विश्वकरंडक मायबोली विशेषांक

Submitted by हर्ट on 4 April, 2011 - 13:33

समस्त मायबोलीकरांनो, इथे एक न एक मायबोलीकर भारताला विश्वकरंडक प्राप्त झाला म्हणून भारावून गेला आहे. म्हणून आपण सर्वजण मिळून एक विशेषांक काढायचा का? कशी वाटली ही कल्पना? छान ना... मग झटपट कामाला लागा. इतका जबरी होईल ना हा अंक!!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली कल्पना आहे. जरा समिती वगैरे हवी काँटेंट कसं , काय, किती वगैरे ठरवायला. माझी तयारी आहे भाग घ्यायची.

ज्यांना संपादकीय मधे यायचे आहे त्यांनी आपली ईच्छा इथे दर्शवावा आणि ज्यांना लेखक म्हणून लिहायचे आहे त्यांनी पण आपली नावे इथे सांगा. शिवाय कुठले विषय्-उपविषय घ्यायचे तेही इथे सुचवा.

बी,
ऑलरेडी जर विश्वचषका संबंधी मायबोली वर काही विनोदी लिखाण केले असेल तर ते या अंका मध्ये प्रसिध्द होऊ शकते का.

घोषणा करा अ‍ॅडमिन ना विचारून म्हणजे लोक जे अत्ताच साहित्य प्रदर्शित करतायेत ते क्रिकेट अंकासठी राखून ठेवतील.
( Btw, क्रिकेट विशेषांक म्हंटलयवर ' षटकार' हेच नाव सुचलं, पूर्वी होतं ना असं मॅगझिन ?)

दीपांजली, प्रशासकांना मी मेल पाठवली आहे नि विपुत पण मजकुर लिहिला आहे.
ज्यांना संपादकिय समितीत यायचे आहे त्यांनी नावे द्या लवकरात लवकर सगळा टेम्पो ओसरुन जायच्या आत.

म्हमईकर, हे इथे वाचा त्याबद्दलः
http://www.maayboli.com/node/24732

मंदार, संपादक मंडळ अजून ठरायचे आहे. ते ठरवून काही ठरवू नका. मायबोली आपलीचं आहे. एकमेकांना सहाय्य करायचे. त्यातून माणूस एकमेकांना कळतो.

LOL
कल्पना चांगली आहे.

>>' षटकार' हेच नाव सुचलं, पूर्वी होतं ना असं मॅगझिन
पूर्वी म्हणजे? आता नाही आहे?

लालू, षटकारच काय? स्पोर्ट्स्टारही बंद झालं Sad

षटकारचा एडिटर संदीप पाटील होता. प्रचंड आवडीची मासिकं दोन्ही.. शाळा कॉलेजमधे असताना पॉकेट्मनी जो मिळायचा तो मोस्टली ह्यावर खर्च व्हायचा!

ते षटकार बन्द झालं असेल तर ' षटकार' हे च नाव आवडेल..खास धोनीच्या सिक्स ला अर्पण :).
भाउं ची कार्टुन्स जरूर असावी अंकात :).

हा विशेषांक खास मायबोलीकरांची मतं, सल्ले, प्रतिसाद इ.वर आधारित आहे,अस जर असेल तर तो भाव ध्वनित होणारं नाव असावं. मी मस्करीत ' मायबोलींग' [My Bowling ] सुचवलं कारण अशी औचित्यपूर्ण नावं इतरानी सुचवावी असं मला वाटलं. बघा पटलं तर .

मंडळी, नावे खूप छान सुचवली आहे धन्यवाद. आणखी नावे नकोत आता. संपादक मंडळात कुणाकुणाला यायचं आहे ते कळवा लवकरात लवकर. प्रशासकांची ईमेल आली आहे मला. संपादक मंडळ लवकरात लवकर तयार व्हायला पाहिजे आता. कोण कोण लिहिणार आहे? कोण सहाय्यक म्हणून काम करणार आहे हे पण इथे लिहा.

दोस्ती, धन्यवाद. संपादकीय मधे तुझे स्वागत आहे.

परत एकदा लिहितो. नाव खूप झाली आहेत. नावे सुचवू नका. इतर बरेच काही आहे ज्यात तुमची गरज आहे त्याकडेही लक्ष द्या.

१) मला संपादक समितीत आणखी सभासद हवे आहेत.
२) ज्यांना जाहिरात उत्तम प्रकारे तयार करता येते असे काही जण हवे आहेत.
३) ज्यांना मजकुर टाईप करायल वेळ आहे असे सभासद हवे आहेत.
४) ज्यांच्याकडे दिवसाकाठी वेळ आहे असे सभासद हवे आहेत.
५) साहित्य मिळवून देतील असे सभासद हवे आहेत.
६) व्याकरण दुरुस्तीला लागणार्‍या मदतीसाठी सभासद हवे आहेत.

तेंव्हा मायबोली आपलीचं आहे हे जाणून विनासंकोच पुढे या. फार वेळ न घेता. धन्यवाद.

Pages