विंबल्डन - २०११

विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
गतविजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती व्हिनस विल्यम्स ह्यांनी दुखापतीतून सावरून ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन निश्चित केलं आहे. ह्या दोघींना अनुक्रमे आठवे आणि चोविसावे मानांकन मिळाले आहे.

मानांकनानुसार खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील..

पुरूष एकेरी :
राफा वि बर्डिच
मरे वि रॉडिक
फेरर वि फेडरर
सोड्या वि जोको

महिला एकेरी :
वोझजियाकी वि शारापोव्हा
ना ली वि सेरेना
स्किव्होनी वि अझारेंका
क्विटोव्हा वि झ्वोनारेव्हा (ह्या भागात व्हिनस पण आहे)

हा धागा यंदाच्या विंबल्डनविषयी चर्चा करण्यासाठी....

Submit to kanokani.com

ड्रॉज कधी आहेत,, म्हणजे आडाखे बांधायला कधी घ्यायचे ते ठरवता येईल....

ड्रॉ १७ तारखेला... पण या की आत्ताच काय फरक पडतो ? "तिथली" चर्चा "इथे" करायची आहे का? फिदीफिदी

हो मीपण तयार आहेच मॅचेस बघायला.

पराग, रोज कोणत्या वेळा असणार आहेत?

कशाच्या वेळा ? चर्चेच्या ? डोळा मारा

"तिथली" म्हणजे कुठली ?

धन्यवाद आठवणीने धागा काढल्याबद्दल.

तिथली चर्चा आणि पोस्टची संख्या वाचूनच फेफरं भरली होती मला.. त्यामुळे तिथली चर्चा इथे कशाला परत.. आपला घोडा असाही फेडेक्सच आहे.. त्यामुळे काय फरक पडत नाय... पूर्वी जसा बेकर होता तसा...

सरिना गेली aegon international मधुन. हि तिची पहिली WTA after come back. कशी काय खेळतेय?

सिंडी, वेळा म्हणजे रोजच्या मॅचेसच्या.

ओह्, ह्यावेळी त्या विलीयम्स् भगिनी असतील का? स्टेफी ग्राफ खेळायची थांबल्यावर Women's tennis मधला इंटरेस्ट कमी होत गेला आणि विलीय्म्स् भगिनी आल्यापासून तो शून्य झाला ..

(ही वाईट वृत्ती झाली पण मी प्रामाणिकपणे कबूल करतेय ..)

गो ज्योको, गो नाडाल! फिदीफिदी

Women's tenis मधला इंटरेस्ट कमी होत गेला >>> इतका की टेनिसचे स्पेलिंग लक्षात नाही ? फिदीफिदी

कुठे काय? फिदीफिदी

ह्या वेळी मी माझा तो ज्योको नाही करणार. ऊगाच त्याला नजर लागते आणि हारतो.

माझा तो ज्योको >>>> हसून हसून गडबडा लोळण चमनला बोलवा... ! तुम्ही तुमचा तो फेडरर म्हणा मग.. फिदीफिदी

ही वाईट वृत्ती झाली >>> हो अगदी अगदी.. फिदीफिदी व्हिनस चांगली खेळते विंबल्डनमध्ये.. म्हणजे तिचं खेळणं सेरेना इतकं ताकदवान (आणि रानटी) वाटत नाही..

सुमंगल, ज्योको अंधश्रद्धेच्या बळावर पुढे जायला नको ना ..

आपण देऊ त्याला प्रोत्साहन, चांगलं खेळला तर जाईलच पुढे! स्मित

आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार पायाला झालेल्या दुखापतीमुळे किमने विंबल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे. अरेरे

"I'm very very disappointed to have to withdraw from Wimbledon after injuring my foot again at the tournament in 'S Hertogenbosch. At this moment I feel frustrated that it has to happen now before one of my favourite tournaments. I've always enjoyed being a part of the Wimbledon atmosphere but I have no other choice now but to rest, recover and to not play tennis for a few weeks."

असं तिने सुत्रांशी बोलताना सांगितलं...

अरेरे .. आता परत women's tennis बघायला नको विंबल्डन पुरतं ..

आपला घोडा तर नदाल . चांगली बातमी म्हणजे त्याला No 1 Seeding मिळालय .
म्हणजे जोको आणी फेडरर परत एकमेकात झुंजून मरणार स्मित

>> म्हणजे जोको आणी फेडरर परत एकमेकात झुंजून मरणार

ह्यावेळी फेडरर मरावा ..

अरेरे

ह्यावेळी फेडरर मरावा .. >> पण माझ्या मते तरी जोको मेलेला नदालला (पर्यायाने मला) चांगला .
फ्रेंच मधे पण जर फायनलला जोको आला असता तर काय खर नव्हत रे बाबा .

ठिक आहे सशल! जो जिता वो सिकंदर. स्मित

मी या धाग्यावर बहिष्कार टाकत आहे.
हल्ली कोणीही येतात आणि काहीही बडबडतात. त्यांना टेनीसमधले ओ की ठो कळत नाही! (उदा. सशल आणि टण्या)

धाग्यास शुभेच्छा!

हेमाशेपो.

धन्यवाद !

फिदीफिदी

'कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते' हे ज्या टेनीस फॅन्स ना पटत नाही त्यांनीं ओ की ठो न कळाणार्‍या लोकांपायी असे बहिष्कार घातले तर तुम्हारी बला से! फिदीफिदी

स्पर्धा संपल्यावर वर विजेते पण अपडेट करत जा.

बस्स... फेडररला जिंकूदे.. मग तो किती वेळाही हरला तरी वाईट वाटणार नाही.. फिदीफिदी

फेडरर ... फेडरर.

राफा ... राफा.
ज्योको ... ज्योको.

गो सशल. :ड

फेडी एके फेडी , फेडी दुणे फेडी , फेडी त्रिक फेडी , फेडी चोक फेडी ............... फिदीफिदी फिदीफिदी