मला आवडलेले चित्रपट : Bicycle Thieves

Submitted by नेतिरी on 3 February, 2011 - 20:35

रिची (Lamberto Maggiorani) बर्‍याच दिवसांपासून बेकार आहे.शेवटी त्याला भिंतिवर पोस्टर चिकटवण्याच काम मिळत पण अट आहे सायकलची.रिची आणी त्याची बायको मारिया (Lianella Carell) घरातिल बेडशीटस विकून दुकानात अडकलेली सायकल सोडवुन आणतात. कामाच्या पहिल्याच दिवशी रिचिची सायकल चोरिला जाते.तो पोलिसांत तक्रार दाघल करतो, पण ते फारस काही करू शकत नसल्याच सांगतात.दुसर्‍यादिवशी रिची आणी ब्रूनो (Enzo Staiol) दिवसभर रोमच्या रस्तांवर सायकल शोधत फिरतात.रस्त्यात चोर दिसतो, दोघे त्याचा पाठलाग करतात आणी पकडतात.तो चोरी केल्याच कबूल करत नाही, लोक जमतात, चोर चक्कर येउन पडतो.पोलिस येतो पण चोरिच्या वेळी कोणी साक्षीदार नसल्याने आणी लोकांची सहानभूती चोराला असल्याने सायकल मिळत नाही.शेवटी दोघे चालत येत असताना खेळाच्या मैदाना समोर अनेक सायकली दिसतात.रिची एक सायकल चोरतो पण जमाव त्याला पकडतो, त्याला मारहाण होते.शेवटी रडवेल्या ब्रुनोला बघून सायकलचा मालक त्याला सोडून देतो आणी दोघेही शेवटी गर्दीत मिसळून चालू लागतात.

व्हिटोरिया डी सिकाच्या Bicycle Thieves ह्या प्रख्यात चित्रपटाची ही साधीसुधी कथा.अतिशय वेगळी मांडणी असलेल्या या चित्रपटाने सिनेमाच्या सर्व व्याख्या बदलल्या.आता जवळपास सर्व film schools मधे हा चित्रपट आवर्जून अभ्यासला जातो.हा चित्रपट म्हणजे निओ रिएलिझमच सर्वोत्तम उदाहारण म्हणतात.ह्या चळवळीची सुरुवात पहिल्या महायुद्धाच्या आसपास चित्रकलेच्या माध्यमातून झाली.सामन्य माणूस आणी दैनंदीन जीवन हे चित्रकलेतून शोधायचा प्रयत्न Charles Ginner आणी Harold Gilman यांनी केला.चाळीसच्या दशकात चित्रपटात याचा वापर सुरु झाला.निओरीएलिस्टिक सिनेमा (हा शब्द प्रामुख्याने इटाअलियन सिनेमाशी जोडतात) म्हणजे ज्यात सामान्य माणसे प्रमूख पात्रे असतात.स्टुडीओजना पूर्ण फाटा देउन रस्त्यावर, खेड्यात किंवा गरिब वस्त्यांवर चित्रण केल जात.कथेचा विषय बहुतेकदा रोजचा दिनक्रम, शोषित वर्ग, कामगार असे असतात पण ही डॉक्युमेंट्री नसते.लहान मुले बरेचदा प्रमुख पात्रांपैकी एक असतात पण एखाद्या प्रसंगात यांचा सहभाग कमी असतो, बरेचदा ते घडणार्‍या घटनांचे फक्त साक्षिदार असतात.mainstream cinema तील "drama" पूर्णपणे झुगारुन सामान्य माणसांच्या हालअपेष्टा आणी रोजच्या जिवनातील संघर्षाच खर चित्रण यात असत. इटलित Luchino Visconti (Obsession,The Earth Trembles) Roberto Rossellini (Stromboli, Rome, Open City, Paisà, Europa '51, Germany- Year Zero) ,Vittorio De Sica (Shoeshine, Umberto D ,Miracle in Milan) Federico Fellini ( The Road, The Swindle) हे यातिल आघाडीचे दिग्दर्शक.यातूनच प्रभावित होउन भारतात पॅरेलल सिनेमा, जपान मधे नुबेरु बागु, फ्रेंच न्यु वेव, पोलिश स्कुल, इंडी सिनेमा अशी वास्तववादी चित्रपट बनवणारी मोठी फळी तयार झाली.

"Ladri di biciclette" या इटालियन शिर्षकाचा "Bicycle Thieves" हा अचूक अनूवाद जर तूम्ही त्याच "The Bicycle Thief" कराल तर चित्रपटाच interpretation बदलू शकत.चित्रपट रोम मधे घडतो.दुसर्‍या महयुद्धानंतर आलेली बेकारी आणी गरिबिची कळा पूर्ण शहरावर आहे.चौकोनी ठोकळ्या सारख्या इमारिती, पोपडे उडालेल्या भिंती, बस साठी लांब रांगा प्रमुख पात्रांचे जुने कपडे आणी एकंदर चित्रपटाची ग्रे शेड अधीकच उदास बनवते.पण म्हणून हा काही पूर्ण ट्रॅजीक चित्रपट नाहिये, शेवटी सायकल मिळत नसून सुद्धा.सायकल चोरीला जाते, ती शोधायचा बराच प्रयत्न होतो, हताश होउन शेवटी ती चोरायचाही प्रयत्न केला जातो तरीही ती हाती लागत नाही बस्स् एव्हढच.इथे चोरी करणे कुठेही justify केलेल नाहिये.रिचीची नोकरी सायकल वर पूर्णपणे अवलंबून आहे.म्हणजे सायकल नाही तर नोकरी नाही.सायकल मिळवण्याचे सर्व प्रयत्न संपल्यावर तो चोरिचा एक "प्रयत्न" करतो.परिस्थितिने गांजलेला माणूस शेवटी चोरी करण्यास कसा प्रवृत्त होतो हा या चित्रपटातिल "वास्तववाद".हे पाहताना डोक्यातून प्रथम चित्रपटाबद्दलचे टीपिकल "sweet and tragic end" चे कॉनसेप्ट काढून ठेवावे लागतात. चित्रपटात कोणीही व्यावसायिक कलाकार नाही.रिची एक फॅक्टरी कामगार होता, मारिया पत्रकार तर ब्रुनोला डी सिकाने रस्त्यावर खेळताना पाहिल होत.या तिघांचा अभिनय अगदी सहज सुंदर आहे याच कारण डी सिकाचा अ‍ॅक्टींग मधला अनूभव. शॉट च्या आधी तो प्रत्येक प्रसंग करून दाखवायचा आणी मग इतर कलाकर त्याची नक्कल करायचे.चित्रपटाचा पेस बर्‍यापैकी स्लो आहे सुरुवातीला काही वेळ तरी धीर धरून बसाव लागत.चित्रपटातिल तीन मुख्य पात्र म्हणजे रिची, ब्रुनो आणी गर्दी.अगदी पहिल्या प्रसंगा पासून ते शेवट पर्यंत गर्दी आजूबाजूला आहे.

चित्रपटाच्या सुरूवातिला जेंव्हा एम्प्लोयमेंट ऑफीसर रिचीच नाव पूकारतो तेंव्हा तो जमलेल्या गर्दीतसुद्धा नाहिये, आपल्याला नोकरी मिळेल ही आशा त्याने पुर्णपणे सोडुन दिलिये.सायकलची अट ऐकून तो जास्तच वैतागतो.सायकल दूकानात अडकलिये आणी ति सोडवायला पैसे नाहियेत आणी ही नोकरी हाती लागेल याची फारशी आशा अजून त्याला नाहिये.जमलेल्या गर्दीत मात्र बर्‍याच जणांकडे सायकल आहे आणी ती नोकरी अनेकांना हविये.....सर्वत्र पसरलेली बेकारी यातून कळते.रिची येऊन मारियाला नोकरीबद्दल सांगतो, ती नळावर पाणी भरतीये, दोन जड बादल्या हातात सावरत बडबडणार्‍या रीचीच्या मागे ती येतिये, वाटेत उतार लागतो मारिय तोल सावरत उतरतिये...पुढे गेलेला रिची मागे येउन तिच्या हातातली एक बादली घेतो, बाजूने लहान मुलांची रांग खेळत चाललिये.घरी पोचूपर्यंत तोच विषय चालू आहे. सायकल कशी मिळवायची.घरी पोचल्यावर रिची विमनस्क पणे हातात बादली तशीच धरून थांबलाय.त्याचा खालचा जबडा उद्द्वेगाने हलतोय.मारिया घरातल्या सगळ्या शीट्स धुतिये, दोन तिच्या लग्नात मिळाल्यात.आता हे विकाव लागणार म्हणून तिची चिडचिड होतिये.दुकानात आल्यावर कपड्याच गाठोड छोट्या खीडकीतून आत पटकन जात नाही , दाबून दाबून ते आत सरकवतात.घासाघीस केल्यावर थोडे जास्त पैसे मिळतात, छोट्या खिडकीत आता दोघांचा हसरा चेहरा दिसतो.खिडकीत आता रांगेतिल मागच्या माणसाचा चेहरा डोकावतो तो विकायला आणलेली दुर्बीण समोर ठेवतो.कापडाच गाठोड एका मोठ्या गोदामात वरच्या कप्प्यात ठेवल जात, गोदाम अशा बर्‍याच गाठोड्यांनी भरलय.आता पुढच्या शॉट मधे खीडकी पून्हा उघडते मात्र मागच दुकान बदललय, ते आहे सायकलच.नवीन नोकरीच्या जागी रिचीने सायकल घट्ट पकडून ठेवलिये.दोघे तिघे ती खाली ठेव, इथे कोणी चोरतिल वाटतय का तूला विचारतायत.कामाचा पोषाख मिळतो, बाहेर मरिया वाट बघत उभी आहे.....आता मात्र नोकरी खरच मिळाल्याचा आनंद दोघांच्या चेहर्‍यावर दिसतो.वाटेत मरिया रिचीला बाहेर थांबवून एका घरात शिरते.दारात रिची सायकल जवळ उभा आहे समोर मूलांचा खेळ सुरू आहे.मरिया लवकर परतत नाही म्हणून समोर खेळणार्‍या मूलांना सायकलवर लक्ष ठेवायला सांगून तो वर जातो.वर ती भविष्य सांगणारी बाई आहे, रिची मरियाला ओढत तिथून घेउन येतोय.आपल्याला वाटत सायकल चोरीला गेली असेल पण ती तिथेच असते.
दुसर्‍यादिवशी सकाळी ब्रुनो भेटतो, गोबर्‍या गालांचा हा गोड छोकरा अगदी मोठ्यामाणसांप्रमाणे वागतो.सायकल त्याने पूसून अगदी चकचकीत केलिये आणी सायकलीला एका ठिकाणी डेन्ट आलय अस तो ओरडून संगतोय.दोघेही घरातून निघतात, रिची ब्रूनोला एका ठिकाणी सोडून पुढे जातो, ब्रूनो "by papa" अस दोनदा ओरडतोय पण रिची आपल्याच आनंदात आहे.आपल्याला वाटत ब्रूनो आता शाळेत जाइल, पण ही आहे त्याच्या कामाची जागा.रिचीच काम आहे पोस्टर चिकटवण्याच, रीटा हेव्हर्थ च पोस्टर भिंतीवर चिकटवताना कोणीतरी याची सायकल चोरत...........(पोस्टर मधील चकचकीत दुनिया आणी रिचीच आयूष्य ही अगदी भिन्न टोक).रिची चोराच्या मागे धावतो तो निसटून गेल्यावर पून्हा हताशपणे आपल काम चालू ठेवतो.दुसर्‍या दिवशी चोरबाजारात सायकल शोधणे चालू आहे, एक माणूस मोडलेली सायकल रंगवतोय आणी सायकलचा नंबर सांगायला नकार देतोय......पोलिस येतो.....आपल्याला वाटत अरे आता सायकल मिळेल पण ती दुसरीच सायकल असते. हा आशा निराशेचा खेळ चित्रपटात बरेचदा घडतो.रिची भराभर पूढे चालतोय आणी त्याच्याबरोबर राहण्यासाठी ब्रुनो दुडक्या चालीने धावतोय.पाउस सुरु होतो, दोघांनी कोट डोक्यावर ओढून घेतलाय, ब्रुनो एका ठिकाणी घसरून पडतो...रिची मागे वळून सुद्धा बघत नाहे....हे पण बरेचदा दिसत...रिची ब्रुनोला अगदी बरोबरीच समजतो लहान मुलगा नाही. एकदा तो चोर दिसतो,एका म्हातार्‍या माणसाला पैसे देताना. त्या माणसाचा पाठलाग करत हे दोघे चर्च मधे येतात..तो माणूस त्यांना चोराचा पत्ता सांगून निसटतो....दोघे त्याच्यामागे धावत येतात, ब्रूनो तो असा कसा सुटला विचारतोय, रिची ब्रूनोला एक थप्पड मारतो....हे आपल्याला आजीबात आवडत नाही.फुरंगुटून ब्रूनो झाडामागे लपतो, रिची तू मला प्रश्न विचारून सतावत होतास एवढच सांगतोय कुठेही गोंजारणे नाही.दोघे नदीकिनारी येतात ब्रूनोला थांबवून रिची तो माणूस दिसतोय का ते पाहतोय, इतक्यात कोणीतरी बुडाल असा गलका होतो.आगतिकतेने रिची तिकडे पळू लागतो, इतक्यात त्याला ब्रूनो दिसतो आता शांतपणे रिची त्याच्याकडे चालत येतो आणी जॅकेट घाल एवढच बोलतो.
कंटाळून दोघे पिझ्झा खायला जातात, तिथे एक श्रिमंत कूटूंब बसलय.रिची वाईन मागवतो दोघांसाठी, ब्रूनोला काही ती फारशी आवडत नाहिये.ब्रुनो मागे वळून त्या मूलाकडे पाहत त्याच्यासारख खाण्याचा प्रयत्न करतोयि इकडे रिची त्याला जर नोकरी राहिलि तर किति पैसे मिळतील हे सांगतोय आणी खात खात ब्रुनो हिशेब लिहतोय.
मैदानावर फूटबॉल मॅच होणार असल्याची जाहीरात केली जातिये.दोघे भविष्य सांगणार्‍या बाईकडे येतात, इथे रांगेत घुसून ब्रुनोने पुढचा नंबर पटकावलाय, ती बाई "सायकल मिळाली तर आजच मिळेल नाही तर नाही " अस सांगते.यावर मी काय समजायच म्हणून रिची वैतागतो.
रस्त्यावर अचानक तो चोर दिसतो, काही क्षण दोघे तसेच थांबतात, मग सगळेच पळू लागतात.चोराला रिची धरतो पण हा चोराचा मोहोल्ला आहे.लोक ऐकायला तयार नाहित.ते रिचीवरच चीडतायत, इतक्यात ब्रुनो पोलिसाला आणतो........चित्रपटात ब्रुनो नेहमीच रिचीची मदत करतो, त्याला छोटी नोकरी आहे, त्याला गणीत येत, सायकलच मॉडेल त्याला चांगलच माहिती आहे.संपूर्ण उदासी पसरलेल्या परिस्थीतित ब्रुनो हा एक आशादायी घटक.साक्षिदार नसल्यामूळे पोलिस मदत करु शकत नाही, सायकल मिळत नाही.
दोघेही अगदी हताशपणे परत येतायत, मैदानात खेळ सुरू आहे, रस्त्याकडेला हजारो सायकली उभ्या आहेत.दोघेही फूट्पाथावर बसलेत.समोरून काही सायकली जातायत.रिचीचा विचार पक्का होतोय.तो ब्रूनोला पैसे देउन बसमधून पुढे जायला सांगतो.ब्रुनो मागे पाहत पाहत बसकडे जातो, रिचीचा विचार त्याला कळलाय.बस येते पण ब्रुनो रेंगाळून बस सोडतो.इकडे रिची एक सायकल चोरतो पण लोक त्याला पकडतात, आपल्याला वाटत रिचीची सायकल गेली तेंव्हा तर कोणीच नव्हत.लोक रिचीला शीव्या देतायत, थोडीशी मारहाण पण होतिये हे सगळ ब्रुनो बघतोय, त्यामूळे रिचील ते जास्तच असह्य होतय.तो तोंडातून एक चकार शब्द काढत नाही.आपल्याला वाटत अरे यानी ओरडून या लोकांना आपली कहाणी सांगितली पाहिजे.(हे काय आपण तर एवढा वेळ चोराचा तिरस्कार करत होतो ना, मग आता काय झाल, आपल्याला रिचीने ती चोरी का केलिये ते कळलय...आणी नेमक हेच डी सिकाला दाखवायच आहे).रीची शांतपणे ते सगळ सहन करतोय, त्याचा सगळा असहाय्यपणा फक्त त्याच्या हलणार्‍या जबड्यातून दिसत राहतो. लोक पोलिसांना बोलावायचा विचार करतात.घाबरलेला ब्रुनो येऊन रिचीचा कोट पकडतो, त्याला आता रडू फूटलय्.सायकलचा मालक ब्रुनोला पाहून रिचीला सोडून देतो.दोघेही हळूहळू चालू लागतात..... ब्रुनो आपले डोळे कोरडे करतोय, रिचीला रडू कोसळलय.....ब्रुनो त्याला आपला हात देतो...रिची तो पकडतो आणी दोघेही गर्दीत मिसळून चालू लागतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघितलेला आहे मी हा सिनेमा. तुमच्यामुळे या सगळ्या आधी कधीकाळी बघितलेल्या सिनेमांची उजळणी होतेय. धन्यवाद.

आज रात्री बघणार आहे. मी खरं तर तुमचे सिनेमावरचे लेख पुर्ण वाचत नाही. तुम्ही बघितले आहेत आणि आवडले म्हंटलं की मग मुद्दाम जाऊन सिनेमा बघता येतो. एरवी नुसतं नेटफ्लिक्स वर चाळताना ४ ओळींच्या समरी मधून इतकं काही कळत नाही मग लीड कोण आहे किंवा डायरेक्ट कोणी केलाय ह्यावरुन बघायचा की नाही हे ठरतं. हा सिनेमा बघून पुर्ण झाला तर परत येऊन नक्की लिहेन (बेकेट सुरु केला होता पण अर्धाच राहिला आहे). Happy

मी कालच हा चित्रपट बघीतला आणि फार आवडला!
ब्रुनो च काम तर सग्ळ्यात जास्त आवडल....
रिचि जेव्हा ब्रुनो ल रागावतो आणि मग ब्रुनो रोचि पसून दूर दूर चालतो आणि रिचिला कोटला हात लाऊ देत नाही हे बाप-लेकातले द्रुश्य एक दम मस्त!!!
बस साठी चि रांग, जुन्या ईमारती, सरकारी कार्य पद्ध्ती.....भारताची आठवण आली बघ! Happy