मदत हवी आहे charlotte, north carolina

Submitted by सानिका on 12 February, 2011 - 23:58

येत्या काही दिवसात न्यू जर्सी हून बदली होऊन charlotte, north carolina येथे जाणार आहोत. नवऱ्याचे हापिस tyvola road येथे असणार आहे. ह्या भागाच्या आसपास राहण्यासाठी चांगल्या अपार्टमेंट सुचवू शकाल का?..मला २ वर्षाचा एक मुलगा आहे. त्याला नर्सरीत घालण्याच्या दृष्टीने सोईस्कर अशी जागा मिळाल्यास बर पडेल. तसेच भारतीय वस्ती जास्त असेल तर अजूनच चांगले होईल.
तसेच अपार्टमेंट मिळेपर्यंत राहण्यासाठी चांगले हॉटेल कोणते आहे? हॉटेल मध्ये kitchen ची सुविधा असणे आवश्यक आहे. कारण मुलगा लहान आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सानिका, हॅरिस बुलेवार्ड या रस्त्यावर १० वर्षांपूर्वी आम्ही रहात होतो. तुझ्या नवर्‍याच्या ऑफिसपासून किती दूर आहे माहीत नाही. पण तिथे आर्चस्टोन वाल्यांचे ' oak pointe' apartments आहेत. आता काय परिस्थिती आहे माहीत नाही पण पूर्वी तिथे भरपूर भारतीय होते. रेटही रिझनेबल होते नि सगळे काही जवळ होते. एरिया पण छान होता. जाऊन बघ वाटल्यास. लिंक देतेय. तिथूनच थोडे पुढे गेलं की candlewood suites आहेत. (किचन असलेले हॉटेल आहे.)

http://www.apartments.com/summary.aspx?property=102724.409&srank=17&area...

अर्थात शार्लेटमधे भारतीय तसेही भरपूर आहेत. बराच चॉइस मिळेल अपार्टमेंट्सच्या बाबतीत. आपले काही मायबोलीकरही तुला सापडतील. मी तिथून अडीच तासाच्या अंतरावर आहे. काही मदत लागल्यास जरूर सांग. नॉर्थ कॅरोलिनामधे स्वागत Happy

सनिका: स्वागत आहे आपले इथे Happy मी charlotte मधेच आहे सध्या तेव्हा काही मदत लागल्यास कळव.

Check out Ballantyne or Pinevile area which is suppose to be good school district (south charlotte)