परदेशी कुरिअर सेवा

Submitted by प्रज्ञा९ on 4 March, 2011 - 12:46

परदेशी कुरिअर करता येण्यासारख्या/ मागवता येण्यासारख्या वस्तू

वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या नियमांप्रमाणे काही गोष्टी/ वस्तू पार्सल केलेल्या चालत नाहीत. त्याबद्दल इथे चर्चा व्हावी अशी अपेक्षा.

स्वतःसाठी म्हणून मी हा धागा आधीच सुरु करणार होते. पण काही कारणामुळे नाही केला. आत्ता एका आयडीने विचारलेल्या प्रश्नामुळे मात्र सुरु करते धागा. योग्य माहिती मिळेल अशी खात्री आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद प्रज्ञा९.

इकडे आयुर्वेदिक औषध मागवायचं असेल तर तसं कोणी मागवलंय का भारतातून? औषधांच्या बाबतीत इथले नियम कडक आहेत. अ‍ॅलोपॅथीची औषधंही कुरिअरथ्रू आणलेली चालत नाहीत. स्वतःची स्वतः आणत असाल तर चालतं. पण डिटेल प्रिस्क्रिप्शन लागतं. (खरंतर कोणतंच औषध नाही चालत, पण इतकं कडक तपासत नाहीत, थोडं दुर्लक्ष करतात अशी माहिती मिळालीये.)

तर काही आयुर्वेदिक पावडर्स, गोळ्या आणायच्या असतील तर काय करावं लागेल? डॉकचं प्रमाणपत्र, प्रिस्किप्शन वगैरे मिळेलच, पण ते इथपर्यंत कसं आणायचं कळत नाहिये. डॉ.नी स्वतः केलेली मिश्रणं असतील तर ती ब्रॅण्डेड स्ट्रिप्समधली/ पॅकिंगमधली किंवा तत्सम प्रकारची नसणार. प्रिस्क्रिप्शन मधे सर्व लिहिलेलं असेल कंपोझिशन काय ते वगैरे....

कोणी सांगू शकेल का?

धारा मी बर्‍याचदा मागवते आयुर्वेदिक औषध कुणाबरोबर तरी. माझे आजोबा वैद्य आहेत त्यामुळे त्यांनी बनवलेली मागवायची असतील तर ओळखीच्यांबरोबर मागवली आहेत. जर दुकानात मिळणारी मागवयाची असतील तर मी ऑनलाईन मागवते. माझे काढे आणि गोळ्या मी खुपदा मागवल आहे ऑनलाईन. पन कुरीयर बरोबर नाही पाठवता येत. माझ्या घरच्यांनी कुरीयर वाल्याकडे विचारल होत ते नाही पाठवत म्हणाले.

लेन्सचे सोल्युशन, लेन्स हे चालत नाही. मी एकदा मागवले होते पण फेडेक्स मधून बरेचदा फोन, मेल्स, प्रिस्क्रीप्शन ची स्कॅन कॉपी हे सगळे झाल्यावर ते पार्सल माझ्या हातात आले आणि परत मला इथे हँडलिंग चार्जेस, पेपरवर्क यासाठी २७ डॉलर वेगळे भरावे लागले.

एकदा खास औषधी शॅम्पू पाठवायचा घरच्यांनी प्रयत्न केला तेव्हा कुरीअर कंपनीने नाही म्हणून सांगितले होते.
बाकी मी खाण्याच्या वाट्टेल त्या गोष्टी भारतातून मागवते. भाजणी, मसाले, कुरडई, पापड, मिठाई, घरी बनवलेली मिठाई. Happy

भाजणी, मसाले, कुरडई, पापड, मिठाई, घरी बनवलेली मिठाई >>>>
सेम पिंच! Happy

पण साबा सांगत होत्या की आमचं लग्न ठरायच्याही आधीच्या दिवाळीत त्यांनी फराळ तयार करून ६-७ किलोचं पार्सल इकडे पाठवलं होतं. ते नवर्‍यापर्यंत आलंच नाही. मग कळलं की इकडे ते चक्क फेकून दिलं गेलं! Sad
खरं म्हणजे फूड परमिट असलेलं कुरिअर होतं, पण काय झालं कोण जाणे!!

धारा ,
भारतातून अमेरीकेत आयुर्वेदिक औषधे कुरीअर थ्रू मागवता येतात. मी बरेचदा मागवलीत. डॉ चे प्रमाणपत्र (custom certificate), prescription लागतेच. ते असल्यास डॉ.नी स्वतः केलेली मिश्रणं ,गोळ्या ही येतात.
मात्र काढे,तूप,तेल ई चा कुरीअर चा अनुभव नाही .

तोषवी..
कोणतं कुरिअर वगैरे माहिती सांगाल का?
मला फक्त पावडर्स आणि गोळ्या मागवाय्च्या आहेत. लिक्विड वगैरे काही नाहिये.

तोषवी, समई,

तुम्ही कोणत्या कुरिअरने औषधे पाठवली होती? पुण्यातून की मुंबईतून?
मला सविस्तर माहिती मिळेल का?

आयुर्वेद + अ‍ॅलोपॅथीच्या गोळ्या असं एकत्र कुरिअर करता येइल का? औषध आहे असं डिक्लरेशन देउन चालतं का?

ज्यांनी औषध मागवलंय/ भारतातून पाठवलंय त्यांनी अनुभव इथे सान्गावा ही विनंती. Happy

माझी आयुर्वेदिक औषध अमरावतीहुन पोस्टाद्वारे पाठवली होती. ती मला मिळाली...आणि बरेचदा मी
मी मागवते.. पण लिक्विड वगैरे बद्दल माहिती नाही. अमरावतीहुन पार्सल इन्डियानापोलीस ला म्ह्ण्जे माझ्या हातात पडायला ३ आठवडे लागतात.

मी Bombino Exp च्या पुण्यातल्या ऑफिसमधे चौकशी केली, पण डॉ. नी स्वतः तयार केलेली नॉनब्रॅण्डेड चूर्णं किंवा गोळ्या आणता येणार नाहीत अशी माहिती मिळाली. जर कंपनी ब्रॅण्ड/सील असेल तर आयुर्वेदिक औषध आणता येईल अशी माहिती मिळाली.

माझी आयुर्वेदिक औषध अमरावतीहुन पोस्टाद्वारे पाठवली होती.>>> कोणत्या सेवेद्वारे मागवली होती? सविस्तर माहिती मिळू शकेल का? विपुत लिहिलं तरी चालेल.

रचु , माझा भाऊ स्पीड पोस्टने रजिस्टर्ड करून पाठवतो. आणि स्वतः करून त्यावर लिहीतो. छान करायचे. कापडाने केले तरी चालते. बाकि वजनावर पडतो.आणि आता पर्यत मी बरेचदा माझी आयुर्वेदिक औषध आणि देवाचे कपडे आणि फन्सी दागिने ,तसेच घरी बनवलेली चूर्ण मागविली आहेत आणि मला सुखरूप मिळाली आहेत्.अजून माहिती हवी असल्यास कळ्वा.

रचु , माझा भाऊ स्पीड पोस्टने रजिस्टर्ड करून पाठवतो. आणि स्वतः packing करून त्यावर medicin लिहीतो. packing छान करायचे. कापडाने केले तरी चालते. बाकि charge वजनावर पडतो.आणि आता पर्यत मी बरेचदा माझी आयुर्वेदिक औषध आणि देवाचे कपडे आणि फन्सी दागिने ,तसेच घरी बनवलेली चूर्ण मागविली आहेत आणि मला सुखरूप मिळाली आहेत्.अजून माहिती हवी असल्यास कळ्वा.

Thanks कौशी. मला पण काही आयुर्वेदिक औषधे मागवायची होती. बर झालं, आता मागवते आणि मग सांगते.

स्पीड पोस्टाने वस्तू पाठवताना, आधी पोस्टातील अधिकार्‍याला काय पाठवायचे आहे, ते दाखवावे लागते, त्याच्याआधी पॅक करायचे नाही. पॅक करण्यासाठी पोस्टाबाहेरच काहि लोक, कापड, लाखेचे सील वगैरे घेऊन बसलेले असतात. ते व्यवस्थित पॅक करुन आणि लाखेने सील करुन देतात.
त्याच बरोबर एक एक्स्पोर्ट इनव्हॉईस बनवावा लागतो. त्याचा फॉर्म पोस्टातच मिळतो, किंवा जे सील करतात त्यांच्याकडे मिळतो. त्यावर नाव पत्ता तसेच वस्तूंचे पूर्ण वर्णन लिहावे लागते. त्याची अंदाजे किंमत व ती वस्तू भेट म्हणून किंवा सँपल म्हणून अथवा औषध म्हणून पाठवायची आहे, हे नमूद करावे लागते. भारतातील व्यक्तींना याची कल्पना देऊन ठेवली तर चांगले.
औषधांबद्दल तसा आक्षेप नाहि, नसावा. पण जर ज्या देशात पाठवायची असेल, त्या देशाचा नियम असेल. (उदा दूग्धजन्य पदार्थाबाबत ऑस्ट्रेलियाचा ) तर मात्र ती पाठवता येत नाहीत. कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदी म्यूझिकल कार्डही पाठवता येत नाही. सीडीज पाठवता येत नाहीत. द्रवपदार्थ पाठवता येत नाहीत.
स्पीड पोस्टाची ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध आहे. आणि कुरिअरपेक्षा ती सेवा खुपच स्वस्त पडते.

कौशी, विपू पाहिली. सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.
दिनेशदा, तुम्हालाही धन्यवाद.

काही माहिती हवी असेल तर परत विचरेन मी. Happy

खुप जास्त वस्तू पाठवायच्या असतील तर ( १५ किलो / २५ किलो ) तर डि एच एल चा जंबो बॉक्स पाठवणे स्वस्त पडते. पॅकिंग तेच लोक करतात. यादी / इनव्हॉईस तेच लोक करतात. कुठल्या देशात काय पाठवता येते, याची अद्यावत माहिती त्यांच्याकडे असते.
अनेक जणांनी मिळून अशा वस्तू मागवता येतात, कपडे / भांडी / पुस्तके / चपला बुट पाठवणे सोयीचे होते. अनेकवेळा एअरलाइन्सचे वजनाचे नियम कडक असतात, अशा वेळी हि सेवा घ्यावी.
एअरलाइन्सचीही कार्गो सेवा असते. फक्त असे केल्यास, त्यांच्या ऑफिसमधून ते सामान कष्टम क्लीयर करुन घ्यावे लागते.

भारतातून उसगावात आंबे कोणत्या पध्हतिने पाठवता येतील,
कही tried tested सोपे आणि त्यातल्या त्यात स्वस्त मार्ग आहेत का...

मी नेट वर कही पाहिले पण प्रचंड महाग आहेत.....कोणत्या महीन्यात पाठ्विने योग्य होइल???

नुकतेच वाचले आपल्या पोस्टाने बेल्जियम ला जाणारे पार्सल बेलगाम ला पाठवले. म्हणुन स्पीड पोस्ट कितपत बरे आहे माहित नाही.

फर्स्ट फ्लाईट कुरीयर चांगले आहे. पुण्यात बर्‍याच ठिकाणी आहे. (एक ऑफीस ज.म. रोडवर संभाजीपार्क च्या समोर आहे). दर ५०० ग्रॅम ला ११६५ रुपये.(अमेरिकेसाठी)

मनस्मि१८, आपण ज्यावेळी स्पीड पोस्टाची रिसिट घेतो, त्यावेळी नीट तपासून घ्यायला पाहिजे. सहसा अशी चूक होत नाही. मला नेहमीच चांगला अनुभव आलाय.

आंबे उत्पादकांच्या काही जाहिराती बघितल्याचे आठवताहेत. (अमेरिकेत आंबे पोचवून देणार्‍या.)

मला काही बुक्स हवी आहेत पुनेतुन. ६-७ किल्ओ वजन असेल तर कोन्त्ति कम्पनि हे सामान अमेरिकेला पाथवते या विशइ माहिति हवि आहे. हि माझि पहिलि वेळ आहे भारतातुन काहि मागवायचि!

धन्यवाद अरुंधती आणि वेबमास्तर मला जी पुस्तके हवी आहेत ती मायबोलीवर नाहीत आणि ती पुण्यात आहेत घरी त्यामुळे पुण्यातून कुरियर करावे लागेल , पुण्यातील काही कंपनी असतील तर पलेअसे अनुभव सांगावा

Pages