केलीय का?

मने
इथल्या होम डेपो किंवा तत्सम दुकानातून एक विन्डो बॉक्स आण. त्यात घालायला पॉटिंग मिक्स ( सॉईल नको ) आण. अन त्यात घरच्या मसाल्यातल्या मेथ्या पेर. विन्डो बॉक्स मधे वरच्या कडेपासुन साधारण इंच -दिड इंच येइल इतकं पॉटिंग मिक्स भर अन जरा दाबून बसव. त्यावर पाणी फवारून घे भरपूर. हे मिक्स अगदी भुसभुशीत असतं त्यामुळे ओलं व्हायला वेळ लागतो. मग एखाद्या चमच्या किंवा काट्याच्या दांड्याने सरळ रेघा ओढ मातीत. त्यात ओळीने मेथीचे दाणे पेर अन वरून मातीने ती रेघ बुजवून टाक. सतत मॉइस्ट राहील याची काळजी घे. उजेड असावा पण अगदी पश्चिमाभिमुख खिडकित ठेवू नकोस उन्हाळ्यात तरी. फार ड्राफ्ट लागणार नाही याची काळजी घे. दोन -दोन आठवड्यांच्या अंतराने दोन विंडो बॉक्सेस लावलेस तर आलटून पालटून मेथी वापरता येईल.

thanks शूनू, पण घरची मसालातली मेथी म्हणजे तीच ना मेथी पिवळी seeds जी लाडवात पण वापरतो पण ती तर टाकली तर समुद्र मेथी येते ना. मी उगवली होती एकदा घरी रेती वगैरे आणून.
समुद्र मेथी नै का मुंबईला विकतात छोट्या १३ जुड्या ४ रुपये वगैरे. (तेव्हा हा दर होता). एक भाजीवाली संध्याकाळी घेवून यायची समुद्र मेथी. ही जी मेथी मी म्हनतेय ना ती पराठ्या घालतो ती. ही मोठी पाने असतात नी पटेल के कोपर्‍यात पडून असतात. Happy

मी तीच लावली आहे. छान मोठी आणि जाड जाड पाने आलीत. मेथीच्या जुडीला येतो तसा छान वास पण येतो आहे. पटेलकडच्या मेथीला तर चिरताना पण गवताचा वास येतो Sad
.
मला प्रश्न असा आहे कि मेथी खारुट्यांपासुन कशी वाचवु. सुरुवातीला पानांबरोबर दाणे वर उचलुन येतात ना. त्यासाठी खारुट्या नुसता हैदोस घालतात.
.
तसेच इथे हिवाळ्यात कुणी काही भारतीय झाडे/भाज्या केल्या आहेत का ? माझ्याकडे प्राजक्ताची दोन सुरेख रोपं उतरली आहेत. हिवाळ्यात त्याचे काय होइल ? तुळशीची तर जळुन जातात. माझ्या घराला सुर्याची खोली नाही. आणि खिडकीत गमला ठेवता येइल अशी जागा पण नाही.

methi.jpg

मग ती रेती मध्ये टाकली की अशी वेगळी का दिसते वरच्यासारखी?? वापरू का घरची मेथी लाडवात घालतो ती?

मने
या बारक्या जुड्या म्हणजे मेथीचे स्प्राउटस ( अल्फा अल्फा स्प्राउटस पाहतेस ना होल फूड्स मधे - तसेच). तेच एकेक रोप मोठ झालं की त्याची पराठ्याची मेथी. तीच आणखीन जून झाली ( वयाने वाढली ) की त्याला शेंगा धरतात अन मगच ती पटेल मधे विकायला येते. घरची , फोडणीला घालतो तीच मेथी पेर तू अन पहा .

सिंडरेला प्राजक्त अन तुळस दोन्ही फ्रॉस्ट डेट च्या आतच घरात आत आणून ठेवायला लागणार. सगळ्यात जास्त उजेड मिळेल अशा जागी ठेवायला पाहिजे. अन एकदम थंड किंवा एकदम गरम ड्राफ्ट येइल अशा ठिकाणी ठेवू नये. मी कडिपत्ता, मोगरा, अबोली अन अनंत असेच सांभाळले आहेत वर्षानुवर्षे.

धन्यवाद Happy बघते कसे जमते ते. यंदा मला हिवाळा आणि इशान अशा दोन आघाड्यांवर लढायचे आहे Wink तसे एक प्रजक्ताचे रोप मैत्रिणीला दत्तक देणार आहे. तिच्या घराला छान फ्रेंच खिडकी आहे नी तिचा मुलगा पुष्कळ मोठा आहे Happy
.
मनुस्विनी, शोनु म्हणाली तसे थोडी मोठी झाली ना मेथी की दिसेल तुला हवी तशी Happy

कुडतरकर,
टोमॅटोला फुले आली पण झाड कमजोर असेल तर ती फुले आपोआप गळून जातील.
पानी काळी म्हणजे काळपट झाली तरी घाबरायचे कारण नाही, पण ती जर आतल्या बाजूला वळत असतील तर खुडून टाकावीत. एखादी फांदीच तशी झाली असेल तर ती खुडावी.
या झाडाला एखादा आधार दिला तर ते नीट फोफावते, यासाठी एक जाड काठि रोवून त्याला हे झाड बांधायचे. नाहीतर लोळण घेते हे झाड. कच्च्या टॉमॅटोची चटणी चांगली होते.

शूनू,
धन्यवाद. अच्छा असे आहे काय ते, आईला ती मेथी सीडस टाकून घरीच बारीक मेथी उगवताना कधी एकदा लहानपणी पाहीले होते पण तीला बारीक मेथीच आवडते म्हणून आई मेथी लहान असताना उपटून भाजी करायची बटाटा घालून म्हणूनच माझ्या डोक्यात हेच की घरची मेथी ती अशीच उगवते ज्याच्या छोट्या जुड्या मिळतात बाहेर. आणी जाडी पराठ्याची मेथी काही घरी उगवता येत नाही. आईला विचारले पण नाही कधी मी ह्या मट्ठ डोक्याने. :). आन्नि मी जेव्हा एकदा घरी लावली होती ना रेती टाकून तेव्हा मी पण तेवव्ढी वाढली तेव्हा उपटून टाकली. मला माहीतेच न्हवते की ती अजून वाढली की अशी होते. Happy

दिनेशदा,प्लीज हसू नका,मला फारसे काहि माहित नाहि.म्हनजे आधी मुळ्याची चकति कापायची,मग ती मातीत लावायची,आणि मग त्या पाल्याला ज्या बिया येतील त्या मातीत पुरायच्या,असेच का?माहितीसाठी धन्यवाद.

माझ्या जास्वंदी सकट सगळ्या फुल झाडांना पण पांढरे ढेकुण झाले होते , मी सगळे
घालवले फार चिकाटीने , रोज सकाळी अर्धा तास तोच कार्यक्रम Sad
पण आता सगळे खुप छान फुलले आहेत ,
दिनेश दा तीव्र साबण वापरला तर चालतो का ?
अजुन एक चाफ्या ची फांदी लावली तर ती येऊ शकते का व्यवस्थित ??

जसे वाजती नुपुर सुखाचे ...

इकडे लिस्टरिन नावाचे माउथवॉश मिळते. ते मिन्ट वासाचे लिस्टरीन एक भाग, पाणी पाच ते सात भाग असं मिसळून झाडांवर फवारल्यास बरेचसे किडे जातात असं ऐकलंय. इथल्या हवे मुळे बरीचशी झाडं बारा महिने घरात ठेवावी लागतात तर काही झाडं हिवाळ्यात घरात ठेवावी लागतात. बाहेरून आत आणलेल्या झाडांवरून पुष्कळदा असे 'पाहुणे' येतात. त्यांच्यावर हा रामबाण उपाय आहे म्हणतात.

सोप्पा उपाय म्हणजे, खायचा तंबाखु आणायचा, साधारण २ चमचे. एक दिवस २ग्लास पाण्यात भीजवत ठेवायचा. हे पाणी गाळुन झाडावर स्प्रे ( ह्याला मराठीत काय म्हणतात?) मारायचा. २-३ दिवसात किड जायला हवी.

मायबोलीच्या प्रगतीचा मार्ग म्हणजे अधिकाधिक मराठी मंडळींना मराठीत बोलत करणं. चला, कामाला लागुया!

तुम्ही म्हणत आहात ती कीड अतिशय बारीक आहे का? जर एखादे किडीने लडलेले पान चुरगाळले तर बारीक पावडर होते का त्या किडीची? अशी कीड तुम्हाला बरेचदा पेरुच्या पानांना, हरित गृहातील जर्बेरा, कार्नेशियन इत्यादी झाडांवर पण दिसेल.. एन्डोसल्फान चा फवारा मारु शकता.. खते-किटकनाशकांचा दुकानदार तुम्हाला त्याचे प्रमाण सांगेल.. जर झाड घरात आत (म्हणजे व्हरांडा, बाल्कनी वगैरे) असेल तर एंडोसल्फान मारु नका.. पिवळा कागदाला तेल किंवा इंजिन ऑइल लावुन चिकट करा आणि तो ह्या झाडापाशी टांगून ठेवा..
(वरील उपाय व इतर बरेच उपाय मी माझ्या हरितगृहामध्ये केले होते)

थन्क्स दिनेशदा. उद्याच ऊपाय करुन बघतो .

टण्या, तुझे उत्तर वाचुन मला आमची माती आमची माणसे आठवले Lol

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

दिनेशदा आभारी आहे. पानं आत वळत पण होती. मी खुडली. झाड वाढलय चांगल. मी तुमच जुनं पोस्त वाचुन आधार दिला होता. एवढ्या मोठ्या झाडाला ३ फुल आली आणि गळुन गेली. सध्या उन नाही मुबंईत म्हणुन असं होतयं का?

काय करायचे गो कराडकर, शेतकरी माणसं शेवटी आम्ही Happy

मी पान्ढरी जास्वन्द लावली आहे. तिला पहिल्यान्दा चान्गली फुले आली. नन्तर तिच्या पाना मध्ये बारीक बारीक कळ्या सारखे येऊन फुले न उमलता ती पिवळी होवून गळून पडतात. त्यासाठी काय करावे?

झाडाला फुले पोसण्याइतके पोषण मिळत नाही आहे. कोवळ्या फांद्या खुडत रहा. झाड जोमाने वाढू द्या. मग फुले नीट येतील.
घरच्या भाजीपाल्याचा टाकाऊ भाग, झाडाच्या मुळाशी टाकत रहा, त्याचे खत तयार होते.

चौथ्या मजल्यावर ५ ते ७ फुलझाडामुळे डास होउ शकतात का ? त्यासाठी कोणत्या अउषधाची फवारणी करवी ?

झाडे कुठल्या प्रकारची आहेत त्यावर अवलंबून आहे. वांग्यासारख्या झाडावर तर खुपच माश्या येतात.
पुदिना, तुळस, सबजा, मरवा या झाडाने डास येणार नाहीत.
पायरेथ्रम हे शेवंतीचा कुळातले झाड आहे त्यानेहि डास येत नाहीत पण ते विषारी झाड आहे.
ओडोमॉस नावाचे पण एक झाड असते. त्यानेहि डास येत नाहीत.

अमेरिकेत भारतीय फुले/फळांची रोपं मिळतात का ? असतील तर कुठे ?

ह्म्म, तुळशी च्या बिया देसायांकडे मिळतात. कढीपत्त्याची रोपं एडिसन भागात मिळतात. भाटिया नर्सरी मधे रात राणी ,प्राजक्त, मोगरा, अबोली मिळतात, विड्याच्या पानांची वेल पण मिळते मला वाटतं. गूगल कर मिळेल त्यांची साइट. मोगरा अन अबोली स्प्रिंगमधे होम डेपो मधे सुद्धा मिळतात.

भेंडी , फरसबी, वांगी, टॉमेटो, कयेन मिरच्या, सेरानो मिरच्या, काकडी, पातीचा कांदा , पालक, लसूण सगळे बिया किंवा रोपं, बर्पी burpee , किंवा होम डेपो मधे मिळतात . शेपू च्या पण बिया मिळतात.

मेथी , मोहरी, कोथिंबीर मसाल्याच्या सामानातून लावता येतात.

कार्लं, गिलके, दोडके, तोंडली यांच्या बिया भारतातून मागवाव्या लागतील.

केळी, संत्री, आंबे, चिकू, पेरु, सीताफ़ळ, डाळिंब्,नारळ तुमच्या इथे टिकणार नाहीत Happy
त्याकरता मृच्या गावी जावं लागेल.

Pages