
'नेमेचि येतो मग पावसाळा.. ' ह्याप्रमाणेच दरवर्षी येणारा ८ मार्च. काय असं वेगळेपण आहे ह्या दिवसाचं? तर हा ओळखला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून. सर्वात प्रथम हा दिवस 'महिला दिन' म्हणून कधी साजरा झाला, ठाऊक आहे तुम्हाला? नसेल, तर जाणून घ्यावंसं वाटलंय कधी? महिला दिनाची संकल्पना उदयास येऊन आणि महिला दिन साजरा होत असल्याला १०० वर्षं पूर्ण झाली आहेत.
गेल्या काही शतकांतील स्त्रियांपेक्षा आजची स्त्री नक्कीच अधिक मोकळा श्वास घेते, तरीही ही परिस्थिती आजही सापेक्ष आहे हे विसरून कसं चालेल? हा मोकळा श्वास तिला घेता यावा, या साठी झगडलेल्या स्त्री पुरुषांच्या मेहनतीला आज बर्यापैकी फळ आलंय, अजून बरंच काही साध्यही व्हायचं आहे. पूर्वीपेक्षा सामाजिक - कौटुंबिक दडपणाचा पंजा नक्कीच सैलावलाय. स्त्री स्वतःकडे आणि भोवताली सजगपणे पाहायला शिकली आहे आणि पाहताना तिला जाणवत आहे की जगाच्या पाठीवर कुठेही स्त्री सारखीच - तिला पडणारे मूलभूत प्रश्न, अडचणी, तिच्या मनात येणारे विचार, तिला भेडसावणार्या शंका कुशंका... हे कुठेतरी सारखंच आहे, आणि एकत्रित तिला ह्या सगळ्याला सामोरं जायचंय. स्वतःचं आणि मैत्रिणींचं आभाळ सशक्तपणे पेलायचं आहे.
आणि हेच बाईपणाचं नातं अधोरेखित करणारा आणि सगळ्या स्त्रियांना एकत्र बांधणारा हा दिवस. ८ मार्च. आंतरराष्ट्रीय महिला दिवस.
महिला दिनाचे औचित्य साधून संयुक्ताने खालील कार्यक्रम योजिले आहेत -
- स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना- खोखो
- परिचय- राही सरनोबत (साया)
- संवाद- छायाचित्रणकार 'स्वप्ना पाटसकरांशी' (सौ. नीला सहस्रबुद्धे)
- मागील वर्षी महिला दिना निमित्ताने घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या उर्वरित भागाचा रिपोर्ट.
आपण सर्व या उपक्रमांत सहभागी व्हाल अशी खात्री आहेच!



चित्रं फार छान आहे.
महिला दिनाच्या शुभेच्छा
महिला दिनाच्या शुभेच्छा
सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. वरचे चित्र छान आहे.
अष्टाभुजेचं चित्रं फारच सुंदर आहे.
सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा.
चित्र झकास! कार्यक्रमांची रूपरेषा छान आहे.
महिलादिनाच्या शुभेच्छा!!
व्व!! चित्र फारच सुरेख आहे आणि कार्यक्रम पण मस्तच
अतिशय सुंदर चित्र
चित्र फार बेस्ट !!
कार्यक्रमही सुंदर!
महिला दिनाच्या शुभेच्छा
महीला दिनाच्या खूप शुभेच्छा .
चित्र सुंदर!
इथे जगभरातल्या महिला दिनाची प्रकाशचित्रे-
http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/gallery/2011/03/08/GA201103...
चित्र आजच्या स्त्रीला अगदी समर्पक आहे.
आजच लोकसत्तात ह्या आधुनिक अष्टभुजेच्या चित्राविषयी वाचलं आणि ते पहाण्याची उत्सुकता होती. मस्तच आहे चित्र!
खुप छान आहे चित्र
आणी सगळे उपक्रम ही , सगळ्या संयोजकांचे अभिनंदन !!!! 
चित्र खूप आवडले.
चित्र छान आहे. फक्त तिच्या डाव्या हातात स्टेथास्कोपनंतर काय आहे ते लक्षात आलं नाही. गार्डनिंग टूल आहे का?
सायो, झाडू.
ओके
एक-दीड वर्षांपूर्वी एका माबोकरणीने स्वत:च्या मुलानं काढलेलं असंच एक चित्र टाकलं होतं. त्यात अशीच दुचाकीवर बसलेली अष्टभुजा दाखवली होती. (त्या माबोकरणीचा आयडी नाही आठवत
)
मी_आर्या तिचा आयडी.
महिला दिन सर्व्हे रिपोर्ट प्रकाशीत करण्यात आला आहे.
हे चित्रं कोणी काढलय ?
नवरात्रीच्या शुभेच्छा म्हणून चित्रं (क्रेडिट सह) फेबु वर शेअर केलं तर चालेल ला ?
नीलूनं काढलंय.
दिपांजली, हे चित्र संयुक्तासाठी काढले असल्याने संयुक्ता अॅडमिन टीमला चालणार असल्याने माझी काहीच हरकत नाही.
हो आणि सर्वांचे मन :पूर्वक धन्यवाद.
जरा उशीरच झाला
चित्र दिल्यावर मी कधी ईथे फिरकलीच नव्हती. आता नवीन पोस्ट्समुळे बाफ वर आला त्यामुळे बघितले 
अरे वा चित्र छानच आहे!