वांगी , डाळ , मसाला , धने जीरे पूड, कांदा, आले , हळद , लाल मिर्ची , लाल तिखट , लसूण, हिंग
डाळ वांगं विदर्भात माझ्या सासरी अजुन वेगळ्या पध्दतीने करताना पहिलय .
कुकर मधे वांगी आणि डाळ एकत्र तेलावर परतून घेतात .
त्यात मसाला , धने जीरे पूड आणि परतलेला कांदा पण घालतात .
मग त्यात पाणी , किसलेले आले आणि हळद घालून कुकर मधे दोन ते तीन शिट्ट्यां पर्यंत शिजवतात आणि नंतर वरून लाल मिर्ची , थोडे नुसते लाल तिखट , लसूण आणि हिंगाची फ़ोडणी देउन serve करतात .
यात वांगी जरा जास्त मऊ होतात पण दाल आणि वांगी एकत्र शिजवल्याने स्वाद छान येतो .
त्यांचा काळ्या मसल्या सारखा वाटणारा मसाला पण बर्या पैकी strong असतो , यात इतर मसाल्यां बरोबर star anis, बडी इलायची वगैरेही असते .
छान लागते ही पण डाळ वांग्याची recipe.
मसाला करताना तेलावर नुसता परतत नाहीत तर deep fry करून घेतात सगळे आणि मग mixer मधून काढतात .


