- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
कोणाशी तरी बोलायचंय
सदस्य प्रवेश |
माझ्या मित्रांच्या मला आवडणार्या / नावडणार्या सवयीप्रत्येकाच्या काही सवयी असतात तुम्हालाही असतिल अश्याच काही मित्रांच्या सवयींचे भंडार उघडूयात का. |
|
आता आमच्या रुममेट ने नविन प्रकार सुरु केला आहे.
एकत्र जेवायला बसायचे avoid करणे. म्हणजे मी जेवायला बोलावले तरी तो व ती म्हनणार की नंतर जेवतो, व माझे जेवन झाले की लगेच नंतर जेवायला बसनार, नाहीतर मी जेवायला बसन्यापुर्वी उरकुन घ्यायचे.
गेले १०-१५ दिवस असे झाल्याने मी आज मी त्यांना जेवताना पकडले, मी म्हणालो पोळ्या गरम करुन येतोच, तर एक मिनीट न थांबता त्यांनी पटापटा जेवन संपवले. व आपल्या रुम मधे पळाले. This is stupidness.
उद्यापासुन आमच्या lease ची नविन term सुरु होतेय. I think I am going to search for another apartment and transfer my lease to someone else.
माझ्या current roommates च्या न आवडनर्या सवयी.
१. घरात कार्पेट असताना बाहेरच्या चपला घरभर घालुन फिरने.
२. डिशवाशर न वापरता, hot water tap continues चालु ठेवुन भांडी धुने.
३. धुतलेली भांडी न निथळता, तशीच ओट्यावर ठेवणे.
४. न निथळयामुळे जमिनीवर पाणी सांडते, त्यातुन तशाच चपला घालुन घरभर हिंडने. (संपुर्ण हॉल काळा झालाय त्यामुळे) मी कुणाला घरी पण नाही बोलवत.
५. trash bin असताना, ती माझी आहे म्हणुन का माहीत नाही, पण प्लास्टीक च्या पिशवीत कचरा टाकुन ती तशीच जमिनीवर ठेवने.
६. they already broke couple of chairs
wow! how am i leaving with these guys, I have to step out.
माणसा, अरे यातून तरी काहीतरी हिंट घे.. रूममेट्सही तुला टाळू लागलेत बघ.. लग्न कर आणि संसाराला लाग, पुरे झालं रूममेट्स बरोबर रहाणं
----------------------
Invention requires an excited mind;
Execution, a calm one.
मीही हेच म्हणणार होतो. माणसा, आता सोलमेट शोधायची सोडून रूममेट रुममेट काय करतोयस ?
रुममेट वेगळे आणि बरोबर जेवणासाठी वाट पाहणारी व्यक्ती वेगळी 
***
Twinkle twinkle little star
I don't wonder what you are
Studying your spectrum, ignorance I've none
You're not a diamond, you're just hydrogen.
खर सांगू का? अश्या माणसांना सुधरण्यात वेळ घालवण्यापे़क्शा दुसरी जागा शोधा, लग्नापेक्शा जास्त सोप्पा उपाय आहे!!! नवा गडी नवा राज continues!
आणि हो त्यांना तुमच्या चांगल्या सवयींची allergy आहे! त्यामुळे तुम्ही किंवा ते बिघडण्या किंवा सुधारण्याच्या आत estate agent शोधा!
माणसा, अरे यातून तरी काहीतरी हिंट घे.>>>>

हे काय पुनम, मला वाटले अत्तापर्यंत तु एखादी मुलगी shortlist केली असशील.
.
.
काय माहीत आजकाल मुली अमेरीकेत यायचे नाहीच म्हणतात, आणि ईथल्या मुली मराठी माणूस नको म्हणतात.
.
anyway lets see how to handle this roommate situation, I have traning due next month on how to handle conflicts and difficult situations in team.
wow! how am i leaving with these guys >>>> yes, you really need to stop "living" with them

.
ईथल्या मुली मराठी माणूस नको म्हणतात >>> कोण नॅन्सी का ?
ओ ओ, धन्यवाद, झोपेत लिहीत होतो, त्यामुळे ध चा मा झाला
.
>>>>>>>>> कोण नॅन्सी का ?
.
एकाच चेहर्याला मी आठवू कशाला
जखमी करून गेले, बिचवे तर्हेतर्हेचे
.
सुरेश भट (Thanks to Ajay)
माणसा, थोडं दुर्लक्ष पण करायला हवे, स्वच्छतेचं जास्त वेड असण्याने कधी-कधी त्रास हा आपल्यालाच होतो (स्वानुभव). मी या परिस्थितीतुन गेलो आहे. त्यातील काही किस्से.
मी साधे बोललो तरी तक्रार करतो आहे, किंवा मला काही तरी स्पष्टीकरण हवे आहे असे सर्व लोकांना वाटते. त्यामुळे मी काही बोललो तरी, 'किती तक्रारी करतोस' किंवा 'त्याचे असे आहे की...' असे माझे मित्र मला सांगतात.
एकदा मला विचारले तू काय काम करतोस, तेंव्हा मी म्हंटले की AT&T च्या मॅनेजमेंटला पडलेले गहन प्रश्न मी सोडवतो, कारण मला १५ वर्षाचा बिलिंग आणि इतर प्रोसेसेस चा अनुभव आहे. त्याबरोबर माझ्या दोन मित्रांनी मला टेलेफोन कसा असतो, त्याचे बिलींग खरे तर कसे सोपे असते हे शिकवायला सुरुवात केली.
आता जोपर्यंत माझा टोन सुधारत नाही तोपर्यंत मला हे सहन करावे लागणार! म्हणजे मरेपर्यंत असेच!
हटकेश्वर, हटकेश्वर.
माणूस तुमची पोस्ट वाचून वाईट वाटले मी तुमच्या जागी असते तर मला रडायलाच आलं असतं.
-
अरे माणसा, तुझे रुममेट्स अचानक असे वागायला लागले का? की हळु हळु त्यांच्या वागण्यात बदल झाला? त्यांच्याशी संवाद साधुन
अगदी शक्य नसेल तर शेवटी जागा बदलुन दुसरीकडे
.
बर्याच गोष्टी तुला क्लिअर करता येतील. त्यांना विचार तुझे कुठले वागणे त्यांना आवडत नाही, तु पण तुला त्यांच्या न आवडलेल्या गोष्टी
सांगुन यातुन मार्ग काढु शकाल. दर वेळी हे शक्य होईलच असे नाही. प्रयत्न करायला हरकत नाही.
रहायला जाणे हा पर्याय आहेच.
काही जण घर सोडुन पहिल्यांदाच बाहेर रहात असतात त्यांना या बाबतीत जरा कमी लक्षात येते,
आपले वागणे घरचे सहन करतात तसेच बाहेर पण केले जाईल असे बर्याच जनांना वाटते.
काही जनांना स्वतःचे वागणे आक्षेपार्ह आहे हेच माहित नसते. अश्या वेळी It is always good to be straight and clear.
माझी एक रुमी नेहमी मी दुकानातुन ईस्री करुन आणलेले कपडे मला न सांगताच घालायची आणि वापरुन परत घडी करुन कपाटात ठेवुन द्यायची
तिला हे कधीच चुकीचे वाटले नाही. शेवटी तिला हजार वेळा सांगितल्यावर मग ती विचारायला लागली आणि मी नाही म्हणायला
कपड्यांवरून आलं लक्षात...
--- आम्ही काही मित्र एकत्र रहायचो, एक मित्र खुप व्यावस्थित होता, दुसर्या दिवशी घालायचे इस्त्री केलेले कपडे रोज रात्री बाहेर काढायचा. मग एके दिवस सकाळी अचानक लक्षात आले की शर्टाच्या सर्व गुंड्या गायब आहेत (रात्री कुणितरी फजिती व्हावी म्हणुन कापल्या होत्या...).
--- एकाचे (तो मित्र बुटका होता) कपडे त्याच्या नकळत उंच पंख्यावर लटकवले जायचे. काडी/ उंच स्टुल असे आमच्या कडे काही नव्हते, मग तो जाम वैतागायचा बाकीचे माझ्या सकट असुरी आनंद घ्यायचे.
--- होस्टेल वर शेजारचे मित्र नास्ता (उपमा, शिरा) करायचे, आम्हाला फक्त खमंग वास यायचा (खायला बोलावत नसत). उपम्यामधे पाणि टाकणार आणि नेमकी त्याचवेळी विज जाणार. आमच्यातील एक बाहेर असणारा मेन-स्वित्च बंद करायचा... हे कित्येक दिवस चालले.
आम्ही हे सगळे हासत-खेळत केले/झेलले, स्वतःची फजिती पण सकारात्मक घेतली, दुसर्याची पण कली, पण एका मर्यादेमधे.
उदय बुटक्या मित्राचे वाचून वाईट वाटले.
*************************************
माझ्या पोस्टनंतर वरची काही पोस्ट्स संपादित झाल्याचे दिसत आहे. कुणा एकावर रोख आहे असे वाटू नये म्हणून हे मुद्दाम येथे नमूद करत आहे. मात्र माझ्या पोस्टमधले मुद्दे अजूनही अस्थानी नाहीत, म्हणून माझी पोस्ट मी तशीच ठेवत आहे.
**************************************
सध्या आपण ज्यांच्यासोबत राहत आहोत/आधी राहिलो आहोत; त्या लोकांबद्दलच्या तक्रारी लोक इथे इतक्या सविस्तर का लिहितायत? एक बोट दुसर्याकडे रोखले तरी उरलेली चारी बोटे आपल्याकडेच वळलेली असतात, हे ठाऊक नाही का विस्मरण झालंय?
दुसर्याच्या स्वभावात चार दोष असतील, आपल्याही स्वभावात चार दोष असतील, पण आपण मायबोलीकर आहोत आणि आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळालाच आहे तर करा यथेच्छ निंदा दुसर्याची, असाच प्रकार एकंदरीत जाणवतो.
मध्ये बदल म्हणून या बीबीवर मित्रांबद्दल चांगल्या गोष्टीदेखील लिहाव्यात अशी सूचना झाली होती. पण ते लौकरच मागे पडलं आणि पुन्हा आवडता प्रकार सुरू झाला.
आणि दुसर्याच्या 'तथाकथित' घाणेरड्या सवयी इथे विस्तारपूर्वक लिहिण्यात कसले समाधान मिळते, नकळे! जर तुम्हाला अडचणी असतील तर थेट त्या व्यक्तीशी बोला आणि हे छोटे छोटे प्रश्न सोडवा (हा मुद्दा मी आधीही मांडला होता)! इथे हे सगळं लिहून काहीही उपयोग होणार नाहीये. या विषयाबद्दल बोलायचं झालं तर जुने काय किंवा नवे काय 'सगळेच / सगळ्याच' रूमी तुमचा छळ करत असतील तर एकटे / एकट्या रहा. उठसूट जे काय असेल ते मायबोलीवर कशाला?
अर्थात, 'तुम्हाला पटत नसेल तर ह्या बीबीकडे फिरकता कशाला?' हा प्रश्न विचारण्यात येईलच. जमेल तेवढे दुर्लक्ष करायचा प्रयत्न तर करतेच. पण सारख्या असल्या (काही पोस्ट्स वाचून तर उगीच फुगवून तक्रारी सांगत असल्याचाही संशय येतो!) तक्रारींचा निचरा मायबोलीवर बघून राहावत नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
-- आधीचे संपादीत झाल्यावर आता काय बोलणार !! असो, मी पण माझे मत तसेच ठेवते. --
अनुमोदन श्रद्धा ! मी कुठल्याही गृप मधे नाही व भांडणे, काड्या असा कुठलाही हेतू नाही... इथे आपण टीपी साठी जमतो हे मान्य, परंतू उगाच बारीक सारीक गोष्टी सातत्याने इथे लिहीलेल्या बघून 'एवढे पण हँडल करता येत नाही का ?' असा प्रश्ण मलाही पडतो. मोठे प्रश्ण असतील तर सगळेच मदतीला तयार असतात, पण रोजच्या जीवनातल्या बारीक गोष्टी माणसाला स्वतः सोडवाव्या लागतात. ( आता कृपया "तुम्ही कधी हॉस्टेल्/रुमीज बरोबर राहील्या आहात का" वगैरे म्हणू नये, जेथे कुठे दोन किंवा अधिक माणसे एकत्र येतात तेथे भांड्याला भांडे लागून आवाज येतोच, प्रकार वेगवेगळे, व सोडविण्याचे मार्ग वेगळे बस्स ! )..
इतरांच्या आपल्याला आवडणार्या सवयींबद्दल पण सर्वांनी लिहावे असे मला वाटते.
तर मला रडायलाच आलं असतं. >>> दक्षीणा, अगं खंबीर हो जरा.. आयुष्यात असे होतंच राहते, त्याचा मुकाबला करावा लागतो, प्रत्यक्ष बोलून, ठोस मार्ग काढून. मी तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून सांगते आहे, चांगल्या अर्थाने घे... रडणे, वाईट वाटणे, यातून काहीच साध्य होत नाही, मला नाही बुवा असे बोलायला जमत, असे धोरण ठेवले तर सहन करण्याशिवाय पर्याय नाही, मग काहीतरी एक ठरवून त्यात आनंदी रहावे. यात तुला दोष देण्याचा हेतू अजिबात नाही हे जर तुला पटले तर त्यातच सर्व काही आले.
वरील काही पोस्ट ह्या माझ्या मित्र/ मैत्रीणिंच्या मायबोलीवरील न आवडणार्या सवयी मधे याव्यात. मला सरळ समोरच्या व्यक्तिला त्याच्या पासुन नकळत, अनावधानाने (असे आपण समजावे) होत असलेला त्रास सांगण्याचा प्रकार आवडतो, पण प्रत्येक वेळी तो समोरच्याला समजतोच असेही नासते.
अगदी योग्य उदय. नकळत बोला किंवा त्याच्या न आवडणार्या क्रुत्यामागे स्वतःचे चांगले क्रुत्य करत रहा.
आणि आपण काय लहान आहोत काय असे चुगली करायला? याने असे केले आणि त्याने तसे केले..
जर मित्र चप्पल घालून कार्पेटवरून फिरत असेल तर तुम्ही मागे क्लिनर घेऊन फिरा. ३,४ वेळा असे केलेत की आपोआप लाजेने वठणीवर येईल.
तो जर पाणी निथळत असताना तसाच निघुन जातो तर तिथे एक कपडा ठेवा आणि अगदी प्रेमाने बोलायचे की "मेरे भाई, वहां कपडा इसी लिये रखा है|"
दोन तिन वेळा स्वतःच करा असे की तो पुढच्या वेळेस बरोबर करेल.
नाहिच फरक पडला तर त्याला ही कामे आवडत नसतील तर सरळ कामांची वाटणी करा.
मला जेवण बनवणे कंटाळवाणे वाटते म्हणून मी घर स्वच्छ ठेवणे आणि कार ड्रायव्हींगचे, बिल्स ई. काम व्यवस्थित पार पाडतो. तो असताना किचनमधे काडिचा ईंटरेस्ट घेत नाही आणि तो कार ड्रायव्हींगमधे किंवा ईतर बाबतीत. माझ्याही कित्येक चुका होत्तात ज्या त्याने किंवा माझ्या आधिच्या रूममेट्स्नी दुरुस्त केल्या आहेत किंवा बदलल्या आहेत. आणि अगदी खरे सांगायचे झाले तर एका वयानंतर माणसाच्या सवयी बदलतही नाहीत आणि आपल्याला ते बघणे जमतही नाही. तेव्हा स्वतंत्र राहणे बरे किंवा संसार थाटलेला बरा.
संसार थाट्ण्यापेक्शा आपल्या सवयी थोड्या modify करता आल्यातर? एका वयानंतर सवयी बदलणे अवघड होते मान्य, पण modify नक्किच करता येतील थोडस adjust केल तर,कारण दर वेळेस आपल्या सवयींनुसार नाही चालत! मग सगळ्यांचच जगणं सुखकर करायला कय हरकत आहे? थोडा विचार करुन पाह्यला हरकत नाही! नाही तर लग्नानंतर पण तेच problems solve करायला इथेच भेटावं लागेल. (just joking!!)
cribbing shows/builds negative attitude, so no replies from my side to whoever gave suggestion/asked questions.
माझी पोस्ट मी आधीच संपादीत करण्याचा विचार केला होता, कुणाला खरं वाटो ना वाटो, मला हा बी.बी. नविन मायबोलीवर पुन्हा सापडला नाही, त्यामूळे सापडला तेव्हा त्यावर तुमच्या पोस्ट्स असूनही मी ती संपादीत केली, कारण मला करायची होती. मला हे ठावूक आहे की मी खूप बारीक गोष्टी लिहील्या होत्या.... हा एक ओपन फोरम आहे इथे आपापल्या लिखाणाला मर्यादा ह्या आपणच घातल्या पाहीजेत हे ही मला मान्य आहे. मला वाद नको होता, मागे पण एका बी बी वर असे घडले तेव्हापासून मी हे ठरवलं.
तरिही एक सांगू इच्छिते, की मी ही चुकतेच, त्यात दुमत नाही. एकटे रहा, बोलून पहा, हे सगळे उपाय एका वेळे नंतर काम करिनासे होतात. शेवटी जो त्यातून जातो त्यालच ते ठावूक असतं. यात दुसरी बाजू म्हणजे, एकटं राहणं सगळ्यांनाच जमतं असं ही नाही, आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या सुद्धा...
|| हरि ओम ||
बर्याच गोश्तिन्चा उहापोह वाचला. मित्रहो सवयि बदलने खुप सोपे असते जर अस विचार केल कि मी जन्मला आले तेव्हा अशी होते का? म्हनजे वानगिदाखल एक उदाहरन घेवु.मी वजनाने खुप जाद झाले. सगले तिन्गल करायचे. मी जाम दुखि वगैरे व्हायचे.पन आमच्या सद्गुगुरु आनिरुध बापु नी मला मार्ग दाखवला. एका प्रवचनात त्यानि सान्गितले कि जन्माला येताना तुम्हि ८० किलो असता का? नाहि ना? म्हनजेच इतक्या वर्शात जे काहि सवयिने तुम्हि केलेय तेच सवय बदलुन नीत देखिल करता येते. म्हनुन मग मी हि तसेच केले आनि लवकरच मी देखिल सुदौल झाले. असो सन्गन्यच मुद्दा ह कि अम्रुता दक्शिना आनि सर्वच जनहो स्वतहाच्या आनि दुसरयान्च्या सवयि बदलने खुप सोपे असते. " केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहिजे."
उदय, "बोल्ड" वाक्यातील प्रत्येक शब्दाला एक मोदक
"तिकडे" पण होतात का तुम्ही?
बाकी पूर्ण पोस्टशी १०० % सहमत.
.
आपण दुसर्या कोणाच्याही सवयी बदलु शकत नाही; आहे तसे सहन करत राहावे. (हॉस्टेलला अनेक वर्ष राहुन बनवलेले माझे मत.) आता एकाही मैत्रिणीच्या वाईट सवयी आठवत नाहीत... फक्त छान छान आठवणी .... "दुर्लक्ष करत राहावे" हा एक उपाय करुन स्वतःला होणारा त्रास कमी करता येतो
एकदा मित्र मैत्रिणींसोबत राहायचे दिवस संपलेत की पुन्हा ते सोनेरी दिवस येत नाहीत.
.
-प्रिन्सेस...
उदय, तुम्हाला मोदक!!
कारण जर दुर्लक्ष नाही केल तर आपल्यालाच त्रास होतो! बाकीचे मस्त जगतात!! स्वतामुळे लोकांना त्रास होतो हे त्यांच्या गावी पण नसते!
मी वाचलेले काही सुंदर विचार...
१.जेव्हा आपल्याला दुसर्याच्या वागण्याने दु:ख होते तेव्हा तसे वागायचे नाही हे ठरवावे आणि जेव्हा आपल्याला दुसर्याच्या वागण्याने आनंद होतो तेव्हा तसे वागायचे हे ठरवावे म्हणजे आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते.
२. आपण दुसर्याला असेच वागा , किंवा तसे वागु नका असे सांगण्यापेक्षा आपणच व्यवस्थित वागावे..क्रियेचा बोध आचरणानेच झाला पाहिजे.
धन्यवाद.
मनस्मी, दोन्ही वाक्यं छान आहेत, अगदी प्रिंट करून वर्क स्टेशनच्या सॉफ्ट बोर्डला पिन करून ठेवावीत अशी. पण प्रत्येकच वेळी इतकं सोशिक आणि सात्विक, दुसर्याच्या बाजूने विचार करणं नाही जमत.
मला माहीती नाही. पण आपल्या सारख्या नागरिकांनीच जर असं आचरण ठेवलं तर काय होईल? आणि ही सवय आपल्याला रोज डोळ्यासमोर पहावी लागणं किती त्रासदायक आहे? 
एक ताजी गोष्ट, एक आठवड्यापुर्वी पर्यंत पावसाचा काही पत्ता नव्हता, आणि पडेल की नाही अशीही शंकाच वाटत होती. आमच्याकडे पाणी कपात त्याच्या अगोदर पासूनच सुरू झालेली आहे . संध्याकाळी पाण्याची ठणठण असते म्हणून माझी रूममेट सकाळी पाणी येतं तेव्हा बादल्या भरायला लावून खुशाल इतर कामं करायला निघून जाते, त्या वाहून जातात, पाणी वाहून जातं. बरं आपल्याला लक्षं द्यायल नसेल जमत तर निदान दुसर्या कुणाला तरी सांगून जावं, ते ही नाही. आणि समजावून सांगितलं की, 'एव्हढंसं पाणी वाया गेलं तर काही बिघडत नाही." हे उत्तर.... तिचा तोंड धुण्याचा ही एक प्रकार पाणी सुरू ठेवून तोंडाला साबण लावत बसायचं. म्हणजे १ तांब्या पाण्यात जे काम होइल त्याला एक बादली पाणी खर्ची घालवायचं.
पाणी वाया जाऊ नये असं मला मनापासून वाटतं. गोड बोलून, रागाने सांगून काही फरक पडला नाही. कदाचित माझा सांगण्याचा मार्ग ही चुकला असेल.
http://www.esakal.com/esakal/07292008/MaitrinB628116EC0.htm
दक्षिणा,
अगदी पटले तुमचे . पण एक उदाहरण देउन तुम्हाला सांगतो मी हे कस सहन करतो ते.
इथे आम्ही जिथे राहतो तिथे वॉशर्/ड्रायर ची वेगळी रूम आहे. (अपार्ट्मेंट च्या लोकांसाठी). तिकडे वॉशिन्ग ३५ मिनिटे आणी ड्रायर ६० मिनिटे असतो.
लोक्(जास्त करुन आपले देशबांधव) वॉशिंग ला टाकतात आणि ३५ मिनिटे सम्पल्यावर काढुन ड्रायर मधे टाकायला विसरतात. आरामात येतात नंतर.
ड्रायर ची ६० मिनिटे सम्पल्यावरही तेच.
इथे ड्रायर मधे एक जाळी असते ती प्रत्येक सायकल च्या आधी साफ करावी लागते. (आपले देश्बांधव ती जाळी स्वतःचे ड्रायरचे काम सम्पल्यावर कधिही साफ करत नाहीत. अमेरिकन मात्र आठवणीने स्वच्छ करतात).
वरील वर्तन गेली कित्येक वर्षे सुरु आहे त्यात काही फरक नाही. आता त्याबद्दल
चिड्चिड करुन काय होणार?
म्हणुन मी
१. प्रत्येक वेळी धुण्याच्या वेळी घड्याळ न चुकता लाविन जातो. वेळ नोट करतो आणि वॉशिन्ग ड्रायिन्ग सायकल सम्पायच्या आधी हजर राहतो.(त्याचे आणखी एक कारण म्हणजे मला माझ्या कपड्याना दुसर्या कोणी किंवा दुसर्या,च्या कपड्याला हात लावयला आवडत नाही). जर मशिन ऑक्क्युपाय असेल तर बसुन राहतो.
२. प्रत्येक ड्रायर सायकल नंतर मी जाळी न चुकता साफ करतो.(एक दोनदा माझे बघुन लाजेकाजेस्तव एक दोन देसी लोकानी जाळी साफ केली होती).
उगाच त्रागा करुन काय फायदा? लोक आपले वर्तन कधिही सुधारणार नाहीत मग स्वतःला त्रास का करुन घ्यायचा?
तुम्ही मैत्रीणीला सांगुन पाहिलेत. नाही ऐकत ठीक आहे. पण तुम्ही मात्र योग्य वागणे सोडु नका. तिला नक्की तिच्या वागण्याची लाज वाटेल तुमचे वर्तन पाहुन आणि ती सरळ होइल.
मी गेले चार् वर्षे घराबाहेर आहे. वर्किंग वूमन्स हॉस्टेल, तीन मुलीनी एक फ्लॅट घेऊन राहणं आणि त्यानंतर एकटीने राहणं आणि आता परत वर्किंग वूमन्स हॉस्टेल. या सर्व दरम्यान मला कुणाचाही त्रास झालेला नाही. बर्याच जणाना माझा त्रास जरूर झाला. कारण मी घरी अगदी लाडावून ठेवलेली कारटी आहे. चहाचा कप सुद्धा आई उचलून ठेवते. (आजदेखील!!!)
अशावेळेला बाहेर राहून सर्व काही मॅनेज करणं मला कठीणच होत.. पण तरीही सर्व मॅनेज झालं. यामधे माझ्या सर्व मैत्रीणीचा आणि मित्राचा सहभाग आहे,
सुरुवातीला मला माझी स्वतःची प्लेट पण धुवून ठेवायला लागतेय याचा खूप वाईट वाटायचं.
पण हळू हळू सवय होत गेली. याचं मुख्य कारण म्हणजे माझा मुळातच बोलका असलेला स्वभाव. मी मोकळेपणाने बोलते. दुसर्याला नक्की काय त्रास आहे हे समजून घेते. एकदा कुठलीही व्यक्ती तुमची मैत्रीण झाली की कधी कसलाच त्रास होत नाही. उलट एक चांगली मैत्रीण तुमचा त्रास कमी करायचा प्रयत्नच करेल.
माझी सध्याची रूममेट देबोलिना. ती माझ्या रूमवर आल्यावर पहिल्या पंधरा मिनिटातच आमचे फॉर्मल इंट्रो वगैरे संपलं आणि बिनदिक्कत नंदु आणि डेबो हाक मारणं चालू झालं. ती आय आय टीची रँकर आहे. तरीही आम्ही अत्यंत क्रेझी गोष्टी करतो. लव्हस्टोरी २०५० आणि थोडा प्यार थोडा मॅजिक सारखे पिक्चर पाहणं.. रात्री तीन चार वाजता पावसात भिजायला बाहेर पडणं.
यापलीकडे जाऊन देखील एकमेकीना हवा तेव्हा आधार देणं हेही महत्वाचं आहेच ना? छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यातून नातं बळ्कट होत असते. मला यायला उशीर झाल्यावर डेबोने माझं जेव काढून ठेवणं किंवा तिला यायला उशीर झालेला असताना मी तिचं जेवण होइपर्यंत जागणं या वाटताना तितक्या मोठ्या गोष्टी वाटत नाहीत. अजून चार वरर्षानी याच आठवणी डोळ्यात पाणी आणतात!
महत्वाचं काय... तर तुम्ही इतराशी कसे वागता ते!!
सवयी हा तर व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. पूर्ण व्यक्तिमत्व नव्हे, आणि एकदा ती व्यक्ति आपली झाली की मी या सवयी पण त्रासदायक होत नाहीत.
--------------
नंदिनी
--------------
१००% अनुमोदन नंदिनी .

आम्ही ३ रुममेट राहत होतो , नंतर दुसर्या वर्षी एक जण बहिनी सोबत राहु लागला अन आम्ही दोघे डीग्री पुर्ण होइपर्यंत सोबत राहत होतो .
माझा सुरुवातीला त्यांना त्रास झाला पण नंतर मी सुधारलो . आता आम्ही तिघांनी एकाच सोसायटी मधे पुण्याला फ्लॅट्स घेतले आहेत .
छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यातून नातं बळ्कट होत असते. >> खरंय , अनुभवाचे बोल
जसे वाजती नुपुर सुखाचे ...
श्रध्दा, नंदिनी. तुमचे मुद्दे पटले. हॉस्टेलला वगैरे रहाण्याची वेळ आली नाही. पण आमचं घर आमच्या ग्रुपचा अड्डा होता. आम्ही दोघं घरी पोचण्याआधी हे सारे जण पोचुन अगदी गाद्या सुद्धा घालुन गप्पांचा फड सुरु असायचा. दोघांचाच स्वयंपाक मी कधी केलाच नाही तेव्हा. नंतर एकेकाची लग्न व्हायला लागली. आपल्या-आपल्यात रहाणं सुरु झालं, जितक्या मोकळेपणाने आमच्या घरी वावरायचे तो स्वतःच्या घरी या, येत रहा म्हणताना नसायचा. तेव्हा खुप त्रास झाला ह्या सगळ्या बदलाचा. ग्रुपच्या भेटीगाठी एकदम कमी झाल्या. मात्र आता ८-१० वर्षांनी सगळ्याना आठवतोय तर फक्त आमच्या घरचा अड्डा आणि गप्पांचा नियमित फड.. आता कधीमधीच भेटतो तेही काहीतरी निमित्ताने. पण त्या आठवणी प्रत्येकाचा नॉस्टॅल्जिया आहे... मीही त्यातली कटुता केव्हाच विसरलेय. २ खोल्यातल्या आम्हा दोघांच्या, सगळ्या मित्रांना सोबत घेउन केलेल्या संसाराच्या (म्हणजे बाकीचे त्याला संसार म्हणतात म्हणुन मी ही तोच शब्द वापरला.
) आठवणी माझाही नॉस्टॅल्जिया आहे...
काही गोष्टी खरोखरच मांडाव्याशा वाटतात. मला एक तमीळ रूममेट मिळाला. मी रेहमानचा मोठा फॅन असल्याने मला वाटले खूप छान जमेल याच्याशी. पण या साहेबांचे, माझ्या खोलीत येऊ नकोस. माझ्या गोष्टी वापरु नकोस आणि त्याला हात लावू नकोस ई.ई. कुठल्या गोष्टी न वापरव्यात त्याचे ज्ञान मलाही आहे
कारण गेले साडेचार वर्षे रुमवर राहतो आहे आणि ते ही भारतातल्या जवळपास सगळ्या राज्यातल्या लोकांबरोबर राहिलो आहे, अगदी हा तमिळी सोडून दुसरा तमिळी सुद्धा. आणि माझे सगळ्यांबरोबर खूप छान जुळले. काही दिवस मी या साहेबांचे सहन केले पण नंतर मात्र माझे सटकले. मी म्हणालो - भावा ४ लोकांच्यात राहताना इतके नखरे नसतात रे ठेवायचे. घराचे भाडे मी पण भरतो. तुझ्या खोलीवर माझाही हक्क आहे आणि आपण इथे मित्र म्हणुन राहतो आहोत. थोडीफार तडजोड तुलाही करायला हवी आणि मलाही. उगाचच छोट्या गोष्टींचा बाऊ करु नकोस. थोडे दिवस ठीक गेले आणि नंतर मात्र एक दिवस भांडण कडाक्याला गेले ते ही मी त्याचा स्पिकरफोन वापरला म्हणून. मी तसा मनमिळाऊ आणि पटकन मैत्री करणारा. कदाचित माझे चुकलेही असेल कारण काही लोकांना पर्सनल हायजीन, स्वच्छता याची आवड असते. मी कदाचित जास्तही केले असेन. पण माझे स्वतःचे असे मत आहे की अशा लोकांनी चार लोक राहतात तेथे राहूच नये. सरळ वेगळे राहावे. कारण असे लोक २०% असतात(बहुधा सोन्याच्या चमच्यातून जेवणारी). बाकी ८०% माझ्यासारखी. वापर न यार मला काळजी करण्यासाठी अजून हजार गोष्टी आहेत म्हणणारी.
त्यानंतर मी अमेरिकाच सोडली. ३ महिने त्याच्याबरोबर राहिलो आणि डाव एकदाचा संपला. अजूनही तो ट्च मधे आहे पण ...... बाकीच्यांसारखा नाही.
माझ्या आत्तापर्यतच्या रूममेटच्या काही खटकलेल्या सवयी:
माझा एक रूममेट कितीही वास आला तरी आपले सॉक्स लवकर धुवायचाच नाही. त्याला स्वताला याचा त्रास कसा व्हायचा नाही कुणास ठाउक...
आणि दुसरा एक रूममेट मी पीसीवर वगैरे काही काम करत असलो तरी माझ्याशेजारी ठाण मांडुन बसायचा... म्हणजे मी काही पर्सनल मेल वगैरे चेक करत असलो तरी हे साहेब शेजारुन हलायचेच नाहीत.... म्हणजे काही करायचा नाही पण नुसता तिकडे बसुन रहायचा... तस म्हणल तर छोटी गोष्ट आहे पण कधीकधी फार त्रास व्हायचा...
एक मित्र असाच सकाळी अगदी गडबडीच्या वेळीही तासतासभर कॉइल लावुन आंघोळीचे पाणी गरम करत बसायचा... म्हणजे जरा पाणी गरम झाल की कॉइल बंद करणार, पेपर वाचत बसणार... पेपर वाचुन होइपर्यंत परत पाणी गार... मग परत एकदा कॉइल चालू... मग काय तर व्यायाम करणार... परत तेच कॉइल चालू-बंद... मग आमच्या कुणाच्या तरी सहनशक्तीचा अंत होइपर्यंत त्याचा तो खेळ चालू असायचा...
एकजण तर इतका कंजूश होता की पावडर असुदे पेस्ट किन्वा डिओ एकदम छोटा पॅक घेउन येणार आणि तो संपला की अरे मला आणायलाच वेळ नाही झाला करुन बाकीच्यांच्या स्टॉकवर महीनाभर तरी काढणार!
असो पण याच रूममेट्सनी कधी चुकुन मी आजारी वगैरे असलो तर अगदी गरमागरम नाश्ता पार्सल घेउन ये पासुन अगदी चहा कॉफी करुन देणे अश्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत... आणि याच कंजूश मित्राने स्वताच्या पीसी साठी बाजुला ठेवलेल्या पैशातुन एका मित्राच्या अगदी अडचणीच्या वेळेला मदत केलेली मी बघितली आहे..
एक्सेप्ट इट एज अ पार्ट एन्ड पार्सल ऑफ देट रिलेशनशिप!
आमच्या ३ जणींतही नातं चांगलं आहे. मुख्य म्हणजे आम्ही भरपूर भांडतो, पण भांडण कॅरी करत नाही. "तू तेव्हा, तसं म्हणालेलीस, मी कधीही विसरणार नाही"अशी वाक्यं आम्ही शक्यतो कधी बोलत नाही. रागच्या भरात वाटतं ते बोलून टाकतो, पण तिघीही हे जाणून आहे की ते पर्मनंट स्टेटमेंट नाही. नॉसटॅल्जिक व्हावं असं नातं फक्त या दोघींबरोबरच आहे. आधीही बर्याच रूममेट्स होत्या, त्या सगळ्याच वाईट नव्हत्या, पण तेव्हा रूममेट ही काय 'चिज' असते हेच मूळी कळायचं नाही.
) अगदी तुपापासून ते सुक्या मेव्यापर्यंतच्या गोष्टी शेअर होतात.
(हा माझा अगावूपणा)
मग आपण अशी वेळ येण्याअगोदर पासूनच वेगळं राहायचा प्रयत्न करू, तशी उपाययोजना करू यावर खूप वेळी चर्चा झाली. पण दरवेळी निकाल एकच, तेव्हाचं तेव्हा पाहू, सध्या मनसोक्त भांडून तर घेऊ... 
सध्याच्या मैत्रिणिंची आई, बहीण आमच्याकडे येऊन रहातात, पण मला कधीही इनकन्व्हिनियंट होत नाही. मानलं तर होऊ शकतं, पण मी ते मानत नाही, उलट त्या म्हणतात की तुझ्याही बाबांना इकडेच रहायला बोलवत जा.
मला ऑफिसातून यायला उशिर होतो, कधी माझ्याकडे कोणी येणार असेल तर मी घरी येईपर्यंत त्या आवर्जून बसवून त्यांचे आदरातिथ्य करतात. माझी मैत्रिण किंवा कुणिही 'माझं' जेवायला येणार असेल तर निम्मा स्वयंपाक तर कधी कधी पूर्णं ही स्वयंपाक करतात. आमच्याकडे पडेल ती कामं जी घरात असेल ती करते. हे माझं काम नाही, किंवा कामांची स्पेसिफिक वाटणी, असले प्रकार नाहीएत. मी आठवडाभर घरात काहीच काम ऍज सच करू शकत नाही, पण वीकेन्ड ला मात्रं करते. एखाद्या वेळेस कंटाळा आला तर वीकेन्ड ला ही करत नाही. पण त्याची मोजणी नाही होत. आमचा स्वयंपाक एकत्र होतो, खाणंपिणं ही एकत्रं होतं कुणाच्याही घरून खाऊ आला तरीही तो माझा - तुझा नाही तर 'आपला' म्हणून ट्रीट केला जातो. (बर्याच वेळा माझा खाऊ मला उरत नाही ही गोष्ट वेगळी...
घरातले सर्व खर्च कॉन्ट्रीब्यूशन काढून केले जातात. मात्रं टी.व्ही. वर कोणी काय पहायचं यावरून जाम भांडणं होतात... मध्यंतरी एका मैत्रिणीने उपाय सुचवला की दिवस ठरवून घेऊ... मग एका कागदावर दिवस आणि जिने पहायचा तिचे नाव असं लिहीण्यात आलं.. मी ते बेधडक अमान्य केलं....
अर्थात अशा लिहिण्याजोग्या खूप गोष्टी आहेत, काही वाईट (माझ्यामते) काही चांगल्या (त्या ही माझ्याच मते) पण आम्ही अपापली घरं सोडून एकत्र राहतोय गेली कित्येक वर्षं. जाम भांडणं झाली, पण आम्ही ती कधीच कॅरी केली नाहीत ही गोष्ट सर्वात महत्वाची. rather मी इथे काय काय लिहीते हे ही त्यांना माहीती आहे. पण त्या त्याचे काही वाईट मानून घेत नाहीत. उलत स्पोर्टींगली घेतात आणि म्हणतात, मन मोकळं करायला एक तरी जागा आहे. :O
कधी कधी आम्ही चिंतेतही पडतो की उद्या जर अपापल्या वाटांनी जायचं ठरलं तर डिपार्ट होताना खूप त्रास होईल.
उदय३२१.. तुमच्य रूममेटच वाचून मला माझी रूममेट आठवली. तिला अजिबात तिखट चालायचे नाही आणि रोज पोळ्याच लागायच्या. मग आम्ही तिच्या साठी भाजी वेगळी काढून ठेवत असू आणि नन्तर पोळ्या करणे बन्द केले. अभ्यासाच्या व्यापत जमणे कठीण जाउ लागले. पण मग तिही भात खायला शिकली.
नंदिनी, तुझं पोस्ट खुप म्हणजे खुप आवडलं.. आणि पटलं. या गोष्टीचा बाहेर मैत्रिणीं बरोबर राहतानाच नाही, तर कुठेही उपयोग होतो.
दक्षिणे,
"कॅरी न करणे"-- खुप आवडलं... खरंतर click झालं एकदम..
या गोष्टी माहीत असतात आपल्याला, पण उदाहरणा सहीत समोर आल्या तर एकदम मनाला भिडतात-- क्लिक यु नो !!!
अनघा
-----------------------------------------
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.