सदस्य प्रवेश |
अरबी समुद्रातील साहसमंडळी ही कथा आहे विजयची. विजय आहे एक मराठी मुलगा. मुळचा मुंबईचा सध्या नोकरीनिमित्त पुण्यात. आणि विजयचे आजोळ कोकणात. आजि आजोबा दोघेच तिथे राहतात. या गणपतीला चार दिवसांची सुटी टाकून विजय कोकणात गेला. आजी आजोबांना कोण आनंद झाला. दीड दिवसाचा गणपती. नंतरच्या दिवशी एक एक जुन्या काळच्या आठवणींवर गप्पा मारत असतांना आजोबा अचानक गंभीर झाले. उठून आतल्या खोलीत गेले, आणि एक जीर्ण कागद घेऊन बाहेर आले. तो दाखवत विजयला म्हणाले, " विजय, मला तुला एक अतिशय महत्वाची गोष्ट आज सांगायची आहे. अनेक वर्षे वाट बघितली हे रहस्य आपल्या पैकी योग्य व्यक्तीला सांगीन म्हणून आणि आता आज ती वेळ आली आहे. आपले वंशज रघुजी हे छत्रपती शाहू महाराजांच्या चाकरीत होते हे मी कधी सांगितले असेन तुला. सागर तटावर झालेल्या कुठल्याश्या लढाईत जिंकलेली संपत्ती घेऊन ते चालले असता स्वकियांच्या कटात अडकले. तेंव्हा ही संपत्ती त्यांनी या बेटावर लपवून ठेवली. पण परतीच्या प्रवासात त्यांना मृत्यु आला. हा नकाशा मात्र त्यांनी आधीच बनवून ठेवला होता. या नकाशाचा पुढील प्रवास माहीत नाही पण माझ्या आजोबांनी तो मला दिला. त्यांनी सगळे आयुष्य हा खजिना शोधण्यात पणाला लावले पण त्यांना यश आले नाही. तरी माझा विश्वास आहे की हा नकाशा आणि त्या बेटावर दडलेली संपत्ती यात नक्किच तथ्य आहे. कोकणातून विजय परत आला. पण तेव्हा पासून त्याच्या डोक्यात एकच विचार. तो नकाशा, ते बेट आणि त्यातील खजीना. विजय ने आपला धाडसी plan त्यांना सांगताच त्या अथांग अरबी सागरात ती आगपेटी सारखी बोट हेलकावे खाऊ लागली. स्तंभीत होऊन या वादळातून वाट कशी काढावी याचा दोघे विचार करू लागले. आणि तेव्हाच एक वीज कडाडली. तिच्या त्या अधर प्रकाशात दोघांनाही दूरवर एक महाकाय जहाज तरंगतांना दिसले. कसेही करून त्या जहाजा पर्यंत पोहोचण्याचा निर्णय दोघांनी घेतला. दोघांचे नशीब चांगले म्हणून ते विशाल जहाज देखील त्यांच्याच दिशेने येत होते. आणखी जवळ आल्यावर दोघांनी मदतीचे सिग्नल्स देऊन जहाजाचे लक्ष आपल्याकडे वळविले. पलिकडून लाइफ बोटी टाकण्यात आल्या. दोघेही आपली बोट सोडून त्यात स्वार झाले आणि मोक्याच्या क्षणी मदतीला आलेल्या त्या जहाजावर दाखल झाले. डेक वर उभ्या दोन माणसांनी दोघांना हात दिला. " welcome to arabian night " सुहास्य वदनाने त्या जहाजाचा captain दोघांकडे बघून म्हणाला. Arabian night हे त्याच्या नावाला शोभेलसे luxury cruise liner होते. आलिशान पंचतारांकीत तरंगता राजमहाल. ताजेतवाने होऊन विजय आणि बाबुराव शिप वर फेरफटका मारायला निघाले. दुसर्या मजल्यावरील कसिनो मधे बाबुरावांचीची नजर गेली... समोरच्या टेबल वर एक दुक्कल बसली होती. पत्ते वाटले गेले आणि दोघांपैकी सोनेरी केसांचा गोरा माणूस छद्मी पणे हसत आणि टेबलावर चारही बोटे आपटत एकच वाक्य बोलला... " मोगॅम्बो खूश हुआ. " आणि त्या बरोबरच समोरचा दुसरा दाढीवाला पचकन बाजुला थुंकत गुरगुरला, " एक ही डाव और पत्ते सिर्फ तीन. बहूत ना इंसाफी है ये! " मोगॅम्बो आणि गब्बर!! बाबुरावांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. " अरे देवा....ऊचल रे बाबा...मला नाही रे या दोघांना. अरे हे कुत्ते कमिने इथे कुठून आले रे. " बाबुराव धावत विजय पाशी गेले. पण त्याला सांगायला त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. बाबुरावांची ही अवस्था बघून विजय त्यांना घेऊन जवळच असलेल्या restaurant मधे गेला. तिथे दोन घोट पाणी पिऊन बाबूराव स्थिरस्थावर होत नाही तोच बाजुच्या टेबलावरील संवाद विजय च्या कानी पडला. " काही म्हण गुंड्याभाऊ पण काऊने घरी केलेल्या हातच्या शेवया आणि या गिळगिळीत चायनीज शेवया यांची काही तुलनाच नाही. " चिमणराव आणि गुंड्याभाऊ!! आणि यांच्या बाजुला हा बारकेला, पांढरा शर्ट घातलेला चष्मीस मुलगा कोण आहे? तेवढ्यात त्या पांढर्या शर्टाने तोंड उघडले. " तुमच्या खाद्य चर्चेत व्यत्यय आणु इच्छीत नाही पण चीन देशी या शेवया हातानेच करतात. चिनी लोकांच्या जीवन पद्धतीवरील एक पुस्तक माझे गुरु श्री. पु.ल. देश्पांडे यांनी मला दिले होते. त्यात भारत आणि चीन देशातील लोकांचे समाजमन आणि राहाणीमान यातील समान सुत्रे अभ्यासली होती. तुम्हाला माहीत नसेल पण या चाऊ चाऊ नूडल्स चा घास आपल्या लेकराला भरवतांना चिनी माता आपल्या भारतीय मातांसारखेच " च्याऊ म्याऊ शेवया खाऊ पत्रावळीचे पाणी पीऊ. असे गीत गातात. " " चिन विषयक बरेच ज्ञान आहे गटणे तुम्हाला " " छे छे. जागतिक इतिहासाचा माझा अभ्यास सध्या अतिशय तोकडा आहे. पण या विषयाचा व्यासंग करायची इच्छा मला आहे. " या त्रिकुटाला पाहून आता थक्क व्हायची पाळी विजयची होती. तर मंडळी विजय डोकेखाजवत होता कि ह्या सगळ्यांना खजिन्याबद्दल कसे कळले. त्याने हि शंका बबुरावाला सांगतली आणी पाठून आवाज आला ” एकदम सोपे आहे हो.घडलेय असे की ज्या प्रमाणे विजयचा वंशज रघुजी याला गुप्त खजिन्या विषयी माहित होते त्याच प्रमाणे चिमणरावांच्या पणजोबांच्या पणजोबांना देखील या गुप्त खजिन्या विषयी कल्पना होती. आणि म्हणून गुंड्याभाउंना घेवून ते रत्न द्वीपाच्या शोधात निघाले होते. पण मग सखाराम गटणे सारखा ईसम सोबत कशाला? तर नकाशात रघुजीने ज्या मराठी भाषेत खजिन्या विषयी लिहिले होते ते प्राच्य मराठी वाचून खजिन्याचे गुढ कोडे उकलून सांगु शकणारा त्यांच्या ओळखीत तो एकटाच होता. ” हे कोण बोलले म्हणून विजय नि बाबूराव मागे वळले आणी समोर कोण तर चट्टेरी पट्टेरी चौकड्यांचा shirt घातलेला एक चश्मीस किडकिडित पण smart पोरगा आणि त्याच्यासोबत एक जहाजाच्या captain चा dress घातलेली तरून मुलगी होती. तीच्या एका हातात कसली तरी चावी नि दुस्र्यामधे एक चाबूक होता. विजयचे त्याच्या बोलण्याकडे लक्श नव्हते. ” अतता हा कोण ?” बाबूराव ” अहो हा तर बनेश ” विजय ” बनेश ? कोण बनेश ?” बाबूराव ” अहो फास्टर फ़ेणे ” परत विजय ” फास्टर फ़ेणे कि बनेश ” नक्की ठरव बघू ” अर्थात बाबूराव ” दोन्ही हो. काय तेच तेच dialoge मारत असता हो सारखे ” विजय ” अरे काय करणार दोन दोन्म movies मधे तेच तेच बोलून तेव्हढेच तोंडात बसलेय रे. पण मग हि मुलगी कोण ” बाबूराव दोघेही प्रशान्र्थक चेहर्याने बनेशकडे वळले. ” हिला नाही ओळखले ? हि बसंती. ” ” बसंती ? म्हणजे हि ती शोले वाली कि काय ? ” ” हो तीच तीच ” ” अरेच्चा पण ती असा जहाजाच्या captain चा dress घालून ? ” हो ती तिसरा शोले कोणी काढला तर त्यात आसेल. पहिली टांगा चलवत होती. दुसरी रिक्षा मग तीसरी बोट का नाही चालवणार ?” ” नाही नाही ते बरोबर आहे ” बाबूरावांनी कबूली देउन टाकली लगेच. ” पण तीच्या हातात चावी कसली आहे ” ” ते एक secret आहे ” ” ओह. आणी चाबूक पण ?” ” तो होय. तो पहिल्या शोलेतला. Pअरत कोणी शोले काढायला लागला कि वापरायला उपयोगी येइल ना ” ” चाबकाने जहाज कशी चालवते हो पण ?” ” नाही हो. म्हणजे परत कोणी शोले काढायला लागले कि त्याला हाणायला उपयोगी येइल हो ” ” हे बाकी एकदम बरोबर बोललात आनी तुम्ही इथे काय करताय ?” ” अर्थात जे तुम्ही करताय तेच. खजिना शोधायला आलोय दोघेही. ” ” आणी तुम्हाला कसे कळले त्याच्याबद्दल ? तुमाच्याही आजोबांनी लिहून ठेवलेले कि काय ?” ” छे हो. आम्हाला ह्याने सांगीतले ” बनेशने दरवाज्याकडे बोट दाखवले. बाबूराव वळळे पण त्यांना कोणीच दिसेना. ” कोणी ? तिथे तर कोणीच नाहीये. माझा नंबर बदलला कि काय परत ” बनेश हसला. त्याने खिशातून एक लाल रंगाचा चष्मा काढून बाबूरावांना दिला. त्यानी तो छढवला नि पहिले. तिथे डोक्यावर काळी hat घातलेला , दाढीचे खुंट वाढलेला एक मनूश्या उभा दिसला. ” Hello I’m Mr.India “ तो पुढे येउण shake hand साठी हात पुढे करत म्हणाला. पण विजय बेशुद्ध पडला होता. नियमः २.ही गोष्ट व यातला कोणताही भाग कोणाच्याही स्वप्नामधे सुरू नाही. उगाचच 'XYZ' ला जाग आली आणि लक्षात आलं की हे सगळं स्वप्नं होतं असं किंवा या स्वरूपाचं काही पोस्ट करून रसभंग करू नये! ३.आपला भाग पोस्ट करताना आधीपर्यंत काय पोस्ट झालेलं आहे हे पाहुन त्याला अनुसरुनच पुढील पोस्ट करावे. आपल्या पोस्ट ने गोष्ट शक्यतो पुढे सरकत आहे किंवा काही Value Addition होत आहे हे पहावे. ४.जर काही मोठे पोस्ट करणार असाल तर कृपया इतरांना त्याची पूर्वकल्पना द्यावी म्हणजे तुमचे आणि इतरांचे प्रयत्न वाया जाणार नाहीत. ५. धपाधप पात्रं मारत बसू नयेत. आपली STY समिती |
विजय ला बेशुध्द पडलेला पाहून बाबूरावाने एक शिवी हासडली,
कुत्र्या , तू माझा खंबा मारलास ना ?
अता पड असाच , उद्या सकाळ पर्यंत काही उठणार नाहीस.
मि. इंडीया पुन्हा बाबूरावाकडे हात पुढे करत म्हणाला,
मी मि. इंडीया, आणि आपण?
बाबूरावानी मि. इंडीया कडे पाहून वाकडं तोंड केलं .."तू मि. इंडीया , मग मी आहे, 'मि. नारायण पेठ''.
पण तू एक सांग रे बाबा, तुला मि. इंडीया बनवलं कोणी?
तुझ्या पेक्षा तर या बाबूराव गणपत राव आपटेची बॉडी चांगली आहे , असे म्हणून बाबूराव मलमलची बंडी काढून दाखवू लागला, त्याची घामट बंडी बेशुध्द पडलेल्या विजय च्या तोंडावर फेकली.
"बाबूराव, मला मि. इंडीया बनवले ते भारताच्या सामान्य जनतेने , आणि म्हणूनच ही अद्रुश्य होण्याची शक्ति माझ्या आजोबांनी फक्त मला दिली आहे."
च्या मायला, म्हणजे या विज्या सारखे तुझे पण आजोबा होते?
"अर्थात आणि अता नुकतेच माझ्या मेलेल्या आजोबांनी मला स्वप्नात येउन त्याहूनही मोठे गुपित सांगितलय, त्याच मिशन वर मी आणि माझी गर्ल्फ्रेंड सीमा उर्फ हवा हवाई या जहाजा वर आलोय."
इतक्यात एक हवाईयन ड्रेस मधे एक फटाका मुलगी आली.
" वुई वुई वुई वुई.. अत्तच मोगँबो पुढे नाचून काही अजुन गुपितं घेउन आलीये मी , पण हा म्हातारा कोण आहे तुझ्या बरोबर मि. इंडीया?"
सीमा, हे मि. नारायण पेठ उर्फ बाबूराव आणि तो पिउन पडलेला त्याचा मित्र.
"वुई वुई वुई वुई.. कसले तुझे मित्र, हा बिन शर्टाचा पोट सुटलेला चश्मिश म्हातारा आनि हा दारुडा."
अशा लोकां मधे राहून तुला खजिना मिळणार नाही, मला हवा हवाई बनून व्हिलन पुढे नाचवतोस आणि तू असा टाईम पास करतोस, तू बस यांच्यात, मी चालले मला अत्तच मिळालेल्या खबरीचा पाठलाग करायला"
असे म्हणून सीमा रागा रागाने निघून गेली.
इकडे बाबूराव हवा हवाई च्या ड्रेस मधल्या सीमा वर जाम फिदा झाला!
जाड भिंगाच्या चश्म्यातून डोळे फाडून तो तिच्या कडे पहात बसला, तो ही वेड्या सारखा हवा हवाईच्या मागे गेला.
इथे बाबूरावाच्या घामाच्या दुर्गंधीत बंडीच्या वासाने विजय शुध्दी वर आला, रागा रागाने त्याने बंडी फेकून बाबूरावाच्या दिशेने फेकली पण ती मि. इंडीयाच्या डोक्यावर पडली आणि त्या वासाने मि. इंडीया बेशुध्द पडला.
बाबूराव हवा हवाईच्या मगे आणि बाबूरावाच्या मागे विजय असे सगळे धावु लागले.
हवा हवाई ने अचानक मार्ग बदलला, ति एका खोलीत गेली आणि एकदम वेगळ्याच गेट अप मधे बाहेर आली !!
वेगळेच एक पांढर्रे परकर पोलक घालून ती आली, अचानक इकडे तिकडे क्रुर नजरेने ती पाहू लागली, बघता बघता तिचे डोळे निळसर घारे झाले आणि ती हिप्नॉटाईझ झाल्या सारखी एका बंद दरवाज्या कडे नाचत जाउ लागली.
विजय आनि बाबूराव लपून ते पहात च होते!
अरे म्हण्जे ही सीमा नाहीचे, ती मि. इंडीया ला डबल क्रॉस करतेय.. ही तर नगिना मधली इच्छा धारी नागिण , "रजनी' आहे!!
"बाबूराव, आपल्याला हिचा पाठलाग करायला हवा, कारण जिथे नागीण असते, तिथेच असतो गुप्त खजिना !"
बाबूराव हा चमत्कार पाहून कधीच बेशुध्द पडला होता.
त्याला तसाच टाकून विजय त्या इच्छा धारी घार्या नागिणीच्या मागे दबकत गेला.
एका दरवाज्या पुढे रजनी कान देउन काही तरी ऐकु लागली, आणि अचानक तिच्या देहाचे नागीणीत रूपांतर झाले, दाराच्या खालच्या फटीतून ती पहाता पहाता वळवळत पलीकडे गेली पण !!
विजय जाम टरकला पण त्या ही अवस्थेत तो त्या खोलीत काय गुपित आहे पहायला त्या दाराला कान देउन आतले डॉयलॉग ऐकु लआगला.
" अबे बापु, तू भी आपुन को येडा बना रहा है क्या?
बोले तो, यहां पे गब्बर और मोगँबो जैसे टपोरी लोग इकठ्ठे हुए है और तू बोलता है सबके साथ विनम्रता से बात करनेका?
और वो बसंती , उसकी अजीब ड्रेस देखी, बोले तो आगेसे तो ठिक है लेकिन पिछ्छू से सब खुल्ला, आपुन को यहां नही जमेगा बाप, तू किसी और को दर्शन दे , खजाना तो आपुन दो चार हडीया तोडके भी कमाएंगे"
विजय ला हा अवाज, ही स्टाईल ओळखीची वाटू लागली, पुढचे बोलणे तो ऐकु लागला,
"मुन्ना, तू हमेशा हड्डीया तोडनेकी बात क्यूं करता है, डर मत, मेरे बताए हुए सच्चई और विनम्रता के रास्ते पे चलेगा तो ये सारे व्हिलन खुद सारा खजान तुम्हे सौप देंगे"
अता मात्र विजय ला खात्रीच पटली आणि त्याने फटीतून जे पाहिले ते पाहून त्याचा विश्वास बसेना, !
खुद्द मुन्नाभाई एका रिकाम्या खुर्ची कडे पाहून बोलत होता, मुन्ना भाईच्या पाया मागे नागीण लपली होती पण खुर्ची वर कोण बसलय ते काही विजय ला दिसेना, एवढ्यात त्याला काही तरी आठवलं....!!
म्हणजे त्या खुर्ची वर गांधीजी तर .................????
म्हणजे मुन्ना ला गांधीजी तर दिसत न्ह्ववते ना.
येडा बंबुच आहे हा मुन्ना. जिकड बघाव तिकड गांधी दिसतात म्हणे. च्या मारी तेच्या. बर ह्य गांधीनी अंहीसा सोडली की काय? त्या मुन्याचा संगतीत राहायला.
विजय मुन्ना व गांधीला तिथेच सोडुन त्या नागिनी च्या शोधार्थ जाउ लागला. पायाला बुळु बूळ काही लागले पाहातो तर काय ति नागीन (की नाग) त्याचा पायाखाली होता. झटक्यात त्याने पाय काढला व दुसर्याच खोलीत पळाला.
पळता पळता परत एकदा तो कसीनो च्या खोलीत आला तिथे गब्बर व मोगाँबो पत्यावरुन भांडत होते. कितने पत्ते है वो? गब्बरचा आवाज भारी होता, विजय ला त्याही अवस्थेत वाटले की ह्या आवाज आज्च्य तरुन हिरो शारुख खान ला दिला तर काय भारी होइइल. तो विचार तिथेच सोडुन त्याने पत्याकडे पाहीले. पत्यावर मराठीत काही तरी गुढ लिहीले होते.
"नजर भारदार
अंग सकवार"
आता हे नजर तर कळले पण सकवार म्हणजे काय? आताच ओळख झालेल्या सखाराम गटन्या कडे तो गेला. सखाराम ने त्याला सांगीतले सकवार म्हणजे नाजुक.
आयला आलीका पंचाइत नजर भारदार न नाजुक बाइ. अरे बापरे. हे भलतच कॉम्बीनेशन. बाजुला असलेल्यअ बाबुरावने लगेच सांगीतले अरे येड्या हे वर्नन बाइच आहे.
च्या मारी या बाबुरावाला जिकडे तिकडे बाइच दिसते. मि. इडींया बोलला.
आता या बाइला शोधु कुठे. थांब जरा गुप्त होतो न बघतो कुठे बाइ मिळते का? त्या आधी एक नवटाक टाकुनच घेतो म्हणजे कस बाइ न बाटली दोन्ही साजर होइल.
नाजुक बाइला शोधायला सर्व त्या खोली तुन बाहेर पडले. नाजुक बाइ कोण असेल? ति नागीन की आणखी कोनी याचा विचार सर्व करत असतानाच तिथे अचानक चोली के पिछे हे गाण वाजु लागले. सर्व जन त्या आवाजा कडे जाउ लागले. अहो आश्चर्यम तिथे मुन्ना व गांधी दोघे होते. गांधीजी फक्त मि. इंडीयालाच दिसले कारण दोघे ही गुप्त होते बाकीचे सर्व जन मुन्ना कडे न त्या बाइइ कडे पाहु लागले. तिहे एक भसाडी बाइ जोर जोरात चोली के पिछे दिल है मेरा हे गाण गात होती व पडद्याअड एक बाइ नाचत होती.
जोरात कशाचा तरी धक्का बसल्यामुळे मुन्ना चा हातातील मद्याचा ग्लास हिंद्काळला त्याने जोरात शिवी दिली व विचारले काय झाले.
बाबुरावा आपल्या चश्म्यातुन पाहात म्हणाले एक बेट येत आहे. बहुतेक तिकडे जावे लागेल. पण असलेल्या नकाशातुन त्यांनी पाहीले हे बेट तर ते न्हवते म्हणजे हे कोनते बेट आहे. बेटावरची वाळु मात्र वाळवंटातील वाळू सारखी दिसत होती.
गब्बर च्या हातातुन पत्ते खाली पडले त्या वर लिहीले होते
"जिच्या हाती पाळन्याची दोरी"
क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष
पुढचे विजय ला काही दिसलेच नाही. हे काय त्या पत्यावर लिहीले असले व परत बाइच असेला का याचा विचार करत तो सखाराम ला शोधु लागला
विजय आपला शोधतोय शोधतोय... कुठं गेला हा गटणे? शेवटी तो बाबूराव ला घेऊन एका रिकाम्या केबिन मध्ये घुसतो.
"अरे द्येवा, तरी मी सांगत हुतो, बगा आता कुटं येऊन्शान पडलोया.." बाबूराव.
विजय एकदम काहीतरी लक्षात आल्यासारखं गळ्यातल्या पिशवीत चाचपडून बघू लागतो. हवी ती गोष्ट हाताला लागल्यावर एकदम त्याला हायसं वाटतं. तो नकाशा बाहेर काढून तो बाबूराव समोर धरुन म्हणतो, "हां, आहे आहे. बाबूराव ज्यासाठी मोहिमेवर निघालोय ती फत्ते झाल्याशिवाय जायचं नाही.. आपण तो खजिना मिळवणार म्हणजे मिळवणारच! आता अडचण एकच, या नकाशातल्या ठिकाणी जहाज नेणे.."
"ट्टॉक"
अचानक आलेल्या आवजाने दचकून विजय एकदम गप्प होतो. लागोपाठ त्याला केबिनबाहेर कुणीतरी पळत गेल्याचा आवाज येतो...
.......
श्वास रोखून धरत पळालेले ते दोघे शेवटी थांबतात.
"काय मॅडसारखं पळालो नाही आपण..?"
"गप रे, लंप्या! तुझा झाला होता 'विठोबा' तिथं. पण लक्षात ठेव, कुठं बोलू नको हे. आपण काहीतरी आयडिया काढून तो नकाशा बघू.." फाफे विचारात पडतो. दोघांचे काम नाही, टीम तयार केली पाहिजे.
"तू सोड रे, मी नाही सांगणार कोणाला.. ए पण काय रे, तो खजिना बिजिना असणार तिथं गोष्टीतल्यासारखं दुष्ट चेटकीण, त्याचं रक्षण करणारा नाग वगैरे असणार कारे?
फाफे उर्फ बनेश वैतागून लंपनकडं बघतो.
"जाऊदे, सांगितलं ना? आमचं आपलं असंच असतं. कुणाला काही समजतंच नाही आमचं. वाटत आम्हाला कुण्णी कुण्णी नाही..."
"लंप्या, मी आहे रे, पण हे बघ आता आपल्याला मदत पाहिजे. कोणीतरी शोधलं पाहिजे.
तेवढ्यात त्याला एक चांगला मोठा, दांडगा कुत्रा दिसतो. आणि त्याच्या मागे एक ढगळी हाफ चड्डी, डोक्याला टोपी, हातात काठी असलेला एक माणूस 'वाघ्या वाघ्या, अरं माज्या वाघ्या' म्हणत धावताना दिसतो. अगदी पांडू हवालदारच जसा! फाफेला आयडिया सुचते आणि त्याचे डोळे आनंदाने चमकतात...
"चल लौकर चल..." म्हणत फाफे लंपनला ओढून नेऊ लागला त्या कुत्र्याच्या मागे आणि एका कॉरिडॉरच्या दरवाज्यापाशी एकदम थांबलाच! त्याला एकदम कसलेसे विचित्र आवाज ऐकू आले होते. त्याने हळूच दार किलकिले करून बघितले. तो कुत्रा आणि नागीण एकमेकांसमोर उभे होते. त्याला काहीच कळले नाही तरी तो श्वास रोखून ऐकत राहिला.
तो कुत्रा आणि नागिणीच्या आपसात गप्पा चालल्या होत्या.
"तू 'तेरी मेहरबानियां' मधला का रे?"
"हो... आणि तू नागिन मधली की नगिना?"
"नगिना... पण मग तो पांडू हवालदार तुझ्यामागे का पळत होता?"
"काय की... त्याला चकवून आलो पळून! मघाशी मी तुला लपून मुन्नाभाईचं बोलणं ऐकताना पाहिलं. तू मि इंडियाला पण बरोबर घेऊन आली आहेस. तुला नागिणीला खजिन्यात एवढा का इंटरेस्ट?"
"कारण... (एकदम नागिणीचे डोळे भरून आले.) माझ्या नागाचा जीव ज्यापायी गेला तो नागमणी त्याच खजिन्यात आहे. जोपर्यंत तो मणी मी नष्ट करणार नाही, तोवर माझ्या नागाचा आत्मा भटकत राहील."
"हमममम...."
"बरं चल... इथून निघूयात. इथे असे गप्पा मारत उभे राहणे सुरक्षित नाही."
ते दोघे खोलीबाहेर पडले. बाजूच्याच खोलीत दारामागे लंपन भीतीने थरथरत होता आणि फाफे त्याला धीर देत होता. त्याचवेळी बाहेर काहीतरी करकरले आणि त्यांना आवाज ऐकू येऊ लागले.
"मला त्या नागिणीचं बोलणं कळलं रॉन... आणि मला खात्री आहे की तो नागमणी एक horcrux आहे. आपल्याला आता जहाजावरच राहिलं पाहिजे."
त्या व्यक्तीला नागिणीचं बोलणं कळतं हे ऐकून फाफे आणि लंपन दोघेही बेशुद्ध झाले.
इकडे बाहेर कॉरिडॉरमध्ये कुणीच नव्हते. अचानक एक आवाज आला.
"Homenum Revelio"...
"आत कुणीच नाही."
"alohomora..." एका टोकाकडच्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडला आणि काही सेकंदात पुन्हा बंद झाला.
इकडे जहाजाच्या मेन डेकवर एक व्यक्ती समुद्राकडे टक लावून बघत उभी होती. संध्याकाळ होत आली होती. सूर्याची केशरी किरणे पाण्यावर पसरली होती. अचानक त्या माणसाचे लक्ष एका गोष्टीने वेधले गेले.
दूरवर अचानकपणे एक जहाज क्षितिजावर दिसू लागले होते. त्या जहाजाभोवती विचित्र लाल प्रकाश दाटला होता. काही क्षणांपूर्वी ते जहाज तिथे नव्हते.
"Flying dutchman....." तो माणूस स्वतःशीच पुटपुटला. "आता काहीतरी अघटित घडेल नक्की...."
त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. तो चमकून मागे वळला....
"कॅप्टन जॅक स्पॅरो?????? तू .... तुम्ही इथे?"
त्याच्या खांद्यावर हात ठेवलेल्या विजयच्या चेहर्यावर भीती दाटली होती.....
फक्त हिंदी किंवा मराठी सिनेमांतलीच पात्रं का? हिंदीत भाषांतरित होऊन आलेले सिनेमे चालतील का?
पण समुद्रातलं साहस आणि flying dutchman किंवा pirates of caribbean चा उल्लेखही नाही म्हंजे कसंतरीच वाटतं.
) बघा, चालत असेल तर ग्राह्य धरा माझा एपिसोड....
आता आणली आहेत तेव्हढी असू दे पण अजून नका आणू. आणी गोष्ट पुढे सरकू दे आता, खूप पात्रे झाली. अशाने त्या खजिन्यामधली एक एक पै येईल प्रत्येकाच्या हिश्शाला
असे 'पै"वाटत सुटू नका. आधीच कामत आणि शेणॉय भरलेत. उरले सुरले 'पै' सगळ्यांना वाटलेत तर कसं चालेल?
( मेधा पै - शोनू )
घाबरलेला विजय धापा टाकीतच आत आला...त्याला बघुन बाबुराव म्हणाले.. काय रे ..काय झाल... खजिना बघितलास की काय... एवढ्या लांबुनच??
तसा विजय म्हणाला: कसला खजिना.ऽअजुन एक जहाज येतेय.. आणि खुप मोठे आहे..
बाबुरव: च्यामारी, म्हन्जे अजुन लोक येतायेत.. आरे विज्या..मी. इंडिया .. तुमच्या आजोबांनी काय सगळ्या दुनियेले सांगुन ठेवलेय काय रे..खजिन्याबद्दल.
ही सगळी स्थिती बघुन
सखाराम गटणे..एकदम समजावणीच्या सुरात ... आपल्या साहित्तिक वाक्यांची चौफेर उधळन करीत बोलु लागला..: अरेरे..काय हे.. तुम्ही सगळी लोक खजिन्याच्या मागे पळुन तुमचे मौलिक जिवन व्यर्थ घालवताय.
बाबुरव: च्यामारी, आनि तु काय करुन राहीलायस रे इथे मग?
गटणे: मी या जिवनात एकच वसा घेतलाय..साहित्याचा.. हा खजिना मिळवण्या मागे माझ एकच उद्दात्त हेतु आहे.. साहित्याचे जतन.
मुन्ना: साहित्य..?? बोले तो?
बाबुरव: साहित्य..म्हन्जे.. सामान रे.. तु नाय का डॉक्टरी करतांना वापरायचास..म्हन्जे असे बघ.... कात्रि, सुरा, बाटली.. म्हन्जे सलाईनचि रे..बाटली म्हनलो मी..खंबा नाय म्हनलो. हा..तर हे तुज़े साहित्य. तसे या गटनेचे साहित्य म्हन्जे ..त्यचि वळकटी, ट्रंक..
(हे ऐकुन गटणे तिथेच बेशुद्ध...)
मुन्न: आरे मग येवध्य खजिन्यचि गरज काय यल..
बाबुराव: तुला नाय कळनार ते..तु राहु दे..
येवध्यात बाबुराव चे लक्ष दुसर्या कोपर्यात.. बाप्पा समोर हात जोडुन उभ्या असलेल्या बसंतीकडे गेले.. तिचि प्रार्थना झाल्यावर बाबुराव बाप्पांपुढे नतमस्तक झाले.. आणि दबक्या आवजात बोलायला लागले: बाप्पा.. आम्हाला खजिना मिळु दे.ऽअम्हि तुल भरपुर दागिने घालु.. आणि हो..या उंदिर मामाला पन मस्तपैकी कानात मोती आनि गळ्यात कंठा घालु..
बाबुराव बाजुला गेल्यावर, मुन्ना पन प्रार्थना करु लागला..मनातल्या मनात.. बाबुरावनी ते बघितले..मुन्नाचि प्रार्थना झाल्यावर परत बाबुराव बाप्पांपुढे.. मुषकाच्य कानात सांगु लागले.. "हे बघ मामा.. तुझा हिस्सा पन आहे बर त्यात.. तेंव्हा तु बप्पांकडे आमच वशिला लाव म्हन्जे झाले.
मुन्ना: ये बाबुरव, तुम्हि आतच तर प्रार्थना केलि.ऽअत परत?
बाबुराव: आरेय तुला नाय कळायचे ते... वशिला पन लावला पहिजे ना... आमच्या गाठिशी पुण्य तसे कमीच..म्हणुण..उगाच रीस्क नको!
तिकडे मोगम्बो आनि गब्बर जोर-जोरात भांडत होते.. त्यांचा गोंगाट ऐकुण सगळे तिकडे पळाले. पाहतात तर काय.. मोगम्बोच्या एका हातात गब्बरचि दाढि..तर गब्बरच्या हातात मोगम्बो चे केस..
बाबुराव ओरडतो: आरे पांडु हवालदार, ह्यांना सोडव.. बघत काय राहिलास..
पांडु: म्या ड्युटीवर नाय... करु देत त्यांना काशी..
बाबुराव जोरात ओरडतो: आरेय..मी. इंडिया आला..
हे ऐकुन मोगम्बो पसार होतो.
सगळी लोक त्या दुसर्या जहाजावर किति लोक असतील आनि आपल्या वाट्याला किति येनार याच हिशोब मांडीत असताना... अचानक.. ढगांचा कडकडाट होतो आणि विजा चमकु लागतात...
पावसाची चिन्हं दिसताच हे सगळे बघून कंटाळलेल्या विजयला अजूनच कंटाळा आला. कुत्रे नागिणी वगैरे प्राणीही आता दिसेनासे झाले होते. संध्याकाळची केशरी उन्हं जाऊन गडद काळ्या ढगांची गर्दी जमा झाली होती. विजयला आपण सकाळपासून धड काही खाल्लेही नसल्याची जाणीव झाली आणि त्याची पावले नकळत त्या क्रूझच्या अतिशय formal आणि पंचतारांकित अशा Dining arena कडे वळली. तिथे पोचताच पहातो तो काय! जगभरातल्या श्रीमंतांची तिथे हीss गर्दी जमली होती. तिथल्या सुटाबुटातल्या लोकांकडे पाहून विजयला क्षणभर ओशाळल्यागत झालं. पण खजिना मिळाल्यावर "हम भी कुछ कम नहीं" हे जगाला दाखवून देऊ असा विचार करत तो पुढे गेला. नाना तर्हेची पेये, खाण्याचे अनेकविध प्रकार, फळाफुलांनी सजलेली टेबले, प्रकाशमान झुंबरांच्या उजेडात काचेची चकाकणारी भांडी, चमचमणारे दागिने आणि उंची अत्तरांचा सुवास या सगळ्यात भांबावून गेलेला विजय आपली भूक विसरून वेड्यासारखा इकडेतिकडे पहातच राहिला.
तेवढ्यात "Are you looking for something?" असे शब्द ऐकल्यावर त्याने वळून पाहिले. एक अतिशय सुंदर तरुणी एका हातात महागडी सिगार घेऊन आणि दुसर्या हाताने आपले वार्यावर उडणारे केस सावरत विजयकडे पहात उभी होती. हा मधाळ प्रश्न नक्की आपल्यालाच विचारला जातोय याची खात्री नसल्यासारखा भानावर येत विजयने काहितरी बोलायचा प्रयत्न केला, "अं हो, म्हणजे I mean .."!
"अरे वा! तुम्ही पण मराठी का? या शिप वर मराठी माणूस भेटणं म्हणजे वादळात दीपस्तंभ दिसण्यासारखंच ना हो!" तरुणी अवखळ हसत म्हणाली. विजयच्या पोटात गोळा आला - आजपर्यंत इतक्या सुंदर तरुणीशी इतके मधाळ बोलायचा प्रसंग तर सोडाच पण बसमधे शेजारी बसण्याचासुद्धा योग आला नव्हता. "नुकतीच जयपूरहून मुंबईला शिफ्ट झाले. म्हटलं काय करावं सुट्टीत. तेवढ्यात मला माझ्या मित्राने ही क्रूझची ऑफर दिली. मी कशाला नाही म्हणू? I was so terribly wanting a change from the busy Mumbai life - तर लगेचच निघाले. पण हा मित्र असाच बेभरवशाचा. दिलान आयत्याक्षणी येत नाही चा धक्का! पण मी थोडीच मागे हटणार्यातली! म्हटलं गेला उडत. मी जाईन एकटीच! नाहीतरी माझ्या घरातल्या खिडकीतून दिसणार्या त्या एकट्याच पिंपळाला कायम पाहून मलाही एकटेपणाची चांगलीच सवय झाली होती. पण इथे तुला पाहिलं, आणि .... अरेच्चा चालेल ना असं लगेच तुला वगैरे म्हटलेलं?"
विजयने "हो" म्हणायला तोंड उघडायचा प्रयत्न केला पण तेव्हाच तिने सोडलेल्या महागड्या सिगारमधली धुराची वर्तुळं नाकात गेल्यामुळे ठसका लागून त्याच्या तोंडून काहीच बाहेर पडले नाही. तरुणी पुढे बोलत राहिली, "मला वीट आला होता आयुष्याचा. रोज नवा दिवस पण तीच रात्र. रोज नवी पहाट पण तोच सूर्य. शेवटी कंटाळले. बदलून टाकले सगळे काही. अगदी राहत्या घरा आणि शहरा आणि नोकरीपासून ते दूधवाल्या भय्यापर्यंत! आणि काहीतरी नवीन, काहीतरी साहसी, माझ्या existence ला नवीन identity देणारे, आणि त्याचबरोबर identity ला नवीन existence देणारे काहीतरी करायचे असे ठरवले. आणि गंमत म्हणजे नेमके नको तिथे कसे मनासारखे होते तसेच झाले. क्रूझवर येताच मला काही संशयास्पद गोष्टी नजरेस पडल्या."
विजयचे तिच्या बोलण्यातून एव्हाना उडालेले लक्ष या शेवटच्या वाक्याने मात्र चटकन वेधून घेतले. पुढ्यातल्या बेचव पास्त्याचा बकाणा भरत त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. "इथे आल्यावर मला कळले आहे की उद्या रात्री ३ वाजायच्या सुमारास ही क्रूझशिप एका निर्जन बेटाजवळून जाणार आहे. त्या बेटावर छुपा खजिना आहे म्हणे! आता एरवी मी अशा फुकटच्या पैशावर कधीच डोळा ठेवला नसता. मला चांगली मोठ्या पगाराची नोकरी आहे. आणि स्वकर्तुत्वावर स्वाभिमानाने जगणारी आणि कशासाठीही लाचार नसलेली म्हणून मला माझा गर्व आहे. पण आयत्या क्षणी टांग देणार्या त्या मित्राचा बदला घ्यायचा म्हणून मी हा खजिना हुडकून काढायचं ठरवलं आहे."
विजयची मती गुंग झाली. या खजिना प्रकरणात तेवढा तो खरा खजिना सोडून बाकी काहीच गुप्त दिसत नव्हतं! पण नंतर तर विजयला आपण काय ऐकतो आहोत यावर विश्वास बसेना! नव्याने शिलगावलेल्या सिगारमधून येणारी धुराची वर्तुळे झेलत तरुणीचे पुढचे शब्द त्याच्या कानावर पडत राहिले, "त्या खजिन्याचा शोध लावण्याच्या मार्गातला एक अतिशय महत्त्वाचा दुवा मला सापडला आहे. म्हणतात ना आयुष्यातल्या संघर्षाच्या क्षणी आपणच तलवार असतो आणि आपणच ढाल! पण तरीही त्या तलवारीला गरज असतेच ना एका म्यानेची? ...त्या खजिन्याची किल्ली माझ्याकडे आहे! तर होशील का तू माझी म्यान?"
अरे भल्या माणसा पण मी म्हणतो जरा पहिल्या post च्या खाली लिहिलेले नियम वाचायचे कष्ट घे कि रे. STY मधे कुठली पात्रे allowed आहेत ते बघ नि त्याप्रमाणे तुझे post पटकन बदल बघू.
मला तर ती सिगार वाली बया मेघना पेठेंची हिरॉइन वाटून राहिली बाबा
काय रे चाफ्या?!
मला ती हेलन किंवा बिंदू वाटतेय
)
अग बिंदू कशी?! हेलनच ती
>>तिचे केस वार्यावर उडत होते
बिंदूचे केस कसे उडतील? तिच्या डोक्यावर तर चिमणीचं घरटं असतं ना नेहमी
MT, बरोबर! कोणी का असेना ती, मी तिला 'मीराकाकू' नाव देऊन पुढचा भाग लिहिणारच होते...
-लालू
कुठाय तो चाफा आणि कुठाय ती ट्युलिप?
शहानिशा हो^ऊनच जाऊ दे .. 

ही त्या नातीचरामी मधली 'ती'च! तेव्हढा तुकारामाचा अभंग राहिला ..
LOL, मैत्रेयी, सशल आणि लालू बरोबर आहेत. 'गाजलेली' पात्रे म्हटलं होतं ना म्हणून पटकन डोक्यात तेच पात्र आलं. दिवे घेऊन वाचा सगळ्यांनी! आणि गोष्टही पुढे सरकवली आहे. उद्या रात्री ३ वाजता...... ??? लालू लिही पुढे!
सिगारवालीला बघता बघता विजयला पत्त्यावर लिहिलेले आठवले...
" नजर भारदार्,अंग सकवार" अरेच्चा, ही "ती" तर नाही?
तो ख्य्शीतच म्हणाला,
" म्यान क्या चीज है सुंदरी? ही मान पण हजर आहे... अडकव पट्टा... आय मीन... तुझ्या सुकुमार हातांच्या वेढ्यात कर बंदीवान मला.."
जिंकलेल्या मुद्रेने, त्याच्या तोंडावर सिगारचा धूर सोडत ती हसली. खु खु खोकत विजय..." या तुझ्या सिगारला नाही का शोधली एखादी म्यान?" तशी ती केस उडवत हसली मोठ्याने.. "नॉटी बॉय"
बाबुराव पळत येतात्.."तु हिकडं काय करतुस? आन ही कोन? सगळीकडे असा डोळा ठेऊ नये रे बाबा.. अर्जुना सारखा एकाच जागी ठेव.. खजिन्यावर.."
"बाबुरव, ही पन आपली पार्टनर्,खजिना शोधायला..."
"आरं वा! तुला पार्तनर आन मला नको...मी पन जातो शीमाकडे.." त्यंच्या गळ्यातील मोबाइल वाजतो...
" बाबुरव्...फोन.."
"हलु... कोन? देवीप्रसाद? च्यामारी... हिकडं मोबाईलवर पन राँग नंबर? यम्टीएनल काय झोपलं काय्?हो.. हो देवीप्रसादच बोलतोय्...माशांची ऑर्डर द्यायाची? बरं....आत्ताच शार्क कदुन घेतलीय ऑर्डर माणसाची... ये हिकडं... टाकतो तुला पाण्यात त्यांच्याफुडं..."च्यामारी, सगळी उतरली.. १ खंबा मारलाच पायजे आता..... " म्हणत जातो..
इकडे नागिन उर्फ हवाहवाईला खबर लागते की जी माहिती तिने मोगम्बो कडुन मिळवली तिचा पुढचा भाग गब्बर कडे आहे. ती गब्बर कडे जाते.... बसंती बनुन..
मि. इंडीया गायब झालल्यावर परत मोगम्बो आणि गब्बर मधे जुंपलेली असते...दोघांना एकमेकांकडील माहितीची गरज असते.
गब्बर- मान ले... कितने आदमी है तेरे.. सबको गोली खिलाऊंगा...
मोगम्बो- ये चल मांडवली कर ले... इतनेसे चंबल का डाकु तू? मी अख्ख्या जगाचा गुंडा आय मीन डोन आहे..
इतक्यात बसंती येते... लाडाने गब्बरच्या गळ्यात हात टाकते... "गब्बर डार्लिंग, मला दे ना रे तुझ्याकडची माहिती.."
गब्बर- ऐसा प्यार से बोलने का... ये छोरी, पहले नाचुन दाखव.."
मोगम्बो- इस कुत्ते के समने मत नाचना बसंती"
बसंती- अभी हवाहवाई बनके तेरे सामने नची ना?मै कुत्ते कुत्ते मे फर्क नही करती.." आणि नाचु लागते.
इकडे खरी बसंती हातातला चाबुक फटकारत असते. बाबुराव खंबा टाकुन येतो आणि तिच्या भोवती गोल गिल फेर्या मारु लागतो...
विजय- बाबुराब, काय चाल्लय काय तुमचं? रात्री ३ वाजता ते जहाज पोहचेल त्या बेटावर... त्या आधी अपल्याला रहस्य शोधायचंय... अजुन हे पत्त्यावर लिहिलेले पण डीकोड नाही करु शकलो आपण?"
इतक्यात तिथे गटण्या येतो... बसंतीच्या हातातील चाबुक कडे बघुन बोलतो,
"अरेरे... काय हे बसंती? अगं काय आपल्या देशाची परंपरा, संस्कृती...... स्त्री ही अनंत काळची माता मानणार्या या देशात, शोभते का तुला असे चाबुक फटकारणे? जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच्या हाती चाबुक?"
"पाळण्याची दोरी... "ऐकताच विजय चमकला. त्याने पत्त्यावरचा मजकुर वाचला,
"जिच्या हाती पाळण्याची दोरी...
क्ष क्ष् क्ष क्ष क्ष क्ष..." आणि ओरडला,
" बाबुराव, सापडली... क्ष!.... "
मै कुत्ते कुत्ते मे फर्क नही करती.." ! >>>>
जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच्या हाती चाबुक?
अरे इतके सोपे होते होय. साला आपण उगीच त्या गटन्याला भाव देत होतो. म्हणजे त्या सिगरेट वाल्या बाइ अन या चाबुक वाल्या बाइ कडे काहीतरी सिगरेट आय मिन सिकरेट आहे होय. त्या बाइचा भलताच प्रभाव वाढलाय आपल्यावर चक्क सिगरेट म्हणु लागलो आपण, हा त्या हळदी कुंकवाचा पार्टीचा तर परिनाम नाही. विजयला आठवले काही दिवसांपुर्वी तो अन त्याचा मित्र पाट्रीला गेले होते तिथे बायका चक्क खंबे उडवत होत्या. तो विचार बाजुला ठेवुन त्याने तिच्या कडे पाहीले व चुकन त्याचा डोळा लवला गेला.
त्या गब्बर च्या नजरेतुन हे सुटले नाही त्याने पचकन थुकूंन विचारले
ऐ साले ये मेरा माल है.
विजयः हा मालुम है ये चाबुक तुम्हारा है.
ग्ब्बर - ऐ ये चाबुक नही लडकी बोलरेला हु मै. त्याची अशी टपोरी भाषा ऐकताच तिथे असलेल्या मुन्याला चेव आला.
मुन्ना गब्बर ला उद्देशुन : मामु तुम भारीच है, ये लडका उस लडकी क पिछे नही है वो तो उधार सिगरेट वाली से गुलुगुलु बाते कर राहा था.
गब्बर ला त्याची भाषा समजली नाही. तो ओरडला गुलुगुलु ये क्या है, सिगरेट वाली ला क्बरे डान्स पन येत होता तिला आठवले नतिचिरामी लिहायचा आधी ति कविता ही करायची.
गुलुगुलु असे ति जोरात ओरडली. न लगेच हिंदी पिच्कर सारखे ब्याकग्रांऊड मुझीक चालु झाले.
इकडे फाफे व बाबुराव एकमेकांना काही तरी दाखवत होते. त्यात फाफे ने चोरलेला नकाशा बाबुराव समोर ठेवला. बाबुराव ने काळा कोट व डोळ्याला काळा गॉगल लावला होता व खाली धोतर घातले होते, फाफे ला वाटले की तो ही हेर आहे व त्याची नकाशात मदत घ्यावी.
रात्र बरीच झाली तिन वाजत आले होते. विजय ने एक चपटी पोटात टाकली व तो बेट यायची वाट पाहु लागला.
इतक्यात जोरात वारे चालु झाले. विजय कडचे दिशा दर्शक यंत्र अचानक जोरात हालु लागले. विजय ला आजोबाने सांगितले होते की असे काही झाले की त्याला खजिन्या वा खजिन्याकडे जानारा मार्गाचा दुवा मिळेल. विजय काळ्या गच्च अंधारातुन डोळे उगडुन पाहु लागले ( तसही काही फरक पडनार न्हवताच) पण तो वाट पाहु लागला.
इत्क्यात त्याला काजव्या सारखे काहीतरी च्मकताना दिसले. त्या दिशेने तो जाउ लागला. जातो तर काय मद्याचा नशात धुंद असलेली मिराकाकु उर्फ सिगरेटवाली दिसली. तिची सिगरेट काही थांबतच न्ह्ववती.
जोरदार वार्याने त्यांची नाव हेलकावे खात बेटाला लागली. विजय ने मिरा ला टाळुन जोरात उडी मारली व तो जमिनीकडे धावु लागला.
मुन्ना, हवाहवाइ व गब्बर अजुनही गुल् गुलु करन्यात मग्न होते. मात्र बाबुराव व फाफे त्या धक्याने खाली पडले. नकाशा पान्यात पडला व बाबुराव काळ्या चशम्यातुन काळ्या अंधाराकडे पाहु लागले. पाणी लागताच बाबुराव घाबरला. ए मेरुको भी लेले रे बाबा असे ओरडत असताना एक चमत्कार घडला.
लक्ख प्रकाश पडल्यामुळे बाबुराव चे डोळे त्याचा चश्म्यासगट दिपुन गेले. बाबुराव ने विचारले. तुम्ही कोन.
त्या मानसाचे वय बरेच दिसत होत पण तो तरुन होता, दाढी न्हवती. डोळे करडे व केस पिंजारलेल्या सारखे दिसत होते. बाबुराव ने त्याल विचारले आपण कोन? तो म्हणाला मी राजु गाइड. मला देवाने नेहमी चॉकलेटी राहन्याचा शाप दिला आहे.
बाबुराव गोंधळले. म्हणले देव आहे काय? देव म्हणजे काय? च्या मारी देव आहे की नाही याचा निकाल अजुन मायबोली वर लागला नाही अन ह्यो म्हणतोय देवाने शाप दिला. तो विचार बाजुला टाकुन बाबुरावाने विचारले तुम्ही गाईड म्हणजे काय करता. तो म्हणाल या बेटावरचे सर्व मला माहीत आहे व मी ते दाखवतो.
बाबुरावाला विजय कुठे आहे हे माहीत न्हवते. राजुला त्यांनी विचारले मेरेको विजय के पास लेके जाव.
विजय तर तिकडे पळत सुटला होता त्याचे दिशादर्श्क यंत्र जोराने हालत होते.
काय असेल बर त्या दिशेला???
निर्जन बेटावर ते दिशायंत्र नसते तर विजय च काय पण कोणी च जाणार नाही असे भयानक वातावरण होते.
लांब कुठुन तरी कुत्र्याच्या भेसूर रडण्याचा आवाज आला, पायाला काही तरी धक्का लागला म्हणून पाहिले तर एक काळी मांजर केकाटत आडवी गेली.
"बाप रे मांजर आडवी गेली , म्हणजे काही तरी अपशकुन तर ...".. छे हे काय आप्ण कधी पासून असा अंध्द्श्रध्दाळु झालो.. स्वतः शी पुटपुटत आणि दिशा यंत्रानी दाखवलेल्या दिशेने तो पुढे जाउ लागला.
समुद्राच्या लाटांचा अवाज, वार्याचा भयानक घोंघावल्याचा आवाज, कुत्र्याचे रडणे अशा वातावरणाने खरं तर विजय जाम टरकला होता.पण खजिन्या साठी आज तो कुठली पण रिस्क घ्यायला तयार होता.
इतक्यात कुठे तरी कोणी तरी भकास कण्हण्याचा आवाज आला, विजय ला अता अजुनच भीती वाटायला लागली, एकी कडे दिशा यंत्र सारख्ं खडखडत होतं आणि एकी कडे हे माणसाचं कण्हणं अजुनच स्पष्ट ऐकु यायला लागलं होतं, इच्छा नसतानाही विजय ने मागे वळून पाहिलं, जे पाहिलं त्याच्यावर त्याच्या डोळ्यांचा विश्वास बसेना ..
धूम २ मधला Mr.A निपचित पडून कण्हत होता आणि त्याचं अर्धं शरीर दगडाचं झालं होतं.. तशाही परीस्थीती मधे विजय ने त्याल ओळखलं, त्याला वाटलं हा ही Mr.A चा गेट अप बदलण्याचा प्लॅन असणार, मी याची विचारपूस केली तर हा आपले दिशा यंत्र आणि खजिन्याची चावी नक्की काढून घेणार , कारण तो आहेच एक परफेक्ट चोर !!
म्हणून तो दुर्लक्ष करून जाउ लागला इतक्यात Mr.A ने हाक मारली, ' मत जाओ, आगे खतरा है, खजाना हासिल करके कुछ नही होगा, मेरे जैसे परफेक्ट थीफ का ये हाल है तो तेरा क्या होगा.. मत जाओ"
पण विजय चे दिशा यंत्र अता अजुनच खडखडायला लागले होते, चलाख Mr.A च्या कुठल्याही बोलणावर त्याचा विश्वास बसत नव्हता, त्याला दिसत होतं फक्त त्याचं उज्ज्वल भविश्य, आणि त्या साठी त्याला पुढे जाणं भाग च होतं.
"अल्विदा Mr.A, तुमसे मिलके बहुत अच्छा लगा, लेकिन तुम भी देखोगे के कैसे वोह खजाना तुम्हारी आंखोके सामने तुमसे छिन कर सिर्फ मै लेके जाउंगा"
असे म्हणून विजय निघाला, अचानक दिशायंत्राचा खडखडाट अतिशय कर्कश्श झला आणि एका फेसाळत्या लाटे मागे विजय ला एक प्रचंड मोठा शिंपला दिसु लागला, इतका मोठा शिंपला त्याने कधीच पाहिला नव्हता , तिथे विजय धावत च गेला आणि दिशा यंत्राने GPS प्रमाणे 'Destination arrived' अस संदेश दिला.
विजय त्या शिंपल्या कडे पाहून मंत्र्मुग्ध झाल्या सारखा पहातच राहिला, कारण ही तसेच होते, 'जिस्म' मधली बिपाशा त्या शिपल्यावर अत्यंत रीव्हीलिंग कपड्यात अतिशय मादक पोझ देउन बसली होती.
आपण कशासाठी आलो, खजिना, दिशा यंत्र, किली सगळं काही विजय विसरल्या सारखा तिच्या कडे पहातच बसला, " यालाच म्हणतात का लव्ह ऍट फर्स्ट साईट", स्वतः शी च तो पुटपुटला..पण ती पुटपुट बिपाशाच्या कानावर गेलीच.
"क्या सोच रहे हो विजय, प्यार ??
ये जिस्म प्यार करना नही जानता, जानता है तो सिर्फ जिस्म कि भूख' असे म्हणून बिपाशाने विजय ला जवळ ओढले आणि विजयला त्याची कित्येक दिवसां पासूनची 'निर्जन बेटावर सुंदर मुली बरोबर रोमान्स, जिस्म मधल्या 'जादू है नशा' गाण्यात जॉन च्या जागी आपण' अशा सगळ्या फँटसीज खर्या होताना दिसल्या , तो ही वहावत गेला.
ती रात्र समुद्राच्या लाटांचा आवाज आणि बिपाशाच्या मोह मायेत कधी संपली त्याला कळलच नाही!
सकाळ झाली सूर्याच्या किरणांनी त्याला जाग आली, दचकून बाजुला पाहिले, तर बिपाशा नाही , शिंपला नाही आणि चावी ही नाही... बिपाशा.. म्हणजे तिने मला फसवले, मला तिच्या शोधात गेलेच पाहिले, असे म्हणून तो उठणार इतक्यात त्याला खूप जड वाटायला लागले.
पाय हलत च नव्हते, खाली पाहिलं आणि विजय ने ओक्षा बोक्षी रडायला सुरवात केली,
कंबरे खालचे पूर्ण शरीर दगडी झाले होते, Mr.A सारखे !!
चिमनराव न गुंड्याभाउ देखील बेट लागल्यावर उतरले. गुंड्याभाऊचा आधार घेत घेत अन चिउ ची आठवन काढत काढत्, एका हाताने छत्री सांभाळत चिमनराव बेटाकडे चालु लागले. त्यांच पायाला पाणि लागल्यावर त्यांनी छत्री उघडली व उलटी केली. गुंड्याभाउ ने जोरात वसकल्यावर त्याचे कारण त्यांनी सांगीतले जे योग्य होते. जर वरुन पाउस पडत असेल तर आपण डोक्यावर छत्री धरतो जर खालुन पाणि लागत असेल तर पायच्या खाली नको का घरायला. गुंड्याभाउ ला त्या स्तिथीत चिमनरावाला उचलुन न्यावे वाटले पण काय करनार एका हातात काठी व दुसर्या हातात मावशी ने (चिमनरावांचा आइने) दिलेला आयुर्वेदीक ओषधांचा डबा साभाळावा लागत होता.
होता होता ते पाण्यातुन निघउन बाहेर जाउ लागले. इतक्यात चिमनरावांना परसाकडे जायची आठवन आली व ते मुळ रस्ता सोडुन दक्षीनेस जाउ लागले. थोड्यावेळाने त्यांना तिथे पडलेला अर्ध मानव अर्ध दगड दिसला.
चिमनराव तिथे थांबले व त्यांनी त्याला विचारले की बा तुझे नाव काय. त्या माणसाने हाताची बाही वर केली त्याला निट बोलता येत न्ह्वते. त्या हातावर लिहीले होते " मेरा बाप चोर है".
चिमनराव : गुंड्या गुंड्या हे बघ याचा बाप चोर आहे.
गुंड्याभाउ परेशान होउन : अरे चिमन असला तर असला आपल्याला त्याची भिती आहे की काय? तालमीत वाढलेले शरीर हे. अस्सा हिसका दाखवतो शिंच्याना की
चिमनराव " अरे आइने सांगीतले आहे की कोणाशीही मारामारी करायची नाहे.
गुंड्यभाउ - अरे शिंच्या इथे आइ येनार की काय मारामारी बघायला.
तो माणुस कन्हलेल्या स्वरात - माझे नाव विजय आहे.
चिमनराव " अरे पाहिलास का गुंड्या याच नाव विजय आहे.
गुंड्या : आता यात पाहन्यासार्ख काय आहे ऐकल की मी.
चिमनराव : इथे का पडलात
गुंड्या : तुझी वाट पाहात
चिमनराव : थांब पाहु तु गुंड्या
विजय : अहो त्याच काय
चिमनराव : तुमचे वडील चोर आहेत काय?
विजय : अहो अ अ अ
गुंड्या " चिमन्या तुला काय त्याचे
विजय " अ ति मोठे इस्टओरी आहे
गुंड्याभाउ विजय ला चाचपडुन पाहात : अरे याला दगडी लखवा आहे.
चिमन : दगडी लखवा म्हणने काय.
अरे हे बघ माझ्याकडे यावर मावशीने ओषध दिले आहे. गुंड्याभाउ ने एक विचीत्र पाला काढला व तो विजय ला लावला व एक जोरात थोबाडीत मारली. पाहतो तर काय ओषध आपले काम करत होते व विजय पुर्ववत होत होता.
चिमनरावांनी विजयला विचारले. तुझ्या हातावर मेरा बाप चोर है हे हिंदित का लिहीले. विजय ने सांगीतले की त्याचा वडील एकदा बोटीवर गेले होते तेथे त्यांना कप्तान जक स्परो भेटला होता व त्याचा नकळत विजय च्या वडीलांनी त्याचे दिशादर्शक यंत्र चोरुन आनले होते नंतर पकडले गेल्यावर तसे लिहीले होते पण नशीब फिरले व डचमन आल्यामुळे स्पअरोला ते दिशा दर्शक यंत्र विजयच्या वडीलांना द्यावे लागले.
विजय पुर्ववत होऊन गुंड्याभाउ ला मिस्टर ऐ कडे जायला सांगुन पुर्वेस चालु लागला. मध्यान्य झाली होती. त्त्या बाईने सर्व नेले होत पण चड्डीच्या अतल्या खिशातील दिशादर्शक यंत्र चुकुन राहीले होते.
पुर्वे कडे जाताना परत एकदा ते यंत्र जोरजोरात वाजु लागले. तिथे थांबुन त्याने पाहीले तर दोन झांडाच्या मध्ये एक व्हि आकार तयार झाला होता व एक पांढरे जकेट तिथे पडले होते त्याचा खिशातुन एक ताइता सार्खे काहीतरी बाहेर पडले होते.
विजय ने ते ताइत काढुन पाहीले त्यात जिर्न कागदावर काही तरी लिहीले होते त्यावर लिहीले होते
"ना धड पाणि ना धड जमिन
ना धड झाड ना धड झुडुप"
मंडळी आज STY चा शेवटचा दिवस.
प्रत्येकाने आपापल्या परीने शेवट करायचा प्रयत्न करुया. Everyone gets to write his/her own ending. एकच post करून आपापल्या thread चा शेवट करा. बघूया कोणाचा शेवट जास्त interesting ठरतो ते
क्रुपया subject मधे शेवट - असे लिहून शेवटची post टाका.
"मला चहा हवा आहे मला चहा हवा आहे मला चहा हवा आहे मला चहा हवा आहे मला चहा हवा आ sss हे." मीराताई त्यांच्या घोडागाडीचे चित्र असलेला रिकाम्या मगकडे पहात स्वतःशीच बोलत असतात. रात्री ३ वाजेपर्यंत जागायचे म्हणजे चहा नको का? गटणे त्यांचे बोलणे ऐकतो आणि त्याला त्यांची ओळख पटते, तो आनंदाने मीराताईना म्हणतो, "तुम्ही भेटलात हे उत्कृष्ट झाले. मला तुमच्या आयुष्यातील काही प्रकरणांबद्दल बोलायचे, पृच्छा करायची होती." हे ऐकून मीराताई संतापतात. गटणे ला काही कळत नाही, तो धडपडत उठून निघून जायला लागतो तेव्हा त्याचा धक्का लागून घोडागाडीचे चित्र असलेला मग खाली पडतो आणि फुटतो! त्याबरोबर मीराताईंच्या तोंडून 'वाईट शब्द' बाहेर पडतात. ते ऐकून तिथून चाललेला पान्डू बेशुद्ध पडतो.
पान्डू बेशुद्ध पडल्याने फाफे आणि लंपन दोघेच राहतात टीम मध्ये. त्यांना पण 'कुठूनतरी' कळते की जहाज रात्री ३ वाजता त्या खजिना असलेल्या बेटाजवळून जाणार आहे. मग ते पण मीराताईंसारखे जागत बसतात. लंपन सुमी ने दिलेलं पुस्तक वाचत बसतो तर फाफे सावधपणे इकडेतिकडे पहात जागा राहतो.
रात्री ३ वाजता जहाज बेटाजवळ येते. ज्यांना हे गुपित माहित असते ते सगळे पटापट पाण्यात उड्या टाकून पोहत पोहत त्या बेटावर पोचतात. पण पुढचा नकाशा फक्त विजय कडेच असतो. ते फाफे आणि लंपन ला माहित असल्यामुळे ते त्याला फॉलो करतात. बाबूराव, विजय, लंपन आणि फाफे खजिना मिळवतात. बाकीचे शोधत बसलेले असतात तोवर हे हळूच 'कसेतरी' पुन्हा जहाजावर येतात. पेटी उघडून आतला खजिना वाटून घेतात. एक वाटा पांडूला पण देतात.
जहाज विहार संपल्यावर परत ठरलेल्या ठिकाणी जाते. तिथून सर्वजण आपपल्या घरी जातात. विजय च्या घरचे खूष होतात. पांडूची 'केळेवाली' पण खूष होते. लंपन थोडा खजिना सुमीला पण देतो. बाकी बेटावर अडकलेल्या लोकाना काही मिळत नाही. मग ते 'कसेतरी' परत येतात.
समाप्त.
(वाचकांना हा शेवट interesting तर सोडाच, पण 'गुंडाळल्यासारखा' वाटण्याची शक्यता आहे. कारण तो गुंडाळलेलाच आहे! )
धन्यवाद.
-लालू
वाटतोय. बाकी गोष्ट आपली इन्सिडेंटली संप(व)लेली वाटतेय
विजय बरा होतो... तित्क्यात धडपडत बाबुराव पोहचतो.
" आरे विज्या, मला टाकुन पळाला... देवा देवा..."
"बाबुराव, चला लवकर..." म्हणत आणि हातातील नकाशा व कंपास कडे बघत विजय पळु लागतो. बरेच लांब गेल्यावर अचानक कंपास थडथदु लागते. तसा तो सुईच्या दिशेने हळु हलु जाऊ लागतो... समोर पहातो तर पाणि आणी मधे थोडीशी जमिन... त्या चिचोळ्या जमिनीवरुन तो पुढे जातो... तर एका प्रचंड कापलेल्या वृक्षाचे खोड... त्याच्या आजुबाजुस रानटी झुडुपे वाढलेली. तो परत वाचतो.
" ना धड पाणि ना धड जमिन... ना धड झाड ना धड झुडुप"
"बाबुराव सापडली जागा... " तो ओरडतो... आणि पुढे येतो तर त्या कापलेल्या बुंध्यावर एक लाकडाचा पक्षी असतो.
"आरं द्येवा... हा पक्षी काय मरुन कडक होऊन पडलाय काय? " असं म्हणत बाबुराव तो पक्षी उचलायला जातो.. तर तो पक्षी थोडासा हलतो. " आरं देवा, हा तर हालतोया.. "
" थांबा बाबुराव, मला बघु द्या." म्हणत विजय तो पक्षी हलवुन बघतो.. तो गोल गोल फिरतो...
"पण हा असा कशासाठी ठेवला असावा..." विजय विचार करतो... आणि त्याला एक आयडीया सुचते.. तो कंपास ची सुई बघुन नॉर्थ दिशेला तो पक्षी फिरवतो... आणि काहितरी आवाज येतो. तो दचकुन पहातो, त्या बुंध्यात एक पोकळी निर्माण झालेली असते...
तो टॉर्चच्या उजेडात पहातो, आट एक पेटी असते. तो ती बाहेर काढतो...
त्या पेटीवर एक भुर्जपत्र असते. ते तो आधी उघडतो... त्यात लिहिलेले असते,
"ही पेटी उघडण्या पूर्वी हे भुर्जपत्र काळजी पूर्वक वाचा.या ठीकाणी मी खजिना लपवुन ठेवलाय.. आणि माझा चांगल्या शुध्द मनाचा वारसच इथे पोहचु शकेल अशी व्यवस्था केली आहे. मी तुझ्या घराण्याचा मूळ पुरुष. हे कापलेल्या झाडाचे खोड दिसतेय ना? हा आपला आराध्यवृक्ष. दर्वर्षी आपण याला पुजायचो... पण काही स्वार्थी लोकांनी जंगलतोड सुरु केली.. त्यात हे झाडही तोडले... तेव्हा पासुन मी झाडे लावुन जंगले वाढवण्याचे व्रत हाती घेतले. युध्दात लुटीत मिळालेले धन या कामी वापरु लागलो.. पण माझ्या मुलांना ते मंजुर नव्हते... म्हणुन इथे लपवुन ठेवले परत... आता तु येथवर पोचला आहेस... तर मला वचन दे की यातील अर्ध धन तु माझे व्रत पुढे चालु ठेवण्यास वापरशिल.नाहीतर सर्व नाश होइल तुझा. आणि आपल्या मानवजातीला संहारा पासुन वाचवशिल... तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती लाभेल... "
विजय वचन देतो.. आणि पेटी उघडतो,
त्यातील रत्ने बघुन त्यांचे डोळे दिपतात..
"आयला खजिना... चल बाबा ... चल लवकर घेऊन कोनी यायच्या आत..."
" चला बाबुराव, एका चांगल्या कामाला सुरुवात करायची घाई मलाही झालीय..."
एव्हाना ते दुसरे जहाज किनार्याला लागलेले असते.. ते त्यातुन निघुन जातात.
समाप्त
( जास्त गंभीर तर नाही झाला शेवट?)
विजय ला तमाम बॉलीवूड आणि पुस्तकी लोक त्याच्या मागे येताना दिसली.
बाबूराव फक्त त्याचा साथी होता, इतर सगळ्यं मधे खजिना वाटायला लागणार या विचाराने तओ निराश झाला, बाबू रावाच्या जाड भिंगा समोर मात्र काजवे चमकायला लागले!
सगळ्यांनाच घेउन राजु गाईड पळत आला होता!
विजय चे दिशायंत्र पुन्हा एकदा खडखडात करायला लागले होते, त्या दिशेने सगळेच पळणार हे विजय ने ओळखले होते, म्हणून त्याने एक अवाहन केले, " मित्रहो, हा खजिना कोणाला मिळणार म्हणून भांडण्या पेक्षा, एकजूटीने काम करुया, जे काही मिळेल ते सर्वांनी वाटून घेउया!"
यावर मि. इंडीयाही पुढे येउन म्हणाला कि खजिना मिळवण्या साठी अदृश्य होउन जाणे फार कामी येइल, त्याच्या कडे अशी ताकद होती कि तमाम पुरुषांना तो काही वेळा साठी गायब करु शकत होता, पण प्रश्न होता बायकांचा !
यावर इच्छा धारी नागिण ही आली, ती म्हणाली कि तिच्याकडेही अशी ताकद आहे कि ज्या मुळे सगळ्या बायका काही काळा पुरत्या नागिणी बनु शकतात!
मग काय सगळे अद्रुष्य