चिकन बिर्यानी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाटी बासमती तांदूळ,
अर्धा कीलो चिकनचे पिसेस,
४ मोठे कांदे, कोथींबीर
आलं लसुण पेस्ट ४ चमचे.
गरम मसाला पावडर १ चमचा
तमाल पत्र २
तिखट,मीठ,तेल्,साईच दही १ वाटी, वरुन सोडायला २ चमचे तूप.

क्रमवार पाककृती: 

पूर्वतयारी:- चिकनचे पिसेस धुवून त्याला मीठ हळद आणि २ चमचा आलं लसणाची पेस्ट लावून २० मी ठेवावं.
तांदूळ धुवून ठेवावेत., २ कांदे बारीक चीरून घ्यावेत. दोन कांदे उभे बारीक चिरावेत.

पातेल्यात तेल घालून त्यात तमालपत्र,बारीक चिरलेला कांदा, उरलेली आलं लसूणाची पेस्ट घालून सगळं तेल सुटे पर्यंत परतून त्यावं त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालून हे ही चांगल परतावं. नंतर तीखट मीठ गरम मसाला पावडर घालून एक वाफ आणावी.

थोडंस तूप आणि मीठ घालून मोकळा अर्धवट कच्चा भात करुन घ्यावा.
उभा चिरलेला कांदा तेलात चांगला परतून घ्यावा.

आता दुसर्या एका पातेल्यात
हा भात मग चिकन मग दही आणि त्यावर परतलेला कांदा असे एकानंतर एक थर द्यावेत. हे सगळं मिळून झाकण ठेवून साधारण १० मी मंद आचेवर ठेवाव
सर्वात शेवटी उरेलेला कांदा आणि कोथींबीर हवं असल्यास काजुचे तुकडे आणि बेदाणेही घाला.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
मीच

श्यामली, सुंदर आहे कृती...
मांसाहारी पदार्थांमध्ये दही वापरायला जरा भीती वाटते... दही नसले तर चवीत कितपत फरक पडतो?

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

दहि न वापरता पन होतो,पण दह्यामुळे खूपच छान चव येते,
ट्राय करायला हरकत नाहि.

ओह माफ कर साधना, इकडेपण मी काही लिहून ठेवलंय हे विसरुनच गेले होते स्मित , अग साधि घरगुती रेसिपी आहे ही.
पण नेहमी हिट्ट जाणारी. तेंव्हा बिनधास्त करं स्मित