पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.


Submit to kanokani.com

हसरी -लवकरच देते तुला रेसिपी ------सातारा भागात लग्नामध्ये वांग, बटाटा आणि बहुतेक चणे घालून भाजी करता थोडी पाणीदार अशी ,

आमी सातारा भागातलेच हाय नव्ह का??

निवेदिता, आभार. नारळाच्या वड्यांची रेसिपी लिहिशील का माझ्या विपुत, प्लीज? ते पाक प्रकरण मला कळत नाही.
तुला नागपुरला पाठवायाच्या कुरियरच्या खर्चात, लोकली अजुन ५ जार्स विकत घेता येतील स्मित पुण्यात असतीस तर लगेच दिले असते.

कर्नाटकी चटणीपूड / पूडाची चटणी ची रेसिपी हवी आहे. (मला सापडली नाही. अस्ल्यास लिंक द्या.) .

डोशा सोबत देतात त्या डाळीच्या चटणिची रेसिपी माहिती आहे का कोणाला?
असल्यास प्लिज सांगा/लिहा.

मैत्रिणीने 'नाचणी सत्व' नावाचे एक पाकीट पाठवले आहे. २५०ग्रॅम. त्यात ते सत्व पीठ आहे.
त्याचे काय करायचे? कसे खायचे?

दुधात सत्त्व, साखर घालून शिजवायचे आणि प्यायचे. ताकातही घालतात, थोडे मीठ घालायचे. पाकिटावर काही लिहिलेले नाही का? कधीकधी साखर त्यातच घातलेली असते.

पाकिटावर लाडू करायची कृती आहे. मला ती एकतर अवघड वाटली, आणि दुसरे म्हणजे काहीतरी अगोड जमले तर जास्त आवडीचे होईल.

मृदुला, दोदोल कर
गूळ साधाच घाल स्मित

मृदुला, नाचणी सत्वाचे डोसे / धिरडे पण छान लागतात--
एक वाटी नाजणी सत्व, अर्थी वाटी तांदळाची पिठी (ह्या ने क्रिस्पी होतात) कालवून त्यामध्ये बारिक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर, धने-जिरे पुड, ओवा, मिठ, हळद, हिरवी मिरची (किंवा तिखट) घालुन त्याचे डोसे/धिरडे कर. सॉस, चटणी सोबत खा. छान लागतात. स्मित

धन्यवाद बिल्वा. पीठ म्हणजेच सत्व का? स्मित
आंबील = सूप करून बघण्यात येईल.

पहिला दुवा क्रोममध्येही दिसला.

धन्यवाद, नी, माधुरी. प्रयोग करायला भरपूर यादी तयार झाली. आता नाचणी वीकेंड करते यावेळी. स्मित

मला पिझ्झा बेस वापरुन पुणा बेकरी / कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर मिळतो तसा पिझा करायची कॄती द्याना कुणीतरी.. नेहमीची मोझरीला चिझ वापरुन कालच केले त्यामुळे ती नकोय स्मित

मनीमाऊ जुन्या मायबोलीवर सीमाने ( बहुतेक ) वड्या या विभागात गुलकंद वड्यांची रेसेपी लिहीलीय ती वाचुन बघ ( गोडवा विभागात वड्या, सॉरी लिंक देण्यात मी पट्टाईत नाही )

आनी गुलकंद उष्ण प्रकृतीला चांगला असल्याने पावसाळ्यातही खाऊ शकता.

नाचणीचा केक पण होतो. नेटवर किंवा मायबोलीवर असेलच.

टेट्रापॅकमध्ये अमुल ताझा आणि इतरही कंपन्यांचे दुध येते, त्य पॅकवर ते दुध उकळू नये असे लिहिलेले असते. मला कोणीतरी सांगितले की ते दुध उकळले की फाटते.म्हणून आम्ही आजपर्यंत कधीच आणले नाही.
मी जे ऐकलय ते खरं आहे का? या दुधाचा चहा नाही बनू शकत का?

अमि, नेमके काय वाक्य असते ते. ते दूध बहुदा यू एच टी (म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट ट्रिटमेंट) दिलेले असते.
त्यातले सर्व बॅक्टेरिया मारलेले असतात. त्याचे दही नीट लागत नाही, कारण दह्यासाठी लागणारे बॅक्टेरिया
पण त्यात कमी असतात. पण त्याचा चहा नक्कीच होतो. तसेच ते तापवून फाटण्याची पण शक्यता कमीच आहे.

पॅकवर, केमिकली ट्रीटेट वगैर लिहिले आहे का ?

लोक्स... मला आज एक राईसब्रान तेलाचं छोटं पाकीट मिळालयं सँपल म्हणून. चांगल्या कंपनीचं आहे. तर या तेलाचं काय करतात? खायचं तेल आहे का? जेमतेम ५० मिली आहे... काय करतात या तेलाचं? प्लीज हेल्पा...स्मित

दिनेशदा, वाक्य आठवत नाही. पण एकदा अणून ट्राय करून पाहते. इथे इतका उकाडा आहे की सलग २-३ दिवस पाऊचमधलं दुध खराब झालं. रोज आम्ही अर्धा लिटर दुध फेकून देतोय. आज अमुल ताझा आणून पाहते.

योगेश, तुम्ही नेहमीच्या स्वयंपाकासाठी हे तेल वापरू शकता.

Yogesh, you can use it in Salad dressing or stir fry veggies etc...

राईसब्रान तेल कोणाशी तुलना करतं... गुणवत्तेच्या बाबतीत? शेंगदाणातेल वा ऑऑ वा अजून काही?

वेका, मी अमी- धन्यवाद!

'तांदुल' नावाचं राईसब्रान ऑइल आम्ही बर्‍याचदा आणतो. ते नॉर्मल स्वयंपाकात वापरल्याने काही फरक जाणवत नाही. तळण्याबद्दल काही कल्पना नाही.

कर्नाटकी चटणीपूड / पूडाची चटणी ची रेसिपी हवी आहे. प्लीज कोणाला माहित असेल तर सांगा ना.

<इथे इतका उकाडा आहे की सलग २-३ दिवस पाऊचमधलं दुध खराब झालं. रोज आम्ही अर्धा लिटर दुध फेकून देतोय. आज अमुल ताझा आणून पाहते<>

पाउच घेताना त्यावरची युझ बाय डेट तपासून घ्यायला हवी. पिशवीवर पॅकिंगची नव्हे तर फक्त युझ बाय डेट असते. त्या तारखेपर्यंत दूध चांगलं उकळून घेतलं तर दुसर्‍या दिवशीही टिकतं. आमच्याकडे पहाटे अमूलचे दूध घरपोच येते. ते दुसर्‍या दिवसापर्यंत न तापवता फ्रीजमध्ये ठेवता येते.

तुमचा दुकानदार दूध कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवत नाही का?

नवर्‍याने आणलं होतं सलग २-३ दिवस संध्या़काळी. डेट वगैरे पाहून आणलं होतं. पण माहीत नाही त्या दूध विकणार्‍याकड्चे कोल्ड स्टोरेज कसं आहे.

सकाळीच दूध आणून फ्रीजमध्ये ठेवून बघा. अमूलची डिलिव्हरी मुंबईत सकाळीच होते.

टेट्रा पॅकचे दूध उकळले तर चालते. पॅकवर जे वाक्य असते त्याचा अर्थ 'दूध उकळणे गरजेचे नाही. न उकळता फ्रीजमध्ये ठेवले तरी दूध टिकू शकते' असा होतो. मध्यंतरी जवळजवळ अडीच वर्षे टेट्रा पॅकचे दूध वापरले आहे. फ्रीज नसल्याने रोज उकळत होते.
पॅक उघडल्यावर एकतर उकळून ठेवावे किंवा पॅक फ्रीजमध्येच ठेवावा. न उघडता पॅक बाहेर आरामात तीन महिने राहू शकतो. स्मित

आमच्या कडे (म्हणजे नैरोबीत) दूधाच्या पिशव्या असतात त्यांना आतून काळ्या प्लॅस्टीकचे अस्तर असते.
त्या पिशव्यातले दूध, न तापवता देखील, दिवसभर चांगले राहते. अर्थात इथले हवामान फारच थंड आहे, हि गोष्ट वेगळी. पण या पॅकिंगचाही त्यात काहितरी रोल असावा.