- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
चालू घडामोडी
सदस्य प्रवेश |
यंदाचे साहित्य संमेलन सॅनफ्रान्सिस्को येथेयंदाचे साहित्य संमेलन सॅनफ्रान्सिस्को येथे घेण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पण प्रथमच परदेशी साहित्य संमेलन भरवण्याच्या मंडळाच्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटते? |
|
सामान्य रसिकांना वंचित केल्यासारखे वाटते.
यातून काय साधणार हे काही कळत नाही.
होतकरू लेखकाला संपूर्णपणे वगळले आहे. होतकरू लेखक स्वतःच्या खर्चाने जाउ शकणार नाही आणि तो होतकरू असल्याने त्याला कोणी नेणार नाही. हा अर्थात एखादा नवशिक्या लेखक पैशाच्या बळावर लावेलही हजेरी.
अनिवासी भारतीयांना कमी लेखायचं नाहीये पण बीएमएम चे संमेलन आणि साहित्य संमेलन यात फरक आहे. अनिवासी भारतीयांकडून होणारे मराठी लिखाण हे कुठल्याही इतर लिखाणासारखेच दर्जाच्या बाबतीत अगदी वाईट ते उत्तम यामधे कुठेही येते. पण संख्येने कमी असल्याने सगळेच visible होते. म्हणजे अजिता काळ्यांची सशक्त कथा आणि कुणा सोमागोम्याची कविता हे एकाच पद्धतीने तोलले जाते. तर थोडक्यात काय मराठीतून लिहिणारे वा मराठी वाचणारे अमेरिकास्थित भारतीय हा एक छोटा गट त्यातून दर्जेदार लिहिणारे आणि दर्जाचा आग्रह असणारे वाचक हे अजून नगण्य संख्येत... त्यामुळे मु़ळात एका नगण्य संख्येसाठी अनेकांना बाजूला केलं जातंय असं वाटतं.
फारसा काही स्वागतार्ह निर्णय वाटत नाही.
अर्थातच या प्रतिसादावर अनेक जण आक्षेप घेतील पण परवडत नसतानाही दरवर्षी नेमाने खिशाला फोडणी देऊन, प्रसंगी बिनपगारी रजा काढून साहित्य संमेलनाला हजेरी लावणारे आस्वादकांचे अनेक गट मला माहिती आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवर असं वाटणं साहजिक आहे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
ह्या संमेलनाचे नाव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेच आहे ना? मग जर हे अमेरिकेत घ्यायचे असेल तर त्याचे नाव आंतरराष्ट्रीय असे का नाही केले...
साहित्य संमेलन इथे भारतात (पक्षी : महाराष्ट्रात) घेताना सुद्धा अवस्था गंभीर असते मग अमेरिके घेतल्यावर त्याला मिळणारा प्रतिसाद कसा असेल? तसेच आज्जुकाने वरती उल्लेखिल्याप्रमाणे जर खिशाला परवडत नसताना भारतातील संमेलना आवर्जुन हजेरी लावणारे रसिक अमेरिकेत जाण्याचा विचार तरी करु शकतील का?
साहित्य संमेलनाचा मूळ हेतू काय आहे असाच प्रश्न पडतो आहे? आणि हा हेतू अमेरिकेत साहित्य संमेलन घेऊन साध्य होईल असे मंडळाला का वाटले? उद्या मॉरिशस मध्ये पण साहित्य संमेलन घेतील.. खूप लोकं मराठी बोलतात म्हणून...
अमेरिकेत साहित्य संमेलन घेऊन मंडळाला असे तर सूचित करायचे नसेल की आता मराठी ही सातासमुद्रापार पोहोचली आहे, मराठी ही ग्लोबल झाली आहे आणि तिचा विस्तार होतो आहे.. इथे महाराष्ट्रात मराठीचीच अवस्था गंभीर आहे आणि अमेरिकेत साहित्य संमेलने घडवून आणत आहेत..
==================
फुकट ते पौष्टीक
साहित्य समेंलनांचा मानकर्यांना अमेरिकेत फुकटात येता यावे ह्यासाठी हा निर्णय घेतला. सामान्य वाचकसाठी वा मराठी साठी तर नक्कीच नाही. अज्जुकाच्या पुर्ण पोस्टला अनुमोदन.
मराठी ग्लोबल बिबल काही झाली नाही पण एक मराठी नाव कुठेही पाहीले की लगेच आपण मराठी माणुस ईकडे पोचला तिकडे पोचला करुन रण गाजवितो. तिकडे मग मराठी माणुस भलेही आपल्या पोराला ओ नो स्विटी डोंट डु धिस असे म्हणत असला तरी चालेल. ईकडील लोक १ पुस्तका ऐवजी ऐकाच वेळेस १० विकत घेतील, तेवढीच पुस्तकाचे प्रदर्शन भरविन्यार्या लोकांची चंगळ होईल. जिकडे पैसा तिकडे आम्ही जाणार ही वृत्ती मात्र ह्यातुन दिसतेय.
आणि हो तेवढाच ग्रंथ दिंडीला आता क्रुकेड स्ट्रीट वर फिरुन आल्याचा मान मिळनार मग भलेही ती महाराष्ट्रातील जिल्हे असनार्या गोंदीया, चंद्रपुर, उस्मानाबाद ईकडे गेली नाही तरी चालेल. नाहीतरी तिकडे वाचक कोणी नाहीतच, असलेच तर त्यांचाकडे प्रदर्शनातील पुस्तके घ्यायला पैसे नसनार. ईकडे आपण इंग्रजी लोकांना मराठी वाचायला लावुयात व मरन्नासन्न भाषा म्हणौन युनो चे अनुदान तरी घेऊयात, तेवढेच दुबई, जर्मनी आणि इतर देशात जाऊन साहीत्य संमेलन करता येतील. तिकडे ही दोन चार मराठी नाव आहेत म्हणे.
अखिल "भारतीय" मराठी साहित्य सम्मेलन "अमेरिकेत"?????
कशासाठी?
या होणार्या खर्चात भारतातच काही करु शकणार नाहीत का?
ह्या निर्णयाचा ऊद्देश फक्त मन्डलातिल लोकाना फुकट अमेरिका वारि घडावि एव्हडाच आहे. हे जे ७५०००/- रुपयन्चे पाकेज आहे ते बे अरइअ तिल लोकना द्या उपल्ब्ध करुन आनि मग तिथ्ल्य सहित्य प्रेमिनी भारतात यावे.
केदार,
>>ईकडील लोक १ पुस्तका ऐवजी ऐकाच वेळेस १० विकत घेतील, तेवढीच पुस्तकाचे प्रदर्शन भरविन्यार्या लोकांची चंगळ होईल.
याचा अगदी उलटा अनुभव BMM च्या वेळी आला. सर्व प्रकाशकांची पुस्तकं शेवटच्या दिवसापर्यंत तशीच पडून होती. एकतर बर्याच जणाना नेहेमिचे यशस्वी लेखक सोडुन नवीन काही माहीत नव्हतं.
मग हे तर अजुनच वाईट. एकतर लेखक माहीत् नाहीत, पुस्तक खपले जातील की नाही हे माहीत नाही. (दर वेळी ह्यावर प्रत्येक पेपर मध्ये एक दोन लेख असतातच.) जे मान्यवर लेखक आहेत ते येतील पण जे मान्यवर नाहीत त्यांचा कडे तर पैसेही नसनार. नविन लेखकांची ओळख अशा समेंलनातुन सर्वांना होते ती आता होईल की नाही हे माहीत नाही. मग हा अट्टहास का करत आहेत देव जाने.
शिवाय ७५ लाख रु पण हवे आहेत आणि फुकटात परदेशवारीही.
येथील नविन पिढीला मराठीची ओळ्ख व्हावी म्हणुन हे संमेलन फ्रिस्को ला भरवित आहोत हे कौतीकराव ढाले (पाटील) लिहीतात. कमॉन कौतीकराव. लोकसत्तात एक पत्र लिहायला हवे.
>>> येथील नविन पिढीला मराठीची ओळ्ख व्हावी म्हणुन हे संमेलन फ्रिस्को ला भरवित आहोत हे कौतीकराव ढाले (पाटील) लिहीतात...
अरे ही केवळ एक मखलाशी असती एक वेळ ठिक होतं. पण त्यांचा यावर मनापासून विश्वास दिसतो हे अचंबित करणारं आहे. राजकारणीसुद्धा मखलाशी करतात, पण ते स्वतः निदान भ्रमात नसतात. साहित्यिक, विचारवंत जेव्हा असे भ्रम बाळगतात तेव्हा ते करूण दिसतं.
वरच्या सर्वांना मोदक.
***
Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.
साहित्य संमेलनाला लागणारा पैसा येणार तो सरकार कडूनच ना? म्हणजे शेवटी करदात्यांच्या खिशातून! इथे आपले पंतप्रधान काटकसर करा म्हणून सांगत आहेत. मंत्र्यांचे परदेश दौरे कमी करावेत अशी सूचना ही केली गेली आहे. महागाईने कंबर मोडली असताना हे खर्च कशासाठी?
हे संमेलन म्हणजे होतकरू लेखकांसाठी नावाजलेले लेखक, कवी, तसेच प्रकाशक आणि त्या क्षेत्रातील महत्त्वाचे (इन्फ्लुएंस वाले) लोक यांच्या नेटवर्किंग साठी आणि नवीन लेखकांची पुस्तके जास्तीत जास्त वाचकांसमोर यावी या मार्केटिंग साठी असते का? (मला माहीत नाही, एक अन्दाज). तसे असेल तर येथे ठेवण्यात काही व्यापक हेतू साध्य होणार आहे का? होणार असेल तर तो होताना काही लोकांना त्यात काही फायदा मिळाला तर ते अपरिहार्य आहे आणि सर्वच संस्था, कंपन्या यात तसे होते.
येथील रसिकांचा फायदा आहे, पण त्यासाठी मुख्य संमेलनासारखेच दुसरे काहीतरी करता येऊ शकते. किंवा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला जोडून असे काहीतरी करता येईल.
पण वरती समीर ने म्हंटल्याप्रमाणे जर पुस्तके खपली जाणार नसतील तर नवीन लेखकांना तो ही फायदा नाही. (पण त्यात थोडा मार्केटिंग चाही भाग असेल. मी मायबोलीवर त्याबद्दल वाचून माहीत झाल्यावरच अनेक पुस्तके आणली).
बे एरिया महाराष्ट्र मंडळाचा ही यात उद्देश काय आहे हे त्यांच्यापैकी कोणी मायबोलीकर असतील तर सांगू शकतील काय?
नेटवर्किंग तर असेलच, पण ते महाराष्ट्रात सर्वात जास्त व्यापक होईल असं वाटतं. नेटवर्किंग हे नवोदितांना खरंच आवश्यक असतं, त्यांना त्यातून सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. पण होतकरूंपैकी बर्याच लोकांना जर जमणार नसेल (विशेषतः ग्रामीण भागातील) तर ते प्रस्थापितांमध्येच होईल, ज्यासाठी त्यांना तिथे जायची गरज मुळीच नाही. समावेशकतेचा प्रश्न येतोच.
अर्थात पुस्तके मात्र जाऊ शकतात हे खरे. पण तसे मार्केटींग करायचे असेल तर प्रकाशकांना इतरही अनेक संधी आहेत (अमोल म्हणतो तसे अधिवेशनाबरोबर), त्यासाठी व्यापक सहभागाशी तडजोड करण्याची खरंच गरज आहे का हे पाहिले पाहिजे.
***
Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.
काल अजुन एक नविन घडामोड झाली ह्यात.. आता म्हणे समांतर संमेलन करणार आहेत रत्नागिरीत.. आणि ह्याची जबाबदारी घ्यायला कोमसाप तयार ही झाली आहे.. उगाच काहितरी फालतूपणा.
==================
फुकट ते पौष्टीक
काय हो???? पन्ढरीची वारी अजुनही पन्ढरपुरालाच होते ना?????

की ती पण अमेरिकेत नेणारेत????
...;
आपला, लिम्बुटिम्बु
-----काय हो???? पन्ढरीची वारी अजुनही पन्ढरपुरालाच होते ना?????
की ती पण अमेरिकेत नेणारेत--------
अवो, तो इठ्ठल पंढरपुरास पुंडलिकाने आणला, कुणा सोम्यागोम्याने न्हाई ! त्येला फ्यान्सीडरेस वाल्या वारकर्यांची गरज न्हाई. त्यामुळे वारी हिथंच हाये. तो हितं उभा र्हाउनबी सगळीकडं लक्ष ठिउन हाये.
------
BTW जशी सिग्नेचर कँपेन असते तसे काही आपल्याला साहित्य संमेलन अमेरिकेत भरवण्याविरुध्द निदान निषेधात्मक करता येईल का ?
हा निर्णय म्हणजे सरकारच्या आणि बे एरियातल्या मंडळींच्या पैशांनी अमेरिकावारी व मजा करण्याचा इकडच्या पदाधिकार्यांचा अट्टाहास आहे. यातून इतर काही चांगले साध्य होईल असे वाटत नाही.
आयोजनात बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे जे काही पैसे आणि श्रम खर्च होणार त्यातून तिथे मराठी रूजण्यासाठी इतर बरेच काही करता येईल, ( तिथे त्यासाठी बरेच सक्षम लोक आहेत असे इतर कार्यक्रमांचे वर्णन ऐकून वाटते. ) त्यासाठी इकडच्या फुकट्यांना तिकडे नेण्याची गरज नसावी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भारतातच व्हावे, सामान्य मराठी माणसाला, नव्या होतकरू साहित्यिकांना सहभागी होता यावे अशा ठिकाणी आणि स्वरुपात व्हावे. जे साहित्यिक नाहीत अशा राजकारणी माणसांच्या उपस्थितीशिवाय व्हावे. याव्यतिरिक्त हवे तर एखादे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या देशात करावे.
येथील नविन पिढीला मराठीची ओळ्ख व्हावी म्हणुन हे संमेलन फ्रिस्को ला भरवित आहोत हे कौतीकराव ढाले (पाटील) लिहीतात. कमॉन कौतीकराव. लोकसत्तात एक पत्र लिहायला हवे.
अरे या कौतिकरावाने या साहित्यसंमेलनाला विरोध केला होता ना? तपासायला हवे. कदाचित उपहासाने म्हटले असेल...
बाय द वे हे कौतिकराव ठाले पाटील (ढाले नव्हेत) हे कवयित्री अनुराधा पाटील यांचे पतिराज आहेत.
अज्जुकाच्या पोस्टला अनुमोदन.
वाचा http://www.saamana.com/2008/June/25/Link/Main5.htm
http://www.saamana.com/2008/June/25/Link/Main4.htm
गेल्या दोन दशकात मोठ्या प्रमाणावर मराठी समाज महाराष्ट्राबाहेर स्थाईक झाला.
अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात मनापासून मराठी साहित्यावर प्रेम करणारे, मराठी बुक क्लब चालवणारे, लिखाण करणारे अनेक गट आहेत.
ह्या बृहन महाराष्ट्राच्या अस्तीत्वाची दखल म्हणून SF ला संमेलन भरवले तर काही निंदा जनक घडले अहे असे मला वाट्त नाही.
ह्यातून परदेशातील मराठी सांस्कृतिक जीवनाला चालना मिळाली, परदेशस्थ मराठी साहीत्याचा कसदार प्रवाह तयार झाला तर ऊत्तमच.
SF ची मंड्ळी तन मन लावून हे संमेलन यशस्वी करतील अशी खात्री आहे.
- झक्कास.
दर-वर्षी जवळ-पास ४०,००० लोक संमेलनाला हजेरी लावतात असे माझ्या वाचनात आले आहे. यातील बहुतांश (१२ + ५० वगळता) साहित्य प्रेमी संमेलनाला मुकतील ह्या गोष्टीचे वाईट वाटते. संमेलन सॅनफ्रान्सिस्को ला घेण्यात पदाधिकार्यांची फुकट वारी हाच जर सुप्त हेतु असेल तर मराठीचे दुर-दैव.
गेली काही वर्षे साहित्य सम्मेलनात घुसलेल्या दोन अनिष्ट गोष्टी म्हणजे वारेमाप पैशाची उधळपट्टी आणी राजकारण्यान्ची घुसखोरी.
सान्गली सम्मेलनात तर याचा कहरच झाला. सम्मेलनाचे बजेट दीड दोन कोटीन्वर गेले.
इतके पैसे जमविण्याची शक्ती नसल्यामुळे मुख्यमन्त्र्यान्चया दारात झोळी घेवून उभे रहाणे क्रमप्राप्तच होते.
(मोठा गाजावाजा करून वसुन्धरा पेन्डसे नाइकानी सुरु केलेला महकोश कुठे गेला? )
त्यानी ही बारबालेवर दौलतजादा केल्याच्या थाटात पन्चवीस लाखाचा चेक फाडला.
( हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणतात ते हेच)
त्याच दिवशी विदर्भात एका दुर्गम खेड्यात एका गरीब मुलाचा म्रुत्यु झालेली बातमी वाचली.
कारण काय तर चारशे रुपयाची रेबीज लस सरकारी दवाखान्यात उपलब्ध नव्हती.
इतकेही कमीच म्हणून महापालिकेकडून थोडीशी वसुली झाली.
( लोकाना शुद्ध पाणी काय, पुढेमागे केव्हाही देता येयील. समेलन महत्वाचे)
सम्मेलनाला पाहुणे म्हणून थेट राष्ट्रपतीनाच बोलवले गेले.
राष्ट्रपतीन्च्या प्रोटोकॉल अधिकार्यानी सम्मेलन अध्यक्ष्याना भाषण पाच मिनिटात उरकण्याची तम्बी दिली आणी
सम्मेलनात साहित्याचे स्थान काय याची जाणीव करून दिली.
त्याआधी सोलापूर साहित्यसम्मेलानाच्या बरोबरच विद्रोही साहित्यसम्मेलन ही झाले.
विद्रोही नी सरकार कडून एक पैसाही न घेता लोकान्कडून एक रुपया आणी मुठभर धान्य एवढी
देणगी गोळा करून सम्मेलन यशस्वी केलेच पण सम्पूर्ण सम्मेलनाचा हिशोब एका महिन्यात जाहीर केला.
याउलट गेल्या पाचसहा साहित्य सम्मेलनाचा हिशेबाचा अजुनही पत्ता नाही.
बे एरियातल्या मराठी मन्डळाला आपले डॉलर खर्च करून फुकटचम्बू बाबुरावाना अमेरिका वारी घडविण्याची हौस
असेल तर आपण सान्गणारे कोण? फक्त या सम्मेलनातून सरकारी मदत न घेण्याचा पायन्डा पडावा.
ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनी केलेल्या उपहासपूर्ण टिपण्णी च्या पार्श्वभुमीवर जर साहित्य संमेलन दक्षिण ध्रुवावर झाले तर कुठला प्रकाशक तिथे जाईल ?

.
.
.
.
कोठवळे ... नाही
.
.
.
.
परचुरे ... नाही
.
.
.
.
मेहता ... नाही
.
.
.
.
पॉपुलर ... नाही
.
.
.
.
फक्त 'पेंग्विन पब्लिकेशन'
>>> विद्रोही नी सरकार कडून एक पैसाही न घेता लोकान्कडून एक रुपया आणी मुठभर धान्य एवढी देणगी गोळा करून सम्मेलन यशस्वी केलेच
थोडक्यात काय, हे तथाकथित विद्रोही असोत वा प्रस्थापित, दोघांनाही साहित्य संमेलनात मिरवायची हौस आहे आणि दोघांनीही स्वतःच्या खिशातून एक रूपयाही खर्च न करता लोकांच्या पैशातून चंगळ केली.
प्रस्थापितांनी सरकारकडून मिळालेली देणगी वापरून जेवणावळी झोडल्या तर या तथाकथित विद्रोह्यांनी वर्गणी गोळा करून व लोकांकडून मिळालेले धान्य विकून पुख्खा झोडला.

>>> ( हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणतात ते हेच)
त्याच दिवशी विदर्भात एका दुर्गम खेड्यात एका गरीब मुलाचा म्रुत्यु झालेली बातमी वाचली.
कारण काय तर चारशे रुपयाची रेबीज लस सरकारी दवाखान्यात उपलब्ध नव्हती.
इतकेही कमीच म्हणून महापालिकेकडून थोडीशी वसुली झाली.
( लोकाना शुद्ध पाणी काय, पुढेमागे केव्हाही देता येयील. समेलन महत्वाचे)
"नेमेचि येतो मग पावसाळा" ही उक्ती सार्थ ठरवत ही तथाकथित विद्रोही मंडळी दरवर्षी कांगावा करत असतात.
या तथाकथित विद्रोहींना साहित्य संमेलनाच्या किरकोळ देणगीचे कुसळ दिसते, परंतु त्यांना, ज्यांची असंख्य स्मारके आणि पुतळे उभे आहेत अशा काहि ठराविक व्यक्तींचे नवीन पुतळे व स्मारके (यातले बहुसंख्य पुतळे या तथाकथित विद्रोही मंडळींच्या लाडक्या व्यक्तींचे आहेत), तथाकथित लोकनेत्यांच्या १० मिनिटांच्या सभेवर केला जाणारा कोट्यावधी रूपयांचा खर्च, एका विशिष्ट वर्गाला धार्मिक प्रवासासाठी दिल्या जाणार्या अब्जावधी रूपयांच्या सवलती इ. मुसळे अजिबात दिसत नाहीत.
हे पण वाचा.
http://batmidar.blogspot.com/2008/06/blog-post_24.html
भारी लिंक
माढेकर साहेब,
विषय कोणताही असो, त्यात हिन्दुत्वाचे तुणतुणे वाजविण्याची आपली किमया प्रशन्सनीय आहे.
प्रस्थापितांनी सरकारकडून मिळालेली देणगी वापरून जेवणावळी झोडल्या तर या तथाकथित विद्रोह्यांनी वर्गणी गोळा करून व लोकांकडून मिळालेले धान्य विकून पुख्खा झोडला.
:)
:)
हे धान्य विकले असे तुम्हाल कसे बरे कळले?
तुम्हीच तर खरेदी केले नाही ना?
शोनू, लेख सही आहे
***
Insane : When you're crazy and it bothers you.
Crazy : When you're insane and you like it.
कुलकर्णी,
मी अगदी तुमच्या दुखर्या भागावर बोट ठेवले ना? या तथाकथित विद्रोहींची फुकटेगिरी बाहेर काढलेली पाहून तुमच्या अंगाची लाही लाही झालेली दिसत आहे. प्रस्थापितांनी सरकारकडून मदत घेतली, तर या विद्रोही विदूषकांनी लोकांकडून भीक मागितली. या दोघांनीही स्वतःच्या खिशातून एक पैसाही खर्च केलेला दिसत नाही. मग त्यांच्यात फरक काय? शेवटी दोघेही फुकटेच. तुलनेत प्रस्थापित बरे. ते निदान भीक मागून वर काहितरी क्रांतिकारी कृत्य केल्याचा कांगावा तर करत नाहीत!
तुम्ही रेबीजची लस मिळत नाही पण संमेलनाला २५ लाख रू. दिले म्हणून आरडाओरडा केला आहे. या विद्रोही विदूषकांनी मागून आणलेल्या भीकेतून किती मदत गरजूंना केली ते सांगा बरे! त्यांनी पण मिळलेल्या भीकेतून मौजमजाच केली ना? मग तुमचा साहित्य संमेलनालाला दिलेल्या मदतीवर राग का?
तुमच्या दृष्टिने साहित्य संमेलनापेक्षा इतर अनेक महत्वाच्या गोष्टिंना मदत देणे आवश्यक आहे. मी म्हणतो की इतर अनेक फालतू बाबींवर अब्जावधी रू. सरकार मदत म्हणून देते (उदाहरणे वर दिलेली आहेत. ती वाचा. तीच उदाहरणे परत इथे दिली तर तुमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल. असो. दिवे घ्या.).साहित्य संमेलनाला दिलेले २५ लाख रू. त्यापुढे अगदी किरकोळ आहेत. त्यामुळे त्या इतर फालतू कारणांकरता दिलेली मदत बंद करून मग साहित्य संमेलनाला दिलेल्या देणगीचा विचार केला पाहिजे.
>>> विषय कोणताही असो, त्यात हिन्दुत्वाचे तुणतुणे वाजविण्याची आपली किमया प्रशन्सनीय आहे.
भीक मागून केलेली मौजमजा असो वा किंवा निधर्मी ढोंगीपणा, त्याला उदात्त क्रांतिकारी मुलामा चढविण्याची आपली किमयासुद्धा प्रशसंनीय आहे!
रत्नागिरी मध्ये स्वा. सावरकरानी हिन्दुधर्मातील सर्वाना प्रवेश घेता यावा असे पतित पावन मन्दिर बान्धले. सर्व हिन्दुना एकाच पन्गतीत भोजन वाढण्याचा धाडसी प्रयोग पण केला. ही पन्गत पहाण्याचा योग आलेले सुद्धा परम भाग्यवन्त. या सर्व उदात्त कार्यासाठी त्यानी लोकान्कडून यथाशक्ती मदत पण घेतली. कीर यान्च्यासारख्या उद्योजकाने आपला हातभार लावला. तुमच्या लेखी हा फुकटेपणा आणी पुक्खा झोडणे होते ?
"आठव्या पन्चवार्षिक योजनेतील सन्करीत ज्वारीचे स्थान" या व्याख्यानात मध्येच उठून "मन्दिर वही बनयेन्गे" च्या घोषणा देण्यासारखा हा प्रकार आहे.
>>> या सर्व उदात्त कार्यासाठी त्यानी लोकान्कडून यथाशक्ती मदत पण घेतली.
विद्रोही साहित्य संमेलन म्हणे. या तथाकथित विद्रोहींनी स्वतःच्या खिशातून एक रूपया सुद्धा न काढता लोकांकडून पैसे आणि धान्य गोळा करून म्हणे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित केले. यात त्यांनी कोणते उदात्त (!) आणि सनाजपयोगी कार्य केले हे सांगा पाहू! लोकांच्या पैशातून नुसती भाषणे ठोकली असतील.
साहित्य संमेलनाच्या २५ लाख रू.च्या देणगीवर टीका करणारे हे विद्रोही, अब्जावधी रू. च्या फालतू उधळपट्टीवर एक अवाक्षर सुद्धा का काढत नाहीत? तुम्ही यावर सोयीस्कर मौन पाळले आहे.
महान क्रांतिकारक वीर सावरकर व हे फुकटचंबू विद्रोही यांच्या कार्याची तुलना करणे म्हणजे सूर्याची आणि काजव्याची तुलना करण्यासारखे आहे.
सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात
कवतिकरावांचे मराठी वाचल्यावर महाराष्ट्रात हे सम्मेलन भरत नाही हे वाचून आनंद जाहला
बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे संदीप देवकुळे यांचे यावरील निवेदन, सकाळ मधे आले आहे.
संम्मेलन सॅन होजे येथे (न)घेण्याबाबतची दुसरी बाजु आजच्या सकाळ मधे आली आहे.
http://esakal.com/esakal/07032008/SpecialnewsD5DFD586A8.htm
मला अज्जुक्का यांचे लिखाण आवडले. त्यांनी कुणावरहि कसलेहि आरोप न करता, काही योग्य मुद्दे मांडले आहेत.
इतर बर्याच जणांचे असे मत दिसते की दुसर्याच्या पैशानी चैन करायला हे सगळे चालले आहे! याचे कारण, त्यांना प्रत्यक्ष या संमेलन भरवणार्यांबद्दल काही माहिती आहे की उगीच आपला कयास, हे कळत नाही.
त्या दृष्टीने विजय कुलकर्णि यांनी मांडलेला मुद्दा लक्षात घ्या. सावरकर करत असलेल्या कार्याबद्दल, कदाचित् काही कर्मठ ब्राह्मण सोडून, सर्वांचे चांगले मत होते. शिवाय ते कर्मठ ब्राह्मण देखील खुद्द सावरकरांबद्दल आदर बाळगून होते. म्हणून त्याबद्दल असे कुणि आक्षेप घेतले नाहीत, उलट त्या कार्याची प्रशंसा होते.
बिचारे साहित्य संमेलनवाले. त्यांच्या संमेलनाबद्दल कुणाला काही सुख दु:ख नाही, नि त्या लोकांबद्दल कुणालाहि फारसा आदर नाही. म्हणून मग त्यांच्यावर टीका होते. ह्या प्रकारे केलेले वादविवाद विशेष उपयोगी होत नाहीत.
जर अज्जुक्का यांना त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली(?!) तर त्यांचे नाही तरी त्यांच्यासारखे वाटणार्यांचे तरी मत बदलेल अशी शंका आहे.
नाहीतर आहेच भारतीय राजकारण्यांचा आदर्श आपल्यासमोर!! केवळ विरोध म्हणून विरोध. त्या अणूकराराला विरोध करणार्यांपैकी किंवा पाठिंबा देणार्यांपैकी सुद्धा कित्येकांना काही कळते का? कुणि नीट वाचले आहे का?
>>मला अज्जुक्का यांचे लिखाण आवडले.<<
मी स्वप्नात तर नाही ना?
असो... उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे इथेच काय मेडिया, वर्तमानपत्रे यात चाललेल्या कुठल्याही उहापोहात मिळत नाहीयेत..
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मला वाटते सान होजेच्या साहित्य संमेलनात भारतातून आलेले सर्वजण इंग्रजीतूनच बोलतील, कारण कुणि अमेरिकन आले असतील तर त्यांना कळायला पाहिजे ना? आणि खुद्द देवकुळे यांनी सांगितले आहे की अस्खलित मराठी बोलणे हे मराठी असल्याचे लक्षण नाही! तेंव्हा आता yes, yes i am knowing marathi. u no, there are nine crore peoples and for hundreds of years they are using marathi only. अशा प्रकारे बोलून हे साहित्य संमेलन साजरे होईल.
झक्की बरोबर आहे आता आय नो मराठीच सगळीकडे होनार.
परवा शिकागोतील काही मराठी अभिनेते ( नाट्य व सिने) आणि निर्माते यांची मिटींग होती. गंमत म्हणजे येथील एका मान्यवर, थोर व्यक्तीने असा प्रस्ताव मांडला की ही नाट्य चळवळ मराठी न राहाता येथील मराठी लोकांच्या मुलांना त्या नाटकांतुन काम करन्यास वाव मिळावा म्हणुन काही नाटक ईंग्रजीतच बसवावी. मराठी भाषा ही मराठी असन्याची ओळख ठेवु नये कारण ग्लोबलायझेशनच्या जमान्यात भाषेला काही महत्व नसते.
त्यांचे वय व मान पाहुन मी सौम्य शब्दात त्यांचाशी वाद घातला, पण त्यांचे म्हणने असे होते की मराठी भाषेत मराठी माणसाने अडकुन पडायला नाही पाहीजे. घ्या आता. पुढचे संमेलन शिकागोला होनार यात काही वाद नाही.
नाट्य चळवळ मराठी न राहाता येथील मराठी लोकांच्या मुलांना त्या नाटकांतुन काम करन्यास वाव मिळावा म्हणुन काही नाटक ईंग्रजीतच बसवावी.
----खुप छान विचार मांडलेत त्या महाभागांनी, पण मग फक्त मराठी लोकांच्याच मुलांना काम करण्यास वाव हा $ ग्लोबलायझेशन $ च्या जमान्यात संकुचीत विचार कां?
मराठी साहित्य संमेलनाची सफल उद्दिष्टे आणि त्यातून उद्भवलेले वादंग यापैकी कशाची संख्या जास्त आहे हे सांगणे कठीण आहे. क्षणभर धरून चालू की मराठी साहित्य संमेलन ही एक आवश्यक गोष्ट आहे आणि ते झालं पाहिजे. आता अमेरिकेकडे जे जगाचं अनभिषिक्त नेतॄत्व आहे (आहे!) त्यामुळे अमेरिकेपर्यन्त कुठलीही गोष्ट पोचली की यशाची परमसीमा झाली असं बरयाच लोकांना वाटत असतं. उदा. NYSE वर आपली कंपनी लिस्ट होणं, अमेरिकेत आपल्या कंपनीचं उत्पादन यशस्वी होणं इ. त्यामुळे बरीच लोकं हा निकष सरसकट सगळ्या गोष्टींना लावू पहातात. जसं काहीजणं तिथल्या मराठी मंडळात/लोकांच्या घरी कीर्तन वगैरे कार्यक्रम करतात आणि भारतात परत येउन स्थानिक वर्तमानपत्रात "अमेरिका गाजवून आल्याची" जंगी जाहिरात देतात. आता एखाद्या भाबड्या जिवाला असं वाटू शकेल की आता तिथले मजूर देखील बांधकामावर जाताना i-pod च्या गुंड्या कानात घालून कीर्तनाच्या तालावर डुलत डुलत जात असतील पण बहुतेकाना जाहिरातीतील मजकुराची किंमत माहीत असते (देवकुळेंच्या निवेदनातील सण, "Long Term" अशा मुद्यांबद्दल काही वेगळं बोलायला नको). जसा काही मराठी लेखकांना, त्यांच्या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर हा एक उच्च मानबिन्दू वाटतो तसंच काहीसं हे असेल कदाचित. अहो, स्वातंत्र्यदिनाच्या आसपासच्या वीक-एण्डला शहरातील शांत रस्त्यावरून तिरंग्याबरोबर हळूच भगवाही "फ्लोट" करून त्याबद्दल छाती फुगवून डिंग्या मारणारे लोकसुद्धा असतातच!
कौस्तुभ तुमचे लिखाण वाचले. तुम्ही पुण्याचेच असणार!
"देवकुळेंच्या निवेदनातील सण," "हळूच भगवाही "फ्लोट" करून त्याबद्दल छाती फुगवून डिंग्या मारणारे लोकसुद्धा असतातच!"
अहो, हळूच नाही, चांगला उघड उघड भगवा मिरवला! आणि या सगळे गोष्टी आम्ही इथे करतो त्या 'डिंग्या' मारायला करतो म्हणून कोण सांगतो? आम्हाला जे वाटते ते आम्ही करतो.
भारतातले लोक इथे येऊन परत गेल्यावर काय म्हणतात, किंवा करतात याबद्दल आम्हाला काहीहि देणे घेणे नाही. काही असते तर इकडे राहिलोच नसतो! तिथेच येऊन 'डिंग्या' मारल्या असत्या. हे असले लोकांना दाखवण्यासाठी काही करायची सवय, भारतीयांचीच, विशेषतः तुमच्या गावच्या लोकांचीच फक्त. इथे येऊन ती सवय सुटते. मग ज्यांना खरेच गणपति, दिवाळी कराविशी वाटते ते न्यू जर्सीत अक्षरशः हजारोंच्या संख्येने येतात. त्याबद्दल भारतात कोण काय म्हणतात याची कुणाला पर्वा? आणि काही शेकडो जण येतहि नाहीत. त्याची तरी कुणाला उठाठेव? फक्त तुमच्यासारख्यांना. जे गेले त्यांना म्हणायचे डिंग्या मारायला गेले, नि जे नाही गेले त्यांना म्हणायचे 'बाटले', 'India ला विसरले' वगैरे. (त्यात सुद्धा 'भारताला' नाही, 'India' ला!). एकूण काय नुसता असंतुष्ट आत्मा!
ते साहित्य संमेलन इथे झाले तर वर अज्जुक्का यांनी लिहिलेले काही तोटे आहेत, पण त्यांचा विचार साहित्य संमेलन भरवणार्या लोकांनी नि भारतातलल्या लोकांनी करावा ना!
आम्ही बोलावले, तुम्ही आलात तर आम्हाला आनंदच होईल, त्यात डिंग्या मारण्यासारखे आम्हाला तरी काही वाटत नाही. आम्ही बर्याच भारतीयांना इथे बोलावतो, नि आशा भोसले यांच्यासारख्यांना प्रचंड रक्कमहि देतो. लता मंगेशकरांकडून निंदा ऐकतो. त्यात 'डिंग्या' मारण्यासारखे काही नाही. मुळातच फुकट अमेरिका यात्रा घडत असेल, तर कुठलाहि भारतीय अमेरिकेला यायला तयार होईल! (अपवादः जे पूर्वी अमेरिकेला येऊन गेलेले आहेत, त्यातल्या शहाण्या लोकांचा.)
सध्या भारतातल्या लोकांनी संमेलनाला विरोध करणे त्यांच्या फायद्याचे नाही. त्या ऐवजी जर जोरात आवाज उठवून पाठिंबा दिला तर त्या लोकांना पण कदाचित् फुकट अमेरिकेची वारी घडेल, हे व्यवहारज्ञान भारतातल्या कुठल्याहि गृहिणीला असेल. तेंव्हा जरा चाल बदला. सगळेच विरोध करत असतील तर आपण त्याची बाजू घ्यायची हे तुमच्या गावच्या लोकांचे वैशिष्ठ्य आहे. त्यात तुमचाहि फायदाच आहे. फुक्कट अमेरिका!
जसं काहीजणं तिथल्या मराठी मंडळात/लोकांच्या घरी कीर्तन वगैरे कार्यक्रम करतात आणि भारतात परत येउन स्थानिक वर्तमानपत्रात "अमेरिका गाजवून आल्याची" जंगी जाहिरात देतात. >>> अगदी अगदी!!
अहो, त्यांच्या दृष्टीने अमेरिका म्हणजे अमेरिकेतील चार मराठी मंडळी!
बाकी केदार नि उदय, त्यात आश्चर्य काय? आत्ताहि मराठी बोलणारे, मराठी, कितीतरी हिंदी हित्रपटात काम करून पुढे आलेले आहेत नि येतहि आहेत. शिवाय आजकाल तर काय, मराठी असो, हिंदी असो, इकडल्या हिंदी, मराठी न कळणार्या अमेरिकनांना सुद्धा समजेल इतक्या मोठ्या प्रमाणात त्यात इंग्रजीचा भरणा असतो. म्हणजे globalization भारतात राहूनच चांगले झाले आहे.
अडचण एकच. अट्टाहासाने त्या चित्रपटातील संवादांचे इंग्रजी(?!)त भाषांतर करतात, त्याने जरा गोंधळ होतो. म्हणजे काय की 'बाई मी विकत घेतला श्याम' गाण्याचे भाषांतर केले होते - I purchased a black slave from Nanda's house. That slave had worked in many places, in different places, he took different names वगैरे वगैरे. 'So, you too had slavery in India, eh?...'
हा भाषांतराचा मुद्दा आठवण्याचे कारण की आजकाल कुठल्याहि भारतीय भाषेतील कार्यक्रमांचे इंग्रजी भाषांतर करून ते प्रेक्षकांना दिल्या जाते. उद्या जर या मराठी लेखक नि कवि यांनी लिहीलेल्या गोष्टी नि कविता यांचे 'असेच' भाषांतर केले तर मराठी साहित्याबद्दल लोकांचे काय मत होईल?
अमेरिकास्थित भारतीयांचं भारतीयपण किती नी कसं हे चर्चेला का घेतलं जातंय सतत ह्या संमेलनाच्या मुद्द्याला धरून हे अनाकलनीय आहे.
गंमत म्हणजे देवकुळे ही तीच तबकडी वाजवतायत.
तुम्ही तुमच्या मते 'गुड इनफ' भारतीय/ मराठी आहात ना मनापासून मग समर्थनं कसली देताय?
संमेलन नक्की कुणाकुणासाठी असतं आणि कशाकशासाठी असतं (याठिकाणी टेबलाखालचे उद्देश चर्चेसाठी म्हणून बाजूला ठेवूया!!) याचा विचार केल्यावरच हे संमेलन कुठे असायला हवे याची उत्तरे मिळणार आहेत.
कॉलेजच्या वयात एकदोन संमेलनांना हजेरी लावली होती. आई तिच्या मैत्रिणींबरोबर रजा काढून दरवर्षी जायची. त्यामुळे थोडासा एक आपला अंदाज आहे तो मांडतेय.
सामान्य माणूस संमेलनाला कशासाठी जातो?
१. आपला आवडता साहित्यिक याची देही याची डोळा बघायला ऐकायला मिळावा.
२. साहित्यिक वातावरणात रमायला मिळावं.
३. चारदोन चर्चा ऐकून थोडीशी आपल्याही विचाराला चालना मिळावी वा किमानपक्षी तशी भावना तरी निर्माण व्हावी.
४. नवीन काही ऐकायला मिळावे.
५. एरवी मुद्दामून पुस्तकांची खरेदी केली जात नाही वा पुस्तके बघितली जात नाहीत ती एकगठ्ठा इथे बघायला मिळतात आणि संग्रहात घेतली जातात. नाहीतर निदान नवीन काय आलंय बाजारात आणि कुठलं किती लोकप्रिय आहे हे तरी कळतं.
६. आपल्यासारखेच अनेक साहित्यरसिक भेटतात आणि त्यातून बर्याच विचारांचं आदानप्रदान होऊ शकतं.
७. माणसाला उत्सव/ सोहळा आवडतो मग भले तो मराठी माणूस असेल नाहीतर अजून कोणी..
ही काही ठळक कारणे. आता या कारणांसाठीच अमेरिकास्थित भारतीयांना वाटले की असावे बाबा हे संमेलन आपल्याकडे तर त्यात त्यांची काही चूक नाही.
आता हे वरचे उद्देश सफल होतात का सामान्य माणसासाठी? तर बर्याच अंशी होतात. सगळ्या साहित्यरसिकांमधे संचारलेल्या उत्साहाची लागण आपण गेलो तर आपल्यालाही होते आणि पुढचे बरेच दिवस त्यात आपण रंगून जाऊ शकतो. ते छान होतं पासून ते किती वाईट होतं इथपर्यंत सर्व...
आता साहित्य संमेलन भरवणारे काय उद्देशाने भरवतात ह्याचा थोडा विचार केला तर.. अपेक्षित उद्देश.. (टेबलाखालचे उद्देश चर्चेसाठी बाजूला ठेवू!)
१. विचारांचे आदानप्रदान आणि घुसळण
२. मोठ्या साहित्यिकांचा गौरव
३. नवोदितांना व्यासपीठ
४. प्रकाशकांचे स्टॉल्स, देणगी प्रवेशिका इत्यादींमधून संस्थेला होणारी थोडीफार मिळकत. ज्यातून मराठी पुस्तके जतन करणे, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टी करता येतात.
५. मराठी पुस्तकांचा खप.
६. ज्या ठिकाणी फारसे साहित्यिक वातावरण नाही त्या ठिकाणच्या माणसालाही वंचित न ठेवणे..
आता हे घडतं का? तर हो काही प्रमाणात(च) घडतं.
मग आता हे संमेलन अमेरिकेत घेण्याने काय होणार? किंवा काय बदलणार?
१.सामान्य माणूस नाकारला जाणार ज्याच्या बळावर, जीवावर साहित्याचा सगळा डोलारा उभा आहे.
२.सुस्थितीत असलेला मध्यमवर्गसुद्धा संमेलनासाठी अमेरिकावारी करू शकणार नाही.
३.विंदांच्यासारखे झळझळीत कर्तुत्वाचे लोक सोडले तर मध्यम लेखक व नवोदीत हे सर्व बाजूला सारले जाणार.
अमेरिकास्थित/ परदेशस्थ मध्यम लेखक व नवोदित ही संख्या एकूणात मराठीतील मध्यम लेखक व नवोदित यांच्या मानाने नगण्य आहे. परत यातले बहुतांश लोक तिथे उत्तम नोकरीधंद्यासाठी आहेत. लेखन हा केवळ छंदाचा भाग आहे, उदरनिर्वाहाचा नाही त्यामुळे कदाचित त्यातले अनेक जण भारतातल्या संमेलनाला हजेरी लावण्याचा विचार तरी करू शकतात. जे उलटे होण्याची शक्यता खूपच कमी...
कोण किती पैसे खाणार?
कोण कुणाची वर्णी लावणार?
कितीजणांना फुकट अमेरिकावारी मिळणार?
इत्यादी प्रश्न तर आहेतच पण ते सगळं अगदी पारदर्शकरित्या झालं तरी (स्वप्न बघायला काय हरकत आहे?) सामान्य रसिक, मध्यम व नवोदित लेखक हे वंचितच रहाणार. आणि आक्षेप तिथेच आहे वा असायला हवा.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अज्जुका,
एकदम बरोबर..
मात्र इथे भारतातही गेल्या काही वर्षांत आपण लिहिलेले व अपेक्षित असलेले उद्देश फारसे सफल झालेले दिसत नाहीत..
पण तरीही राजकारण्यांच्या आणि भोजनभाऊंच्या गर्दीत मुठभर रसिकांचे समाधान झाले तरी पुरे.. अमेरिकेत हे होणे नाही..
वा झक्की! तुम्ही झटकन व्यक्तिगत पातळीवर आलात. शिवाय तुम्ही झटकन शिक्केही मारता. आणि माझ्या लिखाणातला मुख्य मुद्दाही झटकन डावललात - तो हा की लोकांना तिथे संमेलन का करावसं वाटतं. मुळात मी पुण्याचा नव्हे. आणि याचा अर्थ असा नव्हे की मला स्वतःला पुणेकर म्हणवून घेण्यात कमीपणा वाटतो. मी ८-९ वर्षे अमेरिकेत होतो आणि काही काही गोष्टी जवळून बघायची सन्धी मला मिळाली म्हणून लिहिलं. (Madison Avenue वरच्या परेडही बघितल्या). आणि अजूनही कामानिमित्ताने येऊन जाऊन असतो. तेव्हा तुम्हीही हे व्यक्तिगत पातळीवरून घेऊन मनस्ताप करून घेऊ नका, please?
btw - "... आम्ही बर्याच भारतीयांना इथे बोलावतो, नि आशा भोसले यांच्यासारख्यांना प्रचंड रक्कमहि देतो ... " - या डिंग्या/फुशारक्या नसाव्यात!
अज्जुका, अनुमोदन. सुरेख विवेचन केलंस.
कौस्तुभ, त्यांना तो 'डिंग्या मारण्याचा' मुद्दा वर्मी लागलेला दिसतो. तो का वर्मी लागला, त्यावरून तावातावाने बचावयुक्त समर्थनही करावेसे का वाटले (त्यांना संशयाचा फायदा देण्यासाठी 'आशा भोसले वगैरे वगैरे' याला आपण डिंग्या न मानता 'सोदाहरण बचाव' असे मानू) हे विचार करण्यासारखे आहे...म्हणजे आपणच, त्यांनी विचार केला असता तर काय... (परत आव मात्र असा की आम्हाला पर्वा नाही.) मानसिकतेचे हे विश्लेषणसुद्धा काही उत्तरांकडे घेऊन जाईल. तेव्हा जर काही कटू सत्ये आढळली तर ती स्विकारण्याची तयारीसुद्धा पाहिजे.
शेवटी, काही जण डिंग्या मारतात, काहीजण मारत नाहीत हे सुज्ञपणाने समजून घेणे महत्वाचे (पुण्यात शिकण्यासाठी राहिल्यामुळे तो सूज्ञपणा 'शिकायचा' राहून गेला असा एक बचाव असण्याची शक्यता आहे.)
***
Twinkle twinkle little star
I don't wonder what you are
Studying your spectrum, ignorance I've none
You're not a diamond, you're just hydrogen.
सर्व साहित्य प्रेमींना व्हिसा मिळेल कां? व्हिसाची चर्चा कुणिच येथे केलेली नाही, ते गृहीत धरले आहे कां? मला (J1/J2, B1/B2) नेहेमी १-३ महिने लागतात (काहींना ६ महीने पण लागतात, TOI मधे लेख पण आला होता या विलंबा बाबत), बरेच कागदी घोडे आणि प्रत्यक्ष मुलाखतीला जावे लागते, तो मिळेलच याची काहीच शाष्वती नसते.
नुसते मंडळाचे आमंत्रण पत्र असुन चालत नाही. अर्थात हा Q (साहित्तीकांसाठी) व्हिसा सहज मिळत असावा किवा त्यांच्यासाठी शिथीलता असेल. गायक असेल तर त्याला क्वचित गायला पण लावतात, आता काही साहित्तीकांना लिहायला/ वाचायला
देतील बहुधा...