पानं गळून पाचोळ्या झालेल्या वाटेवर
पर्णहीन झालेल्या फांदीतून सुर्य येतो
विखरतात कोवळी किरणं अवतीभवती
दवात भिजलेली पाने सजीव होतात
पिकलेले रंग थेंबथेंब ओघळू लागतात
कधीतरी कुजून मातीत मिसळून जातात
सृजनाच्या क्रियेला सुरवात व्हायला लागते
भरगच्च पर्णसंभारात सुर्यकिरणं अडकतात
भुईवर झिरपत राहतो काळोख.. काळोख
- बी
या कवितेतुन भलते परस्परविरोधी सूर उठताहेत असं वाटतं. हे द्वंद्व आहे की निराशेच्या वाताने आशेच्या दिव्यावर घातलेली फुंकर आहे?