छत्रपती शिवाजी महाराज की जय!

Submitted by गिरिश देशमुख on 22 March, 2011 - 01:07

शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप....!

shivaji.jpg

आज शिवजयंती साजरी होत आहे, त्या निमित्य शिवरायांच्या पावन स्मृतीला मानाचा त्रिवार मुजरा...!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज शिवजयंती आहे?
अरे मग ती १९ तारखेला पण एक जयंती झाली ना! हा काय घोळ आहे?
शिवाजी व डुशिवाजी ईथे पण आहेत की काय?

कॅलेन्डर बघा ! अधिकृत, ऑफिशियल शिवजयंती आज २२ मार्च ला असते!
पण असुदेत ना, शिवराजांची आठवण जागी करायला हरकत काय आहे????

>>> आज शिवजयंती आहे? अरे मग ती १९ तारखेला पण एक जयंती झाली ना! हा काय घोळ आहे?

एकूण ३ वेगवेगळ्या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. तिसरी शिवजयंती अक्षय तृतीया या दिवशी साजरी करतात.

शिवजयंती ऐवजी शिवचरित्र कधी साजरे करणार आपण??? >>>> अनुमोदन...अगदी खरे..
पण भिती वाटते की शिवजयंतीत घातला तसा शिवचरीत्रातही घोळ घालतील हे लोक ...आधी जन्मसालावरुन वाद मग जन्मतारखेवरुन वाद मग लालमहालावरुन वाद...प्रसिद्धीसाठी शिवचरीत्रातही काहीना काही काढुन वाद पेटवला जाईल...

शिवाजी महाराजांच्या ज ति वरुन वाद होते.. त्यामुळे दोन सुट्ट्या द्यायची पाळी येऊ नये म्हनून हाय कोर्टाने दोन्ही सुत्ट्या रद्द केल्या आणि ज्याला जी तारीख योग्य वाटेल ती त्याने मानावी असे सांगितले आहे..( असे मी ऐकुन आहे.) सेना वाल्यांची एक आणि काँग्रेसची ( म्हणजे सरकारची एक ) असा तो घोळ होता..

ध्न्य ती जिजाई मऊली...
धन्य ती प्रतापी माय....
जिच्य पोटातून जन्मला
शककर्ते श्री शिवराय.....!!!!
जय जिजाई..... जय भवानी...जय शिवाजी
महाराष्ट्राच्या या आराध्य दैवताला मानाचा त्रिवार मुजरा....!!!!