विडीओ रेकॉर्डिंग मधला थोडा भाग सेव्ह करून पाठवता / अपलोड करता येतो का ?

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 11 March, 2011 - 01:38

माझ्या मुलीच्या शाळेच्या स्नेह संमेलनाची सीडी मिळाल्ये, नवरा परदेशात आहे, मी सीडी मधला फक्त तिच्या नाचाचा भाग कुठे अपलोड करून त्याला पाठवू शकते का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यासाठी तुझ्याकडे कुठलंतरी एडिट सॉफ्टवेअर आणि डम्प साठी सिस्टीम असायला लागते
एडिट सॉफ्टवेअर = अडोब प्रिमियर किंवा तत्सम....

डम्पसाठी सिस्टीम =
१. योग्य त्या कॉर्डस ज्या कॅमेर्‍यातून कॉम्पमधे डाटा वाहून नेतील आणि परत आणतील.
२. किंवा मग दोन्हीमधे चालणारी मेमरी कार्डस.
३. भरपूर जागा हा. डि वर.
४. एडिट सॉफ्टवेअर मधे चालणार्‍या फॉर्मॅट मधे फायलीला बदलू शकेल आणि परत उलटा बदलू शकेल (mpeg/ avi to dat and other way round) असा बदलक.

हे सगळे असल्यास घरच्या घरी जमेल. Happy

श्रेयस या आयडीला शोध तो जास्त मदत करू शकेल.

camtasia studio हे सॉफ्टवेअर महिनाभराच्या वापरासाठी फुकट मिळतं. आंतरजालावरून घेता येईल. हे सॉफ्टवेअर वापरून चित्रफितींचं संकलन आरामात करता येतं.

तुमच्या पीसी वर जर windows XP असेल तर windows movie maker हे पॅकेज वापरुन तुम्ही सहज रित्या तुम्हाला पाहिजे ते करता येईल.