मायबोली टी-शर्ट

खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!

    सालबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी पण मायबोलीचा लोगो असलेले टी-शर्टस् विक्रीसाठी उपलब्ध करुन देत आहोत.. यंदा टी-शर्ट बरोबरच टोपी ही विक्रीसाठी आहे..

      यंदा टी-शर्टस् एकाच प्रकारात उपलब्ध आहेत..
      -- Round Neck
      पण दोन रंगात उपलब्ध आहेत..
      -- Black
      -- Peach

        खालील चित्रात दाखविलेले रंग उपलब्ध आहेत.. टी-शर्टवर पुढे डाव्याबाजूस मायबोलीचा लोगो, पाठीमागे www.maayboli.com व उजव्या बाहीवर www.maayboli.com असे Embroidary केलेले असेल

          mbtb.jpg

            mbtp.jpg

              सर्वात महत्त्वाचे : पीच रंगाच्या टी-शर्टसाठी कमीत कमी २५ टी-शर्टस् ची ऑर्डर असणे गरजेचे आहे.. जर २५ पेक्षा कमी टी-शर्टस् ची ऑर्डर असेल तर पीच रंगाच्या ऐवजी पांढरा किंवा काळा ह्या पैकी एका रंगाचा टी-शर्ट निवडावा लागेल.

                टी शर्ट खालील साईझेस मध्ये उपलब्ध आहेत:
                -- Extra Small (XS) 13 36"
                -- Small (S) - 38"
                -- Medium (M) - 40"
                -- Large (L) - 42"
                -- Extra Large (XL) - 44"
                -- Extra Extra Large (XXL) - More than 44"

                  टोपी खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे उपलब्ध आहे..
                  टोपीचा रंग Neavy Blue असुन त्यावर पुढे मायबोलीचा लोगो व बाजुला www.maayboli.com असे Embroidary केलेले असेल...

                    mbc.jpg

                      कृपया मायबोलीकरांनी त्यांची ऑर्डर mb_tshirts@yahoo.co.in ह्या mail id वर दिनांक ३ जुलै २००८ पर्यंत कळवावी. मेलच्या subject मध्ये Hitguj T-shirt order असे लिहावे.

                        ऑर्डर खालील format मध्ये द्यावी:
                        १. नाव
                        २. मायबोली id
                        ३. पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक
                        ४. टी- शर्ट चा साईझ
                        ५. टी- शर्टची संख्या
                        ६. टी- शर्टचा रंग
                        ७. टोप्यांची संख्या
                        ८. पैसे कसे भरणार - On-line की प्रत्यक्ष
                        (एकापेक्षा जास्त आणि वेगवेगळ्या साईझ मध्ये हवे असल्यास तसे स्पष्ट लिहावे.)

                          आपापली order दिनांक ३ जुलै २००८ पर्यंत कळवावी. त्या नंतर कुठलीही order स्विकारली जाणार नाही.

                            Order निश्चित करणे व रहीत करणे या दोन्ही साठी ३ जुलै २००८ ही तारीख बंधनकारक असेल.

                              तसेच admin आणि इतरांच्या सुचनेनुसार, टी-शर्टच्या व टोपीच्या किंमतीच्या काही टक्के रक्कम कुठल्याही एखाद्या चॅरिटी ट्रस्टला द्यावी असा एक विचार आहे. त्यानुसार किंमती खालील प्रमाणे.
                              टी-शर्ट - १७०+५०(charity) = रु. २२०/-
                              टोपी - ८०+३०(charity) = रु. ११०/-

                                ही किंमत व. वि. ला उपस्थित असणारे मायबोलीकर तसेच पुणे आणि मुंबई मधील मायबोलीकरांसाठी आहे.

                                  पुणे, मुंबई व्यतिरिक्त भारतातल्या इतर शहरातील मायबोलीकरांना टी-शर्ट हवे असतील तर त्यांनाही उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यासाठी वेगळा packaging आणि postage चा खर्च येईल व तो ऑर्डरनुसार कळविण्यात येईल.

                                    ह्या वर्षीची चॅरिटीची रक्कम "वनवासी कल्याण आश्रम" ह्या संस्थेस देण्याचे ठरविले आहे.
                                    अधिक माहिती साठी ही लिंक पहा http://www.vanvasikalyanparishad.org/home.htm.

                                      टी-शर्ट तसेच टोपीचे पैसे On-line भरणार असल्यास त्यानुसार अकाऊंट डिटेल्स कळविण्यत येतील. तसेच प्रत्यक्ष पैसे भरण्याची तारीख व ठिकाण लवकरच कळविण्यात येईल.

                                        ऑर्डर निश्चित करण्यासाठी पूर्ण पैसे भरणे आवश्यक आहे.

                                          तेव्हा त्वरा करा आणि आपली टी शर्ट ची ऑर्डर आजच द्या!

                                            देशाबाहेरील लोकांसाठी - ज्यांना टी-शर्ट हवा असेल त्यांनी वर दिलेल्या पत्त्यावर email करावी. देशाबाहेरून किमान २० orders आल्या तरच टी शर्ट पाठविण्याची सोय केली जाईल. वर दिलेली किंमत ही फक्त टी शर्टची मूळ किंमत आहे. Shipping आणि Packaging charges देशानुसार वेगळे असतील व ते नंतर कळविण्यात येतील

                                              ०७-०७-०८: टी-शर्टच्या नविन ऑर्डर्स घेणे बंद केलेले आहे

                                                धन्यवाद. !!!

                                                Submit to kanokani.com

                                                व्वा व्वा!!! छान छान!!!
                                                सुरुवात झाली म्हणायची स्मित

                                                ऑर्डर मेल केलीय बघा स्मित

                                                प्रत्यक्ष पैसे कुठे द्यायचे? ववि ला की वविची वर्गणी भरायच्या वेळी? स्मित

                                                एक टोपी मिळेल का?वैयक्तीक

                                                मंजुडी, प्रत्यक्ष पैसे वविची वर्गणी भरण्याच्या वेळेसच भरायचे आहेत.. पण टी-शर्टची ऑर्डर आधीच द्यायची आहे.
                                                गणेश, टोपी आणि टी-शर्ट दोन्ही घेतलेच पाहिजेत असे काही नाही आहे.. फक्त टोपी हवी असेल तर टी-शर्टचे detail सोडुन फक्त टोपीच्या details ची मेल पाठवा.
                                                धन्यवाद,
                                                टी-शर्ट समिती

                                                इथे अमेरिकेत नाही का मिळणार हे t-shirts आणि टोपी? किंमत वगैरे डिटेल्स द्याल का?

                                                अनुमोदन सुमॉ ...
                                                अमेरिकेत आपल्यासारखे बरेच लोक उत्सुक असतील घ्यायला स्मित

                                                उसगावातल्या मायबोलीकरांसाठी: शिपिंग अन हँडलिंग चे वेगळे पैसे भरत बसण्यापेक्षा अमेरिकेत सुध्दा काही टी शर्ट्स आणि टोप्यांवर लोगो छापवून किंवा एंब्रॉयडर करवून घेता येऊ शकेल. तसं शक्य असल्यास मी कंपन्यांना विचारून त्यातल्यात्यात स्वस्त किंमत शोधून काढीन.

                                                चांगली कल्पना.. मृण तू शोधायला लाग. मग कमितकमी कितीची ऑर्डर देता येईल ते कळेल..
                                                .
                                                .
                                                मग इथे अंदाज घेऊन ठरवता येईल (किती लोकाना टी-शर्ट हवा ते).
                                                *
                                                (पुढच्या ए. वे. ए. ठि. ला मायबोली टी-शर्ट् घालुन येण्याची अट घालता येईल..) हाहा
                                                विनय

                                                अनुमोदन विनय, मला पण टी शर्ट हवाय.

                                                मलापण दोन हवेत t shirts.

                                                मृण्मयी, कल्पना छान आहे. लहानग्यांसाठी पण चौकशी कर ना स्मित

                                                व. वि. ला उपस्थित रहणारे मायबोलीकर म्हणजे काय ?

                                                अज्ञात्,खाली दिलेली लिंक चेक करा.. ववि म्हणजे काय ते कळेल.

                                                http://www.maayboli.com/hitguj/messages/34/126410.html?1213696755

                                                ऑर्डरची मेल पाठवली आहे, टीशर्ट उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद स्मित

                                                मलाही तिन टी शर्ट पाहिजेत. ऑर्डर पाठवतेय. व वी ची घोषणा अजुन व्हायचीय ना?

                                                ऑर्डरची मेल पाठवली आहे, टीशर्ट उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद स्मित

                                                पल्लवी.

                                                ashbaby,हो. ववि२००८ ची घोषणा अजुन व्हायची आहे.. लवकरच होईल..

                                                टीशर्ट संयोजक : चहा-सदर्‍याची ऒर्डर दिली आहे ......... स्मित

                                                ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                                Dream is not what you see in sleep
                                                But it is the thing which does not let you sleep

                                                >>चहा-सदर्‍याची ऒर्डर दिली आहे

                                                स्मित

                                                टी शर्ट समिती ऑर्डर देण्याआधी मला एक प्रश्न आहे, वर दिलेले टी शर्ट चे साईझ हे मुलांच्या/मुलींच्या अश्या दोन्ही टी शर्ट साठी आहेत का? हे टी शर्ट युनिसेक्स आहेत की मुलींसाठी वेगळ्या फिटींग चे असतील?
                                                मागच्या वर्षी असे वेगळे वेगळे काढले होते ना.

                                                चहा-सदर्‍याची ऒर्डर द्या य ची आहे पण त्या आधी काही प्रश्न जर टी शर्ट साईझ चे नसले तर बदलून मिळतील का? पीच रंगाचे १/२ टी शर्टस् मि ळ णा र नाहीत का?? स्मित

                                                ऑर्डर देतेय, मला एक हवा टी शर्ट. मी पुण्यात येत आहे तर पुण्यात कधि आणि कुठे मिळेल?

                                                रुनी : हे टी-शर्टस युनीसेक्स आहेत. मुलींसाठी वेगळे साईझ नाहियेत.

                                                कुलदीप :
                                                १. जश्या ऑर्डर्स येतील त्याप्रमाणेच टी-शर्टस शिवले जाणार आहेत. त्यामुळे शक्यतो exact size च्याच टी-शर्ट ची order द्यावी.
                                                २. वरती सांगितल्याप्रमाणे, पीच रंगाच्या टी-शर्ट साठी एकुणात २५ टी-शर्टस ची ऑर्डर पाहिजे आहे. तुमचे १-२ टी-शर्टस तसेच इतरांचे १-२, करत करत २५ची ऑर्डर झाली तरच पीच रंगाचे टी-शर्टस बनवणार आहोत.

                                                पल्ली : कृपया mb_tshirts@yahoo.co.in या पत्त्यावर संपर्क साधा. म्हणजे पुण्यात कधी आणि कुणाकडे टी-शर्टस मिळतील ते कळवता येइल. तुम्ही जर का आधीच या पत्त्यावर मेल टाकली असेल, तर please ignore this message, तिथून रिप्लाय येइलच.

                                                धन्यवाद,
                                                टी-शर्ट समिती

                                                ही किंमत व. वि. ला उपस्थित असणारे मायबोलीकर तसेच पुणे आणि मुंबई मधील मायबोलीकरांसाठी आहे.
                                                >>>>>>>>>

                                                व.वि ला येणार नसलो तरी t-shirt order करता येईल का? पुण्यातच आहोत!! स्मित

                                                स्मित
                                                ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                                अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

                                                आशु_डी,
                                                व वि ला येणार नसलात तरी ऑर्डर देता येईल. काहीच प्रॉब्लेम नाही..
                                                लवकरात लवकर तुमची ऑर्डर द्या..
                                                धन्यवाद,
                                                टी-शर्ट समिती

                                                धन्यवाद टी-शर्ट समिती. चला म्हणजे आता मला २४/२५ जण (ज्यांना) पीच रंगाचा टी शर्ट हवाय ते/त्या/ती शोधायला सुरुवात करायला हवी. (इथं टी-शर्ट समिती मला काही मदत करू शकेल का?) १/२ दिवस थांबुन मी ई पत्रा दवारे माझी मागणी नोंदवीन.

                                                दीपक
                                                "Behind an able man, there are always other able men"

                                                कुलदीप : अरे मी पण पीच कलरच्या चहा-सदर्‍याची ऑर्डर दिली आहे. २५ जणं तर नक्की जमतील असं वाट्टतय ......... स्मित

                                                ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                                Dream is not what you see in sleep
                                                But it is the thing which does not let you sleep

                                                धन्यवाद टी-शर्ट समिती.
                                                ऑर्डर करते!!
                                                स्मित
                                                ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                                अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

                                                मी पण पीच कलरच्या चहा-सदर्‍याची ऑर्डर दिली आहे.

                                                मी पण पीच कलरच्या चहा-सदर्‍याची ऑर्डर दिली आहे. >>>>
                                                अय्या शैलु सेम पीच I mean पिंच स्मित